Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘फनपार्क’मुळे कोल्हापूरला नवी ओळख

$
0
0
‘फनपार्क असोसिएटकडून बनवण्यात आलेली रेल्वे, कोलंबस आदी दर्जेदार खेळणी देशभरात नावाजली जात आहेत. कल्पक आणि आकर्षक खेळणी बनवणाऱ्या फनपार्क असोसिएटसमुळे शहराची नवीन ओळख तयार होईल,’ असा विश्वास कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

बिबट्यासदृश प्राण्याचे बछडे

$
0
0
कळंबा तलावाच्या बॅकवॉटरमधील आंब्याची बाग परिसरात रविवारी दुपारी बिबट्यासदृश्य प्राण्याची दोन बछडे दिसल्याने कळंबा, कात्यायनी परिसरात खळबळ उडाली. त्या दोन बछड्यांच्या अंगावर काळे ठिपके असल्याचे प्रत्यक्ष पाहणाऱ्या व्यक्तीकडून सांगण्यात आले.

बारा जिल्ह्यांत ‘जारूल’ बहरणार

$
0
0
महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल म्हणून सुपरिचित असलेल्या जारूल (तामण) फुलाच्या झाडांची तसेच राज्यवृक्ष असलेल्या अंब्याच्या झाडाची लागवड राज्यातील १२ जिल्ह्यातील २५० निवडक शाळांच्या परिसरात करण्यात आली आहे.

कापशीतील खूनप्रकरणी संशयितास पोलिस कोठडी

$
0
0
सेनापती कापशी (ता. कागल) येथे शुक्रवारी (ता. २५) रात्री झालेल्या तरुणाच्या खूनप्रकरणी संशयिताला ताब्यात घेण्यात आले. बबलू ऊर्फ अनिल भैरू जाधव (वय २०) असे त्याचे नाव आहे. पोलिसांच्या पथकाने रविवारी रात्री उशिरा कराड येथून त्याला ताब्यात घेतले. कागल न्यायालयाने त्याला दोन मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

फुलेवाडी, पुईखडीजवळील रस्ताच गायब

$
0
0
एकमेकांना पत्रे पाठवण्याशिवाय काहीच हालचाल न केलेल्या महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागांमुळे फुलेवाडी व पुईखडी या शहराच्या प्रवेशद्वारावरील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. एका ठिकाणी पाण्याची गळती तर दुसऱ्या ठिकाणी हद्दीचा वाद असल्याने केवळ शंभर ते दोनशे मीटरपर्यंतच्या रस्त्याचे पॅच प्रचंड खराब झाले आहेत. दोन्ही विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याने डांबरीकरण कित्येक वर्षांपासून झालेले नसल्याने तिथून रस्ताच गायब झाल्यासारखी परिस्थिती आहे.

रामदेवबाबांना तत्काळ अटक करा

$
0
0
स्वतःला संत, महात्मा समजणाऱ्या रामदेवबाबा यांनी आपल्या विखारी शब्दांनी दलितांच्या अस्मितेवर घातलेला घाला संविधानाच्या पावित्र्याला काळे फासणारा आहे. राहुल गांधी यांच्यावर टीका करताना त्यांनी संपूर्ण दलित समाजाविरोधात हीन प्रवृत्तीचे वक्तव्य केले आहे. अशा या ढोंगीबाबाच्या सभांना केवळ लखनौपुरती बंदी न घालता संपूर्ण देशभरातील त्यांच्या सभा व योगशिबिरांवर बंदी घालून त्यांना तात्काळ अटक करावी

‘निरी’ च्या शिफारशीप्रश्नी कारवाई करा

$
0
0
पंचगंगा प्रदूषणाबाबत निरी ( राष्ट्रीय अभियांत्रिकी पर्यावरण संशोधन संस्था ) ने उच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालातील सर्व शिफारशींवर त्वरीत कारवाई करावी, या मागणीसाठी पंचगंगा प्रदूषणमुक्ती कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

रामदेवबाबांचा दलित संघटनांच्यावतीने निषेध

$
0
0
राहूल गांधी आणि दलितांबाबत अक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या रामदेब बाबांच्या विरोधात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करून त्यांना अटक करावी, अशी मागणी सातारा शहरातील विविध दलित संघटनांनी केली आहे.

‘सहकारी बँका, पतसंस्था, सोसायट्यांची चौकशी करा’

$
0
0
जिल्ह्यातील सहकारी बँका, ग्रामीण पतसंस्था आणि विकास सेवा सोसायट्यांमध्ये पदाधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या मनमानी कारभाराची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा उपनिबंधकाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

कालवा फोडून पाणी नेण्याची हुकूमशाही मोडून काढू

$
0
0
‘उरमोडी कालव्यातून पाण्याचे आवर्तन सुरू आहे. उपअभियंता व शाखा अभियंत्यावर राजकीय व्यक्तींनी दबाव आणून कालवा फोडून वाटेल तिथे पाणी नेण्याचा हुकूमशाही व्यवहार सुरू केला आहे. ही हुकूमशाही येथील शेतकरी श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून मोडून काढतील आणि पाण्याच्या आवर्तनाला शिस्त लावतील,’ असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

भिक्षेकऱ्यांनी फुलवला श्रमाचा मळा

$
0
0
भिक्षा मागण्यासाठी हात पसरलेला भिक्षेकरी आपणास नेहमीच पहावयास मिळतो. परंतु, याच पसरलेल्या हातांच्या जोरावर दीड एकर ऊस पिकवून लाखोंचे उत्पन्न मिळवून देणारा भिक्षेकरी सातारा येथील सरकारी पुरुष भिक्षेकरीगृहात पहावयास मिळतोय.

