Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कुडाळला 'अजिंक्यतारा'चे विभागीय कार्यालय

$
0
0
जावली तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सोयीसुविधा व विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी अजिंक्यतारा साखर कारखान्यातर्फे जावली तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कुडाळ येथे विभागीय कार्यालय सुरू करण्यात आले आहे.

निकृष्ठ पाण्याची टाकी कोसळली

$
0
0
पुर्नवसन विभागाच्या नागरी सुविधा योजनेतून आसगाव ता. कोरेगाव येथे बांधण्यात आलेली ५० हजार लिटर क्षमतेची पाणी साठवण टाकी रविवारी पहाटे कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

साता-यातील ३ भाविक मृत्त घोषित होणार

$
0
0
उत्तराखंड येथे १६ जून रोजी झालेल्या महाप्रलयाला मंगळवारी एक महिना पूर्ण होत असून, अजूनही पाच हजार ७४८ भाविक बेपत्ता आहेत. या घटनेनंतर एक महिन्यात बेपत्ता व्यक्तींचा शोध न लागल्यास ती व्यक्ती मृत घोषित करावी, असे आदेश उत्तराखंड सरकारने दिले होते.

पॉलिटेक्निकच्या १०४ जागा रिक्त

$
0
0
पॉलिटेक्निक प्रवेशासाठी पहिला कॅप राऊंड अखेर शासकीय तंत्रनिकेतनमध्ये १०४ जागा रिक्त राहिल्या.

कोयना धरणात ७७ टीएमसी पाणीसाठा

$
0
0
कोयना पाणलोट क्षेत्रासह पाटण, जावळी व महाबळेश्वर तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला असून, कोयना धरणात सध्या ७७.१० टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.

पावसाची दिवसभर विश्रांती

$
0
0
गेले चार दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी थोडी विश्रांती घेतली. ऊन आणि अधून मधून पाऊस असे वातावरण शहरात राहिले. राजाराम बंधा-याची पाणी पातळी चार फूटाने कमी झाली.

रमेश पोवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक रमेश पोवार यांनी सोमवारी स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी नगरसचिव दिवाकर कारंडे यांच्याकडे अर्ज दाखल केला. पोवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांनी बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

'अंगडिया'दरोडा : १२ जणांना सक्तमजुरी

$
0
0
वळसे (ता. सातारा) येथे तीन वर्षांपूर्वी पडलेला अंगडिया ट्रॅव्हल्स दरोडाप्रकरणी बारा आरोपींना सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश पी. पी. जोशी यांनी सात वर्षांची सक्तमजुरी आणि सर्वांना दंडाची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे अॅड. महेश कुलकर्णी यांनी काम पाहिले.

जाधव बंधू खून खटला निकाल २९ जुलै रोजी

$
0
0
संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या येथील उमेश व महेश जाधव बंधूंच्या खून खटल्याच्या निकालासाठी २९ जुलै तारीख देण्यात आली. सोमवारी सरकार पक्षाच्या वतीने खून खटल्याच्या सुनावणी दरम्यान दिलेल्या पुराव्यास समर्थन देणारे हायकोर्ट व सुप्रीम कोर्टाचा संदर्भीय निकाल कोर्टात दाखल करण्यात आले.

आयटीआयसाठी २७८० अर्ज दाखल

$
0
0
कळंबा रोडवरील आय. टी. आय प्रवेशाच्या अखेरच्या दिवशी रात्री उशीरापर्यंत १२४० जागांसाठी २७८० अर्ज आले.

ऑटो रिक्षांवरील कारवाई सुरुच राहणार

$
0
0
पासिंगसाठी कार्यालयात रिक्षांची संख्या कमी दिसल्यास कारवाई सुरुच राहणार आहे. ई-मीटरसाठी कोणतीही मुदतवाढ दिलेली नसल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र मदने यांनी सांगितले.

जादा खर्च परत करून राजीनामा द्या

$
0
0
पुण्यातील कार्यक्रमासाठी दाखवलेला जादा खर्च महामंडळाकडे परत करुन २ ऑगस्टपूर्वी अध्यक्षांनी राजीनामा दिला नाही तर संचालक मंडळाच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ बचाव आंदोलन संघर्ष समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

उप‌निबंधक कार्यालयातील क्लार्कला अटक

$
0
0
लिलावात घेतलेल्या मालमत्तेचा ताबा घेण्यासाठी लागणाऱ्या मंजूरीपत्राच्या बदल्यात चार हजार रुपयांची लाच मागणाऱ्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील लिपीकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी अटक केली.

पार्किंगचे ठेके 'इंटरेस्ट'मध्ये अडकले

$
0
0
शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आठ ठिकाणी पे अँड पार्किंगचा ठेका मंजूर होऊनही जून महिन्यातील सर्वसाधारण सभेत हा विषय 'पुढील मिटिंग' करण्यात आला. त्यामुळे त्याला आता अर्थकारणाचा वास येऊ लागला आहे.

सरोगेट मदरलाही बाळंतपणाची रजा

$
0
0
पुणे येथील सरोगेट मदर डॉ. पूजा दोषी हिला पुणे विद्यापीठाने बाळंतपणाच्या रजेचा हक्क नाकारल्यानंतर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत अत्यंत सकारात्मक भूमिका घेतला आहे.

विजेबाबत कारखाने सक्षम

$
0
0
कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातील १३ साखर कारखान्यांनी २०१२-१३ या गळीत हंगामात सुमारे ५३ कोटी युनिटची वीजनिर्मिती केली आहे. त्यांनी या हंगामात स्वतःची गरज भागवून महावितरण आणि रिलायन्स एनर्जी या कंपन्यांना सुमारे ३१ कोटी युनिटची वीज विक्री केली आहे.

दोस्ता, हे वाईट आहे...!

$
0
0
अभ्यास करत नाही म्हणून वडील रागावतात, पॉकेटमनीसाठी पैसे देताना हात आखडता घेतात, अशा किरकोळ कारणातून एका मुलाची वडिलांचा खून करण्यापर्यंत मजल गेली.

'देशभूषण'मध्ये 'गणित मंडळ'

$
0
0
विद्यार्थ्यांना गणित विषयाची गोडी लागावी, त्यांनी या विषयाची भिती बाळगू नये आणि हसत-खेळत या विषयातील सूत्रे, व्याख्या पाठ व्हाव्यात यासाठी येथील देशभूषण हायस्कूलने 'गणित मंडळ' हा वेगळा शैक्षणिक उपक्रम सुरू केला आहे.

कमकुवत विभागांवर लक्ष केंद्रीत करू

$
0
0
'जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागाचा आढावा घेणे सुरू आहे. तो संपल्यावर कोणता विभाग कमकुवत आहे याची माहिती घेऊन त्यावर अधिक लक्ष केंद्रीत करू' असे प्रतिपादन नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सूर्यवंशी यांनी केले.

कोयना पायथा वीजगृहाचे दोन्ही युनिट कार्यान्वित

$
0
0
कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह पाटण, जावळी व महाबळेश्वर तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून, मंगळवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत कोयना धरणातील पाणीसाठा ७९ टीएमसी इतका झाला आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images