Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

व्यक्तिमत्व विकास शिबिर

$
0
0
येथील मर्दानी कलाविशारद कै. आनंदराव पोवार प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्था आणि महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने मोफत व्यक्तिमत्व विकास आणि कला-क्रीडा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्या वतीने आयोजित केले जाणारे हे पंधरावे मोफत शिबिर आहे.

आपटे वाचन मंद‌िराची शनिवारपासून वसंत व्याख्यानमाला

$
0
0
आपटे वाचन मंदिराची वसंत व्याख्यानमाला ३ मेपासून सुरु होत आहे. सुप्रसिध्द अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा ‘संवाद एका संवेदनशील अभिनेत्रीशी’ या कार्यक्रमाने व्याख्यानमालेचा प्रारंभ होणार आहे.

पावसाने दोन लाखांचे नुकसान

$
0
0
शिप्पूर तर्फ नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे रविवारी जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. आंबेकर यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले. आंबेकर यांच्या राहत्या घरावरचे काही पत्रे उडून गेले, तर सुमारे २५ पत्रे फुटले आहेत.

चंदगडला एक मेपासून चिरायू योजना

$
0
0
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने राज्यात प्रथमच राबविण्यात येणारी चिरायू योजना चंदगड तालुक्यात एक मेपासून कार्यरत होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील नवजात बालकांना प्राथमिक आरोग्य सेवा देऊन अर्भकांचे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी, गरोदर मातांना चांगली सेवा देण्यासाठी ही योजना प्रभावी ठरणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. के. खोत यांनी दिली.

‘पोतदार दाम्पत्याची चौकशी करा’

$
0
0
शाहूवाडीचे गटशिक्षणाधिकारी डॉ. जी. बी. कमळकर यांना पंचायत समिती सदस्या प्रभावती पोतदार यांनी मारहाण केल्यानंतर कमळकर यांनी पोतदार दाम्पत्याविरुद्ध केलेल्या तक्रारीनुसार शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

विजेच्या धक्क्याने शेतकऱ्यासह म्हैस ठार

$
0
0
वन्यप्राण्यापासून शेतीचे संरक्षण व्हावे म्हणून शेताभोवती उभारलेल्या विजेच्या तारांचा स्पर्श होऊन एका शेतकऱ्यासह म्हैस ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी जळकेवाडी (ता. राधानगरी) येथे घडली. ज्ञानू रामा पताडे (वय ३२) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणाची नोंद राधानगरी पोलिसांत झाली आहे.

परिपूर्ण सुविधांनी साकारतोय ‘अनंत प्राईड’ वास्तुप्रकल्प

$
0
0
अनंत इस्टेट डेव्हलपर्सतर्फे हॉकी स्टेडियमनजीक ‘अनंत प्राईड’ या नव्याने उभारण्यात येत असलेल्या गृहप्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पात १०० युनिट्स आहेत. प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे, येथील फ्लॅट्स तीनही बाजूंनी खुले या पध्दतीचे आहेत.

‘शंभूराजांचे चरित्र स्फूर्तिदायी’

$
0
0
‘युवकांनी हिंमत आणि धाडस मिळविण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र वाचायला हवे. त्यातून जगण्याची स्फूर्ती मिळते,’ असे प्रतिपादन प्रा. राजेंद्र ठाकूर यांनी केले. मंगळवार पेठ राजर्षी शाहू तरुण मंडळाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. मिरजकर तिकटी चौकात व्याख्यान झाले.

गोरोबा कुंभार संजीवन समाधी सोहळा उत्साहात

$
0
0
येथील कुंभार समाजामार्फत श्री संत शिरोमणी गोरोबा कुंभार संजीवन समाधी सोहळा भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सोहळ्याची सांगता पालखी मिरवणुकीने झाली.

‘एमसीए’ विद्यार्थ्यांचा पदवीचा मार्ग सुकर

$
0
0
एमसीए अभ्यासक्रमाच्या थेट व्दितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पदवीचा मार्ग मोकळा झाला आहे. कोल्हापूर, सांगली आ​णि सातारा या तीन जिल्ह्यातील १६६ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने ब्रीज कोर्सच्या प्रस्तावासह कुलपती कार्यालयाला विविध नियमावली सादर केल्या होत्या.

