Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

शिरोळला गारपिटीचा तडाखा

$
0
0
गारपिटीचा सर्वाधिक तडाखा शिरोळ आणि हातकणंगलेच्या काही भागाला बसला आहे. शिरोळमधील सुमारे ३२ एकरावरील द्राक्षबागा उद्ध्ध्वस्त झाल्या आहेत.

अजितदादांना अडवले

$
0
0
शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करून काँग्रेसकडून शिर्डी लोकसभेची निवडणूक लढवित असलेले खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर सोमवारी संगमनेर शहरात शिवसैनिकांनी हल्ला केला. वाकचौरे यांच्या श्रीमुखात भडकावतानाच त्यांना मारहाणही केली गेली.

साताराःRPIच्या संकपाळांना संधी

$
0
0
प​श्चिम महाराष्ट्रातील सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून रिपब्लिकन पक्षाचे मराठा आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संभाजी शिवाजी संकपाळ हे निवडणूक लढवतील, असे त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी मुंबईत मंगळवारी जाहीर केले.

माय स्मार्ट स्टॅम्प

$
0
0
विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या कर्तृत्ववान व्यक्तीचा फोटो पोस्टाच्या टपाल तिकिटावर छापला जातो. त्यामुळे त्या व्यक्तीचा आणि त्याच्या कार्याचा पोस्ट विभागाकडून गौरवच होत असे.

होळी रंगे निसर्गा संगे !

$
0
0
सकाळी थंडी, दुपारी कडकडीत ऊन, सायंकाळी सुटणारे गार वारे, रात्री थंडी, दिवसातून एकादी दुसरी पावसाची सर असे हवामानात बदल होत असतानाही सर्वांना वेध लागले आहेत ते होळीचे.

मुख्यमंत्र्यांचा पाहणी दौरा

$
0
0
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सोमवारी सोलापूर जिल्ह्यात गारपिटीग्रस्त शेतीची पहाणी केली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील काझी कणबस व होटगी येथील द्राक्षबागांची पाहणी करून आपला धावता दौरा आटोपला.

पेपर लांबणीवर

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १६ व १७ ए​प्रिलला होणाऱ्या विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या दोन्ही दिवशी होणारे ३५ विषयांचे पेपर आता ज्या त्या विषयांच्या परीक्षेच्या शेवटी होतील.

पालांवर आरोग्यसेवा

$
0
0
हंगामी उसतोडणी मजुरांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेने पथदर्शी प्रकल्प हाती घेतला आहे. प्रकल्पांतर्गत उसतोडणी मजुरांची एचआयव्ही, एड्स आणि गुप्तरोगाची तपासणी करण्यात येणार आहे.

कोल्हापूरचा गड जिंका!

$
0
0
कोल्हापूरच्या दोन्ही लोकसभेच्या जागा निसटत्या मतांनी जातात. यंदा देशभर बदलाचे वारे वाहत असल्याने कोणत्याही स्थितीत कोल्हापूरचा गड इर्षेने ‌जिंका, असा आदेश शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी उमेदवार प्रा. संजय मंडलिक, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे व इचलकरंजीचे मुरलीधर जाधव यांना मंगळवारी ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीत दिले.

कुपोषणमुक्तीची अजब आकडेवारी

$
0
0
अंगणवाडी सेविकांचा संप कुपोषित मुलांना सदृढ बनवण्यासाठी फायदेशीर ठरल्याचे चित्र कोल्हापुरात पहायला मिळत आहे. एक महिना अंगणवाडी सेविका संपावर जाऊनसुद्धा कोल्हापूर जिल्ह्याचा कुपोषित मुलांचा आकडा तब्बल १४ ने कमी झाला आहे.

बनावट फेसबुक अकाउंट प्रकरणी अनुजा पाटीलची चौकशी

$
0
0
सहकारी महिला खेळाडूचे बनावट फेसबुक अकाऊंट उघडून बदनामी केल्याप्रकरणी भारतीय क्रिकेट संघातील महिला क्रिकेटपटू अनुजा अरूण पाटील (वय २१, रा. शाहूमिल कॉलनी) हिची हातकणंगले पोलिसांनी चौकशी केली.

