Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पं. स. इंजिनीअर लाच घेताना गजाआड

$
0
0
दोन हजार रुपयांची लाच घेताना गगनबावडा पंचायत समितीमधील बांधकाम विभागाचा इंजिनीअर शरद श्रीपाल पाटील (वय ४८, रा. कोकणे मठ, शनिवार पेठ) याला सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

प्राध्यापकांना निवडणुकीचे चारच दिवस काम

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी यंदा प्रथमच सीनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांचा समावेश केला आहे. दुसरीकडे शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा सुरू आहेत. परीक्षा कामकाजावर परिणाम होऊ नये याची पुरेपूर काळजी घेऊन प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाजातील जबाबदारी सोपविली आहे.

बासला बसणार ३ कोटींचा फटका

$
0
0
प्रक्रिया केलेल्या शेतमालावरील बाजार समित्यांचे नियमन हटविण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला होता. याबाबतचा अध्यादेश १८ डिसेंबरला काढला. त्याची त्वरित अंमलबजावणी करण्याचे आदेश सरकारने नुकतेच काढले आहेत.

वाघांच्या शिकारीचा ‘DNA ट्रॅक’

$
0
0
सांगली येथे सापडलेल्या दोन वाघांच्या आणि एका बिबट्याच्या कातडीमुळे वन विभाग आणि पोलिस खात्यासमोर वन्यप्राण्यांची हत्या आणि त्यांच्या अवयवांची तस्करी कशी रोखायची, याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

कोल्हापुरात ‘आप’कडून नारायण पोवार

$
0
0
आम आदमी पक्षाच्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून जिल्हा संयोजक नारायण पोवार यांची उमेदवारी रात्री​ जाहीर करण्यात आली. पक्षांतर्गत धुसफुसीमुळे उमेदवार निश्चित होण्यात विलंब होत होता. हातकणंलेतून रघुनाथदादा पाटील यांची उमेदवारी यापूर्वीच जाहीर झाली आहे.

महाडिकांचे राजकारण कुठे प्लस, कुठे मायनस

$
0
0
जिल्ह्यात कोणत्याही तालुक्यात गेला तरी महाडिक गटाचे अस्तित्व आहे ही जमेची बाजू आहे. पण या गटाच्या जोरावर महाडिकांनी आतापर्यंत केलेले राजकारण आता लोकसभेसाठी काही ठिकाणी फायद्याचे तर काही ठिकाणी अडचणीचे ठरु लागले आहे.

कोरे-महाडिक भेटीने नवे वळण

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार महादेवराव महाडिक यांनी बुधवारी आमदार विनय कोरे यांची भेट घेतली. या निवडणुकीत हातकणंगलेत कल्लाप्पाणा आवाडे व कोल्हापुरात धनंजय महाडिक यांना पाठिंबा द्यावा अशी विनंती त्यांनी केली.

... हे बहुजनांवर लादलेले उमेदवार

$
0
0
मराठा आरक्षण संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष सुरेश पाटील यांनी बुधवारी अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार यांच्याकडे हातकणंगले मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली. जय जनसेवा पार्टी व अपक्ष असे दोन अर्ज त्यांनी दाखल केले.

पहिल्या पाचमध्ये महाडिक

$
0
0
‘कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी कोणतेही पद नसताना अनेक सामाजिक कामे केली आहेत. आघाडी सरकारने अनेक योजना राबविल्या आहेत. त्यामुळे आघाडी सरकारची चांगली प्रतिमा जनमानसात आहे.

मला संपविण्याचा साखर सम्राटांचा चंग

$
0
0
‘भारत हा कृषी प्रधान देश आहे. केवळ शेतीवरच शेतकरी, शेतमजूरांचे जीवन अवलंबून आहे. केवळ शेतीमुळेच औद्योगिक क्रांती घडू शकते. महाराष्ट्रातील ऊस दर आंदोलनामुळे शेतकऱ्यांचा 32 हजार कोटी रूपयांचा फायदा झाला.

