Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

काँग्रेसला NCPचा बिनशर्त पाठिंबा

0
0
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी गुरुवारी (३ एप्रिल) निवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी कोणत्या गटाचा उमेदवार असावा, याबाबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यात सोमवारी झालेल्या चर्चेत कोणताच तोडगा निघाला नाही.

कोयना परिसराला भूकंपाचा धक्का

0
0
येथील कोयना परिसरासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला बुधवारी सकाळी ७.३३ वाजता भूकंपाचा सौम्य धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.८ इतकी नोंदवली गेली आहे.

चिखलफेक करण्यास अक्कल लागत नाही

0
0
‘चिखलफेक करण्यास अक्कल लागत नाही. आरोप, प्रत्यारोप करून जनतेची दिशाभूल करणे सोपे आहे. मात्र, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करून त्यांच्या विकासासाठी झटत राहणे कोणाचेही काम नाही. गेली २२ वर्षे सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून मी समाजकारण केले.

बंडखोर धत्तुरे काँग्रेसच्या व्यासपीठावर

0
0
सांगली लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात बंडखोरी करून मोठी खळबळ उडवून देणारे माजी आमदार हफिज धत्तुरे यांनी बुधवारी अचानक ‘यू-टर्न’ घेतला. प्रतीक पाटील यांच्या प्रचार शुभारंभाच्या मेळाव्यात मुख्यमंत्री चव्हाण यांच्यासोबत व्यासपीठावर हजेरी लावली.

शेवाळे, पाटण्यात हत्तींचा धुमाकूळ

0
0
शेवाळे, पाटणे (ता. चंदगड) येथील परिसरात कर्नाटकातून आलेल्या हत्तीने धुमाकूळ घातला असून परिसरातील शेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. पाटणे येथील परशराम कांबळे यांची शेतावरील रिकामी बैलगाडी मोडून टाकल्याने सुमारे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

प्रकल्पाचे तातडीने मूल्यांकन करा

0
0
रस्ते विकास महामंडळ व आयआरबीने पुन्हा नाटक चालवले असून त्यातून जनतेची चालवलेली फसवणूक सरकारने बंद करावी. तसेच तातडीने तज्ज्ञ समितीच्यावतीने प्रकल्पाचे मूल्यांकन करावे, यासाठी टोल विरोधी कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

चितळे येथे गव्यांच्या पिलांना जीवदान

0
0
चितळे येथील जयवंत सरदेसाई यांच्या चंदगडला जाणाऱ्या मार्गानजीकच्या शेतातील तीस फूट विहिरीत पडलेल्या गव्यांच्या दोन बछड्यांना जीवदान देण्याची घटना आज दुपारी घडली.

संतप्त नागरिकांनी जलअभियंत्यांना कोंडले

0
0
शहरातील स्वामी मळा, कोले मळा, जवाहरनगर परिसरामध्ये गेले आठवडाभर पाणीपुरवठा झाला नसल्यामुळे आज महिला-पुरुष नागरिकांनी नगरपालिकेत घुसून पाणी पुरवठा कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

टार्गेटच्या पाठलागात महापालिकेची दमछाक

0
0
वार्षिक उत्पन्नाच्या २३५ कोटीच्या टार्गेटपैकी महापालिकेकडे वर्षअखेरीस २३० कोटी जमा झाले आहेत. अपेक्षित टार्गेट गाठण्यासाठी घरफाळा विभागाची निवडणुकीमुळे दमछाक झाली.

जि. प. अध्यक्षाची आज घोषणा

0
0
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी इच्छूकांची काँग्रेसचे पक्ष निरीक्षक माजी आमदार शिवाजी पाटील-कवेकर यांनी मुलाखती घेतल्या. जिल्हा परिषद सदस्यांचा कल जाणून घेण्यासाठी सर्वांचीच स्वतंत्रपणे मते यावेळी ऐकून घेण्यात आली.

ट्रकची धडक मोटारसायकलस्वार ठार

0
0
शिरोळ येथील भरत बँकेसमोर ट्रकने ठोकरल्याने मोटारसायकलस्वार ठार झाला. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. विश्वनाथ भीमराव पाटील-फडतारे (वय ४०, रा. मौजेआगर)असे मृताचे नाव आहे.

राणे स्पोर्ट्‍स विजेता

0
0
खंडोबा चषक स्पर्धेतील अंतिम सामना खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध राणे स्पोर्टस ठाणे यांच्यामध्ये विद्युतझोतात झाला. सामन्यात राणे स्पोर्ट्‍सने यजमान खंडोबा तालीम मंडळाचे आठ धावांनी पराभव करत अजिंक्यपद पटकावले.

जमावाच्या हल्ल्यात तिघेजण जखमी

0
0
टेंबलाईवाडी परिसरात बुधवारी रात्री जमावाने केलेल्या हल्ल्यात दोन पुरूष आणि एक महिला जखमी झाली. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास वीस ते पंचवीस जणांचा जमाव अचानक गल्लीत घुसला.

कर्तृत्ववान असल्यानेच महाडिकांना पाठिंबा

0
0
‘तरुण वयात चांगली बुध्दी आहे. काम करायची इच्छा आहे आणि सर्व गोष्टींची माह‌िती आहे, असा उमेदवार असल्यानेच धनंजय महाडिक यांना खासदार करायचे असा निर्धार करा.

जनता बझारचा ठराव रद्द करा

0
0
जनता बझारचा ठराव बेकायदेशीर असल्याने त्यानुसार करार करण्यात येऊ नये. या ठरावामुळे महापालिकेला कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे तेथील इमारतीसह सर्व जागा महापालिकेने ताब्यात घेऊन जाहीर निविदा काढून भाड्याने देण्यात यावा, ठराव भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आयोज‌ित केलेल्या मेळाव्यात करण्यात आला.

NCP नेत्यांच्या आजपासून प्रचारसभा

0
0
राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सभा आयोजित केल्या आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांची ३ एप्रिलला, लक्ष्मणराव ढोबळे यांची ६ आणि ७ एप्रिलला, गृहमंत्री आर. आर. पाटील यांची १२ एप्रिलला आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची १३ एप्रिलला इचलकरंजी आणि कोल्हापूररमध्ये सभा होणार आहे.

आर्किटेक्ट, प्रकाशकही रिंगणात

0
0
लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात राजकीय पक्षांचे उमेदवार म्हणून त्यांची ओळख असली तरी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राजकीय पक्षाचे उमेदवार उच्च विद्याविभूषित आहेत.

मोदींच्या सभेसाठी ‘देव पाण्यात’

0
0
मोदी लाटेवर स्वार होत विजय खेचून आणण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील महायुतीचा प्रत्येक नेता प्रयत्नशील आहे. त्यासाठी नरेंद्र मोदी यांची सभा होण्यासाठी हे नेते देव पाण्यात घालून बसले आहेत.

बचत गटांची ताकद हवीय

0
0
निवडणुकीमध्ये प्रचारासाठी आणि गठ्ठामतदान म्हणून राजकीय पक्षांनी महिला बचत गटांकडे लक्ष केंद्रित केले आहे. महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांचे बचत गटांच्या माध्यमातून कसोशीने प्रयत्न सुरू आहेत.

धरलं तर चावतंय...!

0
0
शाहूवाडी तालुक्यात माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात आहे. सोयीच्या राजकारणात त्यांची अवस्था ‘धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय,’ अशी झाली आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images