Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

जनतेत विश्वासाची भावना निर्माण करा

0
0
‘पोलिसांविषयी जनतेत विश्वासाची भावना राहिली पाहिजे. पोलिसांच्या प्रतिमेविषयी लोकांमध्ये असलेला पूर्वांपारपासूनचा समज दूर करण्यासाठी पोलिसांनी आपल्या मानसिकतेमध्ये बदल करावा’ असा सल्ला कोल्हापूर जिल्ह्याचे पोलिसप्रमुख मनोजकुमार शर्मा यांनी दिला.

वाहन खरेदीला ग्राहकांची पसंती

0
0
गुढीपाडव्याचा मुहुर्तू साधून दुचाकी आणि चारचाकी वाहन खरेदीला ग्राहकांनी पसंती दिली. गुढीपाडव्या दिवशी दुचाकीच १५० आणि चार चाकी ३५० वाहनांची नोंदणी आरटीओ कार्यालयाकडे झाली.

बैठकीपर्यंत कनेक्शन तोडणार नाही

0
0
जलसंपदा विभाग व महानगरपालिका आपापल्या मतांवर ठाम असल्याने सहा वर्षांपासून भिजत घोंगडे पडलेल्या पाणीपट्टी दराबाबत आता जिल्हाधिकाऱ्यांकडून मध्यस्थी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

जोतिबावर वाहनांना ‘नो एंट्री’

0
0
जोतिबा यात्रा कालावधीत जोतिबा डोंगरावर चारचाकी व दुचाकींना प्रवेश बंदीचा निर्णय घेण्यात आला. दुचाकी व चारचाकी वाहने अडवण्याची ठिकाणे लवकरच निश्चित केली जाणार असून डोंगरावर केवळ एसटी व केएमटीने भाविकांना जावे लागणार आहे.

अमर बागी, सदिच्छा उपांत्य फेरीत

0
0
रवी चावरे (३४) व महेंद्र शिवशरण (२४) यांनी केलेल्या चौफेर फटकेबाजीच्या जोरावर अमर बागी स्पोर्टसने डोग्रा स्पोर्टसच्या २८ धावांनी पराभव करत खंडोबा चषक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या सामन्यात पुणे येथील सदिच्छा स्पोर्टसने नामदार बंटी पाटील स्पोर्टसचा १७ धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

अभिनेते कुलदीप पवार यांना आदरांजली

0
0
नटासाठी लागणारा चेहरा असूनही रूपेरी पडद्यावरील खलनायक अजरामर करणाऱ्या कुलदीप पवार यांच्या निधनाने रसिकां हृदयातील नायक गेला अशा शब्दात रंगकर्मींनी कुलदीप पवार यांना श्रध्दांजली वाहिली.

‘परीक्षांच्या वेळापत्रकात गोंधळ नाही’

0
0
‘एम. कॉम. भाग एक व दोनच्या परीक्षा अनुक्रमे २१ एप्रिल व १० एप्रिल २०१४ पासून सुरू होणार आहेत. या दोन्ही परीक्षांचे कोणतेही दोन पेपर एकाच दिवशी असण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

प्रवास महागला, टोल दर वाढले

0
0
राज्य रस्ते विकास महामंडळाने टोलच्या दरांची पुनर्रचना केल्याने कोल्हापूर ते पुणे प्रवास १५ रुपयांनी तर कोल्हापूर ते मुंबई प्रवास ४५ रुपयांनी महागणार आहे. सध्या किणी आणि तासवडे या टोलनाक्यांचे दर वाढले नसले तरी जुलैमध्ये या टोल नाक्यांच्या दरांमध्ये वाढ होणार असल्याने हा प्रवास आणखी महागणार आहे.

पानसरे यांची भूमिका एकांगी

0
0
कोल्हापूर लोकसभेसाठी डाव्या आघाडीचे संपतराव पवार यांचे नाव जाहीर केल्यानंतर जिल्हा पातळीवर डाव्या आघाडीची बैठक होउन चर्चा होणे आवश्यक होते. डाव्या व पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांना एकत्र करून निर्णय घेण्याऐवजी अॅड. गोविंदराव पानसरे यांनी एकांगीपणे डाव्या आघाडीच्या विरोधात निर्णय घेणे चळवळीच्या दृष्टिने घातक आहे, असे मत डाव्या व पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.

लोकांसमोर अनेक पर्याय!

