Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘सर्फनाला’चे काम बंद

$
0
0
गेल्या महिन्यामध्ये झालेल्या प्रकल्पग्रस्त व प्रशासन अधिकाऱ्यांच्या बैठकीतील ठरावांप्रमाणे कार्यवाही न करता आजरा तालुक्यातील सर्फनाला प्रकल्पग्रस्तांना परस्पर भेटून जमीन वाटपाबाबतचे फॉर्म भरून घेण्याची कार्यवाही पाटबंधारे विभागामार्फत सुरू केल्याच्या निषेधार्थ श्रमिक मुक्ती दलाचे संघटक संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांनी सर्फनालाचे कामच बंद पाडले.

नाटकांसाठी तरी हवी टोलमुक्ती

$
0
0
मराठी नाटकांच्या बसगाड्यांना महामार्गावरील टोल माफ करावेत, नाट्य अकादमीच्या उभारणीसाठी पाच एकरांचा भूखंड दिला जावा, सांस्कृतिक धोरणांची तातडीने अंमलबजावणी व्हावी. आदी मागण्या आणि सूचना मांडत ९४ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनावर रविवारी पडदा पडला.

आसूड घेणारे लोकशाहीवादी कसे?

$
0
0
‘मुंबईत अतिरेकी नेतृत्वाने संप करून गिरणी कामगारांना देशोधडीला लावले. साखर कारखानदारीचीही अशीच अवस्था करण्याचे कंत्राट काहींनी घेतले आहे,’ असा आरोप केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यावर रविवारी केला.

आझाद नायकवडी यांना गुंफण अकादमीचा पुरस्कार

$
0
0
सातारा येथील गुंफण अकादमीच्यावतीने देण्यात येणारे २०१३ साठीचे गुंफण साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक व सद्भावना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. तर गुंफणचा गुणगौरव पुरस्कार साहित्यिक शिरीष कुलकर्णी दिला जाणार आहे.

दातृत्वाचा हात

$
0
0
प्रस्तुत शिल्पात एक भलामोठा हात असून, त्या हाताच्या कुशीत एक कुटुंब विसावलं आहे. सांगलीच्या भारती हॉस्पिटलसमोरील हे शिल्प पेशंटबरोबरच इथे येणाऱ्या प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतं.

पालकांसह शिक्षकही राडा संस्कृतीने धास्तावले

$
0
0
शहरातील नावाजलेल्या आणि बड्या शाळांच्या बाहेर वारंवार होणाऱ्या राडा संस्कृतीने पालक आणि शिक्षकही धास्तावले आहेत. छेडछाडीमुळे रोज होणाऱ्या भांडणाने शिक्षक त्रासले आहेत. या प्रकाराकडे पोलिस प्रशासनही दुर्लक्ष करत आहे. राजकारणी मंडळींच्या हस्ताक्षेपामुळे तक्रार करायची कुणाकडे, असा प्रश्न पालकांना पडू लागला आहे.

आर्ट ऑफ सिम्प्लिसिटी

$
0
0
सामाजिक बांधिलकी संदेश देत कला महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी कलाकारांनी अनेक शिल्प आणि चित्राकृती उपस्थितांसमोर सादर केल्या. रंगरेषा आणि शिल्पकलेतील सिम्प्लिसिटी पाहताना रसिकांचे भान हरपून गेले.

बसला भीषण अपघात; ८ ठार

$
0
0
सातारा-मुंबई मार्गावर पारगाव खंडाळा येथे खाजगी बसला भीषण अपघात झाला आहे. बस उलटल्याने तब्बल आठ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर ३५ प्रवासी जखमी झाले आहेत. उपचारांसाठी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील ३५ ग्रंथालयांची मान्यता रद्द

$
0
0
निकष पूर्ण न करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील ३५ सार्वजनिक वाचनालयांना मान्यता रद्द करण्यात आली आहे. तसेच पुरेशी जागा नसने, स्त्री व बालविभागातील पुस्तके नसणे आदी कारणास्तव नऊ वाचनालयांना दर्जा अवनत झाल्याची पत्रे ग्रंथालय संचलनालय यांच्याकडून प्राप्त झाली आहेत.

अंगणवाडी सेविकांचा ‘रास्ता रोको’

$
0
0
सलग २८ दिवस संप करूनही सरकार मागण्यांना मान्य करण्यासाठी चाल - ढकल करत आहे. या विरोधात भुदरगड तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी महिलांनी गारगोटी बसस्थानकजवळ सुमारे एक तास रास्ता रोको केला.

