Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

एक्झाम फिव्हर

$
0
0
दहावी-बारावीपाठोपाठ आता विद्यापीठीय परीक्षा सुरू होत आहेत. पहिल्या टप्प्यात बीए,बीकॉम, बीएस्सी, बीएबीएड परीक्षा होतील. विद्यापीठातर्फे २३० हून अधिक परीक्षा घेण्यात येणार आहेत.

‘त्या’ ट्रॉफीमागची गोष्ट

$
0
0
तो ऑगस्टचा महिना होता आणि वर्ष होते २०१०. मी गुवाहाटी (आसाम) येथे स्पर्धेमध्ये खेळत होते. माझ्याबरोबर माझी आई होती. मी भारतातल्या एका मोठ्या व महत्त्वाच्या स्पर्धेत खेळत होते.

दोन दशकाचे प्रबोधन

$
0
0
पर्यावरण पूरक होळी साजरी करण्यासाठी शहरातील ३२ हून अधिक संस्था पर्यावरणपूरक होळीसाठी गेली २० वर्षे प्रबोधन करीत आहेत. शिक्षण विभाग आणि मुख्याध्यापक संघाकडून शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात येत असल्याने या उपक्रमाला चांगला पाठिंबा मिळत आहे.

नामा म्हणे तेथे...

$
0
0
संत नामदेवांच्या अभंगातील या ओळी आहेत. ‘नामा म्हणे’ या शब्दांतून ही रचना नामदेवांची असल्याचे समजून येते आणि नामदेवांचे म्हणणेही लक्षात येते. पाण्याचा बुडबुडा पाहता पाहता क्षणात नाहीसा होतो, त्याप्रमाणे हा संसारही शेवटी हाती राहत नाही.

चक दे...!

$
0
0
म्हैसूर येथे शनिवारपासून राष्ट्रीय ज्युनिअर महिला हॉकी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्र संघात कोल्हापूरच्या सात खेळाडूंनी संघात स्थान पटकावले आहे.

वाघाचे कातडे सांगलीत जप्त

$
0
0
येथील चांदणी चौकातील साई नेट कॅफेवर छापा टाकून पट्टेरी वाघाचे कातडे पोलिसांनी गुरुवारी जप्त केले.

होमगार्डच्या भत्त्यात दुपटीने वाढ

$
0
0
होमगार्डच्या दैनंदिन भत्त्यात राज्य सरकारने दुपटीने वाढ केली. कर्तव्यभत्ता १५० रुपयांवरून ३०० रुपये, तर उपाहारभत्ता रोज ५०वरून १०० रुपये झाला आहे. तुटंपुज्या मोबदल्यात काम करणाऱ्या होमगार्डना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.

पुरुषोत्तम जाधव साताऱ्यातून अपक्ष लढण्याची शक्यता

$
0
0
शिवसेनेचे साताऱ्याचे माजी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी सहसंपर्कप्रमुखपदासह पक्षाच्या सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. बंडखोरी करून निवडणूक लढविण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे.

सांगलीत धत्तुरेंची काँग्रेसविरोधात बंडखोरी

$
0
0
मिरजेतील काँग्रेसचे माजी आमदार हाफीज धत्तुरे आगामी लोकसभा निवडणूक ही लोकसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढविणार आहेत. या संदर्भात त्यांनी आपल्या समर्थकांची बैठक १५ मार्चला मिरज येथील पटवर्धन हॉलमध्ये बोलवली आहे.

मानवतावाद फुलेंच्या सामाजिक कार्याचा पाया

$
0
0
‘महात्मा फुले यांचे कार्य केवळ विशिष्ट समाजघटकासाठी नव्हते. त्यांनी समाजातील अस्पृश्यांसाठी शिक्षण, महिला शिक्षण आणि उच्चवर्णीय समाजातील स्त्रियांशी निगडित बालहत्या, भ्रूणहत्या, विधवा समस्या, पुनर्विवाह, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्य केले.