बजरंग देसाई यांनी विधानसभा लढवावी

$
0
0
आघाडीची कोणत्याही प्रकारची झूल अंगावर न ठेवता माजी आमदार बजरंग देसाई यांनी येणारी विधानसभा निवडणूक ताकदीने लढवावी, अशी अपेक्षा शेणगाव (ता. भुदरगड) येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. काँग्रेस कार्यकर्ते त्यांच्या विजयासाठी जिवाचे रान करतील, अशी ग्वाहीही यावेळी पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी दिली. श्री. कृष्ण कार्यालयात मेळावा झाला.

लोकप्रिय नेत्यांना डावल्यामु‍ळेच प्रादेशिक पक्षांची वाढ

$
0
0
‘राज्यात ज्या नेत्याची लोकप्रियता आहे. त्यांना डावलायचे आणि दिल्लीत उठबस असणाऱ्यांना राज्यात पाठवायचे. राष्ट्रीय पक्षांच्या या धोरणांमुळेच प्रादेशिक पक्षांची निर्मिती आणि वाढ झाली आहे. ही राष्ट्रीय पक्षांचीच देण आहे,’ असा टोला गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना लगावला.

वीस मेपर्यंत्त टेंभूचे पाणी आटपाडी

$
0
0
ताकारी-म्हैसाळ, टेंभू या योजनांसाठी लागणारा निधी यायला सुरुवात झाली आहे. म्हैसाळ योजनेचे पाणी जत तालुक्यातील कुंभारीच्या तलावात सोडण्यात आले आहे. २० मेपर्यंत्त टेंभूचे पाणी आटपाडी तालुक्यातील भाग्यनगर तलावात पडेल.

‘हॅरी पॉटर’मधील नकाशाचे आकर्षण

$
0
0
जे. के. रोवलिंग यांनी लिहिलेल्या जगप्रसिद्ध हॅरी पॉटर या पुस्तकातील सातही खंडात दाखवण्यात आलेला तसेच हॅरी पॉटर सिनेमात ही दाखवण्यात आलेला टायपोग्राफिक नकाशा आर्टिस्ट अविनाश खरात यांनी साकारला आहे. शाहू स्मारक भवनात सुरू असलेल्या टायपोग्राफिक, कॅलीग्राफिक पोट्रेट आणि वारली पेंटिंगच्या प्रदर्शनात हा नकाशा पाहण्यासाठी ठेवण्यात आला आहे. यासह येथे रवींद्रनाथ टागोर, नेल्सन मंडेला, सचिन तेंडुलकर, मर्लिन मन्रो, आइन्स्टाइन, लेनीन यांची पोट्रेट कॅलिग्राफी आणि टायपोग्राफीतून साकारलेली आहेत.

जयसिंगपुरात कडकडीत बंद

$
0
0
कोथळी (ता. शिरोळ) येथे झालेल्या दगडफेक प्रकरणातील सर्व आरोपींना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी दलित संघटनांच्या वतीने जयसिंगपूर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. दलितांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे त्वरित मागे घ्यावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. दरम्यान, या पार्श्वभूमीवर दलित संघटनांनी पुकारलेल्या जयसिंगपूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पक्षी आश्रयस्थानात पाणीटंचाई

$
0
0
मायणी येथील इंदिरा गांधी पक्षी आश्रयस्थानात पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे येथील ब्रिटीश कालीन तलावाच्या परिसरात सध्या किलबिलही येथे ऐकू येत नाही. येथील पक्षी वैभव टिकविण्यासाठी तत्काळ पाण्याची सोय करणे गरजेचे आहे.

साताऱ्यात मेघगर्जनेसह पाऊस

$
0
0
सातारा शहर आणि परिसरात सोमवारी सायंकाळी पाऊस मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली.

डेस्टिनेशन कोल्हापूर

$
0
0
सुमारे दीड महिन्याच्या सुटीच्या कालावधीत जिल्ह्यातील विविध पर्यटन आणि धार्मिक स्थळांना कुटुंबीयांसह भेटीचे नियोजन केले जात आहे. कोल्हापूरपासून अगदी पाच किलोमीटरपासून ते तीनशे किलोमीटर अंतरापर्यंतच्या पर्यटनाला पसंती दिली आहे. इच्छित ठिकाणी पोहोचण्यासाठी दळणवळण यंत्रणाही सज्ज झाली आहे. रेल्वे, एसटी आणि खासगी आराम बस, ट्रॅव्हल्सच्या बुकिंगला मोठी गर्दी आहे. युवा वर्गासाठी अभ्यास आणि पर्यटन असे कॉम्बीनेशन करुनच सहलीचे नियोजन सुरु आहे. उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी आणि इनडोअर म्हणून सर्वसोयीनियुक्त वॉटर पार्कलाही पसंती दिली जात आहे.

कडकडीत बंद

$
0
0
कोथळी (ता. शिरोळ) येथे झालेल्या दगडफेक प्रकरणातील सर्व आरोपींना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी दलित संघटनांच्या वतीने जयसिंगपूर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images