राजीनामा द्या, नाहीतर परिणाम भोगा

$
0
0
गेले दोन हंगाम संचालकांच्या निष्कीयतेमुळे हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत कारखाना बंद असून तिसऱ्या हंगामातही गोपाळराव पाटील यांच्यासह संचालकांच्या असहकार्यमुळे बंद रहाण्याची चिन्हे आहेत. गोपाळ पाटील यांनी दौलत दिलेल्या मुदतीत सुरु न झाल्यास राजीनामा देतो असे अनेकदा सर्वासमोर सांगून दिलेला शब्द पाळत नाहीत.

वळणे घेताहेत प्रवाशांचे बळी

$
0
0
कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील मलकापूर ते आंबा घाट दरम्यानच्या वीस किलोमीटरच्या रस्त्याचे रुंदीकरण झालेले नाही. भाडळे खिंड ते आंबा घाटापर्यंतची वळणे दिवसेंदिवस धोकादायक ठरत आहेत.

उचंगी प्रकल्पग्रस्तांच्या नोंदीत सावळागोंधळ

$
0
0
आजरा तालुक्यातील उचंगी प्रकल्पातील बाधित चाफवडे (ता. आजरा) येथील प्रकल्पबाधितांना त्यावेळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सातबारा कागदपत्रांचे अगदी समारंभपूर्वक वाटप केले.

विरोधकांची नडली संगत

$
0
0
स्वत:च्या मतदारसंघात असलेला, पक्षाच्या महत्त्वाच्या कार्यकर्त्याच्या पुढाकाराने झालेल्या आणि राजकीय व ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या कार्यक्रमाला आमदार विनय कोरे यांनी​ दांडी मारली. भारत पाटील यांनी खासदार राजू शेट्टी व महाडिक गटाशी वाढवलेली सलगी हे पन्हाळ्याच्या कार्यक्रमाच्या दांडीचे महत्त्वाचे कारण असल्याचे समजते.

गुंडगिरीविरोधात इचलकरंजीत मोर्चा

$
0
0
शहरातील खंडणीखोर व गुंड प्रवृत्तीच्या निषेधार्थ व्यापारी, उद्योजक, यंत्रमाग कारखानदार, विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष आदींनी प्रांत कार्यालयावर मूक मोर्चा काढला. गुंड प्रवृत्तीचा निषेध व्यक्त करीत अनेक वक्त्यांनी टीका केली. तसेच आता गुंडांना थारा देऊ नये, अशी जोरदार मागणीही करण्यात आली.

संपूर्ण हृदय शुद्धिकरण उपचार पद्धतीचा शोध

$
0
0
वाढत चालेल्या हृदयरोगावर‌ विनाशस्त्रक्रिया उपचार करण्यासाठी संपूर्ण ह्दय शुद्धिकरण उपचार पध्दतीचा शोध लावला असल्याची माहिती डॉ. रोहित साने यांनी पत्रकार बैठकीत दिली.

अन्नसुरक्षा यादीची चौकशी करा

$
0
0
बामणे (ता. भुदरगड) येथील अन्नसुरक्षा यादीमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी असून सदर लाभार्थ्यांची चौकशी करून योग्य लाभार्थी निवडावेत. अशी मागणी महेश बोरनाक यांच्यासह ग्रामस्थांनी तहसीलदार शिल्पा ओसवाल यांच्याकडे निवेदनाने केली आहे.

‘दत्त-दालमिया’ कारखाना बंद

$
0
0
महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने जलस्त्रोतांचे प्रदूषण होत असल्याच्या कारणांवरून असुर्ले पोर्ले येथील दालमिया शुगर इंडस्ट्रिजच्या वतीने चालवण्यात येत असलेल्या श्री दत्त सहकारी साखर कारखान्याला गाळप बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

पंचगंगा प्रदूषण आराखड्यात त्रुटी

$
0
0
पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या आराखड्यात काही त्रुटी असल्यामुळे हा प्रस्ताव दुरुस्त करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, गेल्या दोन महिन्यात त्याबाबत अद्यापही काहीच पूर्तता करण्यात आलेली नाही.

सर्व्हर डाउन दुपारपर्यंत नागरिकांचा खोळंबा

$
0
0
महापालिकेच्या शहरातील दोन विभागीय कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या नागरी सुविधा केंद्रांचा सर्व्हर डाऊन झाल्याने आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवशीच सकाळी आठपासून दुपारपर्यंत शेकडो नागरिकांचा खोळंबा झाला.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images