Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

महालक्ष्मी वज्रलेपाचा चेंडू मेडिएशन सेंटरच्या कोर्टात

$
0
0
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या मूर्तीची झीज होऊ नये यासाठी मूर्तीवर वज्रलेप करण्याचा मार्ग कोर्टाच्या निर्णयाने सुकर केला असला तरीही मूर्तीची सर्वंकष पाहणी व अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्यात येणार आहे. वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या (मेडिएशन सेंटर) समितीची पहिली बैठक मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.

महाडिक, आवाडे निश्चित

$
0
0
कोल्हापुरातून राष्ट्रवादीतर्फे धनंजय महाडिक तर हातकणंगलेतून काँग्रेसतर्फे कल्लाप्पाण्णा आवाडे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे, आता फक्त ​अधिकृत घोषणेची औपचारिकता शिल्लक आहे. यामुळे दोघांनीही प्रचाराला सुरूवात केली असतानाच कार्यकत्यांचे डोळे मात्र अधिकृत घोषणेकडे लागले आहे.

अपार्टमेंटमध्ये कमर्शियल वापरास मनाई

$
0
0
निवासी अपार्टमेंटमध्ये यापूर्वी काही मजल्यांचा वापर हॉटेल, हॉस्पिटल किंवा मोबाइल टॉवसारसाठी करण्यात येत होता. याबाबत महापालिका व जिल्हा प्रशासन परवानगी देत होते. मात्र, रहिवाशांच्या तक्रारी होत असल्याने निवासी अपार्टमेंटमध्ये यापुढे कमर्शियल वापरास मनाई करण्यात आली आहे.

तीने त्याचा गाल रंगवला

$
0
0
एकतर्फी प्रेम करणाऱ्या युवकाच्या त्रासाला कंटाळलेल्या युवतीने शाहूपुरी पोलिस ठाण्यात पोलिसांसमोरच रंगेल प्रियकराचा गाल रंगवला. पोलिसांनी या प्रकरणी सागर पांडुरंग माने (वय २६, रा. कात्यायनी कॉम्प्लेक्स, कळंबा रोड) याला अटक केली आहे.

राजीनामे देऊन निवडणूक लढवा

$
0
0
‘काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी दिलेले राजीनामे ही बनवाबनवी आहे. त्यांच्यात हिंमत असेल तर टोलमुक्तीसाठी त्यांनी राजीनामे देऊन निवडणूक लढवावी.’ असे आव्हान शिवसेनेचे संपर्कनेते आमदार दिवाकर रावते यांनी बुधवारी येथे दिले.

पशू चिकित्सालय सलाईनवरच

$
0
0
गेल्या कित्येक महिन्यांपासून उद‍्घाटनाअभावी पडून असलेल्या गडहिंग्लज तालुका लघुपशु सर्व चिकित्सालयाचे मनसे प्रतिकात्मक उद‍्घाटन करणार आहे. याबाबत महाराष्ट्र टाइम्समध्ये बातमी याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.

अतिरिक्त शिक्षकांच्या विनाअट बदल्या

$
0
0
प्रशासकीय बदलीने २०१२ - १३ पूर्वी अतिरिक्त होऊन बाहेर गेलेल्या केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर, अध्यापक शिक्षकांचा विनाअट बदली आदेश चार दिवसात काढण्यात येणार असल्याचे आश्वासन ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी दिल्याचे राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजाराम वरूटे यांनी सांगितले.

भ्रष्टाचारामुळे पाणी योजना अयशस्वी

$
0
0
पिण्याच्या पाण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने अनेक योजना राबविल्या आहेत. गावांनी मात्र या योजना राबवत असताना सरकारी नियमांना तिलांजली दिली आहे. त्यामुळे स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही जनतेला स्वच्छ व मुबलक पाणी मिळत नाही आहे, अशी खंत कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.

६८२ तरुणांना रोजगार

$
0
0
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील १ हजार लोकांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी ६८२ बेरोजगारांना नोकरी देण्यात जिल्हा परिषदेला यश आले आहे. उर्वरित ३१८ लोकांनाही नोकरी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

महिलेवर अत्याचार करणाऱ्यांना अटक करा

$
0
0
शिक्षण संस्थेतील स्वयंपाक करणाऱ्या महिलेवर बलात्कार करून तिला कामावरून काढून टाकत तिच्या बँकेतील पैसे परस्पर काढून फसवणूक करणाऱ्या गडहिंग्लज तालुक्यातील गिजवणे येथील साई एज्युकेशन संस्थेचा चालक सतीश पाटील व क्रीडा शिक्षक दत्तात्रय कुंभार यांना अटक करावी, अशी मागणी ‘एकटी’ या संस्थेच्या शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक विजयसिंह जाधव यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.

