Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

शेतक-यांवर अन्याय

$
0
0
मुंबई हल्ल्यात निष्पापांचा बळी घेणाऱ्या कसाबला या राज्यकर्त्यांनी बिर्याणी खायला घातली. तो निर्दयी मारेकरी असला तरी त्याला सरकारने वकिल देवून त्याची बाजू मांडण्याची संधी दिली होती. मात्र आंदोलन काळातील नुकसान भरपाईची ८२ लाखांची रक्कम भरण्यासंदर्भात आमची बाजू मांडण्याची संधीही राज्यकर्त्यांनी आम्हाला दिली नाही, अशी उद्विगनता खासदार राजू शेट्टी यांनी आष्ट्यातील सभेत मंगळवारी व्यक्त केली.

जनतेच्या भावनेशी खेळ

$
0
0
सत्ताधारी काँग्रेस पक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी इचलकरंजी येथील जनतेच्या भावनांची खेळ केला. पंचगंगा प्रदूषणाने माणसे मारण्याचे कंत्राटच या नेत्यांनी हाती घेतले. कामगारांची फसवणूक करणाऱ्यांना वेळीच धडा शिकवा, असे आवाहन आम आदमी पक्षाचे लोकसभेच्या हातकणंगले मतदार संघाचे उमेदवार रघुनाथ पाटील यांनी केले.

मुश्रीफांची दादागिरी मोडून काढा

$
0
0
तालुक्यातील सामान्य कुटुंबावर सुरू असलेला दहशतवाद मोडून काढला आहे. आता कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत कामगार मंत्री हसन मुश्रीफांची सुरु असणारी दादागिरी मोडून काढा, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी केले.

मुख्यमंत्र्यांचे मोदींना पुन्हा आव्हान

$
0
0
‘महाराष्ट्र आणि गुजरातच्या विकासाची तुलना एका व्यासपीठावर येऊन करू,’ असे आव्हान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा दिले. हातकणंगले मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या प्रचारार्थ शिराळा येथे त्यांची सभा झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

युवतींचे टिकल ते पोलिटिकल

$
0
0
स्थानिक राजकारणातला महिलांचा टक्का वाढत चाललाय, राज्य आणि राष्ट्रीय राजकारणातलं महिलांचं प्राबल्य वाढत चाललंय असं असतानाही राज्यशास्त्राच्या अभ्यासक्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी होती. अलीकडच्या काही वर्षात हे चित्र बदलू लागले असून पोलिटिकल सायन्सच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमातील युवतींचा टक्काही वाढू लागला आहे.

भर थेट भेटीवर

$
0
0
शेकापचे उमेदवार संपतराव पवार यांचा प्रचारादरम्यान करवीर तालुक्यात लोकांना प्रत्यक्ष भेटण्यावर भर आहे.

शहिदाचे आज अंत्यसंस्कार

$
0
0
जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात अतिरेक्यांशी लढताना वीरमरण प्राप्त झालेल्या शहीद सुभेदार दुरदंडी उर्फ रवींद्र इराप्पा कंकणवाडी (वय ४५) यांच्यावर आज (गुरुवारी) सकाळी दहा वाजता सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गडहिंग्लज तालुक्यातील अरळगुंडी या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

IRB सुप्रीम कोर्टात

$
0
0
शहरातील एकात्मिक रस्ते प्रकल्पाचे ९५ टक्के काम पूर्ण न झाल्याने टोल वसुलीला हायकोर्टाने दिलेल्या स्थगितीला ‘आयआरबी’ने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. कृती समितीच्या वकिलांना त्याची बुधवारी नोटीस मिळाली. समितीच्या वतीने सुप्रीम कोर्टात या आव्हानावर प्रतिवाद केला जाणार आहे.

घराण्यांना किती झेलणार?

$
0
0
‘सांगलीची जनता एकाच घरातील चार पिढ्यांना निवडून देते, याचेच मला आश्चर्य वाटते. अशा परिवारांना किती काळ झेलणार आहात? घराणेशाहीमुळेच देशाची प्रगती खुंटली आहे.’ अशी टीका भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी मिरजेत केली.

