Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

वादळी पाऊस

$
0
0
शहरासह तालुक्यात मंगळवारी सर्वत्र वादळी वारा, विजांचा कडकडाट व गारांसह ठिकठिकाणी दुपारी साडेतीन वाजता जोराचा अवकाळी पाऊस कोसळला.

बनावट नोटांचा सुळसुळाट

$
0
0
पोलिसांकडून सुरू असलेल्या नाकाबंदीत रोख रक्कमा जप्त होत असताना बनावट नोंटाचा सुळसुळाट वाढला आहे. पेट्रोल पंप, किराणा मालाची दुकाने, हॉटेल परिसरात बनावट नोटा सापडण्याचे प्रमाण वाढले आहे.

उदयनराजेंवर आचारसंहितेचा गुन्हा

$
0
0
जेवणावळ देऊन प्रलोभन दाखवल्याप्रकरणी सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडी आणि मित्र पक्षाचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि मेळाव्यासाठी परवाना घेणारे अॅड. दत्तात्रय बनकर यांच्याविरुद्ध आदर्श आचारसंहिता भंग केल्याचे दोन गुन्हे सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत.

सेना पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

$
0
0
शिवसेनेने सातारा मतदारसंघ मित्र पक्षासाठी सोडल्याने नाराज झालेले पुरुषोत्तम जाधव बंडखोरी करून निवडणूक लढवित आहेत. त्यांना पाठिंबा जाहीर करीत शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख हणमंतराव वाघ यांच्यासह सुमारे १२ पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत.

अल्पसंख्याक समाजाने काँग्रेसच्या पाठीशी राहावे

$
0
0
अल्पसंख्याक नेहमीच काँग्रेसच्या पाठिशी राहिला आहे. यावेळीही अल्पसंख्याक समाजाने आघाडीचे उमेदवार प्रतीक पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे,’ असे आवाहन अल्पसंख्याक विकास मंत्री नसीम खान यांनी बुधवारी सांगलीत केले.

भाडळे खोऱ्यातील समस्या सोडवणार

$
0
0
‘कोरेगाव तालुक्याच्या भाडळे खोऱ्यात अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून पालकमंत्र्यांच्या सहकार्याने सोडवणार आहे,’ असे आश्वासन सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेस आघाडीचे उमेदवार खासदार छ. उदयनराजे भोसले यांनी दिले.

राज यांना ‘टोल’च कळते

$
0
0
‘राज ठाकरे यांना राज्यात ‘टोल’ शिवाय एकही विषय माहिती नसून केवळ मुंबई- पुणे व मुंबई- नाशिक महामार्गावर वाऱ्या करण्यापेक्षा राज्याच्या इतर भागातही डोकावण्याचा प्रयत्न करा,’ असा सल्ला राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना दिला आहे.

मोदींच्या सभेला प्रचंड उत्साह

$
0
0
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची बुधवारी सांगली-मिरज रोडवरील पटांगणावर जंगी सभा पार पडली. सांगली म्हणजे वसंतदादा, असे राजकारणातले समीकरण आहे. कारण अपवाद सोडला तर दादा घराण्याचे वारसदार हेच येथील राजकारणाचे शिलेदार राहिले आहेत.

‘बसवेश्वरांचे विचार सामान्यांपर्यंत पोहोचवा’

$
0
0
‘लिंगायत धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. मात्र, सर्व साहित्य कन्नड भाषेत असल्याने त्याचा प्रसार झाला नाही. यामुळे अन्य भाषांमध्ये असणाऱ्या महात्मा बसेश्वरांच्या वचन साहित्याचा अनुवाद करून त्यांचे विचार सामान्य माणसापर्यंत पोहोचवावेत,’ असे आवाहन कुडलसंगम बसव धर्मपीठाच्या अध्यक्षा डॉ. माता महादेवी यांनी केले.

रविवारी मांसविक्री बंद ठेवण्याचे आवाहन

$
0
0
भगवान महावीर जयंती दिनानिमित्त १३ एप्रिलला शहरातील मांसविक्री व कत्तलखाने बंद ठेवण्याचे आवाहन जैन धर्मीयांच्या शिष्टमंडळाने केलेला आहे. याबाबतचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी संजय पवार व महापालिकेचे उपायुक्त संजय हेरवाडे, स्थायी समितीचे सभापती सचिन चव्हाण यांना दिले.

