Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

शिवभक्ताने केला २८ अपंगांचा सत्कार

0
0
शिवभक्त धोंडिराम परीट यांच्या पुढाकार आणि प्रेरणेतून मूरगुड येथे शिवजयंती उत्सवात यावर्षी शहारातील २८ अपंगांचा सत्कार करण्यात आला. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत अपंगत्वावर मात करुन समाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या अपंग बांधवांना शिवभक्त धोंडिंराम परीट यांनी शिवप्रतिमा देवून सन्मानित केले. तर अपंग महिलांना साडी चोळी देण्यात आली.

आम्ही आडनावाचे शेतकरी...

0
0
भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेतकऱ्याला राजा म्हटले तर आपण राजपुत्र आहोत. मग आत्महत्या करणारा राजा नेमका कोणता? स्वातंत्र्यानंतर शेतकऱ्यांची नवी ‘जमात’ जन्माला आली आहे असे सांगत ‘आम्ही आडनावाचे... आडनावाचे शेतकरी’ ही राजकारण्यांवर मार्मिक टीका करणारी कविता सादर करून कवी नारायण सुमंत यांनी रसिकांची दाद मिळविली.

जॉब क्रिएटर व्हा

0
0
‘शिक्षण म्हणजे नोकरी मिळवण्याचे प्रमाणपत्र या चौकटीतून बाहेर पडत नोकरदार होवून जॉब चुजर्स होण्यापेक्षा उद्योजक बनून जॉब क्रिएटर व्हा,’ असा मंत्र यंग उद्योजकांच्या सल्लागार गुरू मानल्या जाणाऱ्या लेखिका रश्मी बन्सल यांनी यंगस्टर्सना दिला.

एमआयडीसीतील सांडपाणी नदीत

0
0
जयसिंगपूर येथील ल.क.अकिवाटे औद्योगिक वसाहतीमधील सांडपाणी थेट कृष्णा नदीत मिसळत असल्याने संतप्त झालेल्या अर्जुनवाड (ता.शिरोळ) येथील ग्रामस्थांनी सांडपाण्याच्या पाइप जेसीबीच्या सहाय्याने उखडून टाकल्या. वसाहतीमधील पाणी शुध्द‌िकरणाबाबत तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

RPIने दाखवले CM ना काळे झेंडे

0
0
विविध मागण्या पूर्ण न केल्याने इंदापूरजवळील निमगाव येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध केला. आपल्या विविध मागण्यांचा या वेळी आरपीआयतर्फे पुनरुच्चार करण्यात आला.

पोलिसांचा जनतेशी संपर्क कमी

0
0
पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांचा जनतेशी संपर्क कमी झाला आहे. माझ्या कार्यकाळात कोल्हापूर रेंजमध्ये क्राइम रेट वाढला असला तरी गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाणही जास्त आहे, असे मत विशेष पोलिस महानिरीक्षक तुकाराम चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. चव्हाण यांची पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ अप्पर पोलिस महासंचालकपदी पदोन्नती झाली आहे.

महायुतीची उमेदवारी कळीचा मुद्दा

0
0
लोकसभेसाठी जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघातील उमेदवारी जाहीर झाली नसली तरी, हातकणंगले मतदारसंघातून माजी खासदार कलाप्पाण्णा आवाडे व कोल्हापुरातून धनंजय महाडिक यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत. यामध्ये आता खरी अडचण खासदार सदाशिवराव मंडलिक यांची झाली आहे. कोल्हापूरची जागा काँग्रेसला न मिळाल्याने ते आता स्वाभिमानी किंवा शिवसेनेच्या दारात जाण्याची चिन्हे आहेत.

परीक्षा, सुरक्षा विभागाचा पंचनामा

0
0
कॉलेज आणि परीक्षा विभागाकडे तक्रार करूनही प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याच्या निषेधार्थ सातारा जिल्ह्यातील विविध कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी विद्यापीठासमोर ठिय्या आंदोलन व जोरदार निदर्शने केली. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची बाजू ऐकून न घेता, त्या विद्यार्थ्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्याचा अजब प्रकार विद्यापीठात पाहावयास मिळाला. दरम्यान, प्र-कुलगुरू अशोक भोईटे, परीक्षा नियंत्रक बी.एम.हिर्डेकर, उपकुलसचिव अश्विनी महाडेश्वर यांच्या उपस्थितीत ​संबंधित विद्यार्थ्यांची बैठक झाली.

केएमटीला सिंगल बेल की डबल

0
0
शहरवासियांच्या सुविधेसाठी नवीन बसेसची आवश्यकता निवडणूक आयोगाला पटवून दिल्यास बसेसच्या टेंडरला आचारसंहितेचा ब्रेक लागणार नाही. ही आवश्यकता पटवून देण्याची जबाबदारी आता प्रशासनावर असून ही सर्व प्रक्रिया सुरळीत झाल्यास जास्तीत जास्त सहा महिन्यात १०४ बस शहरातील रस्त्यांवर धावतानाचे चित्र पहायला मिळेल.

