Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

खुनाचा आलेख चढताच

$
0
0
कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात खून होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यात खुनाच्या सहा तर सांगलीत ११ घटनांची नोंद आहे. सातारा, सोलापूर व पुणे ग्रामीण भागात खुनाचा आलेख कमी झाल्याचे चित्र दिसत आहे.

१२८ बसस्थानकांचा विकास

$
0
0
‘राज्यातील १२८ बसस्थानकांचा बीओटी तत्त्वावर विकास करण्यात येणार असून, विकास आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. प्रवाशांची सुरक्षिततेसाठी लवकरच बसस्थानकात सीसी टीव्ही कॅमेरे, मेटल डोअर डिटेक्टर बसविण्यात येईल,’ अशी माहिती राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी पत्रकार परिषद दिली.

माढ्यावरून महायुतीत फूट?

$
0
0
‘मिळाला तर बघू’ म्हणून कोल्हापूर लोकसभेबाबत खासदार राजू शेट्टी यांनी खडा टाकून बघितला. पण तो द्यायला शिवसेनेने साफ नकार दिला आहे. या जागेवर सेनाच लढणार हे नक्की झाले आहे. यामुळे आता स्वाभिमानीला माढा मिळणार हे स्पष्ट झाले आहे.

एक घर पक्ष्यांसाठी

$
0
0
शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांकडून टाकाऊ वस्तूंपासून पक्ष्यांची घरटी बनवून ती शहरातील विविध ठिकाणी आणि सह्याद्री डोंगररांगातील १३ जिल्ह्यातील विविध शाळांत वितरीत करण्याचा प्रकल्प ग्रीन गार्डस आणि अराइज या पर्यावरणप्रेमी संस्थांनी हाती घेतला आहे.

आता लक्ष्य ६ मार्च

$
0
0
भरतनाट्यममधील पदांवर एकाचवेळी सहा हजार सहाशे सहा नृत्यकलाकारांच्या नृत्यमुद्रा पाहण्याची पर्वणी कोल्हापूरकरांना देणाऱ्या उपक्रमाची नांदी आता अवघ्या एक आठवड्यावर आली आहे.

सातारा जिल्ह्यात सहा नगरपंचायती होणार

$
0
0
राज्यातील २५ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या व तालुका मुख्यालय असलेल्या ग्रामपंचायतींचे नगरपरिषद किंवा नगरपंचायतीमध्ये रुपांतरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार, सातारा जिल्ह्यातील पाटणसह खंडाळा, वडूज, कोरेगाव, दहिवडी, मेंढा या मोठ्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

प्रसंगी मंडलिकांनाही भेटेन

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार धनंजय महाडिक यांना विजय करण्यासाठी मी प्रसंगी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनाही भेटेन. जर त्यांचे मतपरिवर्तन झाले नाही तर, आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला.

३५० लोकसंख्येच्या वसाहतींना ग्रामपंचायतीचा दर्जा

$
0
0
प्रकल्पग्रस्तांच्या वसाहतींना स्वतंत्र ग्रामपंचायतींचा दर्जा मिळण्यासाठीच्या अटींमध्ये शिथीलता आणत आता ३५० लोकसंख्येच्या वसाहतींना ग्रामपंचायत देण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. याबाबत सोमवारी झालेल्या बैठकीत ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी हा निर्णय घेतला असल्याचे श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने सांगण्यात आले.

मदत होणार ‘लाखमोला’ची

$
0
0
रस्त्यावर होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांचे प्राण गेले आहेत. वेळवर उपचार न झाल्याने प्राण गमवावे लागणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे अशा अपघातातील जखमींना तातडीने हॉस्पिटलपर्यंत पोहचवणाऱ्या किंवा त्यांना मदत करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थाचा महाराष्ट्र सरकार तीन लाख रुपयांची बक्षिसे देवून गौरव करणार आहे.

संजयकाकांबरोबर कोणी जाणार नाही

$
0
0
‘संजय पाटील यांच्यापाठोपाठ दुष्काळी भागातील कोणी भाजपमध्ये जातील असे वाटत नाही. याबाबत मी इतर नेत्यांशी त्यांच्याशी चर्चा केली असून, त्यांनी आघाडी धर्म पाळू अशी ग्वाही दिली आहे,’ असे काँग्रेसचे खासदार व केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी सांगितले.

उदयनराजेंविरोधात उमेदवाराचा शोध

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसने खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे उमेदवारीबाबतचा संभ्रम आता संपला आहे. महायुतीत मात्र अजूनही उमेदवाराचा शोध सुरू आहे.