जोतिबावर आज गाव भंडारा

$
0
0
श्रीक्षेत्र जोतिबा डोंगरावरील जोतिबा मंदिरात आज पाकाळणीचा विधी झाला. मंदिर आणि परिसराची स्वच्छता करण्यात आली. चैत्र यात्रा काळात होणाऱ्या गुलाल खोबरे उधळणीमुळे मंदिर आणि परिसर गुलाल साचून राहतो, शिखरे, मंदिराचे गाभारे, देवदेवतांची दागिने, तसेच मंदिर परिसराची स्वच्छता करण्यासाठी जोतिबा मंदिरात पाकाळणी विधी करण्यात आला.

भगिनी पुरस्काराचे दिमाखात वितरण

$
0
0
आपल्या अभिनयाने कोल्हापूरच्या मातीचा सुगंध सातासमुद्रापार नेणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना, नॅशनल फिल्म अॅवार्ड विजेती उत्कृष्ट अभिनेत्री उषा जाधव, देवदासींना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या प्रा. साधना झाडबुके, बुद्धिबळात कोल्हापूरचा झेंडा आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकविणारी ऋचा पुजारी आणि मतिमंद मुलांच्या विकासासाठी २२ वर्ष कार्य करणाऱ्या स्मिता दीक्षित यांना महापौर सुनीता राऊत यांच्या हस्ते भगिनी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

मिठाईच्या दुकानावर दोन महिलांची दगडफेक

$
0
0
शहाजी लॉ कॉलेज परिसरातील जसवंत स्वीट मार्ट या मिठाईच्या दुकानावर दोन महिलांनी दगडफेक करत नुकसान केले. या दोन्ही महिला स्वीट मार्टच्या वरील मजल्यावर राहतात. सोमवारी दुपारी दोन वाजता घटना घडली.

‘आयआरबी’कडून २५ कोटींची कामे अपूर्ण

$
0
0
रस्ते प्रकल्पाचे काम सुरु झालेल्या वर्षातील दरांप्रमाणे प्रकल्पातील सुमारे २५ कोटी रुपयांची कामे आयआरबीकडून अपुरी असल्याची माहिती महापालिकेच्यावतीने प्रकल्पाच्या सुकाणू समितीच्या बैठकीत देण्यात आली.

रस्त्यांवरील बंद वाहनांचा सर्व्हे

$
0
0
शहरातील गल्ली बोळात व रस्त्यांवर अनेक दिवस बंद अवस्थेत असलेल्या वाहनांचा सर्व्हे महापालिकेने सुरू केला आहे. आठ दिवसांत हा सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर संबधित वाहनमालकांना आरटीओमार्फत नोटीसा पाठवण्यात येणार आहेत.

विमानतळ विकासकामांना रेड सिग्नल

$
0
0
कोल्हापूर विमानतळाचे हस्तांतर भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाकडे झाले असले तरी विमानतळ विकामकामाचे स्पीड लो आहे. निर्धारीत तीन वर्षांच्या कालावधीत वीस टक्के कामही पूर्ण झालेले नाही.

ग्रामविकासापर्यंतच्या तक्रारी

$
0
0
गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी काँग्रेस कमिटीत भरविलेल्या जनता दरबारात शहरातील लोकांपासून करवीर, शाहूवाडी ते आजरा, कागल, चंदगडपर्यंत सर्वसामान्य कार्यकर्ते, व्यापारी, आणि नागरिकांनी आपल्या विविध समस्या मांडल्या. सुमारे ५०० लोकांनी गृहराज्यमंत्र्यांकडे आपल्या तक्रारी मांडल्या.

रामदेवबाबांना तत्काळ अटक करा

$
0
0
स्वतःला संत, महात्मा समजणाऱ्या रामदेवबाबा यांनी आपल्या विखारी शब्दांनी दलितांच्या अस्मितेवर घातलेला घाला संविधानाच्या पावित्र्याला काळे फासणारा आहे. राहुल गांधी यांच्यावर टीका करताना त्यांनी संपूर्ण दलित समाजाविरोधात हीन प्रवृत्तीचे वक्तव्य केले आहे.

बिबट्या नव्हे रानमांजर

$
0
0
कळंबा, कात्यायनी परिसरात रविवारी बिबट्यासदृश प्राणी दिसल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण व कुतूहल निर्माण झाले होते. मानवी वस्तीपासून काही अंतरावर बिबट्यासदृश प्राणी दिसल्याने वनखातेही खडबडून जागे झाले होते.

फुलेवाडी, पुईखडी रस्त्याची चाळण

$
0
0
एकमेकांना पत्रे पाठवण्याशिवाय काहीच हालचाल न केलेल्या महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागांमुळे फुलेवाडी व पुईखडी या शहराच्या प्रवेशद्वारावरील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images