Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

काळ्या फिती लावून निषेध

$
0
0
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाची परवानगी नाकारल्याने युवकांनी बिंदू चौकात काळ्या फिती लावून जिल्हा प्रशासनाच्या विरोधात निदर्शने केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर निवेदन ठेवून जिल्हा प्रशासनाला सुबु्द्धी दे, अशी प्रार्थना युवकांनी केली.

कैद्याचा पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न

$
0
0
झडतीच्यावेळी मोबाईल सापडल्यावर चिडलेल्या सचिन शिवाजी पताडे (रा. गणेशनगर, इचलकरंजी) या कैद्याने बिंदू चौकातील सबजेलमधील पोलिस कर्मचाऱ्यांवर फरशीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.. पताडे याला पोलिसी खाक्या दाखवत असताना त्याला भेटण्याच्यासाठी आलेल्या नातेवाईकांनी दंगा केल्याने बिंदू चौक सबजेल रोडवर एकच खळबळ उडाली.

संमेलनासाठी पंढरपूर हाउसफुल्ल!

$
0
0
नाट्य संमेलनाच्या वारीला दरवर्षी उत्साहाने उपस्थित राहणाऱ्या नाट्यरसिकांमुळे विठूरायाची पंढरी ‘हाउसफुल्ल’ झाली आहे! राज्यातूनच नव्हे, तर देशभरातून आलेल्या या ‘वारकऱ्यां’चे पंढरपूरकरांकडून तितक्याच उत्साहाने स्वागत होत आहे.

दोन रुपयांनी दूध महाग

$
0
0
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) आणि वारणा दूध संघाने दुधाच्या विक्री दरात लिटरमागे दोन रुपयांची वाढ केली आहे. ही दरवाढ एक फेब्रुवारीपासून अमलात येणार आहे. त्यामुळे कोल्हापूरसह मुंबईकर व पुणेकरांच्या खिशाला चाट बसणार आहे.

आयोजनातील सावळा गोंधळ उघड

$
0
0
नाट्य परिषदेने संमेलनासाठी चोख व्यवस्था केली असल्याचा दावा केला असला तरी पहिल्याच दिवशी आयोजनातील सावळा गोंधळ समोर आला. सांगलीमध्ये झालेल्या संमेलनाचे अध्यक्ष श्रीकांत मोघे यांना ‘तुम्ही कोण,आम्ही तुम्हाला ओळखत नाही’ असे उत्तर संयोजकांकडून ऐकावे लागले.

अभिरूप न्यायालयाची ‘बोळवण’

$
0
0
टीव्हीने नाटकाला मारले का? मराठी नाट्यसृष्टीत वाद का होतात?, नाटक व्यवसाय की हौस?, नाटकात प्रायोगिक - व्यावसायिक भेद का? अशा प्रश्नांची अभिरूप न्यायालयात चर्चा करण्याचा आणि त्यावर निकाल घोषित करण्याचा प्रयत्न नाट्यसंमेलनात यशस्वी ठरला नाही.

नवे कलावंत नवी रंगभूमी उभारतील

$
0
0
‘केवळ मनोरंजन हे नाटकाचे अंतिम ध्येय असता कामा नये. नव्याने नाट्य चळवळ उभी करण्यासाठी नवी उमेद असलेल्या रंगकर्मींचा शोध घेतला पाहिजे. नवे कलावंतच नवी रंगभूमी उभी करतील,’ अशी आशा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शनिवारी येथे व्यक्त केली.

‘लोकसभेत’ अडकणार काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद

$
0
0
काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी पी. एन. पाटील यांनाच कायम ठेवावे यासाठी पक्षातील मोठा गट सक्रीय झाला आहे. यासाठी पक्षाचे एक मोठे शिष्टमंडळ प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना भेटणार आहे. दरम्यान, हे पद मिळवण्यासाठी आवाडे गट आक्रमक झाला आहे. आता याचा फैसला हातकणंगले लोकसभा कोणत्या पक्षाला मिळणार यावरच होणार आहे.

ऑनलाइन वेतन प्रक्रियेला मुदतवाढ

$
0
0
शालार्थ वेतन प्रणालीनुसार राज्यातील शिक्षकांचे ऑनलाइन वेतन देण्याच्या प्रक्रियेला राज्य सरकारने दोन महिने मुदतवाढ दिल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

दुसऱ्या दिवशी किरणांचा चरणस्पर्श

$
0
0
किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी मावळतीच्या किरणांनी भाविकांची निराशा केली असली तरी शनिवारी दुसऱ्या दिवशी केशरी किरणांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या चरणांना स्पर्श केला. किरणांचा चरणस्पर्श होताच भाविकांनी ‘जय अंबे’चा जयघोष केला.

