Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

फसव्या योजनांचा फास

0
0
आकर्षक जाहिराती, भरघोस परताव्याचे अमिष आणि झटपट श्रीमंत होण्याचा हव्यासाला बळी पडून अनेकांची फसवणूक होत आहे. फसवणूक झाल्यावर केवळ पश्चाताप व्यक्त करण्याखेरीज दुसरा पर्याय गुंतवणूकदारांसोमर शिल्लक राहत नाही. त्यामुळे अशा फसव्या योजनांची सत्यता पडताळून पाहूनच गुंतवणूक करावी.

सावित्रीबाई हॉस्पिटलमध्ये ‘इटीपी’ प्लँट

0
0
सावित्रीबाई फुले रुग्णालयातील कोणत्याही प्रक्रियेविना बाहेर पडणारे दररोजचे १५ हजार लिटर सांडपाणी आता रोखले जाणार आहे. महापालिकेने इफ्लूएंट ट्रीटमेंट प्लँट उभारणीचे टेंडर जाहीर केले असून आयसोलेशन हॉस्पिटलच्या प्रकल्पातील डीवॅटसचे तंत्रज्ञान वापरुन प्रक्रिया केली जाणार आहे

७६७ फॅन्सी नंबरवर कारवाई

0
0
शहर वाहतूक नियंत्रण शाखेने फेब्रुवारी महिन्यात २८ दिवसात शहरातील फॅन्सी नंबर असलेल्या ७६७ वाहनांवर कारवाई केली आहे. या कारवाईत फॅन्सी नंबरप्लेट जप्त करून ७७ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.

घराचे सेफ राखण‘दार’

0
0
एखाद्या बंद घराचा कडीकोयंडा चोरट्यांनी उस्कटण्याचा प्रयत्न केला तर कारखान्यांच्या भोंग्यासारखा सायरन वाजेल. नुसता सायरनच वाजेल असे नाही, तर हे दार अॅटोमॅटीक आतील बाजूने बंद होईल. लाख प्रयत्न केले तरीही चोरट्याला हे दार उघडता येणार नाही.

टिक्केवाडीकर जंगलात!

0
0
टिक्केवाडी (ता. भुदरगड) हे तालुक्याच्या दक्षिणेस डोंगरात वसलेलं अडीच हजार लोकवस्तीचे निसर्ग संपन्न असे गाव.गावात प्रत्येक घरात एक पदवीधर आणि नोकर. मात्र या गावात मागील कित्येक वर्षापासून ‘गूळ काढण्याची’ प्रथा जोपासली आहे. या गूळ काढण्याच्या काळात सारा गावच घर-दार सोडून देवीच्या इच्छेने गावाजवळच्या जंगलात राहण्यास जातो.

जात वैधता रखडणार

0
0
येत्या वर्षातील इंजिनीअरिंग आणि मेडिकल अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील दहा हजार २१८ विद्यार्थ्यांची जात वैधता प्रमाणपत्र रखडणार आहे. त्यामुळे ऐनवेळी विद्यार्थ्यांना धावपळ करावी लागणार आहे.

गारपिटीनं जगणं हिरावलं!

0
0
थंडी आणि उन्हाचा वेगळाच खेळ निसर्ग खेळत असताना अचानकच राज्यातील अनेक भागांवर कोपल्याप्रमाणे गारांचा भ​डिमार झाला. जीवापाड जपलेली शेतातली उभी पिके आडवी झाली. घरे गेली, जनावरे गेली आणि खिन्न मनाची माणसे निसर्गाचा हा थयथयाट पाहत राहिली.

हॉटेलिंग बूम

0
0
शहरातील अनेक हॉटेल व्यावसायिकांनी विस्तारीकरणाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वर्षभरात हजाराच्या आसपास नव्या रुम्सची भर पडणार आहे. यामुळे हॉटेल व्यावसायिकांना पर्यटकांची चांगली निवास व्यवस्था करता येणार आहे.

रा‌यडिंग रेस

0
0
कोल्हापूर आणि हॉर्स रायडिंगचे नाते तसेच अगदी जुने आहे. पण काळाच्या ओघात शहरातील हॉर्स रायडिंगची परंपरा खंडीत झाली. ती नव्याने सुरू होत आहे. हॉर्स रायडिंग शिकण्याची आणि रेसच्या घोड्यांवर रपेट मारण्याची सुविधा पुन्हा एकदा कोल्हापुरात सुरू होत आहे.

