Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

देशात मोदी लाटेचा केवळ आभास

$
0
0
‘देशात कुठेही नरेंद्र मोदींची लाट नाही. केवळ आभास निर्माण केला जात आहे. प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे. देशात अन्य राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांची भाषणे होत नाहीत काय? त्यांची भाषणे टीव्हीवर दाखविली जात नाहीत. मोदींनी इलेक्ट्रॉनिक्स मीडिया भाड्याने घेतल्यामुळेच असे होत असल्याची टीका सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली.

शिराळ्यात गारांचा पाऊस

$
0
0
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मांगले, सागाव, चिखली परिसरात रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सुमारे तासभर सुसाट्याचा वारा व विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस पडला.

आबा मिठू-मिठू बोलणारा पोपट

$
0
0
‘गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख चढता आहे. वाळू तस्कर आणि ठेकेदारांना पोसण्यासाठीच ते राजकारण करीत आहेत. शरद पवार सांगतात त्याप्रमाणे केवळ मिठू-मिठू बोलणाऱ्या या पोपटाची प्रतीक पाटील यांच्या आगोदर पाठ आणि वाट लावण्यासाठीच संजयकाकांची उमेदवारी आहे. त्यासाठी आणखी काही पैलवान शिल्लक आहेत,’ अशी घणाघाती टीका भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी आर. आर. पाटील यांच्यावर केली.

बेडगच्या यात्रेत मारामारी

$
0
0
बेडग (ता. मिरज) येथे मरगुबाई यात्रेत परस्परांकडे रागाने पाहिल्याच्या कारणावरून दोन गटांत मारामारी व दगडफेक झाली. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटांच्या १४ जणांवर गुन्हा दाखल करून अटक केली. एकजण फरारी आहे. दरम्यान, कोर्टाने १४ जणांची जामिनावर मुक्तता केली आहे.

जावळीत मानवी सांगाडे

$
0
0
जावळी तालुक्यातील भुतेश्वर येथील जंगलात रविवारी महिला व पुरुषाचे मानवी सांगाडे आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

एटीएम वॉचमनचा खून

$
0
0
इस्लामपूर येथील बसस्थानक परिसरातील इंद्रप्रस्थ शॉपिंग सेंटरमधील रत्नाकर बँकेचे एटीएम फोडण्याला विरोध करणाऱ्या दोघांवर अज्ञातांनी रविवारी रात्री हल्ला केला. यात एकजण जागीच ठार झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला.

बॉम्बसाठी चोरून आणले जिलेटीन

$
0
0
बॉम्ब तयार करण्यासाठी विहिरीची खुदाई करणाऱ्या ठेकेदाराच्या ताब्यातील जिलेटीन चोरून आणल्याची माहिती पुढे आली आहे. अटक केलेल्या चारही तरूणांची विशेष पोलिस महानिरीक्षक रितेशकुमार व पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी चार तास कसून चौकशी केली.

अट्टल गुन्हेगारास अटक

$
0
0
चिनी बनावटीचे रिव्हॉल्वर व पाच जिवंत काडतुसे घेवून एसटीतून प्रवास करणाऱ्या एका अट्टल गुन्हेगारास राधानगरी पोलिसांनी रंगेहाथ पकडले. शंकर भागवत गरड (वय २३, रा.तारदाळ ता.हातकणंगले) असे संशयित आरोपीचे नाव असून त्याचा साथीदार आकाश अभिमान गायकवाड (वय २३, रा.तांदुळवाडी,उस्मानाबाद) हा मात्र यावेळी पळून जाण्यात यशस्वी झाला.

सुंदर हत्ती प्रकरण चिघळले

$
0
0
पिपल फॉर इथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल या संस्थेच्या प्रयत्नानंतर ‘सुंदर’ हत्तीला वारणेतून हलवून बेंगळूरू येथील वाइल्ड लाइफ रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये हलवण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत.

तुफान पाऊस

$
0
0
भुदरगड तालुक्यात गारा व वादळी वाऱ्यासह वळीव पावसाने हजेरी लावली. तालुक्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्याने घरांचे पत्रे उडून गेले तर काही ठिकाणी केळी पिकांचे नुकसान झाले.

