Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

नियमबाह्य नंबरप्लेटवर १ फेब्रुवारीपासून हातोडा

$
0
0
दादा, मामा, राज, राडा, भाई असे वेडेवाकडे फॅन्सी नंबर व नियमाह्य नंबरप्लेटवर एक फेब्रुवारीपासून हातोडा पडणार आहे. त्याचबरोबर मोबाइलवर बोलत वाहन चालवण्याच्यांवर कारवाई केली जाणार आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून विशेष मोहिम राबवली जाणार आहे.

गॅस एजन्सींचा ‘पोलखोल’

$
0
0
गॅस सिलिंडर प्रकरणात काही गॅस एजन्सींचा गैरव्यवहार पुराव्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बैठकीत उघड केला. यावेळी जिल्हा पुरवठा विभागाच्या सुस्त कारभारावरही टीकेची झोड उठवून दोषी गॅस एजन्सीचे परवाने रद्द करण्याची मागणी केली.

आज-यात बिबट्यांचा वावर

$
0
0
आजरा तालुक्यामध्ये दोन बिबटे वावरत असल्याचे समोर आले आहे. पेरणोली येथील गणपतराव नलगे यांच्या शेतामध्ये वन्यप्राणी गणनेचे काम करीत असलेल्या वनविभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दोन बिबट्यांच्या पायांचे ठसे आढळून आले.

जानेवारीचे बिल जादा दरानेच

$
0
0
वाढीव विजेचे दर २० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, ग्राहकांना या घोषणेचा फायदा या महिन्यात मिळणार नाही. वीजदर कमी केल्याचा कोणताही आदेश महावितरणच्या अधिकाऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे ग्राहकांना वाढीव दरानेच वीजबिले मिळणार आहेत.

व्यापा-यांकडून गूळ सौदे बंद

$
0
0
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गूळ व्यापाऱ्याच्या नातेवाइकाचे मंगळवारी (ता.२८) सकाळी निधन झाले. आपल्या सहकाऱ्याचे सांत्वन व अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी व्यापाऱ्यांनी गूळ सौदे न काढण्याचा निर्णय घेतला. यामुळे संतप्त झालेल्या गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या चारही प्रवेशद्वारांना टाळे ठोकले.

पोतडीने घेतला जिवाचा ठाव

$
0
0
आयुष्याचा आधार असणारे वंशावळ कुळीचे दप्तरच हरवले. त्यामुळे तिच्यासमोर आता जगायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्ह्याला १७ हजार टन धान्य

$
0
0
देशात एक फेब्रुवारीपासून अन्नसुरक्षा योजना सुरू होत असून, लाभार्थींना वाटपासाठी जिल्हा प्रशासनाकडे गहू व तांदूळ असे एकूण १७ हजार टन धान्य आले आहे. जिल्हा पुरवठा कार्यालयाने संबंधित धान्य वर्गवारी करून थेट रेशन दुकानांमध्ये पोहोचविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

शेवडे यांचा सत्कार

$
0
0
महालक्ष्मी मंदिरातील सु. ग. शेवडे यांच्या प्रवचनसेवेला यंदा ४९ वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल श्री सिद्धीविनायक सांस्कृतिक सेवा मंडळाच्यावतीने शेवडे यांचा गौरव करण्यात येणार आहे.

हव्या वेगवान खेळपट्ट्या

$
0
0
इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका दौऱ्यापाठोपाठ न्यूझीलंडमध्येही भारतीय क्रिकेट संघाचे पानिपत झाले. सर्वच समालोचक, क्रिकेट अभ्यासक, माध्यमांनी संघावर टीकेचा भड‌िमार केला. या परिस्थितीवर मात करायची असल्यास देशात वेगवान खेळपट्ट्या तयार करण्याची गरज असल्याचे मत ‘राजाराम कॉलेज’मध्ये झालेल्या ‘मटा डिबेट’ मध्ये व्यक्त करण्यात आले.

पराभवातून शिकत गेले

$
0
0
जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट निवडता किंवा एखाद्या गोष्टीचा स्वीकार करता, तेव्हा त्या गोष्टीच्या फायद्या-तोट्याचाही स्वीकार करता. तुम्ही ज्यावेळी एखादी गोष्ट निवडता, त्यावेळी तिच्या सकारात्मक तसेच नकारात्मक गोष्टीही स्वीकाराव्या लागतात.

