Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

योजना फसल्याने आजरा कोरडाच

$
0
0
आजरा तालुक्याच्या विषम भौगोलिक स्थितीमुळे दक्षिण आणि पश्चिम भागात पाण्याचे नैसर्गिक स्रोत तर पूर्व व उत्तर परिसरात ठणठणाट अशी स्थिती कायम आहे. चित्रीव्यतिरिक्त उचंगी व अंबेओहोळ प्रकल्प रखडल्याने अनेक गावांतील पाणीयोजना असूनही गावे दहानलेली आहेत.

मुबलक पाणी असूनही प्रश्न कायम

$
0
0
जिल्ह्यात भुदरगड तालुक्याची डोंगराळ आणि दुर्गम तालुका अशी ओळख आहे. १९९० च्या काळात पिण्याच्या पाण्यासाठी डोंगर कपारीत वणवण भटकावे लागायचे, नदीमध्ये खड्डे मारून पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करावी लागत होती. डोंगरातील गावांना जिवंत झऱ्याचा आधार शोधावा लागायचा. मार्च महिना सुरु झाला की अख्खा दिवस पाण्यासाठी वाया घालवावा लागायचा.

भूलतज्ज्ञ नाही शस्त्रक्रिया थांबल्या

$
0
0
दर महिन्याला आयोजित करण्यात येणारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर भूलतज्ज्ञच नसल्याने रद्द करण्यात आले. ऐनवेळी याबाबत संबंधितांना कल्पना देऊन शिबिर रद्द झाल्याचे दूरध्वनीवरून कळविण्यात आले. त्यामुळे या शस्त्रक्रियेसाठी आलेल्या अकारण त्रास सहन करावा लागला.

कारखानदाराची फसवणुकीमुळे आत्महत्या

$
0
0
कामगारांना दिलेली अंगावरील बाकी परत न मिळाल्याच्या नैराश्यातून येथील भोनेमाळ परिसरातील यंत्रमाग कारखानदार मेघराज नरसू जाधव यांनी मंगळवारी कारखान्यात गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकाराने यंत्रमागधारकांमध्ये खळबळ उडाली. या प्रकरणाची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे.

गडहिंग्लजमध्ये रस्त्यांचे काम बंद पाडले

$
0
0
येथील उपजिल्हा रूग्णालयासमोरील रस्त्याचे काम सुरु आहे. मात्र रस्ता स्वच्छ न करता तसेच कमीप्रमाणात डांबर वापरून रस्ताचे काम सुरु आहे असे सांगत विरोधी नगरसेवकांनी रस्त्याचे काम बंद पाडले. दरम्यान नगर अभियंता रमेश पाटील यांनी संबधित ठेकेदारास सदर रस्ता नव्याने करण्याचे आदेश दिल्यावर विरोधकांनी माघार घेतला.

आजरा कारखान्याचे गाळप २५ हजार टनांनी वाढले

$
0
0
आजरा तालुका सहकारी साखर कारखान्याने यावर्षीच्या गळीत हंगामामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत २५ हजार टनापर्यंत अधिक उसाचे गाळप केले आहे. यासाठी विशेषत: तालुक्यातून बाहेर जाणारा उस रोखण्यात यावेळी प्रशासनाला यश आल्याचे चित्र आहे. यावर्षी एकूण ३ लाख ५४ हजार ६३७ टन ऊस गाळप करण्यात आला.

विवाहितेच्या छेडछाडप्रकरणी गुन्हा

$
0
0
विवाहित महिलेची छेड काढल्याप्रकरणी येथील एका स्केटींग क्लासचालकाच्या विरोधात शिवाजीनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. उत्तमसिंग रजपूत (रा. स्वामी समर्थ मंदिराजवळ रिंगरोड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तलवार घेऊन फिरणाऱ्या तरुणास अटक

$
0
0
येथील गावभाग परिसरात तलवार घेऊन फिरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. अरमान अरिफ मोमीन (वय २१ रा. भाग्यश्री कॉलनी) असे त्याचे नांव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून तलवार जप्त केली आहे. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, पोलिस गस्त सुरु असताना थोरात चौकातील भाजी मार्केट परिसरात अरमान मोमीन हा संशयितरित्या फिरताना आढळला.

जूनपासून शिक्षकांचा बहिष्कार

$
0
0
शहरातील गंगामाई गर्ल्स हायस्कूलकडील मुख्याध्यापकांची झालेली नेमणूक अवैध असल्याने गेले चार महिने विद्यालयाकडील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाहीत. पगार झाले नसल्याने कर्जाचे हप्ते, व्याज, विम्याचा हप्ता अशा वित्तीय संस्थांच्या संकटाबरोबर दैनंदिन खर्चाची समस्या शिक्षकांसमोर उभी राहिली आहे.

महावितरणच्या योजनांचा अभ्यास

$
0
0
महावितरणच्या पायाभूत आराखडा, भारनियमनाचे नियमन, माहिती तंत्रज्ञान इत्यादी कामांची देशाच्या विद्युत क्षेत्रात यापूर्वीच चर्चा सुरू झाली आहे. कर्नाटकातील बेंगलोर इलेक्ट्रीक सप्लाय कंपनी लि. ( बेसकॉम ) महावितरणच्या योजनांचा अभ्यास करण्यासाठी येणार आहे. तशी विनंती या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पंकजकुमार पांडे यांनी ऊर्जा विभागाच्या सचिवांना पत्र लिहून केली आहे.

