Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सुरक्षेचे ‘ट्रेन एस कार्टिंग’ गायब

$
0
0
रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) आणि रेल्वे लोहमार्ग पोलिस (जीआरपी) यांच्या दररोजच्या एस कार्टिंगची साशंकता निर्माण झाली आहे. आपल्या हद्दीतून सुरक्षित रेल्वे जाण्याच्या जबाबदारीचे आव्हान पुन्हा एकदा निर्माण झाले आहे. जोधपूर ते बेंगळुरु एक्सप्रेस मध्ये झालेल्या चोरीच्या पार्श्वभूमीवर हा सारा प्रकार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

भाज्यांच्या दरात पुन्हा वाढ

$
0
0
गेल्या काही दिवसात कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीसह स्थानिक मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली होती. यामुळे दरामध्ये चांगलीच घसरण झाली होती. मात्र आता पुन्हा भाजीपाल्यांच्या दरात किलोमागे चार ते पाच रुपयांची वाढ झाली आहे. दरवाढीचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत असला तरी, याचा फायदा मात्र शेतकऱ्यांनी होत नसल्याचे बाजार समितीच्या दरफलकावरुन दिसून येत आहे.

शिवशाहूंच्या विचारांचा दबावगट निर्माण करणार

$
0
0
‘शिव-शाहूंचे विचार हा बहुजन समाजाच्या विकासाचा मार्ग आहे. या विचारांचा प्रसार व प्रचार आम्ही महाराष्ट्रभर नव्या जोमाने करत आहोत. शिव-शाहूंच्या विचारांचा दबागट निर्माण करुन बहुजन समाजाचे कल्याण यातून साधण्याचा प्रयत्न आहे. यासाठी मराठा सेवा संघाने पाठबळ द्यावे,’ असे आवाहन युवराज संभाजीराजे यांनी येथे केले.

आणखी दोन दिवस वाट पाहू

$
0
0
काँग्रेसकडून उमेदवारी मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावेत. ते शक्य झाले नाही तर प्रसंगी महायुतीचा विचार करायलाही मागे पुढे पाहू नये, अशा संमिश्र भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत. सर्वांच्या भावनांचा विचार करून दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी जाहीर केले.

‘नॅक’ची तपासणी लांबणीवर

$
0
0
मार्च २०१४ मध्ये ‘नॅक’ कडून विद्यापीठाच्या पुर्नमूल्याकंनाचे नियोजन झाले. ‘नॅक’ तयारीसाठी विद्यापीठाने वेगवेगळ्या कमिट्या नेमल्या. अधिविभागापासून प्राध्यापकांपर्यंत साऱ्यांना अपडेट राहण्याच्या सूचना केल्या. मार्च महिन्यात ‘नॅक’ला आमंत्रित करण्याच्या उद्देशाने विविध विभागाचा मेकओव्हर करण्यात आला. मात्र मार्च महिना तोंडावर आला तरी अद्याप विद्यापीठाकडून ‘नॅक’ ला (राष्ट्रीय अधिस्वीकृती व मानाकंन परिषद) अजून आरएआर (पुनर्मूल्यांकन अहवाल) सादर करण्यात आला नाही.

‘नगरोत्थान’चे रस्ते खुंटणार

$
0
0
राज्य सरकारच्या नगरोत्थान योजनेतून करण्यात येणाऱ्या ३९ किलोमीटरच्या रस्त्यांच्या कामाला सुरुवातीपासून लागलेले ग्रहण वाढतच आहे. ‘डीएसआर’च्या (डिस्ट्रिक्ट शेड्यूल्ड रेट) दरात वाढ झाल्याने चार वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकल्पाच्या खर्चात ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाढीव दरांनुसार कामे करायची असल्यास रस्त्यांच्या रुंदी आणि लांबीबरोबर ड्रेनेज लाइन, सर्व्हिस डक्टच्या कामात काटछाट होणार आहे.

थँक्यू... मेडिकल सायन्स

$
0
0
‘मॉम आणि डॅडनी माझी खूप वाट पाहिलीय...मला मात्र त्यांच्या पोटी यायला १८ वर्षे लागली...त्यासाठी टेस्टट्यूब बेबीसारखं वैद्यकीय तंत्रज्ञान खूप मोलाचं ठरलं. आईबाबांच्या पोटी मुलांचा जन्म होतो हा निसर्गनियम आहे....पण मुलांच्या जन्मामुळे पालक या नात्याचाही जन्म होतो.

प्रा. पी. बी. पाटील यांचे निधन

$
0
0
ज्येष्ठ विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, माजी आमदार प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांचे रविवारी सकाळी सांगलीत शांतिनिकेतनमधील राहत्या घरी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. बुधगाव येथील सरोज उद्यानात दुपारी सरकारी इतमामात प्राचार्य पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुली, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

कलेवरील प्रेमातून कलावंताची जडणघडण

$
0
0
‘कलेला मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे. नाट्यकला ही जाणीवपूर्वक, विचारपूर्वक करण्याची गोष्ट आहे. अभिनय ही अनुभवण्याची, करून पाहण्याची कला आहे’ असे मत ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक शरद भुथाडिया यांनी व्यक्त केले.