मनुग्राफ, एसटीतर्फे दुर्गमोहीम

$
0
0
शिरोली औद्योगिक वसाहतीमधील मनुग्राफ इंडिया लिमिटेड आणि एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी नुकतीच तिकोणा, तुंग, कोरीवगड, राजमाची, श्रीवर्धनगड, मनरंजनगड, लोहगड, विसापूर किल्ला, भाजे लेणी, कारला लेणी, एकवीरादेवी अशी दुर्गमोहीम पूर्ण करण्यात आली.

व्हरायटी ऑफ टेस्ट

$
0
0
झणझणीत रश्श्यापासून ते गोड खिरीपर्यंत आणि पारंपरिक सणासुदीच्या चवींपासून ते इनोव्हेटिव्ह डिशेसपर्यंतच्या खासीयत असलेल्या पदार्थांनी ‘अन्नदाता सुखी भव,’ अशी अनुभूती परीक्षक विष्णू मनोहर यांनी घेतली. हॉटेल पॅव्हेलियनच्या गार्डन हॉलमध्ये रंगलेल्या मेजवानी किचन क्विनच्या प्राथमिक फेरीसाठी दोनशे महिलांनी सहभाग नोंदवला.

रयतेच्या राजाचे चित्रमय चरित्र

$
0
0
शाहू महाराजांच्या जीवनावर विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध आहे. पण यात कमतरता असलेल्या चित्रमय ‌चरित्राची उणीवही भरून निघाली आहे. ‌इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत आणि शिवाजी विद्यापीठाच्या शाहू संशोधन केंद्रातील सहायक देविकाराणी पाटील यांनी जवळपास ४५० फोटो असलेले ‘राजर्षी शाहू छत्रपती रयतेच्या राजाचे चित्रमय चरित्र’ हे पुस्तक तयार केले आहे.

बावड्यात राधानगरी धरण

$
0
0
कसबा बावडा येथील लक्ष्मी-विलास पॅलेस या शाहू जन्मस्थळाच्या ठिकाणी राधानगरी धरणाच्या प्रतिकृतीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सात स्वयंचलित दरवाजे आणि पाच नियमित दरवाजे अशी रचना असलेल्या या धरणांतून प्रत्यक्ष पाणी पडणार असल्याने पर्यटकांना राधानगरी धरण पाहिल्याचाच फील येणार आहे.

महाबळेश्वरातील १४ पॉईंट बंद

$
0
0
वनविभागाच्यावतीने महाबळेश्वरमधील ऑर्थरसिटच्या भागातील रस्त्यांची डागडुजी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील १४ पॉइंट पर्यटकांना बुधवारपासून महिनाभरासाठी बंद करण्यात आले आहेत.

नोकरीचे आमिष : ३५ जणांना लाखोंचा गंडा

$
0
0
नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सुमारे ३० ते ३५ जणांची प्रत्येकी साडेसात हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नीलेश मारुती गायकवाड (रा. धावडी, ता. वाई) याच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

संजय पाटील खून : डॉक्टरांच्या महत्त्वपूर्ण साक्षी

$
0
0
येथील जिल्हा कोर्टात सुरु असलेल्या पै. संजय पाटील खून खटल्यात बुधवारी पोस्ट मार्टेम करणारे डॉ. डी. डी. जाधव, डॉ. हेमलता जोशी व पंच तानाजी चवरे यांच्या तीन महत्त्वपूर्ण साक्ष झाल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील अॅड. विकास पाटील-शिरगावकर यांनी दिली.

‘नाट्य निर्माता संघाचा संमेलनावर बहिष्कार नाही’

$
0
0
येथे होणाऱ्या ९४व्या आखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या कार्यक्रमात नाट्य निर्माता संघाच्या अध्यक्षांना रंगमंचावर स्थान देण्यावरून नाट्य परिषद आणि निर्माता संघात मतभेद झाल्याचे वृत्त परिषदेचे मुख्य कार्यवाह दीपक करंजीकर यांनी फेटाळून लावले.

१९ जणांवर दोषारोपपत्र

$
0
0
सांगली जिल्ह्यातील २००३ - ०४ च्या दुष्काळात रोजगार हमी योजनेतील कामांमध्ये सुमारे ७० लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी वनविभागातील तब्बल १९ सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंध विभागाने बुधवारी सांगलीच्या जिल्हा कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले.

आजरा पंचायत समिती अंधारात

$
0
0
लाखो रूपये खर्चून बांधण्यात आलेल्या आजरा पंचायत समितीच्या नवी इमारत महावितरणच्या आंधळ्या कारभारामुळे अंधारात आहे. वेळोवेळी सूचना देवूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images