Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

दोन महिलांचे गंठण लंपास

$
0
0
दोन वेगवेगळ्या घटनेत मेहजबीन अश्पाक अहमद (वय ३७, रा. गुलमोहर अपार्टमेंट, सरदार कॉलनी) व नीता नृसिंह अपसंगी (वय ४५, रा. कृष्णराव साळोखे हौसिंग सोसायटी, शांती उद्यान, आपटेनगर) या दोन महिलांचे मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी गंठण हिसकावून लंपास केले.

पंचगंगा शुद्धीकरण मोहीम

$
0
0
पंचगंगा प्रदूषणाला शहरातील प्रमुख नाल्यांबरोबर अन्य बारा नाल्यांमधीलही सांडपाणी कारणीभूत असून ‘नीरी’ने हायकोर्टला सादर केलेल्या अहवालातून बारा नाल्यांसाठी निधी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

आरोग्याचे प्रश्न सोडवू!

$
0
0
‘जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून केवळ आठ महिन्यांचा कालावधी मिळणार असला तरीदेखील त्यामध्ये चांगला कारभार करू, गरज लागल्यास रविवारी देखील काम करू आणि जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवू ’, असा विश्वास जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष उमेश आपटे यांनी व्यक्त केला.

गडहिंग्लज पालिकेची ९० टक्के करवसुली

$
0
0
गडहिंग्लज नगरपालिकेने आर्थिक वर्षात ९० टक्के करवसुली केली आहे. लोकसभा निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात पालिका कर्मचारी अडकून असतानाही केवळ नियोजनबद्ध कार्यप्रणालीवर वसुलीपथकांनी करवसुली यशस्वीरीत्या केली आहे.

गोल्डन ज्युबिली निधीचा विसर

$
0
0
विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठया थाटामाटात विद्यापीठाला ‘गोल्डन ज्युबिली’ निमित्त विविध प्रोजेक्टसाठी २०१२ ते ३१ मार्च २०१५ या कालावधीत ४० कोटी ३३ लाखाचा निधी मंजूर केल्याची घोषणा केली. ​संपलेल्या आर्थिक वर्षात सरकारकडून विद्यापीठाला १८ कोटी ७० लाख रूपये मिळणे अपेक्षित असताना एक पैसा देखील मिळाला नाही.

मोदी म्हणजे ‘एटीकेटी’तील विद्यार्थी

$
0
0
मोदींना भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करणे म्हणजे इतिहास, गणित, भूगोल विषयात एटीकेटी घेणाऱ्या विद्यार्थ्याला पहिला आल्याचे घोषित करण्यासारखे आहे,’ अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी पत्रकार परिषदेत केली.

‘काँग्रेस कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीने संपविले’

$
0
0
‘राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार आहे. मात्र, राष्ट्रवादीने गेल्या पाच वर्षांत आघाडी धर्म न पाळता काँग्रेसचे प्रामाणिक कार्यकर्त्यांना हेरून त्यांना संपविण्याचे काम केले आहे,’ अशी टीका माजी आमदार संजय घाटगे यांनी केली. पिंपळगाव खुर्द आणि व्हन्नूर येथे जाहीर सभेत ते बोलत होते.

वैभव नायकवडींचा आघाडीला पाठिंबा

$
0
0
हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी यांनी सांगली, सातारा, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांतील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले.

अनुभवाचे सोने करेन

$
0
0
मी विचारांशी बांधिलकी मानणाऱ्या पक्षाचा कार्यकर्ता आहे. हीच माझी मोठी ताकद आहे. विरोधी उमेदवार तिकीटासाठी पक्ष बदलणारे आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून मी या आधीही मतदारसंघात निष्ठेने कामे केली आहेत. हा अनुभव माझ्यादृष्टीने मोठे संचित आहे. - संपतराव पवार- पाटील, शेतकरी कामगार पक्ष, कोल्हापूर मतदारसंघ

बंडाच्या इशाऱ्यानंतर थैली सुटली

$
0
0
मतदान आठ दिवसावर आले तरी कार्यकर्ते ‘रिचार्ज’ होण्यासाठी जे काही लागते तेच मिळत नसल्याने नाराजी वाढली. त्यातून दुसरेच कारण पुढे करत राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी बंडांचा झेंडा हाती घेतला. याची कुणकुण लागताच नेते सक्रीय झाले. नेमके काय हवे आहे हे लक्षात आले. त्याची पूर्तता झाली आणि सगळेच बंडोबा थंडोबा झाले

उमेदवारांना प्रतीक्षा निधीची

$
0
0
पक्षाचे चिन्ह घेऊन लोकसभेच्या रणांगणात उतरलेल्या उमेदवारांना फुल ना फुलाची पाकळी म्हणत पक्षानेही मदतीचा हात पुढे केला आहे. प्रचाराचे साहित्य बहुतेक सर्वच उमेदवारांना मिळाले असले तरी आता प्रतीक्षा आहे ती आर्थिक मदतीची.

