Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

धोबीपछाड कोणाला?

$
0
0
उसना उमेदवार घेण्याची परंपरा कायम ठेवणाऱ्या शिवसेनेला यंदा खासदार सदाशिवराव मंडलिक गटाची रसद मिळाली. त्याला नरेंद्र मोदी लाटेची मदत मिळाल्याने खासदार सदाशिवरावांचे चिरंजीव प्रा. संजय मंडलिक यांनी काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार धनं​जय महाडिक यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे.

शिंदेंचा सोलापुरात तळ

$
0
0
सोलापूर लोकसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाचे उमेदवार केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि महायुतीचे उमेदवार शरद बनसोडे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. मेळावे, बैठका, पदयात्रा आणि होम टू होम प्रचारानंतर आता खुद्द शिंदे मतदान होईपर्यंत आठवडाभर सोलापुरात तळ ठोकून राहणार आहेत.

खुशीत असतात ते घोडे

$
0
0
राज्यारोहण होणार असल्याची चाहूल लागली रे लागली की, सिंहासनावर विराजमान होणाऱ्यांपेक्षा खुशीत असतात ते घोडे. ते खूपच आनंद वाटून बत्तिशी दाखवत ‌खिंकाळू लागतात.

घराणेशाहीचे अवकाश बदला

$
0
0
युवकांना राजकारण आणि सध्याच्या निवडणुकीतील सहभागाविषयी काय वाटते या विषयावर शिवाजी विद्यापीठातील लेडीज हॉस्टेलमधील मुलींसोबत आयोजित ‘मटा डिबेट’मध्ये प्रस्थापित नेत्यांविषयी तीव्र आक्षेप नोंदविण्यात आले.

घरबसल्या पाहा जोतिबाची यात्रा

$
0
0
दख्खनचा राजा जोतिबा म्हणजे भाविकांचे श्रध्दास्थान. चैत्र पौर्णिमेला यात्रेनिमित्त वाडी रत्नागिरी येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. यात्रेच्या मुख्य दिवशी तर जोतिबा डोंगर भाविकांनी फुललेला असतो.

ई-टेंडरसाठी साठमारी

$
0
0
जनहिताची कामे होताना कोणत्याही प्रकारे चुकीचे प्रकार घडू नयेत आणि दर्जेदार कामे व्हावीत, कोणत्याही अधिकाऱ्याला त्यामध्ये हस्तक्षेप करता येऊ नये. यासाठी ई टेंडरींगची प्रक्रिया सुरू केली असली तरी त्यामध्ये गैरप्रकार सुरूच आहेत. ई टेंडरही मॅनेज करून भरण्याचा प्रकार सुरू आहे.

‘एसटीपी’चे विकेंद्रीकरण हवे

$
0
0
पंचगंगा नदी प्रदूषणाला कारणीभूत घटकांचा अभ्यास करण्याबरोबरच त्यावरील उपाय सुचवण्यासाठी हायकोर्टने नेमलेल्या ‘नीरी’ संस्थेने मंगळवारी आपला अहवाल सादर केला. त्यामध्ये त्यांनी शहरातील सांडपाणी प्रक्रिया केंद्रांचे विकेंद्रीकरण करण्याबरोबरच रंकाळ्यात जैविक पद्धतीचा व धरणातून पाणी सोडण्यासाठी इकॉलॉजिकल संकल्पनांची आवश्यकता असल्याचे मत मांडले आहे.

वाहनात सापडली वासरे

$
0
0
आरटीओच्या भरारी पथकाने पकडलेल्या सहा सिडर रिक्षात सहा वासरे, दोन रेडके व मांस सापडल्याने खळबळ उडाली. शाहूपुरी पोलिसांनी वासरे व रेडके पांजरपोळ येथे जमा केली असून दोन्ही वाहनांच्या मालकांचा शोध सुरू आहे.

जिल्ह्यात ५१ ठिकाणी प्रसूतिगृहे सुरू करणार

$
0
0
आरोग्याबाबत लोकांमध्ये जागृती वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेने कंबर कसली असून मातामृत्यू आणि बालमृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या आहेत. ग्रामीण भागातील आरोग्याच्या सेवा नेमक्या कुठे कमी पडतात याबाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आढावा घेतला आहे.

साखर कामगार ऑन ड्युटी प्रचारात

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सहकारी साखर कारखान्यांचे कर्मचारी आता संबंधित उमेदवारांच्या टोप्या घालून उतरले आहेत. बहुतांशी मातब्बर उमेदवारांच्या ताब्यात सहकारी साखर कारखाने असल्याने त्यांनी ‘हक्काचे कार्यकर्ते’ म्हणून आता कर्मचाऱ्यांना प्रचारात उतरवले आहे.