रामदेवबाबा कोल्हापूरमध्ये

$
0
0
स्वामी रामदेव बाबा यांची येत्या शनिवारी (ता. १२ ) सासने मैदानावर मोफत योगदीक्षा आणि राष्ट्र निर्माण सभा होत आहे. याच दिवशी पेठवडगाव येथेही सभा होत असल्याची माहिती भारत स्वाभिमान न्यासचे राज्य प्रभारी मिलिंद शुक्ल, जिल्हा प्रभारी चंद्रशेखर खापणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बड्याचीवाडीत अपघात

$
0
0
बड्याचीवाडी (ता. गडहिंग्लज) येथील घाटरस्त्यावरील तीव्र उतारावर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीसह पलटी झाल्याने झालेल्या अपघातात सुशाबाई भैरू लोहार (वय ४०, रा.हडलगे, ता.हुक्केरी, जि.बेळगाव) ही महिला ठार झाली तर चालकासह अठराजण जखमी झाले.

मद्यविक्रीवर 'वॉच'

$
0
0
निवडणूक काळात उमेदवारांकडून मतदारांसाठी दारूचा महापूर वाहू नये यासाठी उत्पादन शुल्क खात्याने आता सर्वच दारू दुकानांवर बारीक नजर ठेवली आहे. थोडी थोडी पिया ‘मत’ करो म्हणत त्याला प्रतिबंध करण्यात येत आहे. रोज प्रत्येक दुकानात किती दारू खपते याचा लेखाजोखा दुकानदार व परमिटरूमधारकांना द्यावा लागत आहे.

नरेंद्र मोदी बुधवारी कोल्हापुरात

$
0
0
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमदेवार नरेंद्र मोदी खास विमानाने बुधवारी दुपारी एक वाजता कोल्हापुरात येणार आहे. कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर ते खास हेलिकॉप्टर सांगलीला रवाना होणार आहे.

पाटील, मुश्रीफांची चौकशी करा

$
0
0
ऐन निवडणूकीच्या काळात कोल्हापूरात बॉम्ब सापडण्याचा प्रकार निंदनीय आहे. चार बॉम्ब सापडले असले तरी अजून शंभरावर बॉम्ब निर्माण झाले असण्याची शक्यता आहे. या बॉम्बप्रकरणी कोल्हापूरचे नेतृत्व करणारे कामगारमंत्री हसन मुश्रीफ व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची चौकशी करा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उचगाव (ता. करवीर) येथील जाहीर सभेत केली.

सूप, वड्याने प्रश्न सुटत नाहीत

$
0
0
‘शिवसेनेचे राजकारण हे विकासाच्या विरोधी आहे. देशाचे भवितव्य ठरविण्याची निवडणूक होत असताना ठाकरे बंधू मात्र एकमेकांची औकात काढत आहेत. तेलकट वडे व चिकन सूपचे महाराष्ट्राशी काही देणेघेणे नाही. त्यांच्या कौटुंबिक वादामुळे महाराष्ट्राचे प्रश्न सुटणार नाहीत,’ अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे व मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर हल्ला चढविला.

सुंदरला पुनर्वसन केंद्रात सोडा

$
0
0
सध्या वारणानगरमध्ये असलेल्या सुंदर हत्तीला पुनर्वसन केंद्रात सोडावे, असा आदेश मुंबई हायकोर्टातील न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे आणि ए. के. मेनन यांनी ही याचिका फेटाळून लावली.

१५ लाख शिक्षकांचे पगार थकले

$
0
0
राज्यातील ‘पे युनिट’ने प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांच्या ऑनलाइन वेतन प्रणालीची अंमलबजावणी न केल्याने १५ लाखांहून अधिक प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि ज्युनिअर कॉलेज शिक्षकांचा मार्चचा पगार रखडला आहे.

मतदान वेळेत एक तासाने वाढ

$
0
0
निवडणूक आयोगाच्यावतीने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची वेळ १ तासाने वाढविण्यात आली आहे. त्यानुसार सकाळी ७ ते सायं. ६ यावेळेत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किरण कुलकर्णी यांनी ही माहिती दिली.

रूईकर कॉलनीचे खासदार

$
0
0
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून कोण निवडून येणार असा प्रश्न सर्वत्र चर्चिला जात असला तरी ‘कोल्हापूर’चा खासदार हा रूईकर कॉलनीतीलच असणार आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक व महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक या दोघांची निवासस्थाने रूईकर कॉलनीतच आहेत.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images