Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘आप’चा प्रभाव पडणार नाही

0
0
अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचा (आप) चा प्रभाव दिल्लीसह उत्तरेकडील काही राज्यांत पडण्याची शक्यता आहे. पण, महाराष्ट्रासह दक्षिण भारतात ‘आप’चा प्रभाव दिसणार नाही. परंतु, मेधा पाटकर यांच्यासारखा उमेदवार बऱ्यापैकी मते घेण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी येथे व्यक्त केले. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.

ती वादग्रस्त कागदपत्रे खाक

0
0
मंत्रालयाला लागलेल्या आगीची झळ कोल्हापूरच्या वादग्रस्त रस्ते प्रकल्पालाही लागली आहे. आगीत प्रकल्पाच्या खर्चाबाबतची कागदपत्रे जळून खाक झाल्याची माहिती सरकारने मंगळवारी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे. अॅडव्होकेट जनरल दरायस खंबाटा यांनी टोलला स्थगिती देण्यास विरोध केला. आयआरबीने कराराप्रमाणे काम केले नसल्याने टोल वसुलीला स्थगिती द्यावी, अशी मागणी कोल्हापूर महापालिकेने केली आहे.

पंढरपुरात जोरदार गारपीट

0
0
पंढरपुरात आज, बुधवारी दुपारी अचानक जोरदार मेघगर्जनेसह अचानक पावसाला सुरुवात झाली. पाहता पाहता पावसाचा वेग वाढत गेला आणि पावसासोबत गारांचा वर्षाव सुरु झाला. अचानक सुरु झालेल्या गारपीटमुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

अँटीबायोटिक्सचे अतिसेवन घातक

0
0
‘जंतुजन्य आजारांत अँटीबायोटिक्स औषधांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो, पण त्याच्या अतिसेवनामुळे भविष्यात गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो,’ असे मत पुणे येथे डॉ. अमित द्रविड यांनी व्यक्त केले.

मठगावचे दुर्लक्षित शिल्पवैभव

0
0
कोल्हापूर परिसरात घनदाट जंगल परिसरात आजही काही प्राचीन मंदिरांचे अवशेष पाहायला मिळतात. मानवी वस्तीपासून दूर असलेल्या मंदिरातील शिल्पवैभव अत्युच्च दर्जाचे आहे. मात्र योग्य निगा न राखल्यामुळे त्यांची हेळसांड होत आहे. भुदरगड तालुक्यातील मठगाव येथील शिवमंदिरही असेच दुर्लक्षित राहिले आहे.

मेकओव्हर

0
0
करवीरनगरीला करवीर काशी संबोधले जाते. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या महालक्ष्मी मंदिराबरोबर उत्तरेला दख्खनचा राजा, दक्षिणेला कात्यायणी, पूर्वेला टेंबलाई तर पश्चिमेला सिध्द बटुकेश्वराचे मंदिर आहे.

३५० लोकसंख्येच्या वसाहतींना ग्रामपंचायतीचा दर्जा

0
0
प्रकल्पग्रस्तांच्या वसाहतींना स्वतंत्र ग्रामपंचायतींचा दर्जा मिळण्यासाठीच्या अटींमध्ये शिथीलता आणत आता ३५० लोकसंख्येच्या वसाहतींना ग्रामपंचायत देण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. याबाबत सोमवारी झालेल्या बैठकीत ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी हा निर्णय घेतला असल्याचे श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने सांगण्यात आले.

भुदरगडच्या भुमिकेवर खादसारकीची स्वप्ने

0
0
कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी खासदार मंडलिक यांनी शिवसेनेचे तिकट फायनल करावे अशी भूमिका कार्यकर्ते मांडत आहेत. तसे झाल्यास मागील लोकसभा निवडणुकीत ४२ हजारांचे मताधिक्य देणाऱ्या राधानगरी–भुदरगड तालुक्यातील जनतेची व नेत्यांची भूमिका काय असणाऱ यावर निवडणुकीची गणिते अवलंबून आहेत.

‘सोलापूर पॅटर्न’मुळे बेकायदा वाळू उपशाला चाप

0
0
बेकायदा वाळू उपशासाठी सोलापूर जिल्हा कुप्रसिद्ध आहे. बेकायदा वाळू उपसा रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात आता ‘सोलापूर पॅटर्न’ राबविण्यास सुरुवात झाल्याने जिल्ह्यातून वाळू माफिया गायब झाले आहेत. दंड आणि वाळू घाटाच्या लिलावातून प्रशासनाने आतापर्यंत ८६ कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल जमा केला आहे.

भाजी विक्रेत्यांचा धुमाकूळ

0
0
मिरजेतील रस्त्यावरील भाजी विक्रेते व हातगाड्यांचा प्रश्न बुधवारी चांगलाच चिघळला. रस्त्यावरील बाजार हटविण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या अधिकारी व कर्मचारी वर्गावर धावून जावून त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला.

