Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पासऐवजी मिळणार ‘स्मार्ट कार्ड’

$
0
0
सर्वसामान्यांच्या प्रवासाची सोय करणाऱ्या राज्यमार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) आता पासधारक प्रवाशांना पासऐवजी ‘स्मार्ट कार्ड’ देण्याची योजना नुकतीच सुरू करण्यात आली आहे.

मर्यादेबाहेर त्यांना मदत नाही

$
0
0
‘सहकारी क्षेत्राने उर्जेची निर्मिती तसेच शास्त्रोक्त पद्धतीने पाण्याचा वापर करुन येणारे संकट टाळावे. खासगी क्षेत्राच्या स्पर्धेत सहकार क्षेत्राने उतरून दिमाखाने उभे रहावे. एका मर्यादेच्या बाहेर सरकार मदत करणार नाही. केंद्राच्या धर्तीवर राज्यात ऊस विकास निधी बँक करण्याचा आमचा विचार आहे’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

कराडमध्ये दुर्मिळ पक्षांचे दर्शन

$
0
0
जगभरात दुर्मिळ होत चाललेल्या पक्ष्यांचा वावर कराड, पाटण परिसरात वाढू लागला आहे. परिसरातील तळ्यांत व नदीकाठी पेन्टेड स्टॉर्क (रंगीत करकोचा), व्हाईट आयबीस (पांढरा आवाक) आदी दुर्मिळ पक्षी दृष्टीस पडत आहेत.

देश सांस्कृतिक, आर्थिक अराजकाच्या उंबरठ्यावर

$
0
0
आपला देश सांस्कृतिक आणि आर्थिक अराजकतेच्या उंबरठ्यावर उभा असून वेळीच आपण सावध होऊन योग्य उपाययोजना केल्या नाहीत तर भविष्यकाळ आपल्याला कदाप‌ि माफ करणार नाही. आर्थिक नियोजन आणि भांडवलाअभावी गणपती आणि पतंग आयात करण्यात आपण धन्यता मानत आहोत. जन्मलेल्या मुलालाही पहिल्या दिवसापासून टॅक्स भरावा लागतो.

काँग्रेस सरकार श्रीमंतांचे

$
0
0
काँग्रेसमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महागाईने उच्चांक मांडला आहे. सामान्य माणसाला जगणे मुश्कील झाले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये एक्साईज ड्युटी कमी करण्यात आली पण शेतकऱ्याना खतावरील सबसीडी देता येणार नाही. हे सरकार गरीबांचे सरकार नाही. तर हे सरकार श्रीमंताचे सरकार आहे.

किंमत आणि मूल्य

$
0
0
‘फेसबुकने मला नाकारले. काही विलक्षण, अफलातून मंडळींबरोबर का‘म करायची संधी हुकली. आयुष्यातल्या यापुढच्या आव्हानासाठी तयार होतोय.’ ३ ऑगस्ट २००९ ला दुपारी सव्वाबारा वाजता ब्रायन अॅक्टनने आपल्या मनातल्या निराशेला वाट करून देणारे ट्वीट केले. चार महिन्यापूर्वी त्याने असेच ट्वीट ट्वीटर मधून मिळालेल्या नकारानंतर केले होते.

प्रशासन पाडतेय धरणग्रस्तांत फूट

$
0
0
आजरा तालुक्यातील सर्फनाला प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक जमनी येथील लाभक्षेत्रामध्ये उपलब्ध नसताना आणि त्याबाबतची उपलब्धता करण्यापेक्षा गावठाणातील भूखंडांसाठीच्या पसंती अर्जाची गरजच काय, असा सवाल करीत पसंती फॉर्म भरून घेण्यासाठी येथे आलेल्या जिल्हा पुनर्वसन अधिकारी अमृत नाटेकर व अन्य अधिकाऱ्यांना लोकशाहीवादी श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखालील प्रकल्पग्रस्तांनी शेळप फाट्यानजीकच गुरूवारी रोखले.

महापालिकेसमोर शिवसेनेचे आंदोलन

$
0
0
कोणतीही जबाबदारी नसताना महापालिका पदाधिकारी व आयुक्तांनी आयआरबीला नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी का स्वीकारली, याचा खुलासा न केल्यास शिवसेना टप्प्याटप्प्याने आंदोलन करणार आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून मंगळवारी (ता.२५) महापालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

प्लॉटिंगमुळे जैवविविधतेवरच कुऱ्हाड

$
0
0
शाहूवाडीच्या पश्चिमेसह दक्षिण व उत्तर भागात समृध्द निसर्गसंपदा आहे. इको सेन्स‌िटीव्ह झेनमध्ये हा भाग मोडत असल्याने सर्वच पातळयावर मर्यादा आल्या आहेत. अशाही स्थितीत मर्यादांचे उल्लंघन करुन पर्यावरणावरच घाला घालण्याचे काम काही मंडळीकडून होत राहिले आहे. या भागात असलेल्या जंगलातले डोंगर बुलडोझरने उलथवून प्लॉटींग पाडण्याची स्पर्धा लागल्याने जैवविविधता नष्ट होवू लागली आहे.