एसडीपीची गरज आरडीपीवर

0
0
सीपीआरमधील सिंगल डोनर प्लेटलेट (एसडीपी) मशीन वर्षभर बंद आहे. त्यामुळे गरजूंना जादा साडेतीन हजार रूपये मोजून खासगी ब्लड बँकेतून एसडीपी मिळवावे लागत आहे. ताप, डेंग्यू अथवा व्हायरल इन्फेक्शनमध्ये रक्तातील प्लेटलेट मोठ्या प्रमाणावर कमी झालेल्या असतात. त्यावेळी बाहेरून प्लेटलेट द्यावे लागतात.

देवस्थान समितीकडून ३० ठिकाणी फलक

0
0
कोल्हापूरला भेट देणाऱ्या पर्यटकांपैकी सर्वाधिक पर्यटक करवीरनिवासिनी महालक्ष्मीला भेट देतात. दिवसेंदिवस पर्यटकांच्या संख्येत वाढच होत आहे. मात्र शहरात प्रवेश केला की महालक्ष्मी मंदिराकडे जायचे कसे, किंवा इच्छितस्थळी जायचे कसे, पार्किंग व्यवस्था कुठे आहे याची माहिती दर्शवणारे फलकच वर्षोनवर्षे लावलेले नव्हते. त्यामुळे वाहनधारक आणि पर्यटकांची कुचंबणा व्हायची किंवा वाहतूक पोलिसांच्या दंडाला सामोरे जावे लागे.

शिवरायांचा कोणता गुण बाणवणार?

0
0
तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती १९ फेब्रुवारीला साजरी झाली. सरकारी नियमाप्रमाणे त्या दिवशी सुटीसुद्धा मिळाली. अक्षय तृतीयेला पुन्हा एकदा तिथीप्रमाणे जयंती साजरी होईल.

खदखदणाऱ्या भावनांचा ‘आइसब्रेक’

0
0
अखिल भारतीय अपंग साहित्य संमेलन आजपासून (ता.२२) पुण्यात होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी कोल्हापूरच्या सोनाली नवांगुळ यांची एकमताने निवड झाली.

प्लेटलेटसाठीचे सीपीआरमधील मशीन वर्षभर बंद

0
0
सीपीआरमधील सिंगल डोनर प्लेटलेट (एसडीपी) मशीन वर्षभर बंद आहे. त्यामुळे गरजूंना जादा साडेतीन हजार रूपये मोजून खासगी ब्लड बँकेतून एसडीपी मिळवावे लागत आहे.

गायक महेश मुतालिक यांचे निधन

0
0
भुले बिसरे गीत, 'इथे गाणी भेटतात', 'शुक्रतारा' या सांगितीक कार्यक्रमांतील प्रमुख गायक व झी टीव्हीच्या 'सारेगमप' या रिऍलिटी शोमधील उपविजेते महेशमधुकर मुतालिक यांचे सांगली येथील राहत्या घरी निधन झाले.

दिशादर्शन

0
0
कोल्हापूरला भेट देणाऱ्या पर्यटकांपैकी सर्वाधिक पर्यटक करवीरनिवासिनी महालक्ष्मीला भेट देतात. दिवसेंदिवस पर्यटकांच्या संख्येत वाढच होत आहे.

डॉ. आंबेडकरांना ‘सत्यशोधक’ साथ

0
0
महाडचे चवदार तळ्याचे आंदोलन असो की अस्पश्यृता निर्मूलनाचा कार्यक्रम, वंचित घटकांच्या सन्मानासाठी सामाजिक लढा असो की बहुजन समाजाला त्यांच्या हक्काच्या जाणीव जागृतीचा कार्यक्रम, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बहुजन समाजातील आणि सत्यशोधकी विचारधारेतील व्यक्तींची साथ लाभली. कुणी बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केले तर कुणी पडद्याआड राहून आधारवडची भूमिका निभावली.

‘हिंदी हैं हम..’चा सोमवारपासून ठिय्या

0
0
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या समवेत गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी बैठक घडवून आणावी. मुस्लिम समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी सोमवार (ता.२४) पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु करण्यात येणार आहे. वेळप्रसंगी गृह राज्यमंत्री सतेज पाटील आणि कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा ‘हिंदी हैं हम.. हिंदोस्ता हमारा’चे कार्यकारी अध्यक्ष हुमायून मुरसल यांनी पत्रकार परिषदेत दिला.

मुस्लिम बोर्डिंगचा गैरकारभार

0
0
मुस्लिम बोर्डिंगच्या संचालक मंडळाची मुदत संपली असल्याने तातडीने निवडणूक घ्यावी तसेच सर्वसाधारण सभा घ्यावी या मागणीसाठी सोमवारपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते हिदायत मणेर, महंमदशरीफ शेख आणि सलीम बागवान यांनी दिला आहे.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मानधनवाढीसाठी मोर्चा

0
0
अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधनवाढीबाबत मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये कोणताही निर्णय न घेतल्याने शुक्रवारी(ता.२१) कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांना देण्यात आले.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images