शिक्षकांचा परदेशात ई-संवाद

0
0
आयटीमुळे मानवाचा जगाशी लगेच संपर्क होऊ लागला आहे. इंटरनेटच्या क्रांतीने तर जग घरापर्यंत पोहोचले आहे. ई-लर्निंगच्या माध्यमातून मुंबईतून सीईओशी तर ऑस्ट्रेलियातले शिक्षण तज्ज्ञ लेविसशी करंजफेण येथील शिबिरातल्या एक हजार शिक्षकांनी थेट संवाद साधला. संतोष तेलगट्टीनी हा योग घडवून आणला.

संशयितांच्या घरावर महिलांची चाल

0
0
यंत्रमाग कारखानदार संजय पाटील यांच्या खूनानंतर जुना चंदूर रोड परिसरातील संतप्त महिला व नागरिकांनी आज संशयित आरोपी योगेश रावळ याच्या घरावर चालक कर साहित्य बाहेर फेकले. तर अन्य आरोपींच्या कुटुंबियांना हा भाग सोडून जाण्याबाबत इशारा दिला.

‘अष्टविनायक’च्या पतंगेविरोधात दुसरा गुन्हा

0
0
महिन्याला पाच टक्के व्याज आणि एक वर्षात रक्कम परत, असे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी अष्टविनायक एनर्जी अॅड मेटल्सचे प्रदीपकुमार पांडुरंग पतंगे (रा. कुंभारगाव, ता. कराड, जि. सातारा) व अमोल शिरगुप्पे (मूळ गाव, पट्टणकोडोली, सध्या रा. रॉयल अॅस्ट्रा बिल्डिंग, न्यू पॅलेस) याच्याविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात ५३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

स्वच्छतागृहाच्या ठिकाणी सेतू

0
0
शहराचे व तालुक्याचे प्रमुख ठिकाण असलेल्या करवीर तहसील व पोलिस ठाण्यामध्ये असणाऱ्या स्वच्छतागृहाच्या जागेमध्ये सेतू कार्यालयाची केबिन थाटली आहे. यामुळे या दोन्ही कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची गौरसोय होणार असून प्रशासनाची ही कृती म्हणजे ‘घर मोडून मांडव घालण्यातला प्रकार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया मंगळवारी कार्यालय परिसरात उमटल्या.

‘आरटीई’ अंमलबजावणीपूर्वी वर्ग जोडा

0
0
महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेच्या राज्याध्यक्षपदी प्रसाद पाटील यांची नुकतीच निवड झाली. यानिमित्ताने त्यांचा बुधवारी (ता. २७) जिल्हा शाखेच्या वतीने गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते सत्कार होत आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद...

मोडक्या खुर्च्या आणि बंद पंखे

0
0
जिल्ह्याची धोरणे ज्या सभागृहातून निश्चित केली जातात त्या ताराबाई सभागृहाची अवस्था मोडकळीला आली आहे. निम्म्या सभागृहातील खुर्च्या मोडल्या आहेत तर बोलण्यासाठी सेट केलेले माइकचे वायरिंग तुटले आहे तर एसी आणि पंखे केव्हाच बंद पडले आहेत. अशा अवस्थेतही या सभागृहात रोज बैठका घेतल्या जातात. सभागृह धुळीने अक्षरशः माखले आहे.

वसुलीसाठी प्रयत्न गरजेचे

0
0
घर बांधून दहा वर्षे झाली, अद्याप त्याचा फाळा लागू झालेला नाही. त्याच्या वसुलीसाठी एकही नोटीस पाठवलेली नाही. शहरात व्यवसायांची संख्या मोठी असूनही त्यांच्याकडून येणाऱ्या कराची रक्कम अल्प आहे. एलबीटीच्या उत्पन्नात वाढ होत असली तरी ती जकातीच्या तुलनेत सुमारे २० कोटीने पिछाडीवर आहे.

अवैध व्यवसायाविरोधात हेल्पलाइन

0
0
नूतन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांना चाप लावण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू केली आहे. ९५५२३२८३८३ असा हा हेल्पलाइन क्रमांक आहे.

रस्ते विकास मंडळाने टोलवले

0
0
‘रस्ते प्रकल्पात आपली भूमिका मर्यादित आहे. टोल बंद करण्यासारखे तांत्रिक समितीच्या अहवालामध्ये गंभीर असे काही नाही. त्यामुळे सुरू असलेली टोल वसुली योग्य आहे,’ असे मत महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने बुधवारी हायकोर्टासमोर मांडले.

शिक्षक संघटनांमध्ये फूट

0
0
राज्यात बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचा घोळ सुरु असतानाच जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघ आणि महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या राज्य अध्यक्षांत वादाची घंटा वाजू लागली आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images