Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सोलापुरात ५७; माढ्यात ६२ टक्के

0
0
सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर आणि माढा मतदारसंघात अनुक्रमे ५७ टक्के आणि ६२ टक्के मतदान झाले. मतदानयंत्रांत बिघाड झाल्याने काही ठिकाणी यंत्रे बदलण्यात आली. मतदार यादीतून नाव अचानक गायब झाल्याचा फटका काही मतदारांना बसला.

साताऱ्यात ५७ टक्के

0
0
सातारा मतदारसंघात ५७ टक्के मतदान झाले. या मतदारसंघातील १८ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले. २१ ठिकाणी मतदानयंत्रात बिघाड झाल्यामुळे ती बदलण्यात आली.

विनंती न करताही नावे गायब कशी?

0
0
गेल्या लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतर महापालिका निवडणुकीत मतदान केलेल्या अनेकांची नावे यंदा मात्र मतदारयादीतून गायब झाल्याचे आढळून आले. त्यामुळे या मतदारांना मतदानापासून वंचित रहावे लागले.

सांगलीत ६५ टक्के मतदान

0
0
सांगली मतदारसंघात सरासरी ६५ टक्के मतदान झाले. मतदान सुरू झाल्यानंतर चार मशिन नादुरुस्त झाल्याने बदलण्यात आली. ढाणेवाडी (ता. पलूस) गावाने मतदानावर बहिष्कार टाकला, पण तेथे एक पुरुष आणि एका महिलेने मतदानाचा हक्क बजावला.

पन्हाळा पश्चिममध्ये जोर

0
0
पन्हाळा तालुक्यात शांततेत सरासरी ६७ टक्के मतदान झाले. तालुक्यातील पूर्व भागापेक्षा पश्चिम भागात मतदान जास्त झाले. तालुक्यातील कोल्हापूर मतदारसंघात असणाऱ्या कळे, बाजारभोगाव आणि यवलूज परिसरात सरासरी ८० टक्के मतदान झाले.

कागलमध्ये अफवा आणि इर्षा

0
0
निवडणुकीच्या केंद्रस्थानी असलेल्या कागल तालुक्यात चुरशीने मतदान झाले. संवेदनशील असलेल्या बोरवडे येथे दोन गटात किरकोळ बाचाबाची झाली तर मुरगूड येथील काही काळ झालेला तणाव वगळता कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

इस्लामपुरात बाचाबाची, पोलिसाचा धिंगाणा

0
0
इस्लामपूर विधानसभा मतदार संघात काही किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. दोन लाख ४३ हजार ४७८ मतदारापैकी एक लाख ७६ हजार ४४८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

शिरोळमध्ये पावसाचा व्यत्यय

0
0
हातकणंगले लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी शिरोळ तालुक्यात चुरशीने मतदान झाले. किरकोळ शाब्दिक बाचाबाची वगळता कोणतीही अनुचित घटना घडली नाही. सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास शिरोळ येथे सोसाट्याचा वारा व मेघगर्जनेसह पाऊस झाला.

इचलकरंजीत ७२ टक्के मतदान

0
0
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात आज उत्स्फूर्तपणे ७२ टक्के मतदान झाले. मतदारांनी कोणाची प्रतीक्षा न करता स्वयंस्फूर्तीने केलेले मतदान हे लक्षवेधी ठरले. रात्री उशीरापर्यंत अनेक केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.

उत्सुकता, हुरहुर आणि आनंद

0
0
पहिल्यांदा मतदान करताना कुणाला भीती वाटत होती तर कुणाला हूरहुर होती. पण आपल्याला मिळालेल्या हक्काचा योग्य वापर करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, याची जाणीवही झाल्याची कबुली नवमतदारांनी मतदानानंतर दिली.

शिराळ्यात मतदान यंत्रांमध्ये बिघाड

0
0
पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त निवडणूक निर्णय अधिका-यांचे काटेकोर नियोजन यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी आज शिराळा तालुक्यात सरासरी ७३ टक्के मतदान झाले.

