Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मतदान चिठ्ठी तीन दिवसआधी

0
0
मतदानाची टक्केवारी जास्त व्हावी व मतदानासाठी मतदाराला मतदान केंद्रावर कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रत्येक मतदाराला मतदानापूर्वी तीन दिवस अगोदर त्याच्या घरी जाऊन जिल्हा प्रशासनातर्फे मतदान चिठ्ठी देणार आहे. या मतदान चिठ्ठीवर मतदाराच्या फोटोसह सर्व माहिती असल्याने बोगस मतदानाला आळा बसणार आहे.

‘निर्मल ग्राम’ची उत्कंठा

0
0
जिल्ह्यातील २९ गावे वगळता पूर्ण जिल्हा निर्मल झाला आहे. तर गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात दाखल झालेल्या समितीच्या पाहणीनंतर आणि त्यांच्या समाधानामुळे देशातील पहिला निर्मल जिल्हा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बीडकर प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर

0
0
‘सिने कला दिग्दर्शक, चित्रकार कै. बळीराम बीडकर कलाप्रतिष्ठान’तर्फे सिने व नाट्य क्षेत्रातील संस्मरणीय कामगिरी, चित्रकारिता, शिल्पकार, भरतकाम आ​णि कलाशिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा चित्रकर्ती विजयमाला पेंटर, प्रसिध्द अभिनेत्री अलका कुबल आठल्ये यांना ‘कला साधना-कला जीवन गौरव’ तर कलाध्यापक संदीप शिरगावे (पुणे) यांना आदर्श कला शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

मंडलिक गट ‘शिवधनुष्य’ उचलणार

0
0
काँग्रेसने कोल्हापूरची जागा राष्ट्रवादीला दिल्याचे संकेत दिल्याने खासदार सदाशिवराव मंडलिक गट आता ‘शिवधनुष्य’ उचलण्याच्या तयारीत आहे. तसा दबाव कार्यकर्त्यांकडून सुरू आहे.‘पवारांना भाजप, शेट्टी-आठवलेंना महायुती चालते,मग आपणाला त्याचे काय वावडे ’ असा सवाल मंडलिकांनी केल्याने त्यांचाही कल आता सेनेकडे झुकल्याचे स्पष्ट होत आहे.

ढोलाच्या दणदणाटाने सव्वा कोटी वसूल

0
0
एका महिन्यात २१ कोटीची घरफाळ्याची वसुली कशी करणार अशी विचारणा करत नगरसेवकांनी महापालिकेच्या सभेत घरफाळा विभागाला झाडल्यानंतर शुक्रवारी घरफाळा विभागाने वसुलीचा धडाका लावला. दिवसभर थकबाकीदारांच्या दारात ढोल ताशांचा दणदणाट करुन एक कोटी ३७ हजार ७४४ रुपयांचा कर देण्यास भाग पाडले.

बारावीचा निकाल लांबणार?

0
0
राज्य मंडळात बारावीच्या मराठी आणि इंग्रजी या दोन्ही विषयासंबंधीच्या बैठकीवर चीफ मॉडरेटरनी बहिष्कार टाकला. त्यामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊही विभागीय कार्यालयाचे टेन्शन वाढले आहे.

सर्व बसेसना ‘जीपीआरएस’ बसविणार

0
0
बसमध्ये होणारी गर्दी पाहता महिलांना विनात्रास व सुरक्षित प्रवास करण्यासाठी केएमटीने शहरात महिला स्पेशल बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात दोन बस महिलांसाठी सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांना बसची प्रतीक्षा करायला लागू नये यासाठी प्रत्येक बसवर जीपीआरएस यंत्रणा बसवण्यात येणार आहेत.

उत्तरपत्रिकांचे टेन्शन वाढले

0
0
राज्य मंडळात बारावीच्या मराठी आणि इंग्रजी या दोन्ही विषयासंबंधीच्या बैठकीवर चीफ मॉडरेटरनी बहिष्कार टाकला. त्यामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊही विभागीय कार्यालयांचे टेन्शन वाढले आहे. मराठी विषयांच्या उत्तरपत्रिकेबाबत सूचना आणि पुढील प्रक्रियेसंबंधी माहिती देण्यासाठी उद्या (शनिवारी) बैठक होणार आहे.

जोधपूर-बेंगळुरू एक्स्प्रेस लुटली

0
0
जोधपूर-बेंगळुरू एक्सप्रेसमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घालत प्रवाशांचा रोख रक्कम, मोबाइल हॅण्डसेट, सोन्याचे दागिने व कपडे असा सुमारे चार लाखांचा ऐवज लुटला. शुक्रवारी रात्री वसई ते पुणे दरम्यान सहा बोगींमध्ये चोरी करून चोरटे पसार झाले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रवाशांनी पुणे, कराड आणि सातारा स्थानकात फिर्याद दाखल करण्याचा प्रयत्न केला.

अखेर सापडला तो चोर...