शेट्टींनी नैतिक अधिकार गमावला

$
0
0
‘खासदार राजू शेट्टी यांनी जातीयवादी शक्तींशी हातमिळविणी केल्याने त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या गावात येऊन प्रचाराचा नारळ फोडण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे’ असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी केले. येडेमच्छिंद्र्र येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

गॅस्ट्रो रोखण्याचे प्रयत्न

$
0
0
गॅस्ट्रो साथीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने मंगळवारी तातडीची बैठक घेऊन गॅस्ट्रोचा मुकाबला करण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला. सध्या आयजीएम रुग्णालयात एक गॅस्ट्रोसदृश्य रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती मुख्याधिकारी सुनिल पवार यांनी दिली.

आगे क्या होगा...?

$
0
0
संसदेत जाऊ इच्छिणारे उमेदवार भविष्य आणि कर्मकांडात गुंतल्याचे चित्र आहे. उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झाली आहे. त्यासाठी योग्य वेळ कोणती, कोणाच्या हस्ते अर्ज भरायचा येथपासून ते कोणत्या दिशेला तोंड करून प्रचाराचा नारळ फोडायचा येथपर्यंतची दिशा ज्योतिषांकडून निश्चित केली जात आहे.

साखरगाठींची अमेरिका, दुबईवारी

$
0
0
महाराष्ट्रात गुढ्या उभारून नववर्षाचे स्वागत केले जात असल्याची परंपरा साता समुद्रापार गेलेल्या मराठमोळ्या बांधवांनी अमेरिका, दुबई आणि साहेबांचा देश इंग्लंडमध्येही कायम ठेवली आहे. या गुढींसाठी साखरगाठी साताऱ्यातून निर्यात होत आहेत.

खासदार शेट्टींनी भरली नुकसानभरपाई

$
0
0
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने खासदार राजू शेट्टी यांच्यावर निश्चित केलेल्या नुकसानभरपाईची रक्कम १ लाख १२ हजार १३५ रुपयांची रक्कम बुधवारी भरण्यात आली. ‌या रकमेचा डीडी जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

संवादातून साहित्यनिर्मिती

$
0
0
संत तुकोबांचा हा अभंग माणसाच्या बोलण्यावर प्रकाश टाकतो. बोलणे कसे असावे याचा ते विचार करतात. कधीही अबोल राहू नये, जे आपण बोलतो ते सर्वांसाठी सारखेच असले पाहिजे. गरीब-श्रीमंत, उच्च-नीच अथवा जवळचा-दूरचा असा भेदभाव न करता बोलले पाहिजे.

सुजाण रसिक घडवताना...

$
0
0
सिनेमा कसा पहावा, कोणता पहावा हे सांगतानाच विविध प्रादेशिक भाषांसह आंतरराष्ट्रीय फिल्मस, डाक्युमेंटरी दाखवत सुजाण रसिक घडवण्याची प्रक्रिया गेल्या काही वर्षांत कोल्हापुरात रुजली आहे.

घाम फुटला..!

$
0
0
होळी संपली की उन्हाळ्याची चाहूल लागते. चैत्र महिन्यात उन्हाचे चटके बसू लागतात. पण अलीकडे गेल्या आठ दिवसात उन्हाचा तडाखा वाढल्याने फाल्गुनातच वैशाख वणव्याच्या झळा सोसाव्या लागत आहेत. उन्हाच्या काहिलीने चांगलाच घाम फुटू लागला आहे.

मतांच्या माळांसाठी नेत्यांचे गळ्यात गळे

$
0
0
निवडणूक कोणतीही असो, एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी न दवडणारी राजकीय मंडळी सध्या एकमेकांच्या गळ्यात गळे घालत आहेत. काँग्रेस आघाडी असो वा महायुती, प्रत्येकजण मतांच्या टक्केवारीसाठी बेरजेचे राजकारण करण्यात गुंतल्याचे चित्र आहे.

मराठा, ओबीसी मते हातकणंगलेत निर्णायक

$
0
0
हातकणंगले मतदारसंघाचे गणित जातीच्या राजकारणावर अवलंबून असल्याची कायम चर्चा असते. प्रचारातही जातीचाच मुद्दा कायम असतो. उमेदवारी देतानाही याचाच विचार केला जातो.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>