राधानगरीत मताधिक्यासाठी चुरस

0
0
कोल्हापूर लोकसभेसाठी राधानगरी तालुक्यात अत्यंत चुरशीने सरासरी ७७.०७ टक्के इतके मतदान झाले. आपल्याच उमेदवारास सर्वाधिक मतदान व्हावे यासाठी आघाडी व महायुतीमध्ये जोरदार चुरस असल्याचे चित्र येथे होते.

भुदरगडमध्ये दुपारनंतर जोर

0
0
भुदरगड तालुक्यातील १६८ मतदान केंद्रांच्यावर आज चुरशीने सरासरी ७३ टक्के मतदान नोंद झाली. सकाळपासूनच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात उत्साह जाणवत होता. तर मोठ्या लोकसंख्येच्या गावात सकाळी मतदानास तुरळक गर्दी जाणवत होती.

सकाळपासूनच रांगा

0
0
शेतीची कामे आवरून मतदानासाठी लावलेल्या रांगा, गठ्ठा मतदानासाठी प्रत्येक गल्लीतून उमेदवारांच्या समर्थकांच्या सोबत मतदान केंद्रापर्यंत जाण्याची चुरस कोल्हापूर आणि हातकणंगले मतदार संघातील गावा गावांत दिसत होती.

महाराणा प्रताप चौकात वादावादी

0
0
महाराणा प्रताप चौकात ​राष्ट्रवादी व शिवसनेच्या कार्यकत्यांत वाद झाला. दोन्ही गटाचे कार्यकर्ते शिवीगाळ करत अंगावर धावून गेल्याने चौकात तणाव वाढला. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत कार्यकर्त्यांना पिटाळून लावले. गुरूवारी सकाळी साडेअकरा वाजता ही घटना घडली.

रॅम्पअभावी अपंग मतदारांची गैरसोय

0
0
रॅम्पची व्यवस्था नसल्यामुळे तसेच रेलिंग, बसण्यासाठी खुर्ची नसल्यामुळे अपंग मतदारांची मतदान करताना मोठी गैरसोय झाली. शहरातील विवेकानंद कॉलेज येथे अपंगासाठी रॅम्प नसल्यामुळे काही अपंगांना मतदानापासून वंचित रहावे लागले.

सरनोबतवाडीत अनेक नावेच गायब

0
0
शहरालगतच्या उचगाव आणि सरनोबतवाडी तसेच शिवाजी विद्यापीठ परिसरात मतदारांचा मोठा उत्साह दिसत होता. काही ठिकाणी चुकीचे नाव, तर काही ठिकाणी मतदार यादीत नाव नसल्याच्या तक्रारी होत्या.

मशिनसह ४० कर्मचारी रस्त्यावरच

0
0
बाजारभोगाव निवडणूक केंद्रातील मतदान प्रक्रिया आटपून कोल्हापूरकडे येणाऱ्या ४० निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लबॅक बसमधील डिझेल वारनूळ हद्दीजवळ संपल्यामुळे त्यांना मतदान मशीनच्यासह रस्त्यावरच थांबावे लागले.

ईर्षा आणि उत्साह

0
0
उमेदवारांच्या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीतील चढाओढ, पक्षीय उमेदवाराला मताधिक्य मिळवून देण्यासाठी पायाला भिंगरी बांधल्यासारखे धावणारे कार्यकर्ते आणि नवमतदारांचा ओसांडून वाहणारा उत्साह, मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांच्या लागलेल्या रांगा आणि सर्वत्र जाणवणारा निवडणुकीचा माहौल असे चित्र शहरात गुरूवारी पाहायला मिळाले.

मतदानाचा बासष्ट वर्षांतील उच्चांक

0
0
लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी मतदारांनी उत्साहाने आणि उत्स्फूर्त मतदान केल्याने राज्यात कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघांसाठी उच्चांकी मतदान झाले. कोल्हापूर मतदारसंघात ७२.२३, तर हातकणंगले मतदारसंघात ७३.२४ टक्के मतदानाची नोंद झाली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images