Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

उलगडले कॅमेऱ्याचे तंत्र

0
0
‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि भालजी पेंढारकर सांस्कृतिक कला अकादमीतर्फे ‘डीएसएलआर कॅमेरा फॉर सिनेमॅटोग्राफी अँड फिल्म मेकिंग’ या विषयावर भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात कार्यशाळा झाली. कार्यशाळेत रविवारी ‘कॅमेऱ्याची तांत्रिक अंगे’ हा विषयाच्या अनुषंगाने तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

‘रंगदंग’ चित्रप्रदर्शन सुरु

0
0
येथील युवा चित्रकार विजय टिपुगडे यांनी साकारलेल्या विविध २५० चित्रांचे ‘रंगदंग’ प्रदर्शन दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सुरू झाले आहे. प्रवाही जलरंग शैलीतील साकारलेली ही चित्र आहेत. ७ फेब्रुवारीपर्यंत सकाळ‌‌ी ९ ते रात्री ९ या वेळेत ही चित्रे पाहता येणार आहेत.

कोल्हापूर-पन्हाळा सायकल रॅली

0
0
कोल्हापूर सायकल क्लबच्यावतीने भवानी मंडप ते पन्हाळा सायकल क्लब रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये ७ वर्षापासून ४५ वर्षांपर्यंतच्या नागरिकांचा सहभाग होता. विशेष करून तरुणाईने या उपक्रमास चांगला प्रतिसाद दिला.

राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी विद्यापीठाची आजपासून तयारी

0
0
हरियाणा येथील कुरूक्षेत्र विद्यापीठ येथे १८ ते २२ फेब्रुवारीदरम्यान आंतरविद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सव होत आहे. या महोत्सवात शिवाजी विद्यापीठाचा संघ पाच कला प्रकारात प्रतिनिधीत्व करणार आहे.

न्यू एज्युकेशन सोसायटीचा वर्धापनदिन उत्साहात

0
0
विद्यार्थ्यांनी फक्त शिक्षणातच नव्हे तर कला, क्रीडा, कला आणि विज्ञान अशा सवर्च क्षेत्रात चौफेर प्रगती केली पाहिजे, असे मत संजय घोडावत ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी व्यक्त केले.

विंग कमांडर परांडेकर यांना वायुसेना मेडल

0
0
आठ महिन्यांपूर्वी उत्तराखंडमध्ये आलेल्या महाप्रलयात अडकलेल्या हजारो भाविकांपैकी अडीच हजाराहून अधिक भाविकांना मृत्युच्या दाढेतून बाहेर काढत कोल्हापूरच्या विंग कमांडर अभय परांडेकर यांनी आपली कामगिरी बजावली.

कोल्हापुरात आर्ट संडे

0
0
रंगरेषा आणि आकारांच्या वैविध्यपूर्ण कलाकृती आणि कलाकारांना व्यासपीठ देणाऱ्या कलामहोत्सवाने रविवारचा दिवस कॅश केला. सकाळी दहा वाजल्यापासूनच कलारसिकांच्या गर्दीने महोत्सवातील दालनाचा कानाकोपरा फुलून गेला.

‘जादूटोणाविरोधी कायदा हिंदूविरोधी नाही’

0
0
जादूटोणा व नरबळीविरोधी कायद्यांतर्गत दाखल केले जाणारे गुन्हे दखलपात्र म्हणजे अजामीनपात्र असून महाराष्ट्रात आतापर्यंत या कायद्याखाली ३९ गुन्हे दाखल झाले आहेत, असे प्रतिपादन अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले.

‘टु जिनिअस’चे विमान वेड

0
0
‘थ्री इडिएट’ या गाजलेल्या सिनेमात जॉय लोबो विमान बनवण्याच्या प्रयत्नात असतो. असेच लहानसे विमान कोल्हापुरातील बालरोगतज्ज्ञ डॉ. दिनेश कित्तुर, आयआयटी, मुंबईचे माजी विद्यार्थी आणि उद्योजक अविनाश पांचाल यांनी साकारली आहेत.

सत्ताधाऱ्यांतील नाराजांची लोकसभेसाठी भाजपकडे रीघ

0
0
‘सांगली लोकसभा मतदार संघातील उमेदवारी बाबत आपल्याकडे अद्याप विचारणा झालेली नाही. नरेंद्र मोदींची लाट आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात वारे आहे. सत्ताधाऱ्यांतील अनेक नाराजांची रिघ लागली आहे.

