Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘गोकुळ’ चे लोणी की मंडलिक ?

0
0
लोकसभेसाठी प्रा. संजय मंडलिक व धनंजय महाडिक यांच्यात लढत होण्याची चिन्हे आता स्पष्ट होत आहेत. यामुळे दोन्ही डगरीवर हात ठेवून असलेल्या जिल्ह्यातील अनेक नेत्यांची स्थिती ‘इकडे आड तिकडे विहिर’ अशी स्थिती झाली आहे.

सच्चा शिवसैनिकालाच उमेदवारी द्या

0
0
पाच वर्षे उन्हातान्हात काँग्रेस व राष्ट्रवादीच्याविरोधात रान पेटवलेल्या सच्चा शिवसैनिकालाच कोल्हापूर लोकसभेची उमेदवारी द्या, अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात करण्यात आली.

प्रा. संजय मंडलिक शिवसेनेच्या संपर्कात

0
0
कोल्हापूर लोकसभेसाठी धणुष्यबाण उचलण्यास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक हे सज्ज झाले आहेत. त्याची पहिली पायरी म्हणून त्यांनी सोमवारी शिवसेना नेत्यांची भेट घेतली. ‘तातडीने पक्ष प्रवेश करा,’ असा सेनेकडून निरोप आल्याने या प्रक्रियेला आता वेग आला आहे.

संगणक परिचालक संघाचा मोर्चा

0
0
चार दिवसांत प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास साखळी उपोषणाचा इशारा कोल्हापूर जिल्हा संगणक परिचालक संघाने दिला. सुमारे पाचशे संगणक परिचालकांनी जिल्हा परिषदेवर जोरदार घोषणाबाजी करीत सोमवारी मोर्चा काढला.

अपंग मागण्यांवर ठाम

0
0
अपंगाच्या कल्याणासाठी केंद्रशासनाने १९९५ मध्ये कायदा केला आहे. मात्र या कायद्याची अमंलबजावणी न झाल्यामुळे हजारो अपंग नोकरी व अन्य सुविधांपासून वंचित राहिले आहेत. याच्या निषेधार्थ अपंग बेरोजगार व पुनर्वसन संस्थेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुद उपोषणास बसले आहेत.

फेरमूल्यांकन समितीवर शिक्कामोर्तब

0
0
रस्ते विकास प्रकल्पाच्या फेरमूल्यांकनच्या त्रिसदस्यीय समितीला राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारिणी समितीत मान्यता दिली. त्रिसदस्यीय समितीसाठी नावे सूचवण्याबाबत संस्थांशी पत्रव्यवहार करण्यात येणार असून त्यानंतर समिती प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार आहे.

टोलप्रश्नी आज पुन्हा सुनावणी

0
0
कोल्हापूरचा रस्ते प्रकल्प दोनशे वीस कोटींचा असताना आयआरबी कंपनीने तीस वर्षात ३६०० कोटी वसूल करणार असल्याची माहिती न्यायालयात दिली आहे, याला सोमवारी आक्षेप घेण्यात आला. दरम्यान, मंगळवारी आयआरबी कंपनी आपली बाजू मांडणार आहे.

महापालिकेचे बिग बजेट

0
0
थेट पाइप लाइन, शाहू मिलमधील शाहू स्मारक, कळंबा तलाव यासाठी भरीव तरतूद असलेले महापालिकेचे अंदाजपत्रक सोमवारी आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी स्थायी समिती सभेत सादर केले. महापालिकेला आगामी वर्षात राज्य व केंद्र सरकारकडून मोठा निधी मिळणार आहे.

पालिकेचे बजेट ११४४ कोटींचे

0
0
कोणतीही करवाढ नसलेले ११४४ कोटी रुपयांचे २०१४-१५ वर्षासाठीचे ‘बिग बजेट’ अंदाजपत्रक सोमवारी आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी स्थायी समिती सभेत सादर केले. महापालिकेच्या इतिहासातील हे सर्वांत मोठे बजेट आहे.

प्रा. मंडलिक सेनेच्या संपर्कात

0
0
कोल्हापूर लोकसभेसाठी धणुष्यबाण उचलण्यास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक हे सज्ज झाले आहेत. त्याची पहिली पायरी म्हणून त्यांनी सोमवारी शिवसेना नेत्यांची भेट घेतली. ‘तातडीने पक्ष प्रवेश करा,’ असा सेनेकडून निरोप आल्याने या प्रक्रियेला आता वेग आला आहे.

चॅनेलवाल्यांना ठेचून टाकेन!: शिंदे

0
0
वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्ध होत असलेल्या संभाव्य पराभवाच्या बातम्यांमुळे नैराश्य आलेल्या काँग्रेस नेत्यांनी मीडियाला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. ‘इलेक्ट्रॉनिक मीडियात येणाऱ्या काँग्रेसविरोधी बातम्या न थांबल्यास संबंधितांना ठेचून टाकेन,’ अशी धमकी खुद्द केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली आहे.