महसूलमंत्र्यांना आश्वासनाचा विसर

$
0
0
उद्योजकांनी भविष्यातील उद्योगाच्या विस्ताराचा विचार करता काही ठिकाणी बांधकाम केले आहे. याबाबत एमआयडीसीकडून परवानगी घेण्यात येणार आहे. मात्र, त्यापूर्वीच बांधकाम केल्याने एमआयडीसीने उद्योजकांना २५ टक्के दंड आकारला आहे.

संजयकाकांना उमेदवारी दिल्यास राजीनामास्त्र

$
0
0
‘संजयकाका पाटील यांच्या भाजप प्रवेशाला विरोधच व्हायला हवा होता. सांगलीतल्या तीनही भाजप आमदारांना अंधारात ठेवून त्यांना प्रवेश दिला गेला. यापुढे जावून त्यांना सांगली लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी दिली, तर आपण पक्षाचा राजीनामा देऊ,’ असा इशारा सांगलीचे आमदार संभाजी पवार यांनी गुरुवारी दिला.

महाडिक -प्रा.मंडलिकांमध्येच लढत

$
0
0
कोल्हापूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीने अपेक्षेप्रमाणे धनंजय महाडिक यांची उमेदवारी जाहीर केली. ‘कौन है मुन्ना’ असा प्रश्न दहा वर्षापूर्वी विचारणाऱ्या खुद्द शरद पवारांनीच त्यांना उमेदवारी देवून ‘यही है मुन्ना’ हे जाहीर केले आहे.

कलाक्षेत्रातील आयर्नलेडी

$
0
0
ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत मांडरे यांच्या पत्नी शशिकला यांचा आज (ता. २८) पहिला स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या स्नेह्याने जागविलेल्या आठवणी.

धनदांडग्यांना ‘अन्नसुरक्षा’

$
0
0
आगामी लोकसभेसाठी प्रमुख आधार असणाऱ्या आणि खऱ्या अर्थाने सर्वसामन्य गरीब जनतेला आधार असणाऱ्या अन्नसुरक्षा योजनेने कोल्हापूर जिल्ह्यात धनदांडग्यानाच ‘अन्न’ आणि ‘सुरक्षा’ दिली आहे. यामध्ये गरीब मात्र नेहमीप्रमाणे वाऱ्यावरच असून हेलपाटे मारुन तक्रारी देवून वैतागले आहेत.

रंकाळ्याच्या समस्येवरील उपाय

$
0
0
मोठ्या प्रमाणावर मिसळणाऱ्या सांडपाण्यामुळे रंकाळ्याचे अस्तित्वच धोक्यात आहे. तात्पुरत्या मलमपट्ट्या होत राहतात आणि पुन्हा मागील पानावरून पुढे अशी परिस्थिती येते. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तलावाच्या काही भागात सँड फिल्टर घालून प्रदूषणाची तीव्रता कमी केली आणि पाणहत्ती पार्क तयार केल्यास दुहेरी फायदा होऊ शकतो.

‘मंडलिक, पाटलांना विनंती करू’

$
0
0
राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. आघाडीचा उमेदवार असल्यामुळे खासदार सदाशिवराव मंडलिक असो अगर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडून मदतीची अपेक्षा आहे. त्यासाठी पक्ष आदेशाप्रमाणे त्यांच्या घरी जाऊन मदतीसाठी विनंती करू. मात्र, याबाबत अजून चर्चा झालेली नाही, नेत्यांशी बोलून निर्णय घेऊ, असे राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केले.

टोल वसुलीला स्थगिती

$
0
0
रस्ते प्रकल्पाचे ९५ टक्के काम पूर्ण न करता ‘आयआरबी’ने चालवलेल्या टोल वसुलीला हायकोर्टाने गुरुवारी स्थगिती दिली. हे वृत्त समजताच कोल्हापुरात उत्स्फूर्त जल्लोष झाला. पोलिस बंदोबस्तही तातडीने काढून घेण्याचे आदेश दिल्याने टोल वसुली दुपारीच बंद करण्यात आली.

नाट्य परिषद येणार वेब पोर्टलवर

$
0
0
मराठी रंगभूमीच्या समृद्ध इतिहासाचे केवळ गोडवेच गाणारी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आता वेब पोर्टलच्या माध्यमातून हा ठेवा पुढील पिढीपर्यंत नेण्यासाठी पावले उचलत आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images