उद्घाटनानंतरच कलावंतांची संमेलनातून ‘एक्झिट’

0
0
नाटक करणाऱ्या कलावंतांमध्ये सुसंवाद निर्माण करण्यालाही होणाऱ्या नाट्य संमेलनाकडे ‘सेलीब्रेटी’ कलाकारांनीच पाठ फिरवली. पंढरपूरनगरीत संमेलनाच्या उद्घाटनाचा सोहळा झाल्यावर आणि रात्रीचा ठरलेला संगीत कार्यक्रम करुन बहुतांशी कलाकारांनी घरची वाट धरणे पसंत केले.

नाट्य विद्यापीठ लालफितीत अडकू नये

0
0
‘राज्य शासनाने देशातील पहिले नाट्य विद्यापीठ उभारण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, सहकारी लालफितीच्या कारभारात हे विद्यापीठ अडकू नये आणि नाट्यचळवळ पुढे जाईल असा दर्जा या विद्यापीठाने निर्माण करावा,’ अशी अपेक्षा संमेलनालाला आलेल्या राज्यभरातील हौशी रंगकर्मींनी व्यक्त केली.

अहंकाराची टोके सांधण्याची कला जमली पाहिजे

0
0
‘नाटकात टोकेरी अहंकार असलेली माणसे असतात. घड्याळाच्या काट्याच्या चक्रांप्रमाणे या माणसांची टोके एकमेकांमध्ये सांधली की, काळ पटकन पुढे सरकतो. अहंकाराचे हे काटे बोचरे असतात. मात्र, या काटेरी माणसांनीही कधीतरी आनंद दिलेला असतो.

अल्पवयीन चोरट्यांचा गडहिंग्लजमध्ये धुमाकूळ

0
0
गेल्या काही दिवसांपासून गडहिंग्लज शहर आणि परिसरात अल्पवयीन चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. कायद्याच्या कचाट्यातून सहजासहजी सुटत असल्याने पोलिस यंत्रणाही हतबल झाली आहे. गेल्या वर्षभरात गडहिंग्लज आणि परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.

जात पंचायत बंद करण्याचा ठराव करणार

0
0
‘भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे अधिवेशन २५ फेब्रुवारीला येथील दसरा चौकात दुपारी एक वाजता होणार असून राज्यातील ४२ जमातीचे प्रतिनिधी अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत,’ अशी माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ‘उपरा’ कार लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाड‌िक काका-पुतण्यांचे पवारांशी गुप्तगू

0
0
कोल्हापूर लोकसभा राष्ट्रवादीलाच मिळणार आहे. त्यामुळे तयारी करा असा सल्ला केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी रविवारी सर्किट हाउसवर धनंजय महाडीक यांना दिला. आमदार महादेवराव महाडीक व धनंजय यांच्याशी बंद खोलीत सुमारे अर्धा तास चर्चा केली.

इलेक्टिव्ह मेरीट हाच उमेदवारीसाठी निकष

0
0
स्थिर सरकार देण्याचा काँग्रेस आघाडीचा अनुभव आहे. लोकसभा निवडणुकीत याच आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्वास केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला. आम्हाला लोकसभा जिंकायची आहे.

भाज्यांचे दर उतरले : शेतकरी हवालदिल

0
0
मागील दोन महिन्याच्या तुलनेत भाजीपाल्यांचे दर ग्रामीण बाजारपेठेत निम्मे झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. भाजीपाला विक्रीतून भाजीसाठी खताला वापरलेला पैसा व मजुरीही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

नाट्यचळवळीला संजीवनी मिळेल

0
0
‘पंढरपूरसारख्या छोट्या शहराला नाट्यसंमेलनाचा मान मिळाला ही आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे. गेल्या काही वर्षात थंडावलेल्या पंढरपुरातील नाट्यचळवळीने या संमेलनातून प्रेरणा घतल्यास या भागातील नाट्यचळवळ पुन्हा जिवंत होईल,’ अशी आशा पंढरपुरवासियांनी व्यक्त केली.

पाटील यांचा गुरुजींना राजकीय धडा

0
0
गावातील एक गल्ली उलटीपालटी करण्याचे सामर्थ्य असलेल्या गुरुजींना शाळांच्या परीक्षांनंतर निवडणुकीच्या मोठ्या परीक्षांना सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी पूर्णवेळ द्यावा लागणार असल्याचे सांगत ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी प्राथमिक शिक्षक संघाच्या शिक्षण परिषदेच्यानिमित्ताने ‘गुरुजींना’ चांगलाच राजकीय धडा दिला.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images