Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

अनुदानाचा दुसरा हप्ता ५० टक्केच जमा

$
0
0
राज्यातील बारा हजार सार्वजिनक ग्रंथालयांच्या दुसरा हप्ता ग्रंथालय संचालकांनी सबंधित वाचनालयाच्या खात्यावर ३१ मार्चपूर्वी जमा करण्यात आला आहे. पण, दुसऱ्या हफ्त्याच्या पन्नास टक्केच हे अनुदान जमा केल्याने पुन्हा उसनवारी करून या वाचनालयांना आता ताळेबंद करावा लागणार आहे.

गूळ विक्री केंद्रे थंडावली

$
0
0
खरेदी विक्रीतील मध्यस्थांचे उच्चाटन करुन ग्राहकांना वाजवी किंमतीमध्ये व शेतकऱ्यांना किफायतशीर दर मिळावा यासाठी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीने थेट गूळ विक्री केंद्राची सुरुवात केली.

मार्च एंडिंगसाठी धावाधाव

$
0
0
मार्च एंडिंगपूर्वीचे हिशोब पूर्ण करण्यासाठी सोमवारी दिवसभर राष्ट्रीयकृत बँकांच्या ट्रेझरी शाखा तसेच क्लिअरन्स हाऊसमध्ये लगबग उडाली. जिल्ह्यातून जवळपास ४ हजार कोटीचा महसूल सरकारकडे जमा करण्यात आला आहे.

मतदान करणं गरजेचं!

$
0
0
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी याआधीच सुरू झालेली आहे. या पार्श्वभूमीवर, निवडणुका, त्यातील मुद्दे राजकीय नेते, पक्ष आदींबाबत वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना नेमकं काय वाटतं, यावर प्रकाश टाकणारं हे विशेष सदर. वाचा आजपासून…

पवारांमुळे शेतकरी उद्‍‍ध्वस्त

$
0
0
‘कृषिमंत्री शरद पवार यांच्या चुकीच्या धोरणांना मी कायम विरोध केल्यानेच पवार माझा द्वेष करतात. माझे वय झाल्याने मुलगा संजयला शिवसेनेत जाण्याची मी मुभा दिली. संजयने पवारांच्या चुकीच्या धोरणांना कायम विरोध करावा असे मी त्याला सांगितले आहे.

कागलमधून महाडिकांना मताधिक्य देणार

$
0
0
‘कागल तालुक्यात मी विकासकामांचा डोंगर उभारला आहे. त्यामुळे तालुक्यातून धनंजय महाडिक यांना मताधिक्य मिळणार आहे. मात्र, कार्यकर्त्यांनी भावनेच्या आहारी न जाता महाडिक यांना निवडून द्यावे, अन्यथा मला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल,’ असे प्रतिपादन कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

दोन दाढीवाल्यांची जादू संपली

$
0
0
‘खासदार राजू शेट्टी हे केवळ माहितीच्या अधिकाराखाली माहिती गोळा करून विकास कामांचा डांगोरा पिटत जनतेची दिशाभूल करून भावनेशी खेळतात. मात्र, या वेळी भावनेचा खेळ चालणार नाही,’ अशी परखड टीका ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी केली.

गल्ली ते शिवार चर्चा एकच... आवाडे की शेट्टी?

$
0
0
हिरवीगार डोलणारी पिकं आणि सतत कामात व्यग्र असणारी माणसं हे हातकणंगले तालुक्याचं वैशिष्ट्य. गावागावांतील सहकारी संस्थांमुळे व्यवसाय व उद्योगांनी आणलेली समृद्धीची गंगा गावांमधील घरांमध्ये पाझरलेली दिसते.

सुटीत येणार प्रचाराला वेग

$
0
0
प्रचारादरम्यान नोकरदार व व्यावसायिकांशी संपर्क साधण्यासाठी सुटीची वेळ साधावी लागणार आहे. १७ एप्रिलअखेर कर्मचाऱ्यांना पाच दिवस सरकारी सुटी मिळणार आहे.

‘जय महाराष्ट्र’लाच जय महाराष्ट्र!

$
0
0
जाहीर प्रचार असो वा भाषण असो ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ अशा समारोपाशिवाय समारोप झाल्यासारखे वाटतच नाही. देश व राज्याचा एकत्रित अभिमान चेतवणाऱ्या या छोट्या घोषणेवरही कोल्हापुरात लोकसभा निवडणुकीचा परिणाम जाणवू लागला आहे.