पालावर मतदानासाठी निरोप

$
0
0
उसतोडणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात बाहेरून आलेल्या मजुरांना मतदानासाठी नेण्यासाठी त्या-त्या जिल्ह्यातील यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे. यासाठी ऊसतोड मजुरांच्या मुकादमांशी चर्चा झाल्या आहेत. त्यांनी पालांवर निरोपही पाठविला आहे.

कोपरा सभांनी गजबजले चौक

$
0
0
म्हटले तर रस्त्याकडेला आणि म्हटले तर गल्लीतल्या मुख्य चौकात... छोटेखानी स्टेज उभारले जाते. समोर साधारण ३५-४० खुर्च्या. चौकाच्या कोपऱ्याला थांबलेले पंधरा-वीस कार्यकर्ते. त्यांना प्रतिक्षा असते ती नेत्यांची. कोपरा सभेच्या आधी फक्त अर्धा-पाऊण तास दिसणारे हे चित्र.

मताधिक्यासाठी नियोजन करा!

$
0
0
‘काँग्रेस-राष्ट्रवादीची एकत्रित ताकद लावल्यास वाळवा मतदारसंघात किमान ३० ते ४० हजार, तर शिराळा मतदारसंघातून २० हजारांचे मताधिक्य मिळू शकते. त्यामुळे कल्लाप्पाण्णा आवाडे यांचा विजय निश्चित आहे. त्यासाठी काटेकोर व नियोजनबद्ध प्रचार करा. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नेते कामाला लागले आहेत. आपण कुठे मागे राहता कामा नये,’ अशी सूचना ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी केले.

उमेदवारांच्या सौभाग्यवतींचा प्रचाराचा झपाटा

$
0
0
प्रचाराच्या धामधुमीत अनेक स्टार प्रचारकांबरोबरच कोल्हापुरातील प्रमुख उमेदवारांच्या सौभाग्यवतींनीही प्रचारात आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी त्यांच्या सौभाग्यवतींचे झंझावाती दौरे सुरू आहेत.

फलक लावून फिरताहेत वाहने

$
0
0
निवडणुकीच्या प्रचार फेरीत पाच वाहनांचा निकष असला तरी उमेदवारांच्या प्रचारात यंत्रणेत खासगी वाहनांचा मोठा राबता आहे. प्रचारासाठी रिक्षा, व्हॅन तसेच लक्झरी वाहनांसह एसी वाहनांना मागणी आहे. निवडणुकीच्या काळात खासगी वाहनधारकांनी मात्र आपले भाव वधारले आहेत.

भावनेला उत्तर मुद्द्याने

$
0
0
शेतीच्या पाणीप्रश्नामुळे परिसराचा खुंटलेला विकास. त्यामुळे काही भाग वगळला तर बोडके डोंगर व उजाड माळामुळे दिवसाही भयाण वाटणारा परिसर. रोजगाराची साधने नसल्याने मुंबई गाठलेल्या तरुणाईमुळे गावागावात ज्येष्ठांचा आणि महिलांचाच राबता.

मानधन नाकारून निर्मात्याला मदत

$
0
0
रविवारी झालेल्या जोरदार पावसाने पडवळवाडी (ता. पन्हाळा) गावच्या माळावरचं ‘कोंबडी’ सिनेमातील एक गाव जमीनदोस्त झालं... २७ दिवसांच्या शेड्यूलपैकी शेवटचा आठवडा शिल्लक असताना अस्मानी संकटानं होत्याचं नव्हतं केलं. पण सेटशी नातं जुळलेल्या स्पॉटबॉयपासून आर्टडायरेक्टरपर्यंत प्रत्येकाने एक दिवसाच्या मानधनावर मोठ्या मनानं पाणी सोडून निर्मात्याला आठ लाखांचा फटका बसला तरी दोन लाखांपर्यंत मदत केली.

जतमध्ये पाण्यासाठी भटकंती

$
0
0
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच जत तालुक्यातील पाण्याची पातळी झपाट्याने खाली गेली आहे. तालुक्यातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी मैलोंमैल पायपीट करावी लागत आहे. सध्या सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या कामांत गुंतल्याने पाणी प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.

मोदी चांगले काम करतील!

$
0
0
‘गुजरातपेक्षाही अधिक चांगले काम नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशात करतील,’ असा विश्वास लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांनी वाई येथे व्यक्त केला.

कोल्हापूरचा जवान शहीद

$
0
0
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील चौक बाल एरियामध्ये लष्करे तैयबाच्या दहशतवाद्यांशी लढताना अरळगुंडी (ता. गडहिंग्लज) येथील सुभेदार दुरदुंडी ऊर्फ रवींद्र इराप्पा कंकणवडी (वय ४४) शहीद झाले. या चकमकीत आणखी दोन सुरक्षारक्षक शहीद झाले.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>