प्रचाराला आपुलकीचा स्पर्श

$
0
0
‘काय म्हणता मावशी... ? तब्येत कशी आहे ?’ अशी आपुलकीची हाक देत प्रत्येक घरात हक्कानं शिरणाऱ्या माजी खासदार निवेदिता माने यांच्यासाठी हातकणंगले मतदारसंघ म्हणजे पायाखालची वाट याची पदोपदी प्रचिती येते. सकाळी साडेआठच्या ठोक्याला त्या रूईकर कॉलनीतील घरातून बाहेर पडतात, ते दिवसभरात कुठल्या गल्लीत जायचे आणि कुणाच्या गाठीभेटी घ्यायच्या हे ठरवूनच.

उन्हातही प्रचाराचं रान

$
0
0
महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक गुरुवारी सकाळी नऊ वाजता रुईकर कॉलनीतील घरापासून राधानगरी तालुक्याच्या प्रचारदौऱ्यासाठी मोटारीत बसत असताना मुधाळतिट्टा येथील समर्थकांनी त्यांना गराडा घातला. ‘आमच्या गावात आजच सभा घ्या,’ अशी गळ घालायला त्यांनी सुरूवात केली.

हवे भाविकांचे सहकार्य

$
0
0
सोमवारी (ता.१४) जोतिबा यात्रेचा मुख्य दिवस आहे. यात्रेसाठी प्रशासन सज्ज असते, पण भाविकांच्या मोठ्या संख्येमुळे नियोजनात काही त्रुटी राहतात. जोतिबा यात्रेसाठी प्रशासनाने कोणते निर्णय घेतले आहेत, कोणत्या उपाययोजना कराव्यात यासंदर्भात तज्ज्ञ मंडळींनी ‘मटा’ राऊंड टेबलच्या माध्यमातून आपली मते मांडली.

दर्शनासाठी व्हीआयपी रांग नाही

$
0
0
जोतिबाच्या दर्शनासाठी आता व्हीआयपी शॉर्टकट चालणार नाही. ज्या दाराने सामान्य भाविक दर्शन घेऊन बाहेर येतात. त्या दारातून व्हीआयपींना आत सोडण्याची परंपरा यावेळी बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी घेतला आहे.

जोतिबा यात्रा

$
0
0
‘जोतिबा भाविकांना जास्तीत जास्त सोयीसुविधा देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत असून सर्व विभागांनी योग्य ते नियोजन करावे,’ असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सुर्यवंशी यांनी जोतिबा डोंगर येथे यात्रा नियोजन बैठकीत दिले.

शहीद कंकणवाडींवर अंत्यसंस्कार

$
0
0
अरळगुंडी (ता. गडहिंग्लज) येथील शहीद जवान दुरदुंडी उर्फ रवींद्र इराप्पा कंकणवाडी यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी त्यांचे पार्थिव अरळगुंडीत आणल्यानंतर पुष्पमालांनी सजवलेल्या रथातून अंत्ययात्रा काढण्यात आली. १०९ मराठा इन्फंट्री बटालियनचे जवान व पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली.

मदन भोसले अखेर उदयराजेंच्या प्रचारात

$
0
0
आतापर्यंत आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवणारे काँग्रेसचे माजी आमदार मदन भोसले अखेर राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. कोयना-कांदाटी खोऱ्यात तसेच भिलार-महाबळेश्वर भागात मदन भोसले यांनी उदनराजेंच्या प्रचारासाठी बैठका घेतल्या.

धर्मांधांना रोखा!

$
0
0
देशातील धर्मांध शक्तींना वेळीच रोखण्याची गरज आहे. अशा शक्तींच्या हातात देशाची सूत्रे गेल्यास देशाचे विघटन होण्यास वेळ लागणार नाही. - आर.आर. पाटील

निकृष्ट रस्ते

$
0
0
रस्त्यांची कामे लवकर होत नसताना जी होत आहेत तीही निकृष्ट पद्धतीने केली जात असल्याने महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. ज्यांनी निकृष्ट काम केले आहे, त्यांची बिले थांबवण्याची सूचना नगरसेवकांनी केली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images