CCTV वरून तोतया पोलिस गजाआड

$
0
0
कोल्हापुरात हॉस्पिटलमध्ये उपचारास आलेल्या चिकोडी येथील पेशंटला पोलिस असल्याचे सांगून त्याच्याकडील मोबाइल, रोख रक्कम व मोटारसायकल लुटणाऱ्या तोतया पोलिस समीर ईलाही अरब (रा. झेंडा चौक, किणी, ता. हातकणंगले) याला शाहूपुरी पोलिसांनी बिअर बारमधील सीसीटीव्ही फुटेजवरून अटक केली.

धमकी देणाऱ्या खासगी सावकाराला अटक

$
0
0
पंधरा लाखांच्या वसुलीसाठी जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या गौरव खंडेराव जगताप (वय ३०, रा. राजारामपुरी) या खासगी सावकाराला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. प्रविण विजय पाटील (रा. सातवी गल्ली, राजारामपुरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

शिवा काशीद समाधी पर्यटनस्थळ?

$
0
0
‘नरवीर शिवा काशीद यांच्या समाधीस्थळाचा परिसर पर्यटन स्थळ म्हणून येत्या आठ ते पंधरा दिवसांत राज्य सरकार जाहीर करेल. स्वराज्यासाठी प्राणाची आहुती दिलेल्या या नरवीरांच्या समाधीस्थळ विकासासाठी कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही.

शाहूंचा समतेचा विचार पुढे न्या

$
0
0
‘वैज्ञानिक दृष्टी असलेला, रयतेत रमणारा, सर्वसामान्यांच्या भविष्याचा आणि समतेचा विचार तसेच शिक्षणाचा संदेश देशभर पोहचिवण्याचा प्रयत्न करत सनातनी प्रवृत्तीवर प्रहार करणाऱ्या शाहूंच्या विचारांची भूमिका कायम पुढे सुरू ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचे मत कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.

सहा दशकांनी जुन्या मित्रांची भेट

$
0
0
वियोगार्थ मीलन घडते, नेम या जगाचा... या ग. दि. माडगूळकरांच्या ओळींचा प्रत्यय सहा दशकांनंतर नाट्यनगरीत आला. निमित्त होते नाट्य संमेलनाध्यक्ष अरुण काकडे आणि गोव्यातील मूरगांवचे रहिवासी बाबूराव रेडकर यांच्या भेटीचा.

शिक्षक बदल्या विनाअट स्वतालुक्यात

$
0
0
प्रशासकीय व समायोजनाने तालुकाबाह्य झालेल्या शिक्षक बदल्या विनाअट स्वतालु्क्यात घेण्याचा आणि वीस पटाखालील शाळा नैसर्गिक अडचणीमुळे सरसकट बंद न करण्याचा निर्णयासह प्रशासकीय आदेश काढण्याचे निर्देशही ग्रामविकास राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिले.

‘आप’ चालणार नाही!: शरद पवार

$
0
0
देशाला स्थिर सरकारची गरज आहे. स्पष्ट बहुमत न मिळाल्यास समविचारी पक्षांनी एकत्र येऊन स्थिर सरकार दिले पाहिजे, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केले.

हातकणंगले आवाडेंना

$
0
0
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस कल्लाप्पाणा आवाडेंना उमेदवारी देणार असेल तर तो मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याचे राष्ट्रवादीने निश्चित केले आहे. त्या बदल्यात कोल्हापूर मतदारसंघात राष्ट्रवादीने धनंजय महाडिक यांनाच उमेदवारी द्यावी, अशी अट आवाडेंनी घातल्याची चर्चा आहे.

'पराभूतांनी माझ्याबद्दल बोलू नये!'

$
0
0
‘स्वत:च्या घरात पराभूत झालेल्यांनी माझ्या पराभवावर भाष्य करू नये,’ असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना हाणला.

मोदींची पवारांकडूनही पाठराखण!

$
0
0
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी उघडपणे गुजरातचे मुख्यमंत्री व भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची पाठराखण केल्यानंतर आज पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मोदींबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आदर करायला हवा, असे विधान करत सर्वांचे लक्ष वेधले.
Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images