एचआयव्हीग्रस्तांचा वधू-वर मेळावा

$
0
0
सामाज‌िक बांधिलकीच्या दृष्ट‌िकोनातून येथील मेडिकल असोसिएशन ऑफ इचलकरंजी, माई आधार केंद्र आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्या वतीने एच.आय.व्ही. पॉझीटिव्ह व्यक्तींसाठी रविवार २७ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी एक या वेळेत सर्वधर्मीय मोफत सहावा वधू-वर परीचय मेळावा आयोजित केला आहे. येथील टी. बी. क्लिनिक, डाळया सभागृह, कल्याण केंद्रजवळ येथे हा मेळावा होणार आहे.

बेकायदा वसुलीविरोधात आयोगाकडे याचिका

$
0
0
कृषी पंपांसाठी नवीन वीज जोडणी देताना ओआरसी व ओआरसीपी अशा नावाखाली महावितरण कंपनीस वीज खांबाचा किंवा विद्युत वाहिनी, आदी खर्च घेण्यास महाराष्ट्र ऊर्जा नियामक आयोगाने बंदी केली आहे. तरीही शेतकऱ्यांकडून वीज जोडणीचा संपूर्ण खर्च वसूल करण्याचा घाट महावितरण कंपनी करीत आहे.

ऑनलाइन देवदर्शन ऑफलाइनच

$
0
0
महालक्ष्मी, जोतिबासह अनेक देवदेवतांचे ऑनलाईन दर्शन घडविण्याची घोषणा झाली, वर्षभरानंतरही कोणताच देव समितीला पावत नसल्याने दर्शन ऑफलाईनच आहे. कोटीचे उत्पन्न मिळवून देणारा हा उपक्रम असूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. दरम्यान,सतरा हजार एकर जमिनीचे खंड कोटीपर्यंत अपेक्षित असताना प्रत्यक्षात वीस लाखांपर्यंतच वसूल होतो आहे.

आरसी गँगचे १५ जण जिल्ह्यातून हद्दपार

$
0
0
जवाहरनगर, राजेंद्रनगर व सुभाषनगर परिसरात दहशत माजवणाऱ्या आर.सी. गँगच्या १५ जणांना पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. खून, खुनाचा प्रयत्न, गर्दी, मारामारी, अपहरण, शिविगाळ, तोडफोडीचे गुन्ह्यात हद्दपार केलेल्यांचा समावेश आहे.

खासगी आराम बसचे प्रवास भाडे दुप्पट

$
0
0
खासगी आराम बसमालकांनी विविध मार्गावरील प्रवासाचे भाडे दुप्पट केले आहेत. त्याचा आर्थिक फटका प्रवाशांना सोसावा लागत आहे. भाडे आकारणीच्या तुलनेत आराम बसमधून प्रवाशांना सुविधा दिल्या जात नसल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. दाभोळकर कॉर्नर येथील चौकात रात्रीपासून प्रवासी वाहुतकीसाठी खासगी आराम बसेस सज्ज झाल्या आहेत.

क्रशर चौकात मारामारी

$
0
0
आमच्या गल्लीत मुलींची चेष्टा करायची नाही, असा दम भरल्यानंतर चिडलेल्या सुर्वेनगर व पाचगावातील युवकांनी तलवार, लोखंडी गजाने केलेल्या हल्ल्यात अशिष शशिकांत जाधव मिठारी (वय २३, रा. मिठारी मळा, साने गुरूजी वसाहत), केतन पाटील गंभीर जखमी झाले. क्रशर चौकातील एकजुटी तरूण मंडळाच्या परिसरात सोमवारी रात्री साडेआठ वाजता घटना घडली.

कनवा डॉट कॉम वेबसाइटचे उद‍्घाटन

$
0
0
सुमारे १६३ वर्षाची परंपरा असलेल्या करवीर नगर वाचन मंदिर या ग्रंथालयाच्या www.kanwa.com या वेबसाइटचे उदघाटन महापालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते मंगळवारी झाले. वाचकांमध्ये ‘कनवा’ या नावानेच संबोधित होत असलेल्या या ग्रंथालयाच्या वेबसाइटच्या माध्यमातून एक लाख १६ हजार पुस्तकांची माहिती ऑनलाइन मिळणार आहे.

ऊर्जा संवर्धनाचा पथदर्शी प्रकल्प

$
0
0
विजेचे वाढते दर आणि वीज बिलापोटी दर महिन्याला खर्ची पडणारी लाखो रूपये यावर उपाय शोधताना शिवाजी विद्यापीठाने कॅम्पसमध्ये ‘एनर्जी पार्क’उभारणीचा प्रोजेक्ट तयार केला आहे. हा प्रोजेक्ट मं​जुरीसाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा), राज्य सरकार व कुलपती कार्यालयाकडे पाठविला आहे. अपारंपरिक ऊर्जा निर्मितीचा प्रोजेक्ट कार्यान्वित झाल्यास विद्यापीठाच्या वीज बिलात तीस ते पस्तीस टक्के कपात होणार आहे.

‘प्रदूषण नियंत्रण’ने घेतले रंकाळ्यातील नमुने

$
0
0
पंचगंगेनंतर रंकाळ्यातही काही मासे मेल्याच्या घटनेमुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मंगळवारी रंकाळ्यातील पाण्याचे नमुने घेतले. रंकाळयात मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी सुरु असलेल्या कामाची वाढीव मुदत संपूनही आठवडा उलटला तरी काम अजूनही अपूर्ण आहे.

धमकी देऊन युवतीवर बलात्कार

$
0
0
इंटरनेटवर फोटो अपलोड करण्याची धमकी देऊन युवतीवर बलात्कार करणाऱ्या सुनील राजाराम पाटील (वय २८, रा. आमशी, ता. करवीर) या तरूणाला करवीर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने आरोपी पाटील याला सात दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images