Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

खर्चाच्या भरपाईची जबाबदारी महासभेची

0
0
माझ्याकडे फक्त २५ लाखांपर्यंतच्या कामांना मंजुरी देण्याचा अधिकार आहे. त्यामुळे रस्ते प्रकल्पाच्या खर्चाची भरपाई देण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने घ्यायचा आहे, असे सांगत आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी भरपाई देण्याबाबतच्या मुद्द्याची जबाबदारी ढकलली. यामुळे शिवसेनेने या मुद्द्यावर आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे.

‘युवा रणरागिणी’ पुरस्कार पाचजणींना जाहीर

0
0
जागतिक महिला दिनानिमित्त आठ मार्च रोजी युवा फाउंडेशन कोल्हापूरच्यावतीने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पाच महिलांना ‘युवा रण​रागिणी’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. संयोगिता पाटील, अनुराधा कदम, स्वरूपा कोरगावकर, जयश्री गायकवाड, बेबीताई फेमिस्टर (कांबळे) यांना मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष परशुराम कदम-पाटील व प्रा. जॉर्ज क्रुझ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

बीडकरांचे कलाक्षेत्रात मोलाचे योगदान

0
0
‘अनेक चांगले कलाकार असतात मात्र त्यांच्याकडे इंडस्ट्री दुर्लक्ष करते. मात्र बळीराम बीडकर यांच्या चित्रकलेची शैली मी स्वतः काही सिनेमांमधून अनुभवली आहे, त्यांचे कलाक्षेत्रातील योगदान मोठे आहे. ते नवोदितांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरेल,’ असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय कोंडके यांनी केले.

महिला बचतगटांना मास्टर ट्रेनर्स

0
0
राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्ह्यातील नियमित व अनियमित स्वयंसहाय्यता गटांसाठी दशसूत्री पायाभूत प्रशिक्षणाच्या कार्यक्रमातून बळकटीकरण आणि सक्षमीकरण करण्यात येत असून, त्याद्वारे चार टप्प्यांत ३६६ मास्टर ट्रेनर्स तयार करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पी. बी. पाटील यांनी दिली.

महर्षी शिंदे कृतिशील विचारवंत

0
0
‘मानवतावादी विचारांची पायाभरणी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली. महर्षी शिंदे हे अस्पृश्यतानिवारण कार्याच्या जागृती पर्वाचे प्रणेते व या कार्याचे अग्रदूत होते .त्यांच्या धर्मकार्याचा मुख्य अविष्कार अस्पृश्यता निवारणाचा होता. समाजकार्य आणि धर्मकार्याचे परखड विचार त्यांनी समाजाला दिल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी केले.

महापालिकेची बँक गॅरंटी जप्त

0
0
पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यात सातत्याने अपयशी ठरल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) महापालिकेची १८ लाख रुपयांची बँक गॅरंटी मंगळवारी जप्त केली. वाढीव बँक गॅरंटी न दिल्याने आयुक्तांनाही फौजदारी कारवाईची नोटीस देण्यात आली आहे. इराणी खाणीतील रसाययुक्त पाणीनदीत सोडल्याबद्दल आणखी एक नोटीस महापालिकेला बजावण्यात आली आहे.

आगीत गादी कारखाना खाक

0
0
गादी कारखान्यात शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत कारखान्यातील यंत्रसामग्री व तयार गाद्या, उशी, लोड, कच्चा कापूस जळून खाक होऊन सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना कराडजवळील पाडळी येथील इंदिरा नगरमध्ये घडली. सुदैवाने या आगीत जिवित हानी झाली नाही.

ग्रामविकास मंत्र्यांनी मैदानातून पळ काढला

0
0
‘शिराळा तालुक्यातील सत्यजित देशमुख, आमदार मानसिंगराव नाईक दोन बाहुल्यांच्या दोऱ्या वाळवा तालुक्यातील मंत्र्यांच्या हातात आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या बाहुल्या एकत्रित येऊ देत किंवा दोघेही येऊ देत मैदान मीच मारणार आहे. हातकणगले मतदार संघ काँग्रेसला सोडल्याचे सांगून ग्रामविकास मंत्र्यांनी मैदानातून पळ काढला आहे,’ असा आरोप शिवाजीराव नाईक यांनी केला आहे.

दाभोलकर हत्येचा जाब विचारणार

0
0
समाजात सर्वत्र दहशतवाद, सनातन कृती फोफावत असताना राज्यकर्ते मूग गिळून गप्प आहेत. सहा महिन्यानंतरही डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी सापडत नाहीत. यांचा अर्थ काय? असा सवाल करून या प्रकरणी राज्यकर्त्यांना जाब विचारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी दिला.

‘समाजाच्या आरोग्यासाठी अनिष्ट प्रथांना फाटा द्या’

0
0
‘समाजाचे आरोग्य सुधारण्यासाठी अनिष्ट प्रथा, रुढी, परंपरांना फाटा द्यायला हवा. विज्ञानाच्या आधारे या बाबत प्रबोधन व्हायला हवे. यासाठीच अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या माध्यमातून डॉ. दाभोलकर यांनी प्रतिगामी शक्तींच्या विरोधात लढा दिला. शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून शक्य तितकी ताकद पुरोगामी चळवळीला देवून अंधश्रद्धा मुक्त समाज घडवू या,’ असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. एन. जे. पवार यांनी केले.

