Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १८०० जणांना नोटिसा

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी देखील जय्यत तयारी केली आहे. बेकायदेशीर कृत्ये घडण्याची शक्यता असलेल्या १८०० जणांना नोटिसा देण्याबरोबरच, संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त बंदोबस्त तैनात करणे, दारूची छुपी वाहतूक थांबविण्यासाठी प्रयत्न अशा वेगवेगळ्या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्याचे काम पोलिसांनी केले आहे.

‘एसटीपी’ला मुहूर्त कधी?

$
0
0
पंचगंगा नदीचे प्रदूषण दूर करण्यासाठी आवश्यक असलेल्या महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या (एसटीपी) कामाला सोमवारपर्यंतची (३१ मार्च) मुदत गाठता येणार नाही. हा प्रकल्प केंव्हा सुरु होईल, याबाबत अजून दिवसही ठरवता आलेला नसल्याने प्रकल्प सुरु होण्यास आणखी किती दिवस लागणार हे अनिश्चित आहे.

आजऱ्यात रंगला रंगोत्सव

$
0
0
गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला आजरा परिसरात जोरदारपणे रंगपंचमी खेळली जाते. युवकांसह, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सहभागाने रंगणारी येथील रंगपंचमी काही औरच असते. नेहमीच्या रंगपंचमीऐवजी आज खेळल्या जाणाऱ्या रंगपंचमीला शनिवारी मोठा उत्साह जाणवला.

बाजार समिती आकारणार सेवाशुल्क

$
0
0
सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग खात्याने प्रक्रिया केलेल्या शेतीमालावरील नियमन रद्द केले असले तरी, बाजार समितीला आपल्या आवारात होणाऱ्या व्यवहारावर उपविधी सूचनेनुसार सेवाशुल्क आकारण्याचा अधिकार आहे.

शीलादेवी शिंदे यांचे निधन

$
0
0
येथील श्रीमती शीलादेवी डी. शिंदे ( वय ७९ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. दिवंगत डी. डी. शिंदे सरकार यांच्या त्या पत्नी आणि विद्यापीठ सोसायटीचे अध्यक्ष उमेश शिंदे यांच्या त्या आई होत.

दोन विषयांच्या परीक्षांना एकच मुहूर्त

$
0
0
शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील सावळागोंधळ थांबता थांबेना. प्रश्नपत्रिकेची अदलाबदल, परीक्षा केंद्रावर वेळेत प्रश्नपत्रिका उपलब्ध न होणे, यापाठोपाठ आता दूरशिक्षण केंद्रांतर्गत एम.कॉम.च्या एटीकेटीधारक विद्यार्थ्यांच्या परीक्षांची पंचाईत झाली आहे.

गुढीपाडवा: पाठवा तुमचा फोटो

$
0
0
गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस. घराघरात उंच गुढी उभारून, दाराला तोरण बांधून हा सण सर्वत्र साजरा केला जातो. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने खास गुढीपाडव्याचे औचित्य साधत ‘तुमच्या फोटोसंगे, गुढीपाडवा साजरा करू या’ अशी वाचकांना साद घातली आहे.

मंडलिकांसाठी मोदी, उद्धव. बाबाही

$
0
0
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी भाजपचे नेते नरेंद्र मोदी, शिवेसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, योगगुरू रामदेवबाबा, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले, खासदार संजय राऊत, होम मिनिस्टर फेम आदेश बांदेकर, डॉ. अमोल कोल्हे, सदाभाऊ खोत यांच्या तोफा धडाडणार आहेत.

खासगी शिक्षणसंस्थांची दंडेली

$
0
0
महिन्याच्या पगारातून दोन हजारांची कपात, नोकरीला दोन ते तीन वर्षे शिल्लक असतानाही सक्तीची रिटायरमेंट, कोरी सेवापुस्तके, परस्पर वरिष्ठ वेतनश्रेणी, परस्पर अतिरिक्त शिक्षक ठरविणे आदी स्वयंप्रताप अनेक माध्यमिक शाळांत सुरु आहेत. शैक्षणिक संस्थेने नेमलेले एजंट आणि शिक्षण खात्यात साथ देणारे अधिकारी यांच्यामुळेच काही शाळांत अपप्रवृत्ती फोफावली आहे.

शाहूंचा विचार विकला : आव्हाड

$
0
0
‘आयुष्यभर ज्यांनी फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेतले, ते जातीयवादींच्या विकृत सावलीला गेले आहेत. देशाला एकसंघ ठेवायचे असल्यास राजर्षी शाहूंचा विचार विकणाऱ्या मंडलिकांचा पराभव करा ,’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी केले.