0
0
यंदाची निवडणूक ही अधिक रंगतदार होईल, अशी अपेक्षा आहे. काय होईल हे सांगता येणं कठीण आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे, लोकांपुढे आता पक्षांच्या रूपात केवळ दोन पर्याय नाहीत, तर अनेक पर्याय आहेत.

फसवणूक करणाऱ्यांना घरी बसवा

0
0
‘ना शेठजी, ना साहेब, फक्त आम आदमी एवढंच लक्षात ठेवा. राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीतील चोरांना योग्य जागा दाखविण्याची हीच खरी वेळ आहे. सामान्य माणसांना आपचा तिसरा पर्याय आहे.

जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही दोघे एकत्र

0
0
‘२००४ च्या निवडणुकीत धनंजय महाडिकांमुळेच मला ४२ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. परंतु दुर्दैवाने कुणीतरी मिठाचा खडा टाकल्याने आमच्यात वितुष्ट आले. झाले गेले पंचगंगेत बुडवून आम्ही एकत्र आलो आहोत.

विकासाला मत म्हणजे आवाडेंना मत

0
0
‘सहकाराच्या माध्यमातून विविध संस्थांची उभारणी करुन त्याद्वारे हजारो सुशिक्षित बेकार तरुण-तरुणींना मदतीचा हात देऊन स्वकर्तृत्त्वाची शिकवण कल्लाप्पाण्णा आवाडेंनी दिली आहे.

भगव्याची काँग्रेसला धास्ती

0
0
‘भगव्या वादळाची चाहूल लागल्यानेच काँग्रेस आघाडीच्या नेत्यांनी धास्ती घेतली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भगवे वादळ रोखण्याचे केलेले आवाहन भितीतूनच केले आहे. आता जनताच त्यांना घरात बसवेल.’

अचूक निकाल सांगा, २१ लाख जिंका

0
0
भविष्य वर्तविणाऱ्या ज्योतिषांना महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्यावतीने लोकसभा निवडणूक निकालांचे अचूक भविष्य वर्तवा आणि २१ लाख रूपये रोख ब‌क्षीस जिंकण्याचे आव्हान देण्यात आले असल्याची मा‌हिती अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिले.

महिलांची गर्दी प्रचारापुरतीच

0
0
‘‘गेल्या काही दिवसांपासून महिला मेळाव्यांसाठी बोलावलं जातं. तिथं नुसती उमेदवाराची स्तुती ऐकावी लागते. काही मेळाव्यांच्या ठिकाणी महिलांना जोडवी, करंडे भेट दिले जातात. हळदीकुंकू समारंभाचं निमित्त पुढं करून भेटी दिल्या जातात.

युवक आणि यंग सीनिअर्सच टार्गेट

0
0
कळे गाव सोडल्यानंतर लाल मातीचा धुरळा उडवितच थेट गावापर्यंत जाणारी वाहने, ग्रामदेवतेच्या मंदिरात ठिकाठिकाणी सुरु असलेली यंग सीनिर्यसची राजकीय चर्चा, कोण बी निवडून येऊन दे, पण रस्ता, वीज, पाणी आणि पीककर्ज माफ करायला पायजे, अशाच प्रतिक्रिया गगनबावडा तालुक्यातील मतदारांनी दिल्या.

वाढत्या आकड्यांची भीती

0
0
लोकसभा उमेदवारांचे अर्ज भरताना हजारो समर्थक वाहनांतून आले. समर्थकांना गाव व गटानुसार चहानाष्ट्याची सोय ठराविक हॉटेलमध्ये केली गेली. झेंडे, डि‌जीटल फलकांची गर्दी माणसांपेक्षा जास्त दिसली.

शोध पुरोगामी चेहऱ्याचा!

0
0
अमावस्येची रात्र होती. बाहेर किर्रर्र काळा कभिन्न अंधार. घरातल्या बल्बच्या मंद प्रकाशात साहेबांनी खूप प्रेमानं स्वतःच्या दाढीवरून हात फिरवला. टेबलावरची टॉर्च उचलली.

तरुणाई आतुर पहिल्या मतदानासाठी

0
0
आपल्याला मतदान करायची संधी मिळणार या कल्पनेनेच तरुण मतदार आनंदित झाले असून, हा हक्क बजावण्याचा संकल्पच जणू त्यांनी केल्याचे त्यांच्याशी संवाद साधताना जाणवले.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images