Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

वारणेच्या ‘सावकरांचा’ नवा जुगार

$
0
0
राज्याच्या सहकार क्षेत्रातले विकासाचे बेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वारणा समूहाचे प्रमुख आणि जनसुराज्य शक्ति पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे लोकसभा निवडणुकीत मनसे, शेकापक्षासह अन्य छोट्या पक्षांच्या आघाडीसाठी सरसावले आहेत.

एड्ससह जगणाऱ्यांसाठी तिचा लढा

$
0
0
स्वतः एचआयव्ही / एड्ससह जगत असताना येणाऱ्या अनेक अडचणी, रक्ताच्या नात्यांनी फिरविलेली पाठ आणि समाजाने दिलेले अनेक अनुभव गाठीशी बांधत सुषमा बटकडली गेल्या चार वर्षांपासून एचआयव्ही/एड्ससह जगणाऱ्यांसाठी लढा देत आहेत.

गृहिणी महोत्सवाचा मंच खुला

$
0
0
डॉ. डी. वाय. पाटील कला, क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्टच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या गृहिणी महोत्सवाचे उदघाटन झाले. बचतगटातील महिलांनी बनवलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासोबत महिलांमधील कलागुणांना वाव देणारा मंच यानिमित्ताने खुला झाला आहे.

बाइक रॅलीची आज धूम

$
0
0
विविध क्षेत्रांत आपले सामर्थ्य दाखवत गगनभरारी घेणाऱ्या महिला शक्तिच्या सन्मानार्थ होणाऱ्या महाराष्ट्र टाइम्स हिरो प्लेजर ऑल विमेन बाइक रॅलीसाठी महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आहे.

घर गमावलं; पण छत्र टिकवलं

$
0
0
ज्यांना दिसत नाही, त्यांच्यासाठी त्या डोळे आहेत. ज्यांना ऐकू येत नाही, त्यांच्यासाठी त्या कान आहेत आणि मतिमंद मुलांसाठी तर त्या प्रेमाची पाखर धरणाऱ्या आईच आहेत.

हातकणंगल्यातून आवाडेच

$
0
0
गेले कित्येक दिवस हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत सुरू असलेला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील घोळ अखेर शनिवारी मिटला. येथे काँग्रेसतर्फे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांची उमेदवारी निश्चित झाल्याने येथे खासदार राजू शेट्टी विरुद्ध आवाडे यांच्यात लढत होणार आहे.

भरकटलेल्या सांबराचा मृत्यू

$
0
0
सांगली-कुपवाड परिसरात दोन दिवसांपासून भरकटून आलेल्या सांबराचा दंडोबा येथे उपचार सुरू असताना मरण पावले. वनविभागाची दिरंगाई, भटकी कुत्री आणि अतिउत्साही नागरिकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केल्यामुळे पळून-पळून थकलेल्या भदरलेल्या सांबराचा मृत्यू झाला.

चिपरीत महिलेचा खून

$
0
0
चारित्र्याच्या संशयावरून चिपरी (ता. शिरोळ) येथे ऊसतोड मजूर महिलेचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला. संगीता गणपत डोळस (वय ४०) असे तिचे नाव असून, खुनाच्या घटनेनंतर पती गणपत डोळस (४५) फरार झाला आहे.

पंचगंगा प्रदूषणप्रश्नी फेरआराखडा

$
0
0
पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या आराखड्यात काही त्रुटी असल्यामुळे हा प्रस्ताव दुरूस्त करून पुन्हा सादर करण्यात आला आहे.

महाडिक मालोजीराजेंच्या भेटीला

$
0
0
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी शनिवारी सायंकाळी न्यू पॅलेस येथे माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांची भेट घेऊन एक तास चर्चा केली.

...आणि आवाडेंचे तिकीट फायनल

$
0
0
‘हातकणंगले’ तून जयंत पाटील ? शुक्रवारी दुपारनंतर वृत्तवाहिन्यांवर हे वृत्त झळकू लागले. आठ-दहा दिवसांपासून जोरात प्रचाराला लागलेल्या आवाडे गटाचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले. पण शनिवारी दुपारी तीन वाजता कल्लाप्पाण्णा आवाडेंना मुख्यमंत्र्यांचा फोन आला आणि सारा नूरच पालटून गेला.

