Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘घनकचरा’प्रश्नी मुदतवाढ

$
0
0
शहरातील घनकचऱ्याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावलेल्या नोटीसला उत्तर देण्यासाठी महापालिकेने आठ दिवसाची मुदत वाढवून घेतली आहे. निवडणूक कामासाठी अधिकारी व कर्मचारी व्यस्त असल्याचे कारण मुदतवाढीसाठी दिले आहे. दरम्यान, पंचगंगा नदीमध्ये मृत आढळलेल्या माशांचा फॉरेन्सिक लॅबचा अहवाल महिन्यानंतर येण्याची शक्यता आहे.

सतीश कामतांना पुरस्कार

$
0
0
दिवंगत ज्येष्ठ पत्रकार वरुणराज भिडे पत्रकारिता पुरस्कार यंदा रत्नागिरी येथील ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत यांना देण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण २७ एप्रिलला सकाळी १०.३० वाजता पुणे येथील गरवारे कॉलेजच्या सभागृहात होणार आहे.

कॅल्शियम कार्बाइडचा फंडा

$
0
0
भाताचे पिंजर, गवताची अढी पसरून पारंपरिक पद्धतीने आंबे पिकवण्याऐवजी व्यापारी मंडळी कॅल्शियम कार्बाईडचा वापर करत आहेत. रासायनिक प्रक्रियेने आंबे पिकवण्याच्या या फंड्यामुळे खवय्यांना पोटाच्या विकारांना सामोरे जावे लाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

‘खासबाग’चे नूतनीकरण गतीने

$
0
0
मान्यता नाही, निधी नाही, टेंडर नाही अशा विविध कारणांनी कोल्हापुरातील अनेक प्रकल्प रखडले होते. पण निधी मिळाल्याने केशवराव भोसले नाट्यगृह, शाहू खासबाग मैदान, सांडपाणी प्रकल्प, जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या बांधकामासह अनेक कामांना गती आली आहे, अशा प्रकल्पांचा आढावा...

पंचगंगा नदीत पाणी सोडा

$
0
0
पंचगंगा नदीमध्ये असलेल्या प्रदुषित पाण्याची तीव्रता कमी होण्यासाठी नदी कायमस्वरुपी प्रवाहित ठेवण्यासाठी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्याचे नियोजन करावे अशी मागणी जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्याकडे करण्याचा निर्णय मंगळवारी नगरपालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. बिस्मिला मुजावर होत्या.

पावसाचा ‘महावितरण’ला तडाखा

$
0
0
गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार वादळी वारा आणि पावसामुळे कोल्हापूर विभागात विजेचे सुमारे साडेचारशे पोल उन्मळून पडले, तर १८ किलोमीटर विद्युत तारेचे नुकसान झाले. याचा फटका २७ गावांतील साडेपाच हजारहून अधिक ग्राहकांना बसला आहे. नेमका वीजपुरवठा कोठे खंडित झाला, याचा शोध घेणारी महावितरणची ‘स्काडा’ यंत्रणा अद्यापही कार्यान्वित न झाल्याने इतरांना उजेड देणारी महावितरणची यंत्रणाच अंधारात चाचपडत आहे.

गावठी आंबा सध्या तेजीत

$
0
0
योग्य प्रकाश आणि तापमानामुळे यंदा गेल्या वर्षीपेक्षा बाजारात गावठी आंब्याचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. तसेच हापूस आणि देवगडच्या आंब्यांच्या वाढलेल्या दरांमुळेही गावठी आंबा सध्या मार्केटमध्ये तेजीत आहे.

‘आयआरबी’कडून पॅचवर्क सुरू

$
0
0
अपूर्ण कामांमुळे हायकोर्टाने टोलवसुलीला ​स्थगिती दिल्याने ‘आयआरबी’ने प्रकल्पातील अपुऱ्या कामांचा सर्व्हे करून पहिल्या टप्प्यात खड्ड्यांच्या पॅचवर्कचे काम सुरू केले आहे. कसबा बावडा परिसरात तसेच सर्किट हाउस ते सीपीआर चौक रस्त्यावर ठिकठिकाणी युटिलिटी शिफ्टिंगसाठी केलेल्या खोदाईचे तातडीने पॅचवर्क चालवले आहे.

पालिका ग्रीन ट्रॅब्युनलच्या दारात

$
0
0
लँडफिल साइटअभावी शहरातील कचऱ्याचा प्रश्न लटकलेला असताना न्यायालयीन सुनावणीत आणखी कालावधी जाण्यापेक्षा लवकर निर्णय घेण्यासाठी महापालिकेने आता पुणे येथील राष्ट्रीय हरित प्राधिकरणाकडे (ग्रीन ट्रॅब्युनल) धाव घेतली आहे.

‘नगरोत्थान’ची कामे ट्रॅकवर

$
0
0
चार वर्षांपासून रखडलेल्या नगरोत्थान अभियानातील काही अपूर्ण रस्त्यांच्या कामाला गती येऊ लागली आहे. वेगवेगळ्या पॅकेजमधील काही रस्त्यांची कामे सुरु करण्यात आली आहेत. १५ मेपर्यंत किमान ५० टक्के रस्ते पूर्ण करण्याचे टार्गेट आहे.

