Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

प्रभावळकर ‘सहकार महर्षी’चे मानकरी

$
0
0
मराठी साहित्य विश्वात मानाचा व प्रतिष्ठेचा समजला जाणारा यंदाचा सहकार महर्षी साहित्य पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे आणि संजय मेश्राम यांच्या साहित्यकृतींना जाहीर झाला आहे.

उंचावरून पडूनही चिमुकली सुखरूप

$
0
0
इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून थेट जमिनीवर पडलेली अडीच वर्षांची तान्हुली केवळ दैव बलवत्तर म्हणूनच बचावली.

‘बेदाण्याच्या हमीभावासाठी आंदोलन’

$
0
0
द्राक्ष आणि बेदाण्याला हमी भाव मिळावा, या मागणीसाठी आता स्वाभिमानी शेतकरी संघटना व्यापक लढा उभारणार आहे, असा इशारा संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला. तासगाव येथे आयोजित केलेल्या द्राक्ष बागायतदार परिषदेत ते बोलत होते.

अपघातांनंतरही उपाययोजना नाही

$
0
0
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी बोगद्याजवळ सोमवार रात्री साडे दहा वाजता पाच वेगवेगळ्यांचा वाहनांचा एकाच ठिकाणी विचित्र अपघात झाला.

प्राचीन शिलालेख, शिल्पे दुर्लक्षित

$
0
0
इतिहासातील पाऊलखुणा जपल्याशिवाय वर्तमान कळत नाही आणि भविष्यही घडविता येत नाही. मात्र गौरवशाली इतिहास सांगणारे शिलालेख आणि वीरगळ काळाच्या ओघात नष्ट होत आहेत. या शिललालेखांमधून संबंधित परिसराचा इतिहास समजत असतो.

कोल्हापूरात टोलवसुली सुरू, पण...

$
0
0
राज्यभर झालेल्या 'टोल'फोडीची सुरुवात जिथून झाली त्या कोल्हापूरात गेले काही दिवस बंद टोलवसुली बंद होती. पण आज सकाळी ९ पासून कडक बंदोबस्तात नऊपैकी पाच टोलनाक्यावर टोलवसुलीला सुरुवात झाली आहे.

कोल्हापूरकरांसाठी फील गुड

$
0
0
पाणीपट्टीमध्ये २० टक्के वाढ, २५ टक्के सांडपाणी अधिभार असा बोजा गेल्या वर्षी सहन केलेल्या कोल्हापूरकरांवर यंदा मात्र कोणतीही करवाढ लादण्यात येणार नाही. महापालिकेने बजेट प्रक्रियेला प्रारंभ केला असून, यावर्षी कोणत्याही विभागाने करवाढीचा प्रस्ताव दिलेला नाही.

रेल्वेची आश्वासनाची शिट्टी

$
0
0
कोल्हापूर रेल्वे स्थानकाचे भौतिक रुप पालटत असले तरी अधिकाधिक रेल्वे सेवा ट्रॅकवर येणे गरजेचे आहे. अर्थसंकल्पात कराड ते बेळगाव आणि कोल्हापूर ते राजापूर मार्गावरील सर्व्हेचा प्रस्तावही रेल्वे मंत्रालयाला सादरीकरणाची गरज आहे.

शाहू महाराजांना ‘भारतरत्न’ द्या

$
0
0
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडे भटक्या विमुक्त जमाती विचार मंचने केली. कृषिमंत्री पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या वेळी मंचचे अध्यक्ष व्यंकाप्पा भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेतली.

पन्नास टक्के मराठा विद्यार्थी

$
0
0
मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांत आरक्षण देण्यासाठी राजकीय पातळीवरून हालचाली सुरू असताना शैक्षणिक क्षेत्रातील मराठा टक्का किती आहे याची माहिती संकलित केली जात आहे.