घाटात दडलंय पक्षीवैभव

0
0
पक्ष्यांचे एक अजब जग आहे. या जगाविषयी प्रत्येकाला कुतहूल असते. त्यांची जगण्याची पद्धत पाहून जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. सादळे-मादळे आणि गिरोली घाट परिसरात उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा अशा तीनही ऋतूंत भरपूर जैवविविधता आढळते.

बेळगाव पालिकेवर मराठी झेंडा

0
0
बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत महापौरपदी मराठी भाषिक महेश नाईक आणि उपमहापौरपदी रेणू मुतागेकर यांनी बाजी मारली. यामुळे महानगरपालिकेवर मराठी भाषिकांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले आहे.

गृहमंत्र्यांकडून भ्रष्टाचाराला खतपाणी

0
0
‘अवतारी पुरुष असल्याचे भासवायचे आणि आतून भस्मासुरी कृत्ये करायची. मुठभरांना हाताशी धरून भ्रष्टाचाराला खतपाणी घालायचे. दलालांच्या माध्यमातून राजकारण करताना सर्वसामान्यांना मानसिक गुलामगिरीत लोटण्याचे काम गृहमंत्री करीत आहेत. - संजयकाका पाटील

साताऱ्याला आदर्श जिल्हा करू

0
0
लोकसभा निवडणुकीच्या पाशर्वभूमीवर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीला आघाडीचे उमदेवार उदयनराजे भोसले यांनी हजेरी लावली. बऱ्याच महिन्यानंतर काँग्रेस कमिटीत आलेल्या उदयनराजे भोसले यांनी प्रचार सभाच घेतली.

सुशीलकुमार, मोहिते-पाटील २२ मार्चला भरणार अर्ज

0
0
काँग्रेसचे सोलापूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा लोकसभा मतदार संघातील उमेदवार विजयसिंह मोहिते-पाटील २२ मार्चला निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. या वेळी कृषिमंत्री शरद पवार उपस्थित राहणार आहेत.

सोलापुरात अवकाळीचे तीन बळी

0
0
सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाचे थैमान सुरूच आहे. रविवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यात तिघांचा बळी गेला आहे. वादळी वारे व गारपिटीमुळे आतापर्यंत बळी गेलेल्यांची संख्या सात झाली आहे. याशिवाय गारपिटीमुळे हजारो एकरांवरील फळबागा आणि रब्बीची पिके उध्वस्त झाली आहेत.

रघुनाथ पाटील यांच्यासह १५ जणांची निर्दोष मुक्तता

0
0
अर्जुनवाड (ता.शिरोळ) येथे २००८ मध्ये झालेल्या ऊस आंदोलनात ट्रॅक्टरचे टायर फोडून मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांच्यासह पंधराजणांची जयसिंगपूर येथील प्रथमवर्ग न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

७०:३० फॉर्म्युल्यावर शेतकरी नाराज

0
0
यंदा पावसाळ्यात पावसाने उसंत घेतली नाही. परिणामी पिके गारठून याचा परिणाम पिकांच्या वाढीवर झाला. आणि एकरी ८ ते १० टनाची घट आली. यामुळे शेतकरी यंदा पीक कर्ज भागवू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

शेतकरीच महत्त्वाचे!

0
0
शाहुवाडी तालुक्यात पक्षनिष्ठेपेक्षा व्यक्तिनिष्ठ राजकारणावर सातत्याने भर दिला जात आहे. विधानसभेच्या निवडणुकीत जेवढी मताची टक्केवारी असते तेवढी लोकसभेत नसते. लोकसभेच्या निवडणुकीत तालुका पातळीवरची नेतेमंडळी कच खात असल्याने मतदानाची टक्केवारी घटते.

मुश्रीफ, पाटील यांची धावाधाव

0
0
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला अथवा मतदानाची टक्केवारी कमी झाल्यास त्याची कुऱ्हाड मंत्रीपदावर येण्याची​ शक्यता आहे.

काँग्रेस करेल महाडिकांचा प्रचार

0
0
कोल्हापूर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या प्रचारात काँग्रेस मंगळवार (११ मार्च) पासून सक्रिय होणार आहे. प्रचाराचा नारळ सांगरूळ (ता. करवीर) येथील जाहीर मेळाव्यात फोडण्यात येणार आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images