फोटो स्टुडिओला भादवणमध्ये आग

$
0
0
भादवण (ता. आजरा) येथील एका फोटो स्टुड‌िओला लागलेल्या आगीमुळे तीन लाखांचे नुकसान झाले. या आगीमुळे शेजारील एका घरालाही आगीची झळ पोहोचली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

शिंदे यांचे स्मारक प्रेरणादायी

$
0
0
देश सेवेचा ध्यास घेऊन सैन्यभरती झालेल्या सैनिकांच्यामुळे देशाची सुरक्षा तसेच आपण सुरक्षित आहोत. सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांच्या बलिदानाने पावन झालेल्या नेसरीच्या भूमीला देशभक्ती व स्वामिनिष्ठेचा इतिहास आहे. या ‌देशभक्तीचा वारसा शहीद मेजर सत्यजीत शिंदे यांनी पुढे ‌चालविला आहे.

एसीपींच्या आश्वासनानंतर चंदगड बंद मागे

$
0
0
चंदगड पोलिस ठाण्यावर करण्यात आलेल्या दगडफेकप्रकरणी दाखल नाहक गोवण्यात आलेल्या व्यक्तींवरील गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी आज (ता.२४) चंदगड तालुका बंदचे आवाहन करण्यात आले होते. मात्र जिल्हा पोलिस प्रमुखांच्या आश्वासनानंतर हा मोर्चा व बंद स्थगित करण्यात आल्याची माहिती चंदगडचे उपसरपंच सचिन बल्लाळ यांनी दिली.

डॉ. कदम यांना गाडगे महाराज पुरस्कार

$
0
0
‘सर्वच बुद्धिजीवी वर्गाची संसद निर्माण झाल्यास विधायक समाज निर्मिती आणि नावीन्यपूर्ण संकल्पनाची निर्मिती करता येईल,’ असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी केले. संत गाडगे महाराज अध्यासनाच्या वतीने संत गाडगे महाराज समाज भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते. राजर्षी शाहू स्मारक भवनात कार्यक्रम झाला.

शिवसेना पदाधिकारी राजीनामे देणार

$
0
0
कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांना पक्षाची उमेदवारी देण्यात यावी अन्यथा कागल तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते राजीनामे देतील, असा इशारा कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

‘अन्न सुरक्षा’ चा कामगारांना फायदा द्या

$
0
0
यंत्रमाग कामगारांसह सर्व असंघटीत कामगारांना सुरक्षा कायद्यामध्ये समाविष्ट करावे, अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत कार्डास ३५ किलो धान्य देण्यात यावे, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पुरवठा अधिकारी के. बी. देसाई यांना निवेदन देण्यात आले.

बॉक्साइट कंपन्याची मनमानी सुरूच

$
0
0
भुदरगड तालुक्यातील मिणचे येथील पंडितराव माईन्स आणि मिनरल्स कंपनीच्यावतीने बॉक्साइट वाहतूक सुरु आहे. डिसेंबर महिन्यात परिसरातील ग्रामस्थांनी या उत्खनन व बेकायदेशीर वाहतुकी विरोधात येथील उत्खनन बंद पाडले होते. यावेळी तहसीलदार यांनी ग्रामस्थ व कंपनीमध्ये समन्वय बैठक करून काही अटींच्यावर वाहतूक व उत्खननास परवानगी दिली होती.

चित्रशैली, भरतकामाचा अाविष्कार

$
0
0
भुरळ पाडणारी निसर्गातील सौंदर्यस्थळे, वृक्षवेलींनी लपटलेली कोकणातील कौलारू घरे, निसर्गातील छायाप्रकाशाचा बदल लक्षात घेत टिपलेले वेगवेगळे मूड्स, जलरंगात विचारपूर्वक केलेली मांडणी अशा चित्रकृतींनी उदघाटनाच्याच दिवशी कलाप्रेमींची दाद मिळवली. जलरंगाच्या माध्यमात रेखाटलेल्या या चित्रकृतींसोबतच भरतकामातील सुंदर अशा कलाकृतींनी प्रदर्शनाची शोभा वाढवली आहे.

एचआयव्ही एड्स प्रबोधनाचा पडद्यावरचा प्रभावी जागर

$
0
0
‘प्रबोधन, जागृती अशा परिर्वनशील गोष्टींसाठी सिनेमा हे खूप प्रभावी माध्यम आहे. म्हणूनच एचआयव्ही एड्स या आजाराला प्रतिबंध करायचा असेल तर त्याला समूळ नष्ट करायला हवे, हा संदेश देणाऱ्या ‘संवेदना’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून प्रबोधनाचा नवा जागर केला,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. शरद भुथाडिया यांनी केले.

रंकाळा पदपथ उद्यान एसटी वाहतूक बंद करा

$
0
0
दत्त मंगल कार्यालय-रंकाळा पदपथ उद्यान ते क्रशर चौक मार्गावरील एसटी व अवजड वाहनांची वाहतूक त्वरीत बंद करण्याची मागणी निवेदनाव्दारे भारतीय जनता पक्षाने एसटी महामंडळ विभाग नियंत्रक सुहास जाधव व पोलिस निरीक्षक आर. आर. पाटील यांच्याकडे केली.

नेत्यांची पिछाडी, कार्यकर्त्यांची आघाडी

$
0
0
नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत सोशल मिडीयाने महत्वाची भूमिका बजावली होती. चपखल आणि नेमका वापर करुन आम आदमी पार्टीने प्रचार करुन दिल्लीची सत्ता ताब्यात घेण्याइतपत मजल मारली होती. सोशल मिडीया हे प्रचाराचे प्रभावी अस्त्र म्हणून वापरले जात आहे. सोशल मिडीयाच्या वाढलेल्या या प्रभावाची दखल अद्याप कोल्हापुरातील नेतेमंडळींकडून फारशी घेतली नसल्याचे चित्र आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images