राजस्थानसह कोकण किनारा भेटीला

$
0
0
राजस्थानमधील पुरातन हवेल्या, महाल, वाळवंट, उंट, राजस्थानमधील मार्केटबरोबर कोकणातील अथांग समुद्र क‌ि‌नाऱ्याचे सौंदर्य, त्याच्या लाटांबरोबर डोलणाऱ्या नावा, रंगीबेरंगी कोळीबांधव, डोगरदऱ्यांच्या रांगा अशा विश्वात नेणाऱ्या चित्रांचे प्रदर्शन करवीरनगरीत सुरु झाले आहे.

यंग सीनिअर्ससाठी एकांकिका महोत्सव

$
0
0
सांस्कृतिक संचालनायच्यावतीने कै. अनंतराव कोरगावकर सामाजिक ट्रस्ट आणि प्रतिज्ञा नाटयरंग संस्थेच्यावतीने ज्येष्ठ हौशी कलाकारांसाठी प्रथम ‘नवपालवी’ एकांकिका महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १२ फेब्रुवारीला दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनात या एकांकिका महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

आव्हानांचा आनंद घ्या!

$
0
0
मला असे वाटते की, ‘आव्हाने’ माणसाचे जीवन रंजक बनवतात व त्या आव्हानांवर मात करण्याने जीवनाला अर्थ प्राप्त होतो. मला आव्हाने आवडतात. माझ्यासाठी प्रत्येक स्पर्धा, प्रत्येक डाव हे एक आव्हान असते. मी जेव्हा मला आव्हाने स्वीकारायला आवडतात, असे म्हणते तेव्हा ते केवळ बुद्धिबळाच्या संदर्भातच नव्हे तर ते इतर सर्व बाबींकरिता सुद्धा असते.

कॅम्पसमध्ये आजपासून कार्निव्हलची धूम

$
0
0
कॉलेज तरूणाईच्या कलागुणांना वाव आणि कॅम्पसमध्ये धमाल, मौज-मस्ती असे समीकरण असलेल्या ‘टाइम्स कार्निव्हल’ला गुरूवारपासून (ता. ६) प्रारंभ होत आहे. कार्निव्हलच्या माध्यमातून कॅम्पसमध्ये मनोरंजनाची धूम पाहायला मिळणार आहे.

भय रक्तक्षयाचे

$
0
0
तुलनेत कमी आढळणाऱ्या अप्लास्टिक अॅनिमियाचे पेशंटचे प्रमाण शहरात वाढत असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. या आजाराबाबतचे अज्ञान आणि सरकारी यादीत या आजाराची नोंदच नसल्याने पेशंटचे निदान आणि उपचार यात अडचणी येत आहेत.

रिक्षामामा करणार पर्यावरण जागृती

$
0
0
रिक्षामामा आणि त्यांच्या रिक्षातून शाळेला नियमित जाणारे विद्यार्थी यांच्यात एक वेगळंच नातं असतं. आता हे रिक्षावालेमामा रिक्षातील विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जागृती करणार आहेत.

गुप्तीने भोसकून साताऱ्यात खून

$
0
0
येथील राजवाडा परिसरात बुधवारी दुपारच्या सुमारास एकाचा गुप्तीने भोसकून खून करण्यात आला. मृताचे नाव सुरेश पांडुरंग अहिरे (वय ५०, रा. चिमणुपरा पेठ, सातारा) आहे.

महामार्ग प्राधिकरणावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

$
0
0
खंबाटकी घाटातील अपघाताला कारणीभूत ठरल्याप्रकरणी खंडाळा पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया) विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

खूनप्रकरणी कर्नाटकात तपास

$
0
0
उद्योजक मनोज गट्टाणी यांच्या खूनप्रकरणी अटक करण्यात आलेला मुख्य संशयित आरोपी लाला उर्फ लाल्या मलिक याला बुधवारी तपासकामी चिकोडी तालुक्यातील कारदगा परिसरात फिरवण्यात आले.

मारहाणीत हॉटेल कामगार जखमी

$
0
0
चंदगडमध्ये किरकोळ कारणावरून जुन्या बसस्थानकाजवळ असलेल्या टॉप-इन टॉऊन हॉटेलमधील कामगार गुरूनाथ गणपती तारळेकर (वय ३५, रा. इनाम कोळिंद्रे) याला दोघांनी बेदम मारहाण केली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images