Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पोलिस-महसूलमध्ये शीतयुद्ध

$
0
0
निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाने पाठविलेले हद्दपारीचे ४८ प्रस्ताव महसूल विभागाने प्रलंबित ठेवल्याने पोलिस व महसूलमध्ये शीतयुद्ध सुरू झाले आहे.

चिन्हे वाढवतायेत उमेदवारांचे श्रम

$
0
0
निवडणुकीसाठी उमेदवारांना चिन्हांचा आधार घ्यावा लागतो. लोकांमध्ये चिन्हाबाबत जागृती करून त्याला अधिकाधिक पसंती मिळवून देण्यासाठी उमेदवार प्रयत्नांची पराकाष्ठा करतात.

विकासात्मक दृष्टिकोन हवा

$
0
0
राजकारणात वर्षानुवर्षे एकाच कुटुंबाकडे सत्ता आणि अधिकाराची पदे आहेत. राजकारणातील घराणेशाही संपली पाहिजे. लोकसभा निवडणूक लढविणारा उमेदवार हा किमान पदवीधर असावा. निवडून आल्यानंतर उमेदवाराने गटातटाचे राजकारण करू नये.

स्पेशल इफेक्टस

$
0
0
सगळे तंत्रज्ञान इथे आलेय, सहज उपलब्ध आहे, पण वापरणारी शहाणी हवीत! आपल्याकडे प्रॉडक्शन मधल्या चुका झाकण्यासाठी प्रामुख्याने या तंत्रज्ञानाचा वापर करतात. तिकडे हे तंत्रज्ञान वापरुन बनवलेले एखादे पात्र, वस्तू कथानकाचा भाग बनलेले असते म्हणून त्यासाठी पुरेसे बजेटही असते.

बॉम्ब बनविणाऱ्या चौघांना अटक

$
0
0
बॉम्ब बनविणाऱ्या चौघांना कागल पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्यांच्याकडून चार जिवंत बॉम्ब आणि त्यासाठी लागणारे साहित्य असा २५ लाख ६९ हजार ५७५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

सत्तेच्या राजकारणात महिला अबलाच

$
0
0
महिलांना राजकारणात संधी देण्याच्या घोषणा राजकीय पक्ष करतात मात्र, त्यांना प्रत्यक्षात खरोखरच संधी मिळते का, याबाबत सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिला सामाजिक कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

पालक, परीक्षेच्या ‘आचारसंहितेमुळे’ निर्बंध

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या गदारोळात पहिल्यांदा मतदान करणाऱ्या युवा मतदारांची धूम आहे. युवतींच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर सगळेच बोलत असले तरी प्रचारात मात्र सगळ्या ‘ताई माई अक्कां’चाच सहभाग दिसतो. एकीकडे पालकांचा विरोध आणि दुसरीकडे परीक्षांचा मोसम अशा दुहेरी आचारसंहितेमुळे युवतींच्या प्रचारातील सहभागावर निर्बंध आले आहेत.

भुदरगडमध्ये ‘आमचा गट आणि आम्ही’

$
0
0
मुबलक पावसामुळे डोलणारी हिरवीगार पिकं आणि झाडींमध्ये दाटीवाटीत वसलेली टुमदार गावं असं भुदरगड तालुक्याच्या बहुतांश भागाचं चित्र. वेदगंगा नदी, पाटगाव व फये प्रकल्पाने शिडकाव केलेल्या समृध्दीच्या खाणाखुणा इथं जागोजागी दिसतात. साखर कारखाना आणि दुभत्या जनावरांमुळे माणसांच्या हातात खुळखुळणाऱ्या पैशाची प्रचितीही येते.

‘वारणे’भोवती शेट्टींची भा‌वनिक साद

$
0
0
रणरणत्या उन्हाची पर्वा न करता कार्यकर्त्यांची प्रचाराची धांदल, मतदारांशी थेट संपर्क साधण्यासाठी गावागावातून निघणारी रॅली, गावच्या मुख्य चौकातील सभेत थेट मतदारांच्या हृदयाला भिडणारे भाषण, अशा एकेक सभेत खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी पुन्हा निवडून देण्याची भावनिक साद घातली.

शाहूंच्या विचारांचा सत्तेसाठी अपमान

$
0
0
‘सत्तेच्या लालसेपोटी खासदार मंडलिकांनी राजर्षी शाहूंच्या विचारांचा अपमान केला आहे. त्यामुळे सामाजिक कार्याची जाण असणारा आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारा कार्यकर्ता म्हणून धनंजय महाडिक यांना निवडून दिल्यास कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रगतीच्या वाटचालीला बळ मिळेल,’ असे प्रतिपादन माजी पाणीपुरवठा मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले.