‘ट्रॅफिक’मध्ये अडथळेच अडथळे

$
0
0
शहरातील २२ पैकी ९ ट्रॅफिक सिग्नल सुरू झाल्याने वाहतूक सुरळीत होऊ लागली आहे. मात्र चौकातील अवैध वाहतूक, रिक्षा स्टॉप व फेरीवाल्यांनी रस्त्यांवर मांडलेले ठाण यामुळे वाहतुकीचे नियोजन करताना अडचणी येत आहेत.

गटशिक्षणाधिकाऱ्यांना मारहाण

$
0
0
शाहूवाडीचे गटशिक्षणाधिकारी जी. बी. कमळकर यांना पंचायत समिती सदस्य प्रभावती पोतदार यांनी जिल्हा परिषदेच्या आवारातच चप्पलने मारहाण केली. शाळा खोल्यांच्या बांधकामाचे बिल आणि शिक्षक गैरहजेरी चौकशी अहवालावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडला.

५७ कोटी बँकेत, गैरसोयी मंदिरात

$
0
0
एक दोन नव्हे तर १४ ते १५ कोटीचे उत्पन्न महालक्ष्मी मंदिरातून दरवर्षी देवस्थान समितीला मिळते. जोतिबा मंदिरात कोटी​ रूपये मिळतात. ही रक्कम भाविकांना सुविधा देण्यासाठी खर्च करणे अपेक्षित आहे. पण तसे करण्यापेक्षा बँकेत ठेवी ठेवण्यातच देवस्थान समिती धन्यता मानते.

विश्वास आणि खात्रीचा परतावा

$
0
0
जागतिक मंदी असतानाही बँकांनी निर्माण केलेला विश्वास आणि सोयी-सुविधांमुळे बँकांच्या ठेवींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. शेअर बाजारातील अनिश्चितता, सोन्या-चांदीच्या दरातील सततची चढउतार आणि प्लॉटमध्ये होणारी गुंतवणूक कमी झाल्यामुळेच बँकांच्या ठेवींमध्ये वाढ झाली आहे.

कामगार, नेत्यांवर कारवाई करा

$
0
0
यंत्रमाग कामगारांना दिलेली अॅडव्हान्सची रक्कम बुडविण्याची प्रवृत्ती शहरात वाढली आहे. त्यामुळे शहरात अशांतता माजली आहे.

टंचाई आराखडा बेदखल

$
0
0
उन्हाळा सुरू झाल्यानंतर आजरा तालुक्यातील अनेक गावांना पाणीप्रश्न भेडसावतो. त्यानुसार पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी विविध योजना राबविण्यासाठीचा आराखडा मंजूर केला जातो व जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात येतो. मात्र गेल्या काही वर्षात अशा आराखड्यांबाबत जिल्हा प्रशासनाकडून कोणतेही गांभीर्य दाखविले जात नाही.

जितेंद्र सरनोबतला सक्तमजुरी

$
0
0
पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले पोर्ले येथील दत्त सहकारी साखर कारखान्याच्या आवारात रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार करून दोघांना गंभीर जखमी करणाऱ्या जितेंद्र गणपतराव सरनोबत (वय ३५, रा. राजमोती अपार्टमेंट, शिवाजी पार्क) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी सात वर्षे सक्त मजुरी व एक हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.

यंत्रमाग कामगाराचा निर्घृण खून

$
0
0
खंजिरे औद्योगिक वसाहतीतील एका पडक्या इमारतीत यंत्रमाग कामगाराचा डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. गोविंद बाळू भिसे (वय ५५ रा. जीकेनगर, तारदाळ) असे मृताचे नाव आहे.

बेशिस्तीमुळे ‘रेड सिग्नल’

$
0
0
शहरातून जाणाऱ्या कोल्हापूर-रत्नागिरी राज्य मार्गावर सात सिग्नल सुरू करताना शहर वाहतूक नियंत्रण शाखा, प्रादेशिक परिवहन विभाग आणि महापालिकेने कोणतेही नियोजन न केल्याने वाहनचालकांच्या मनःस्तापात वाढ झाली आहे.

‌हस्तक्षेप झुगारल्यामुळे कृत्य

$
0
0
पंचायत समिती सदस्य प्रभावती पोतदार व त्यांचे पती प्रकाश पोतदार यांनी आपल्यावर केलेला हल्ला हा पूर्वनियोजित कट होता. सभापती म्हणून त्या कार्यरत असताना नियमबाह्य कामांना दिलेला नकार आणि शिक्षक बदल्यातील हस्तक्षेप झुगारत ऑनलाइन पध्दतीने बदल्या केल्याच्या रागापोटी त्यांनी मारहाण केली, असा आरोप डॉ. जी. बी. कमळकर यांनी गुरूवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत केला.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images