रेल्वेचे नवे टच स्क्र‌ीन मशीन

$
0
0
किती तिकिटे शिल्लक आहेत, तिकीट कन्मफर्म झाले आहे का, गाडीची वेळ, गाडी हाउसफुल्ल झाल्याची माहिती प्रवाशांना आता कळणार आहे. यापूर्वीची जुनाट झालेले मशीन कोल्हापूर रेल्वेस्थानकाच्या आरक्षण विभागात बदलून नवे टच स्क्रिन पॅसेंजर ऑपरेटिंग इन्क्वायरी मशिन बुधवारी बसविण्यात आले.

धान्य महागले

$
0
0
मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश परिसरात गेल्या महिन्यात गारपिटीमुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे गहू, ज्वारी, डाळींच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. कोल्हापूर शहरात येणारी धान्यांची आवक कायम असली, तरी दरामध्ये मात्र क्विंटलमागे दोनशे ते अडीचशे रुपयांची वाढ झाली आहे.

मतांसाठी फिल्डिंग

$
0
0
प्रचाराची रणधुमाळी टिपेली पोहोचलेली असताना आता गठ्ठा मतदानासाठी फिल्डिंग लावली जात आहे. समाजाचा मेळावा, तालमीच्या बैठका, सार्वजनिक मंडळांच्या बैठका आणि पाठिंब्यातून मते फिक्स केली जात आहेत.

नुकसानभरपाईची मागणी

$
0
0
‘भुदरगड तालुक्यात सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्याने व गारपिटीने शेतकऱ्यांचे व नागरिकांचे मोठे नुकसान आले आहे. अशा शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्याची नुकसानभरपाई द्यावी,’ अशी मागणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस नाथाजी पाटील यांनी निवेदनाने तहसीलदार शिल्पा ओसवाल यांच्याकडे केली आहे.

मेडिकल टुरिझमसाठी प्रयत्न करू

$
0
0
कोल्हापूर शहरात मेडिकल टुरिझम विकसित होण्याची पूर्ण क्षमता आहे, त्यादृष्टीने प्रयत्न केले जातील असे कोल्हापूर मेडिकल असोसिएशन प्रयत्नशील राहणार असल्याचे असोसिएशनचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. आनंद कामत यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना सांगितले.

शाहूवाडीत परवानगीविना दोन कोटींची कामे

$
0
0
पाणलोट कामे मंजूर नसताना व प्रस्तावित कामांचा निधी प्राप्त नसताना शाहूवाडी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी विशेष घटक योजना व इतर योजनेंतर्गत २५०० मजुरांच्या मदतीने दोनशे कामे पूर्ण केली आहेत. कामाला मंजुरी नसतानाही अशी दोन कोटींची कामे केल्याने जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने त्यांच्याकडे खुलासा मागितला आहे.

विधानसभेसाठी लोकसभेतच पदरमोड

$
0
0
लोकसभा निवडणूक ही एक प्रकारची रंगीत तालीम समजून कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या भावी इच्छुकांनी जोरदार तयारी चालवली आहे. सत्यजित कदम व रवीकिरण इंगवले आघाडीवर आहेत. लोकसभेच्या प्रचारानिमित्त आतापासूनच कार्यकर्त्यांची मोट बांधण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दाच महत्वाचा

$
0
0
सुरेश पाटील अपक्ष, हातकणंगले मतदारसंघ यांची मुलाखत

सामान्यांसाठी लढतोय!

$
0
0
रघुनाथ पाटील, आम आदमी पक्ष, हातकणगंले मतदारसंघ यांची मुलाखत

महाडिकांना विजयी करा: मालोजीराजे

$
0
0
केंद्र सरकारकडून मिळणारा खासदार फंड सर्वांनाच मिळत असतो. त्यासाठी कर्तृत्व लागत नाही. मात्र खासदार मंडलिकांनी मिळालेला निधीही योग्यप्रकारे खर्च केलेला नसल्याने जिल्ह्यात विकासाचा अनुशेष निर्माण झाला आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images