अठराशे कोटी महसूल

$
0
0
प्रगत व सधन जिल्हा म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूरने यंदा महसूल जमा करण्यात १ हजार ८६७ कोटींचा टप्पा पार केला आहे. उद्योग व व्यवसायांमध्ये जाणवत असलेल्या मंदीचा परिणाम म्हणून काही महत्त्वाच्या कार्यालयांचा महसूल टार्गेटपेक्षा कमी जमा झाला आहे.

मतदान करा; सवलत मिळवा

$
0
0
मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सरकारी पातळीवर तसेच खासगी आणि स्वयंसेवी संस्थांच्या वतीने विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. त्यात आता कोल्हापूर मेडिकल असोसिएशन सहभागी झाली आहे. मतदान करणाऱ्यांना संस्थेशी संलग्न डॉक्टरांकडे कन्सल्टिंग फीमध्ये २५ टक्के सवलत देण्यात येणार आहे.

स्त्रीवादी जाणिवेचे लेखन

$
0
0
संत जनाबाई यांच्या अभंगातील या ओळी आहेत. मराठी संत साहित्यातील बंडखोर कवयित्री म्हणजे जनाबाई. महाराष्ट्रातील स्त्रीमुक्तीच्या पाऊलखुणा शोधण्यासाठी जनाबाईंच्या अभंगांचा उपयोग होतो.

वाढवू मताचा टक्का

$
0
0
गेल्या महिन्याभरापासून ​लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रचाराची जी रणधुमाळी उठली आहे त्यानंतर आता बॉल आहे तो मतदारांच्या कोर्टात. राज्यातील उमेदवारांचे जनसंपर्काचे काम आता प्रचाराच्या बॉर्डरवर आले असताना महाराष्ट्रात विदर्भापासून प्रत्यक्ष मतदानाला सुरूवात झाली आहे.

राजेंद्र चोरगेंवर गुन्हा दाखल

$
0
0
आम आदमी पार्टीचे उमेदवार राजेंद्र चोरगे यांच्याविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्ज भरताना काढलेल्या पदयात्रेचा खर्च कमी दाखवल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

वर्षा माडगूळकर यांच्या जिल्ह्यात १३ पदयात्रा

$
0
0
अपक्ष उमेदवार अॅड. वर्षा माडगूळकर यांनी पदयात्रांवर भद देत प्रचार करण्याची योजना राबविली आहे. आतापर्यंत त्यांनी १३ पदयात्रा काढून मतदारसंघ ढवळून काढला आहे

निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

$
0
0
पवनचक्की कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या दमदाटीच्या निषेधार्थ निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा पाटण तालुक्यातील मोरणा विभागातील ग्रामस्थांनी दिला आहे.

भाजपमध्ये घराणेशाही नाही का?

$
0
0
‘भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी दिल्लीपासून सांगलीपर्यंतच्या घराणेशाहीवर टीका करत आहेत. त्यांना भाजप आणि महायुतीमधील घराणेशाही दिसत नाही का,’ असा असा सवाल सांगली लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार आणि केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केला.

वह्यांच्या उपक्रमाची नोंद लिम्का बुकमध्ये

$
0
0
गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छा म्हणून गेल्या सात वर्षांत जमलेल्या ३३ लाख २४ हजार ६६१ वह्यांच्या उपक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.

साडेसात लाख जप्त

$
0
0
आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी नेमलेल्या भरारी पथकाने कारवाई करताना बांधकाम व्यावसायिक भिमराव नलवडे यांच्या फ्लॅटवर छापा टाकून ७ लाख ४३ हजार रूपये जप्त केले. गुरूवारी दुपारी अडीच वाजता ही कारवाई करण्यात आली.

साडेसहा लाखांची रोकड ताब्यात

$
0
0
आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर महामार्गावर तपासणीसाठी नेमण्यात आलेल्या पथकाने गुरूवारी सहा लाख ७६ हजार ४२६ रुपये ताब्यात घेतले. ही रक्कम बेळगावहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या एसटीमध्ये बसलेल्या एका व्यापाऱ्याकडे होती. लक्ष्मीपुरी येथे शिवानी ट्रेडर्सचे मालक अफ्रोज आरीफ गर्जर (वय ३९) असे या मालकाचे नाव आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images