दक्षिणेतील वारे फिरतेय...

$
0
0
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील छुप्या ‘जय महाराष्ट्र’च्या प्रचारामुळे राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण असताना गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी राष्ट्रवादीचे लोकसभा उमेदवार धनंजय महाडिक यांच्याशी असलेला अबोला तोडला.

आघाडीला बट्टा लावणाऱ्यांवर वॉच

$
0
0
विरोधकांना धूळ चारायची असेल तर आघाडी धर्म पाळायलाच हवा, असे जाहीर सभेत बेंबीच्या देठापासून ओरडायचे. प्रत्यक्षात मात्र वेगळेच करायचे. आतून विरोध आणि बाहेरून पाठिंबा असा आघाडी धर्माचा नवा फंडा पुन्हा एकदा चर्चेत आला.

पाडव्याचा मुहूर्त, प्रचार धडाका

$
0
0
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सोमवारी बहुतांशी उमेदवारांनी प्रचाराचे नारळ फोडले. सुटी कॅश करण्यासाठी उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतासाठी आवाहन केले. निवडणुकांच्या प्रचारासाठी आजचा दिवस उमेदवारांच्या दृष्टीने महत्वाचा होता. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा मुहूर्त उमेदवारांनी साधला.

तरुणाई पहिल्या मताचं मोल

$
0
0
यंदाच्या लोकसभा निवडणुकीद्वारे देशात कोणाचे सरकार आणण्यात महत्त्वाची भूमिका असणार आहे, ती तरुणाईची आणि विशेषकरून पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांची.

पावसाळ्यातही रंकाळा प्रदूषितच

$
0
0
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाप्रमाणे रंकाळा ड्रेनेज लाइनचे कामही मुदत ओलांडणार आहे. हे काम एप्रिलअखेरपर्यंत चालण्याची चिन्हे असल्याने यंदाच्या पावसाळ्यात रंकाळ्यात स्वच्छ पाणी साठवण्याचे नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वर्षअखेरपर्यंत शहरवासियांना प्रदूषित हिरवेगार सांडपाणीच पाहायला मिळणार आहे.

शिवसेनेत तिकीटविक्री!

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, ‘शिवसेनेत पूर्वीची जिद्द राहिली नाही’, अशी टिपणी केली असताना, ‘शिवसेनेत निवडणुकीच्या तिकिटासाठी पैसे द्यावे लागतात’, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील जाहीर सभेत मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वर्मावर घाव घातला.

लिपिक महिलेची आत्महत्या

$
0
0
शहरातील गुरुवार बागेत मंगळवारी दुपारी दहिवडी येथील पाटबंधारे विभागातील सहायक लिपिक आरती सारंग पखाले (वय २४, रा. फलटण) या महिलेने विषप्राशन करून आत्महत्या केली.

प्रचाराला उन्हाचा ‘चटका’

$
0
0
तळपत्या सूर्यामुळे बसणारे चटके, मागील तीन-चार दिवसांत वाढलेला कमालीचा उष्मा याचा परिणाम लोकसभा निवडणूक प्रचारावर झाला आहे. त्यामुळे प्रचार थंडावला असून, प्रचाराला वेग कसा द्यायचा, असा प्रश्न निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांपुढे उभा राहिली आहे.

रुसवा बाजूला ठेवा, राजेंना मतदान करा

$
0
0
‘आगामी लोकसभा निवडणूक महत्त्वाची आहे. काँग्रेसने जी वैचारिक मूल्ये जोपासली आहेत ती कायम ठेवण्याची ही निवडणूक आहे. रुसवे-फुगवे बाजूला ठेऊन मी निवडणुकीला उभा आहे, असे समजून कार्यकर्त्यांनी काम करावे.

रानमेव्याला आला बहर

$
0
0
पन्हाळा परिसरातील मार्तंड, पावनगड, विठोबा माळ, रेडेघाट या परिसरातील करवंदे, बोरे, चिकण्या, काजू, तोरणे आदी प्रकारचा रानमेवा बहरू लागला असून त्याचा सुगंध परिसरात दरवळत आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images