हुतात्म्यांच्या स्मरणासाठी प्रतिज्ञा नाट्यरंगतर्फे २३ ला उपक्रम

$
0
0
पारतंत्र्याच्या जोखडातून देशाला मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्यलढ्यात उतरलेल्या व हौतात्म्य पत्करलेल्या भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांचा स्मृतिदिन बलिदान दिवस म्हणून २३ मार्च रोजी साजरा केला जातो.

अधिकाऱ्यांच्या मोबाइलला व्हॉइस रेकॉर्डिंग सॉफ्टवेअर

$
0
0
नगररचना विभाग व ​राजारामपुरी विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना नगरसेवकांकडून धमकावण्याच्या प्रकरणात आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी गुरुवारी गांभीर्याने लक्ष घातले.

काँग्रेस आघाडीतील मतभेद संपविणार

$
0
0
कोल्हापुरातून राष्ट्रवादीचा खासदार निवडून देण्यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादीमधील मतभेद कोणत्याही परिस्थितीत मिटविणार आहोत, असा निर्धार कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

‘प्राचार्य, प्राध्यापकांवर निवडणूक कामे नकोत’

$
0
0
शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा १५ मार्चपासून सुरू होत आहे. परीक्षा कालावधीत प्राध्यापकांवर पर्यवेक्षक, कनिष्ठ पर्यवेक्षक, भरारी पथकांतर्गत कामे सोपविलेली असतात. प्राचार्यांवर संपूर्ण कॉलेजमधील परीक्षा व्यवस्थित घेण्याची जबाबदारी असते.

रंकाळ्याचे भवितव्य नागरिकांच्या हाती

$
0
0
महापौरांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करुन इशारा दिला, महापालिकेच्या विशेष सभेनेही संयम सुटत चालल्याचे संकेत दिले, ड्रेनेज लाइनच्या कामासाठी महिना नव्हे दीड महिन्याची मुदत दिली, पण महिना संपत आला तरी ड्रेनेज लाइनचे काम किंचितही पुढे सरकलेले नाही.

आचारसंहितेचा निव्वळ कांगावा

$
0
0
आचारसंहितेचा कांगावा करून कोणतीही मदत जाहीर करण्यात सरकार चालढकल करत आहे. मात्र, राज्यात जेव्हा लोकसभा, विधानसभा, विधानपरिषद किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू झालेली असते आणि लोकांच्या जीवनावश्यक गरजा किंवा जीवनमरणाचा प्रश्न निर्माण होत असेल तर निवडणूक आचारसंहितेत देखील शिथिल होऊन लोकांना मदत करता येते, असा राज्य सरकारचाच जानेवारी २००७ चा अध्यादेश आहे.

‘मार्च एंड’ची लगबग

$
0
0
यंदा उसाच्या वजनात घट झाली असल्यामुळे शेतकरी आर्थिक अरिष्ठात सापडला आहे. त्यातच मार्च एंडची लगबग सुरु असल्याने बँकांचे वसुली पथक दारात येत असल्याने शेतकरी हैराण झाला आहे. यंदा उत्पन्न आणि उत्पादन खर्च यांचा मेळच बसत नसल्याने बहुतांशी पिक कर्जे थकित आहेत.

महिलांनो, व्यवस्थेची गुलामी झुगारून द्या

$
0
0
चुकीच्या मानसिकता आणि न्यूनगंड ही स्त्रियांची अवनतीची मुख्य कारणे आहेत. निर्माण झालेल्या परिस्थितीत बदल करायचा असेल तर तयार उत्तरे शोधणे बंद केले पाहिजे.

जि. प. अध्यक्ष ३७ वर्षांनंतर रिंगणात

$
0
0
आणीबाणीनंतर १९७७ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस वाहून गेली असतानाही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून खासदारकीची निवडणूक लढवणारे बाळासाहेब माने जिल्ह्यातील पहिले खासदार झाले.

दिसते मजला स्वप्न नवे

$
0
0
विज्ञान तंत्रज्ञानामुळे टेक्नोसॅवी झालेल्या जगात एकीकडे प्रेमाचा बाजार मांडला जात असताना पिंपळगाव खुर्द (ता.कागल) येथील एका पतीने अंध पत्नीसाठी संसारात गेल्या २५ वर्षांपासून पत्नीसाठी वाहून घेतले आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images