साउंड क्लाउडची मोहिनी

0
0
तुम्ही तुमचा म्युझिक ट्रॅक बनवला आहे का? आणि तो कुणीतरी ऐकावे असे वाटते का? काही दिवसांपूर्वी हे काम कठीण वाटत असले तरी आता साउंड क्लाउड आणि इतर साइटमुळे ते सहज सोपे झाले आहे.

‘वर्षभरात ४९ कोटींची कामे’

0
0
मागील वर्षभरामध्ये मतदारसंघात उच्चांकी सुमारे ४९ कोटी रुपयांची विकासकामे करण्यात आली. यामध्ये दुर्गम भागातील पक्के रस्ते, समाजभवन, पाणी पुरवठा योजना, गटर यांचा प्रामुख्याने समावेश आहे. यामध्ये विशेषकरून कोवाड पुलाचे काम पूर्ण करून घेतले असून लोकार्पण सोहळा नजीकच्या काळात होत आहे.

तोडणी मजुरांच्या विम्याचे काय?

0
0
ऊस तोडणी कामगारांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय ७ नोव्हेंबरच्या प्रादेशिक साखर संचालकांच्या कार्यालयात कारखाना प्रतिनिधींच्या बैठकीत झाला होता. या निर्णयाची जिल्ह्यातील कोणत्या कारखान्यांनी अमंलबजावणी केली अशी विचारणा महाराष्ट्र उसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रादेशिक साखर संचालक वाय. व्ही. सुर्वे यांना केली.

परतीच्या वाटेवर हत्तींचा धुमाकूळ

0
0
आजरा तालुक्यातील हत्तींनी आता परतीचा प्रवास सुरू केला आहे. मसोली, खानापूर आणि वेळवट्टी परिसरात बिनधास्तपणे वावरणाऱ्या या कळपाने आता या परिसरात खाण्यासाठी काहीही न उरल्याने पूर्वीच्या सुळेरान, घाटगरवाडी आणि धनगरमोळा परिसरातल्या पश्चिमेकडील जंगलांकडे सरकला आहे.

गरजूंपर्यंत योजना पोहाचवा

0
0
काँग्रेस आघाडीने उपेक्षित व दुर्बल घटकांसाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. कामगारांच्या विकासासाठी सुमारे १८०० कोटी रुपये जमा झाले आहेत. मात्र कामगारांची नोंदणीकृत संख्या कमी असल्याने आजअखेर आठशे कोटी खर्ची पडले आहेत. त्यामुळे या योजना गरजूंपर्यंत पोचविण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन राज्य गृहमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केले.

यंत्रमागधारकाच्या खूनप्रकरणी बंद

0
0
येथील जुना चंदूर रस्त्यावर काल रात्री निर्घृणपणे खून झालेल्या घटनेचे पडसाद आज (मंगळवारी) जुना चंदूर रस्ता, गुरुकन्नननगर, लिंबू चौक, तांबेमाळ परिसरात उमटले. या परिसरातील यंत्रमाग कारखान्यांसह सर्व व्यवहार नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंद ठेवले. आज सकाळी गुरुकन्नननगरातील मयत संजय पाटील यांच्या निवासस्थानावर मोठी गर्दी जमली होती.

अवास्तव आकांक्षांमुळे माणूसपण हरवले

0
0
आपण बाजारात आहोत मात्र माणूस म्हणून नाही तर केवळ ग्राहक बनून उभे आहोत. पूर्वी तुला बोलायला पैसे पडतात का असे आपण सहज म्हणायचो. पण आज खरोखरच आपण मोबाइलवर पैसे देऊन बोलतो आहोत. पालकांनाही आपला मुलगा ‘माणूस’ नव्हे तर पैसा कमविणारी मशीन व्हावा असे वाटते. अवास्तव आकाक्षांमुळे माणूसपण हरवल्याचे ते चित्र आहे, असे मत जेष्ठ साहित्यिक डॉ.राजन गवस यांनी व्यक्त केले.

भटक्यांसाठी एकच राष्ट्रीय धोरण राबवा

0
0
‘सात टक्के लोकसंख्या असलेल्या आदिवासी जमातींच्या विकासासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे स्वतंत्र बजेट सादर केले जाते. याउलट साडेपाच टक्के लोकसंख्या असलेल्या भटक्या जमातींकडे मात्र सरकार ढुंकूनही पहात नाही. आमच्या मागण्या मागील तीन पिढ्यांपासून आम्ही सरकारकडे सादर करत आहोत.

वाचक जोडण्याचा नवा पर्याय हायटेक प्रणालीच

0
0
‘ग्रंथालये लोकप्रबोधनाचे उत्तम माध्यम आहेत. डिजिटल युगात ग्रंथालय आणि ग्रंथपाल यांनी हायटेक तंत्रज्ञान आत्मसात करायला हवे. भविष्यात वाचक जोडण्याचा हा नवा मार्ग असेल,’ असे प्रतिपादन नागपूरच्या राष्ट्र संत तुकडोजी महाराज विद्यापीठातील निवृत्त विभागप्रमुख डॉ. पी. एस. जी. कुमार यांनी केले. डॉ. बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालय आणि ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त शिवाजी विद्यापीठात दोनदिवसीय आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images