0
0
सर्वसामान्य नागरिकांचे अज्ञान, दलालांची टोळी, राजकीय नेत्यांशी लागेबांधे आणि गावोगावच्या कारभाऱ्यांना हाताशी धरून मनमानी कारभार केल्यास कोणीही आपल्या वाटेला जात नाही, असा काहीसा समज अधिकाऱ्यांचा झालेला असतो. अनेकदा असा कारभार चव्हाट्यावर येत नाही. मात्र, काहीजणांचे हितसंबंध दुखावले की त्यांना अडचणीत आणले जाते, अन्यथा हा बिनबोभाट कारभार सुरूच असतो.

परीक्षा आणि सुरक्षेचा पंचनामा

0
0
कॉलेज आणि परीक्षा विभागाकडे तक्रार करूनही प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याच्या निषेधार्थ सातारा जिल्ह्यातील विविध कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी विद्यापीठासमोर ठिय्या आंदोलन व जोरदार निदर्शने केली. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची बाजू ऐकून न घेता, त्या विद्यार्थ्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्याचा अजब प्रकार विद्यापीठात पाहावयास मिळाला.

बोगस बियाणे विकणाऱ्यांवर कारवाई करा

0
0
बोगस बियाणांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बियाणे विक्री दुकानदारांवर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कृषी अधिकाऱ्यांची भेट घेतली. ज्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे, त्याबाबतचा अहवाल तयार करण्यात आला असून दुकानदाराचा परवाना रद्द करण्यासाठी कृषी विकास अधिकाऱ्यांकडे शिफारस करण्याचे आश्वासन कृषी उपसंचालकांनी दिले आहे.

जयशंकर दानवे पुरस्कार शरद पोंक्षे यांना जाहीर

0
0
मूक चित्रपटापासून बोलपटापर्यंत आपल्या अभिनय व दिग्दर्शकाची अवीट छाप पाडलेल्या नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या नावाचा कलायात्री पुरस्कार अभिनेते शरद पोंक्षे यांना देण्यात येणार असल्याची माहिती जयश्री दानवे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

‘घड्याळ’ चिन्हावरच लढणार!: महाडिक

0
0
‘मागील काही दिवसांपासून मी कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार असा प्रश्न विचारला जात होता. पण आज मी ‘घड्याळ’ या चिन्हावरच निवडणूक लढविण्याचे जाहीर करतो. तसा आदेश मला राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.

परस्पर शेतजमीन लाटली

0
0
बनावट कागदपत्रांद्वारे एक एकर शेती परस्पर लाटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी ९ जणांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी तिघांना अटक केली असून चारजणांनी तात्पुरता अटकपूर्व जामीन घेतला आहे तर शेती खरेदी घेणाऱ्यासह दोघेजण फरारी आहेत.

शिवसेनेला कोणीही गृहीत धरू नका

0
0
कोल्हापूर लोकसभेची जागा काँग्रेसला सुटणार नसेल तर खासदार सदाशिवराव मंडलिक आणि त्यांचे पुत्र जिल्हा परिषद अध्यक्ष संजय मंडलिक यांनी वेळप्रसंगी शिवसेनेकडूनही लढण्याची तयारी ठेवली आहे. मात्र, याबाबत शिवसेनेशी कोणीही संपर्क साधलेला नसून शिवसेना कोल्हापूरची जागा जिंकण्याच्या उद्देशानेच लढविणार आहे. त्यामुळे कोणीही शिवसेनेला गृहीत धरून उमेदवारी जाहीर करू नये, असा इशारा शिवसेनेच्या नेत्यांनी दिला आहे.

प्रतिष्ठेसाठीच पवारांचा हट्ट

0
0
‘राष्ट्रवादी काँग्रेसकडे पक्षाची विचारधारा असणारा स्वतःचा उमेदवार नाही, तरीदेखील २००९ साली झालेल्या पराभवामुळे गेलेली अब्रू परत मिळविण्यासाठी धनंजय महाडिक यांचे नाव पुढे करून निवडणूक जिंकण्याचा शरद पवारांचा इरादा आहे. मात्र, तो आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही.

मॉडरेटरांचाही बहिष्कार

0
0
बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीच्या कामासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शनिवारी बोलाविलेल्या बैठकीवर मॉडरेटरनी बहिष्कार टाकला. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीनही जिल्ह्यांतील मॉडरेटर बहिष्कारात सहभागी झाले.

मराठी माणूस 'पीएम' का नाही!: नाना

0
0
‘मराठी माणूस कुठेही कमी नाही. तरीही स्वातंत्र्यानंतरच्या ६० वर्षांत मराठी माणसाला एकदाही पंतप्रधानपदाची संधी का मिळाली नाही,’ अशी खंत व्यक्त करतानाच, यापुढे आपण पंतप्रधानपदासाठी ताकद लावली पाहिजे,’ असे आग्रही प्रतिपादन अभिनेता नाना पाटेकर याने रविवारी येथे केले.

‘एलबीटी’चा निर्णय २८ फेब्रुवारीपर्यंत घ्या

0
0
राज्यातील व्यापारी संघटनांनी राज्य सरकारला एलबीटी रद्द करण्यासाठी २८ फेब्रुवारीची मदत दिली आहे. या काळात सरकारने निर्णय घेतला नाही, तर येत्या निवडणुकांत काँग्रेस आघाडीच्या विरुद्ध मतदान करू, असा इशारा दिला आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images