आदेशाचा ‘कचरा’

$
0
0
पंचगंगा नदीच्या प्रदूषणाला कारणीभूत होत असल्याने कसबा बावडा येथील पूरक्षेत्रातील सरवळीत कचरा टाकण्यास केलेला मज्जाव महापालिकेने पुन्हा लाथाडला.

बेळगावमध्ये पाच लँडमाफियांना अटक

$
0
0
बेळगाव शहरातील जमिनीच्या व्यवहाराच्या प्रकरणात बंदुकीचा धाक दाखवून, जीवे मारण्याची धमकी देवून तसेच वादग्रस्त जमिनींच्या व्यवहारात मध्यस्थी करून पैसे वसूल करण्याच्या आरोपावरून शहरातील पाच भू माफियांना जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली.

फाइव्ह स्टार एमआयडीसीत रिक्लेमेशन प्लँटची उभारणी

$
0
0
गोकुळ शिरगाव एमआयडीसीमध्ये कॉमन फॅसिलिटी सेंटर व सॅण्ड रिक्लेमेशन प्लँटची उभारणी सुरू आहे. त्यासाठी लागणारी मशिनरी चीनमधून आयात करण्यात आली आहे. ही मशिनरी उच्च प्रतीची असून गोकुळ शिरगाव एमआयडीसामध्ये गुरुवारी सॅण्ड रिक्लेमेशन प्लँटच्या जागेवर दाखल झाली आहे.

आसगावच्या पुलाने घेतला पाचवा बळी

$
0
0
आसगाव-नागनवाडी (ता. चंदगड) दरम्यान असणाऱ्या पुलावरुन जाताना पाय घसरुन पडल्याने मऱ्याप्पा कृष्णा गावडे (वय ५५, रा आसगाव, ता. चंदगड) यांचा ताम्रपर्णी नदीत बुडुन मृत्यू झाला. बुधवारी (ता.२) सकाळी दहा ते आज सकाळी साडेसातच्या दरम्यान ही घटना घडली.

शॉर्ट मार्जिनचा धोका टळला

$
0
0
ऊस गळीत हंगाम सुरु होण्यापूर्वी साखरेचे भाव कमालीचे घसरले होते. यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित दर देण्यासाठी कारखाना व्यवस्थापनाला करसत करावी लागणार होती. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून साखरेच्या दरामध्ये क्विंटलपाठीमागे ४०० ते ५०० रुपयांची वाढ झाल्याने कारखान्यासमोरील शॉर्ट मार्जिनचा धोका टळला आहे.

महाडिकांसाठी माझी प्रतिष्ठा पणाला

$
0
0
काँग्रेस आघाडीशिवाय देशाला पर्याय नाही. कारण सर्वसामान्यांचा विकास काँग्रेस पक्षाकडूनच केला जातो हे जनतेला माहीत आहे. शिवसेना-भाजप हे लोकांसमोर स्वप्नांचा फुगा तयार करत असून त्याला भूलू नका. माझी प्रतिष्ठा व विश्वासार्हता टिकवण्यासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांनाच विजयी करा, असे आवाहन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले.

कॅमेरामन व्ही. बाबासाहेब यांचे निधन

$
0
0
जुन्या पिढीतील ख्यातनाम कॅमेरामन व्ही. बाबासाहेब (बाबासाहेब वस्ताद) यांचे यांचे शनिवारी मिरज येथे वृद्धापकाळामुळे निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. शनिवारी रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

चार दोस्तांचा ‘बॉम्ब कारखाना’

$
0
0
एक इंजिनीयर, दुसरा वायरमॅन, तिसरा मेस्त्री आणि चौथा तरुण उत्तम शेतीकडे वळलेला. चौघेही दोस्त. आर्थिक परिस्थीती बेताचीच असल्याने पैसे मिळवण्याच्या नेहमीच्याच चर्चेतून बॉम्ब बनविण्याचा व्यवसाय करण्याचं सुत्र पुढं आलं. मग मागचापुढचा विचार न करता चार बॉम्ब बनवले.

मनसेला ‘राजआज्ञे’ची प्रतिक्षा

$
0
0
लोकसभा निवडणुकीसाठी विविध पक्ष, संघटनांनी आपली मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. माई, टोलनाका विरोधी आंदोलनासह विविध आंदोलने करून चर्चेत आलेल्या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी कमालीचे मौन पाळले आहे.

विरोधकांचे बुद्धीभेदाचे राजकारण

$
0
0
‘सातारा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्त्व अनेक मान्यवरांनी केले आहे. त्यांच्या इतके काम मला करता येणार नाही. परंतु, त्यांना अभिप्रेत असणारी विकासाची कामे मार्गी लावणार, हा माझा शब्द आहे,’ असे आवाहन सातारा लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी केले. ते येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images