श्रमिक मुक्तीचा २५ पासून ठिय्या

$
0
0
चित्री प्रकल्पांतर्गत पुनर्वसनासाठी प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनी देण्यात आल्या आहेत. पर्यायी जमिनींची मोजणी व्यवस्थित न झाल्यामुळे व एकमेकांच्या गट क्रमांकामध्ये अतिक्रमण दिसत असल्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये जमिनींबाबत वाद होत आहेत.

सखी संघटनेची इचलकरंजीत निदर्शने

$
0
0
महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या लाभार्थी मोलकरीनीच्या पाल्याना ताबडतोब लॅपटॉप व टॅबलेट देण्यात यावे, ५५ वर्षांवरील सर्व मोलकरीनींना १० हजार रुपयाचे विशेष सहाय्य देण्यात यावे, ६० वर्षावरील मोलकरीन महिलांना निवृत्ती वेतन द्यावे

शाहूवाडी स्ट्रॉबेरीचा जॅम, जेली

$
0
0
शाहूवाडीच्या लालचुटूक स्ट्रॉबेरी बाजारात दाखल झाल्याने हौशी पर्यटकांकडून स्ट्रॉबेरीच्या स्टॉल वर गर्दी होवू लागली आहे. शाहूवाडीच्या डोंगररांगातील पोषक वातावरणामुळे तालुक्याच्या पश्चिम भागात स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले आहे.

यंत्रमाग कामगारांना पगारवाढ

$
0
0
कामगार संघटना संयुक्त कामगार कृती समितीच्यावतीने यंत्रमाग कामगारांना ११ पैसे मजुरीवाढीचा तर जॉबर, कांडीवाली यांना १२ टक्के पगारवाढीचा तक्ता जाहीर करण्यात आला. त्यामुळे दोन महागाई भत्त्याप्रमाणे मजुरीवाढ मिळावी या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला पूर्णविराम मिळाला आला.

ऊस हंगाम एप्रिलअखेर

$
0
0
ऊस दर आंदोलनामुळे कारखाने वेळाने सुरू झाल्याने व तांत्रिक अडचणींमुळे ऊस तोडणीचा हंगाम ३० एप्रिलपर्यंत सुरू राहण्याची चिन्हे आहेत. ऐन लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत ऊस तोडणी विलंब होणार असल्याने याचा फटका स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह राज्यकर्त्यांना बसण्याची चिन्हे आहेत.

१५०० विद्यार्थ्यांचा सूर्यनमस्कार

$
0
0
जयसिंगपुरात प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील दीड हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी एकत्रित सूर्यनमस्काराचा उपक्रम यशस्वी केला. जयसिंगपूर नगरपरिषद प्राथमिक शिक्षण मंडळ आणि गीता परिवार यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गव्याच्या हल्ल्यात दोन जखमी

$
0
0
श्रृंगारवाडी (ता. आजरा) येथे गव्याने केलेल्या हल्ल्यात दोन ऊसतोड करणारे शेतकरी जखमी झाले. आज सकाळी ही घटना येथील नाणीशेतामध्ये घडलीय विष्णू भिमा तारळेकर (वय ५०) व शंकर जानू शिंत्रे (वय ४२, दोघेही रा. श्रृंगारवाडी) अशी जखमी शेतकऱ्यांची नावे आहेत.

शिवभक्तीत रमला मुरगूडचा मावळा

$
0
0
शिवजयंती आली की सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. मात्र केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतीव प्रेमापोटी मुरगूड (ता.कागल) येथील धोंडीराम परीट यांनी गेली १५ वर्षापासून सातत्याने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक करुनच दिवसाची सुरूवात होते.

मराठा आरक्षण लोकभावनेशी खेळ

$
0
0
‘मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार लोकांच्या भावनांशी खेळत आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आरक्षणाचा खेळ मांडला जात आहे. सरकार आणि समितीतील मंत्री देखील आरक्षणाबाबत संवेदनशील नाहीत. त्यामुळे राणे समितीने आरक्षणाबाबतची सद्यस्थिती सांगावी,’ असे मत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी व्यक्त केले.

हत्तींना परतविण्याची मोहीम फसली

$
0
0
चार दिवसांपूर्वीच येथील वनविभागाने राबविलेली हत्ती हुसकावण्याची मोहिम जवळपास फसल्याने हत्तींनी पुन्हा एकदा थैमान घालण्यास सुरूवात केली आहे. हुसकावलेल्या हत्तींनी गेले दोन दिवस पुन्हा एकदा शेतात घूसून नुकसान केल्याने मसोली, खानापूर, हाळोली आणि वेळवट्टी परिसरातील शेतकरी अक्षरश: मेटाकुटीस आले आहेत.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images