तासगावमध्ये फटाक्यांची आतिषबाजी

0
0
आमदार संजय पाटील यांनी आमदारकीचा आणि राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याची घोषणा मंगळवारी मुंबईत केली. पाटील यांच्या या घोषणेचे तासगाव आणि परिसरात कार्यकर्त्यांनी चौकाचौकात फटाक्यांची आतषबाजी करून जोरदार स्वागत केले.

सुशीलकुमार शिंदेंचे आणखी एक घूमजाव

0
0
इलेक्ट्रॉनिक मीडियाला ठेचून काढण्याची भाषा करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मंगळवारी घूमजाव करत आपण वृत्तमाध्यमांबद्दल नव्हे तर सोशल मीडियाबद्दल बोलत असल्याचे म्हटले आहे. मात्र, त्यांच्या या विधानावरुन त्यांच्यावर टीका होत आहे.

कोल्हापूरसाठी निराशाजनक अर्थसंकल्प

0
0
राज्याच्या अर्थसंकल्पाकडून कोल्हापूरकरांच्या खूप अपेक्षा होत्या. मात्र, कोल्हापूर अर्थसंकल्पापासून फार दूर राहिले आहे. कोणत्याही योजनेसाठी किंवा टोल, शाहू स्मारक अथवा थेट पाईपलाईनसाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे एकूणच अर्थसकंल्प हा कोल्हापूरसाठी निराशाजनक ठरला आहे.

‘हिंदी है हम...’ ‘अजिंक्यतारा’वर

0
0
प्रार्थना स्थळांसाठी नवीन जीआर काढा, विविध प्रश्नांसंदर्भात बैठकीचे निर्णय घ्या, कर्नाटक पॅटर्न प्रमाणे ५ टक्के आरक्षण द्या यासह इतर मागण्यासाठी ‘हिंदी है हम.... हिंदोस्ताँ हमारा’ च्यावतीने गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी बुधवार दुपारपर्यंत निर्णय देण्याचे आश्वसन देण्यात आले.

बोगस आदेशाने ई-टेंडरिंगला खो घालण्याचा प्रयत्न

0
0
जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने केलेल्या ई टेंडरिंगच्या प्रक्रियेला खो घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बोगस आदेशाद्वारे पाच हजार लोकवस्तीच्या आतील गावातील टेंडर खुल्या पद्धतीने काढण्यात यावीत असा जी. आर. पाणीपुरवठा विभागाला देण्यात आला.

मुंडेंची भूमिका दुटप्पी

0
0
‘शरद पवार यांनी सहकार मोडीत काढला अशी टीका गोपीनाथ मुंडे करतात, पण केवळ दोन खोल्यांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींकडे २६ कारखाने कसे आलेत, असा सवाल करत पश्चिम महाराष्ट्रात ऊसदरासाठी आंदोलन करणारे मुंडे स्वतःच्या कारखान्यात १४०० रुपये दर कसा देतात. त्यांच्या या दुटप्पी भूमिकेमुळेच शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत, अशी टीका आम आदमी पक्षाचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली.

प्रा. मंडलिक यांचा सेना प्रवेश लांबणीवर

0
0
जोपर्यंत कोल्हापूरच्या जागेबाबत अधिकृत निर्णय होत नाही, तोपर्यंत शिवसेनेत प्रवेश न करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक यांनी घेतला आहे. तरूण कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाण्याचा आग्रह धरला असल्याचे सांगून पक्षप्रवेशाचा निर्णय एक तारखेनंतरच घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.

इचलकरंजीचे बजेट २५२ कोटींचे

0
0
कोणतीही करवाढ नसलेले इचलकरंजी नगरपालिकेचे २५२ कोटी रुपये खर्चाचे व १७ लाख रुपये शिलकीचे अंदाजपत्रक सोमवारी विरोधकांच्या जोरदार गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मंजूर करण्यात आले. ७२ कोटी २१ लाख रुपये वाढीचे पोकळ अंदाजपत्रक असल्याची टीका करुन विरोधकांनी प्रत्यक्षात न येणारी जमा दाखवून सत्ताधाऱ्यांनी नगरपालिका पुन्हा कर्जाच्या खाईत घालण्याचा खटाटोप केल्याचा आरोप केला.

करवसुलीची धडक मोहीम

0
0
मार्च महिना जवळ येईल, तशी महापालिकेने विविध करांच्या वसुलीची मोहिम तीव्र करण्यास सुरुवात केली आहे. वेळोवेळी नोटीस देऊनही थकबाकी न भरलेल्या ४० थकबाकीदारांचे नळकनेक्शन पाणीपुरवठा विभागाने तोडले. तर परवाना विभागाने राजारामपुरीतील ९ व्यावसायिकांवर कारवाई करुन ३९ हजाराची फी वसूल केली. घरफाळा विभागाने ढोल ताशे वाजवत वसुली सुरुच ठेवली आहे.

काँग्रेसच्या आशीर्वादाने बंडखोरी

0
0
‘रायगड हवा असेल तर कोल्हापूर द्या,’ असा आक्रमक पवित्रा अचानक राज्यपातळीवर काँग्रसने घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या बंडखोरीला काँग्रेसने आशिर्वाद दिल्याचे खात्रीलायक वृत्त आले आहे. मंडलिकांच्या घरी झालेल्या बैठकीस काँग्रेसचे कार्यकर्ते पाठवण्याचा आदेश ‘वरून’ आल्यानेच त्यांच्या घरात काँग्रेसवाल्यांची गर्दी झाली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images