'ती' युती लवकरच कौरवांची होईल!

$
0
0
‘पाच पांडवाच्या महायुतीत आता आणखी एकाची भर पडली आहे. निवडणुकीपर्यंत ही महायुती शंभर कौरवांची होईल,’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोमावारी लगावला.

नेते आवाडेंबरोबर, जनता शेट्टींबरोबर?

$
0
0
साखर कारखादारांविरोधात आंदोलनाचे रान उठवलेल्या राजू शेट्टी यांना रोखण्यासाठीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसला बोनस म्हणून दिलेल्या हातकणंगले मतदारसंघातील निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या एकोप्यामुळे रंगतदार बनली आहे.

काँग्रेसला बंडखोरीचा; भाजपला नाराजीचा ‘ताप’

$
0
0
सांगली लोकसभा मतदार संघात महायुतीच्या गोटात आमदार संभाजी पवार यांच्या नाराजीने तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या गोटात माजी आमदार हाफीज धत्तुरे यांच्या बंडखोरीने उमेदवारांचा ‘ताप’ वाढविला आहे.

मिरजेतील मुस्लिम समाजात ‘कलगीतुरा’

$
0
0
माजी आमदार हाफीज धत्तुरे यांच्या बंडखोरीवरुन मुस्लिम समाजातील स्थानिक नेत्यांमध्ये ‘कलगीतुरे’ झडू लागले आहेत. स्थानिक नेत्यांनी सोमवारी स्वतःला समस्त मुस्लीम समाज म्हणवून घेत काँग्रेसकडून अन्याय झालेल्यांची यादी सादर केली तर दुसरीकडे त्याच यादीवरील अनेकांनी समस्त म्हणवून घेणारे वैफल्यग्रस्त झालेत.

पवारांसाठी प्रतिष्ठेची लढत

$
0
0
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा मतदारसंघ म्हणून ओळख असल्यामुळे माढा मतदारसंघातील लढत राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रतिष्ठेची आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, सांगोला आणि माळशिरस, तर सातारा जिल्ह्यातील फलटण आणि माण हे विधानसभा मतदारसंघ यात येतात. सहापैकी चार मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहेत.

बिंदू चौकातील गोळीबार प्रकरणाची चौकशी सुरू

$
0
0
बिंदू चौक येथे हवेत गोळीबार केल्याच्या प्रकरणाची चौकशी लक्ष्मीपुरी पोलिसांनी सुरू केली आहे. इरफान अतब महात यांनी गोळीबार प्रकरणी नुराणी बंधूंची चौकशी करण्याची मागणी जिल्हा पोलिसप्रमुख मनोजकुमार शर्मा यांच्याकडे केली आहे.

पॉलिशच्या बहाण्याने शेळपमध्ये सोने पळवले

$
0
0
आजरा तालुक्यातील शेळपपौकी रांगवाडी येथील शेतकरी कुटुंबाला सोने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने दोन अज्ञातांनी सुमारे नव्वद हजार रुपयांचे सोने पळविण्याची घटना रविवारी (ता. ३०) दुपारच्या सुमारास घडली. याबाबत स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने घेतलेली शोधमोहिम फसल्यानंतर संबंधीत कुटुंबाने आज याबाबतचा गुन्हा आजरा पोलीसात नोंद केला.

मंत्रालयीन सहायक परीक्षेत नीलेश निंबाळकर प्रथम

$
0
0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या मंत्रालयीन सहायक या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत कोल्हापूरसह तासगाव, इस्लामपूर येथील विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. सर्वसाधारण गटातून नीलेश विलास निंबाळकर यांनी प्रथम तर तानाजी माने यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला.

दोन पोलिस निलंबित

$
0
0
मटक्यावर अड्ड्यावर धाड टाकून कारवाई न करता ५० हजार रुपयांची तडजोड केल्याच्या संशयावरून लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक इजाज गुलाब शेख व भुजंग रामचंद्र कांबळे या दोन कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलिसप्रमुख मनोजकुमार शर्मा यांनी निलंबित केले.

‘गाइड’साठी लागणार ‘एनओसी’

$
0
0
प्राध्यापक म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात नोकरी करायची आणि पीएचडी, एमफिलसाठी अन्य विद्यापीठातील उमेदवारांना मार्गदर्शन करायचे. त्याची विद्यापीठासह कॉलेजकडे कोणतीच नोंद नाही.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images