उलगडली माणदेशी माणसं...

$
0
0
व्यंकटेश माडगुळकर यांनी लिहिलेल्या ‘माणदेशी माणसे’ मध्ये विविध शब्दचित्रे आहेत. प्रत्येक शब्दचित्रात भेटणारा माणूस त्याची कथा मांडताना व्यथाही मांडून जातो. माणदेशाच्या पार्श्वभूमीशी निगडीत असलेल्या या शब्दचित्रांमध्ये प्रत्येक पात्र सामान्य जीवनातीलच दु:ख मांडते.

‘भालकर्स’ कला अकादमीतर्फे पुरस्कार सोहळा

$
0
0
नृत्याच्या मंचावर कलेसाठी वाहून घेणाऱ्या युवा कलाकारांच्या नृत्यकौशल्याला दाद देत आणि ज्यांनी कलेसाठी आपापल्यापरीने कार्यातून योगदान दिले त्यांना भालकर कलाअकादमीच्यावतीने गौरवण्यात आले.

गायन, नृत्याविष्काराने झंकारली सायंकाळ

$
0
0
शास्त्रीय रागदारीची बहारदार सुरावट आ​णि त्या सुरावटीवर फुललेला भरतनाट्यम् व कथक नृत्य प्रकार, एकाचवेळी अभिजात शास्त्रीय संगीतातील गायन आ​णि नृत्य अविष्कार रविवारच्या सायंकाळी कलाप्रेमींना अनुभवता आला.

एमडीआरचे निदान होणार दोन तासात

$
0
0
टीबी या आजारावर उपचार उपलब्ध आहेत, त्यातही निदान जर वेळेवर झाले तर उपचार अधिक सोपे होतात. टीबीमधील गुंतागुंतीचा प्रकार असलेल्या आणि विविध उपचार पद्धतींना दाद देत नसलेल्या मल्टीपल ड्रग रेजिस्टंस (एमडीआर) चे निदान अवघ्या दोन तासात होवू शकणार आहेत.

महापालिकेसमोर आज शिवसेनेचे आंदोलन

$
0
0
कोणतीही जबाबदारी नसताना महापालिका पदाधिकारी व आयुक्तांनी आयआरबीला नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी का स्वीकारली, याचा खुलासा न केल्यास शिवसेना टप्प्याटप्प्याने आंदोलन करणार आहे.

काँग्रेस सरकार श्रीमंतांचे

$
0
0
काँग्रेसमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महागाईने उच्चांक मांडला आहे. सामान्य माणसाला जगणे मुश्कील झाले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये एक्साईज ड्युटी कमी करण्यात आली पण शेतकऱ्याना खतावरील सबसीडी देता येणार नाही.

‘हिंदी हैं हम..’ चे ठिय्या आंदोलन सुरु

$
0
0
मुस्लिम समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी सोमवार (ता. २४) पासून ‘हिंदी हैं हम.. हिंदोस्ता हमारा’च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनाची सुरुवात झाली. सुमारे शंभर कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत.

मुस्लिम बोर्डिंगच्या संचालकांविरोधात उपोषण

$
0
0
दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटीची सहा वर्षे सर्वसाधारण सभा झालेली नाही, गेल्या दहा वर्षाचा ताळेबंद जाहीर करावा यासह अन्य मागण्यांसाठी मुस्लिम बोर्डिंगच्या दोन माजी संचालकांसह कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषणाची सोमवारपासून सुरुवात केली.

दीडशे पटावरील शाळांना स्वतंत्र मुख्याध्यापक

$
0
0
आरटीईच्या तरतुदीनुसार येत्या शैक्षणिक वर्षातील संच मान्यता होणार असून दीडशे पटावरील प्राथमिक शाळांना स्वतंत्र मुख्याध्यापक दिला जाणार आहे. ही माहिती राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांनी महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या शिष्टमंडळाला दिली.

‘महसूल’चे ४१ तर पोलिसांतील ४२ लाचखोर

$
0
0
लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाने २०१३ मध्ये १०९ सापळ्यामध्ये महसूल खात्यातील ४१ तर पोलिस खात्यातील ४२ जणांना अटक केली आहे. महसूल खात्यातील कारवाईत ३ लाख ३६ हजार तर पोलिस खात्यातील ३ लाख ४९ हजार ७०० रूपये जप्त करण्यात आले आहेत.

थेट पाईपलाईसाठी सात कंपन्यांचे टेंडर

$
0
0
काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेसाठी सात कंपन्यांनी टेंडर भरल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. यामध्ये मुंबई आणि हैद्राबाद येथील कंपन्यांचा समावेश आहे. टेक्निकल आणि फायनान्शिअल अशा दोन प्रकारात टेंडर स्वीकारले जाणार असल्याची अट महापालिका प्रशासनाने घातली होती.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images