शेंडा पार्कात RTO ऑफिस?

$
0
0
ड्रायव्हिंग टेस्ट आणि फिटनेस सेंटरच्या जागेचा कोल्हापूर आरटीओचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला आहे. शेंडा पार्क परिसरात १२ एकर जागेच्या मागणीचा प्रस्तावाचा प्रवास करवीर तहसील कार्यालयापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत ड्रायव्हिंग टेस्ट आणि फिटनेस सेंटरचा प्रश्न कायमचा मिटणार आहे.

विनय कोरेंचा भाव वधारला

$
0
0
विधानसभेच्या निवडणुकीपासून जिल्ह्याच्या राजकारणात जवळजवळ अलिप्त असलेले जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनय कोरे लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा केंद्रस्थानी आले आहेत.

शेकाप अस्वस्थ

$
0
0
काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी आणि महायुतीच्या पंक्तीत आता तिसरी आघाडी आणण्याचे रणशिंग काही पक्षांनी फुंकले. पण या तिसऱ्या आघाडीच्या निर्णयाची गाडी जोपर्यंत धावत नाही तोपर्यंत कोल्हापुरातील शेकापच्या गोटात मात्र अस्वस्थतेचेच धूर आहेत.

पोस्टल मतदानावर डोळा

$
0
0
कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सैनिक, सरकारी कर्मचारी व पोलिस असे जवळपास ३८ हजार पोस्टल मतदार आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने असणाऱ्या या मतदाराने आपल्यालाच कौल द्यावा यासाठी उमेदवारांनी गुप्त संपर्क सुरु केला आहे.

वेट अँड वॉच

$
0
0
शेतकरी कामगार पक्षाने कोल्हापुरातून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी चालवली असली तरी महाराष्ट्रातील डाव्या आघाडीचे प्रमुख घटक असलेले भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांनी मात्र सध्या वेट अॅंड वॉचची भूमिका घेतली आहे.

बेरजेचे गणित

$
0
0
अनेकदा विजय पराजयाचे गणित सुध्दा कोणत्या जातीची किती लोकसंख्या यावर ठरवले जाते. कोल्हापुरातही आता त्याच पध्दतीने प्रचाराची रणणिती ठरवली जात आहे. हातकणंगलेत तर काँग्रेसचा उमेदवार देताना याच जातीच्या गणिताचा आधार घेण्यात आला.

साखर सम्राटांना खासदारकी

$
0
0
पश्चिम महाराष्ट्रात रूजलेल्या साखर कारखानदारीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेची बहुतांशी उमेदवारी साखरसम्राटांच्या खिशात टाकली आहे.

फायबर ताशांच्या प्रेमात बच्चे कंपनी

$
0
0
खणखणीत आवाजातील टिमकीशिवाय शिमगा किंवा होळीची हाळी पूर्ण होत नाही. होळीसाठी पारंपरिक चामड्याच्या टिमक्यांबरोबरच फायबरचे ताशे बाजारात आले आहेत. बच्चे कंपनीकडून फायबर ताशालाच चांगली पसंती असल्याने पारंपरिक टिमक्यांना बाजारपेठेत आव्हान मिळू लागले आहे.

‘स्वयंसिद्धा’ देशपातळीवर

$
0
0
महिलांकडे अबला म्हणून पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन अजूनही फारसा बदललेला नाही. महिलांना हे जमणार काय असे प्रश्नचिन्ह उभे करुन तिला प्रवाहात येऊ न देणाऱ्या व्यवस्थेला ती स्वतःसह कुटुंब आणि समाजालाही सक्षम करु शकते हे पटवून देण्याचे काम गेली २१ वर्षे करणाऱ्या ‘स्वयंसिद्धा’ ची छाप देशपातळीवर पडली आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images