हातकणंगल्यातून आवाडेच

$
0
0
गेले कित्येक दिवस हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत सुरू असलेला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील घोळ अखेर शनिवारी मिटला. येथे काँग्रेसतर्फे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांची उमेदवारी निश्चित झाल्याने येथे खासदार राजू शेट्टी विरुद्ध आवाडे यांच्यात लढत होणार आहे.

सोशल मीडिया-नवी वोटबँक ?

$
0
0
‘इंटरनेटच्या जमान्यात शहर फक्त शहरातच राहिलेलं नाही, शिवाय शहरातही सगळे शहरी असतातच असे नाही’, निवडणुका जाहीर झाल्यावर प्रत्येक ग्रुपमध्ये होणाऱ्या राजकारणावरील जोरदार चर्चेत एका मित्राने हे विधान केले.

मिरज प्रांतकडून कोटीची दंडवसुली

$
0
0
मिरजेच्या प्रांताधिकारी स्मिता कुलकर्णी, तहसीलदार किशोर घाडगे यांनी अवघ्या दहा महिन्यांच्या कालावधीत गौण खनिजाच्या दंडापोटी मिळणारे उत्पन्न तिप्पटीने वाढविले आहे. सन २०१३-१४चे आर्थिक वर्ष संपण्यास अद्याप २० दिवसांचा कालावधी बाकी असताना चालू आर्थिक वर्षात ९७ लाख ३२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

कराडमध्ये वाळू उपशांवर ‘CCTV’ची नजर

$
0
0
बेकायदा वाळू उपशाला लगाम घालण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांनी कराड तालुक्यांतील वाळू घाटांवर ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे लावले आहेत. जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांत मात्र, कॅमेरे बसविण्याच्या योजनेची अंमलबजावणी झाली नाही.

सांगलीत पुन्हा गारपीट

$
0
0
सांगली जिल्ह्यातील तासगाव, खानापूर, आटपाडी आणि जत तालुक्यांना रविवारी गारपिटीने पुन्हा झोडपले. तासगाव तालुक्यातील दहीवडीत भिंत अंगावर पडल्याने लोचना जनार्दन जाधव (वय ४०) ही ठार झाली. तर वाऱ्याने उडालेला पत्रा अंगावर पडल्याने मांजर्डे येथील पिंटू अर्जुन मंडले (वय २५) हा तरुण जखमी झाला.

सातारकर थंडीने गारठले

$
0
0
साताऱ्याला शनिवारी मध्यरात्री अवकाळी पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सातारा शहरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. शनिवारी दिवसभर उन्हाचा तडाखा बसत होता.

आघाडीचा धर्म पाळा

$
0
0
‘दोन्ही पक्षातील सर्व गटातटांचा कल्लाप्पाणा आवाडे यांना पाठिंबा मिळून ते विजयी होणार अाहेत. राष्ट्रवादीने हातकणंगले मतदार संघ काँग्रेसला दिला आहे. त्या ठिकाणी राजू शेट्टी यांचा पराभव अटळ आहे,’ असा दावा ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी केला.

नोकरीचे अामिष : १२ जणांची फसवणूक

$
0
0
भुदरगड तालुक्यातील १२ सुशिक्षित तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून हुंडाळी (जि. सातारा) येथील अमित आनंदराव चव्हाण या भामट्याने २५ लाखांचा गंडा घातल्याची तक्रारपोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांच्याकडे केली आहे.

इचलकरंजीचे कापड जाणार परदेशात

$
0
0
इचलकरंजी येथे सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय वस्त्र प्रदर्शनामध्ये १४ देशातील ६३ प्रतिनिधींनी यंत्रमाग कापड खरेदीत स्वारस्य दाखविले. दोन दिवसात सुमारे २५० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती प्रदर्शनाचे संयोजक पॉवरलूम डेव्हलपमेंट अॅन्ड एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल (पिडीक्सेल)च्यावतीने देण्यात आली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>