Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पवारांनी चौकशीला सामोरे जावे

$
0
0
‘माझ्यावर झालेल्या आरोपांमुळे मी पोलिस चौकशीस सामोरे गेलो. अजित पवार यांच्यात हिम्मत असेल, तर त्यांनी भ्रष्टाचाराच्या प्रकरणांसाठी चौकशी समित्या नेमण्यापेक्षा पोलिस चौकशीला सामोरे जाऊन दाखवावे,’ असे खुले आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी दिले आहे.

संघर्षमय जीवनाची अनुभूती

$
0
0
‘तुम मुझे खून दो... मै तुम्हे आझादी दुँगा’ अशी साद घालत ज्यांनी आझाद हिंद सेनेची मोट बांधली, त्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जन्मस्थळापासून त्यांच्या आझाद हिंद सेनेच्या युध्दकाळातील संघर्षापर्यंतच्या चित्रमय प्रवासाचे सहप्रवासी होण्याची अनुभूती सध्या कोल्हापूरकरांना मिळत आहे.

दुर्मिळ ग्रंथांचा खजिना भेटीला

$
0
0
छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्मिळे पत्रे, महाराष्ट्राचा भाषिक नकाशा, दलित ग्रामीण साहित्य, रुढी, परंपरा आणि विधीकोश, दलित ग्रामीण साहित्य शब्दकोश, दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकाची आणि श्री समर्थ रामदास स्वामी यांनी ध्वनिफित, वैज्ञानिक परिभाषा का आणि कसे, मराठी शब्दकोश आदी पुस्तक, ग्रंथाचा खजिनाच राजर्षी शाहू स्मारक भवनात वाचकांसाठी खुला झाला आहे.

जान्हवीला गाठायचंय ‘भरतनाट्यम्’चं शिखर

$
0
0
वयाच्या आठव्या वर्षी पायात घुंगरू बांधले आणि शास्त्रीय पदाच्या तालावर तिने पहिली नृत्यमुद्रा केली. जिथे शब्दांशिवाय भाव बोलतात... देहबोली आणि हावभावांतून पौराणिक कथाविष्कार घडतो त्या भरतनाट्यम्सारख्या भारतीय नृत्यपरंपरेला नसानसात भिनवण्याचा तिचा प्रवास सुरू झाला.

ताल

$
0
0
जवळजवळ तीनेक हजार वर्षे नृत्य, संगीताची भव्य परंपरा नि संस्कृती लाभलेल्या आपल्या देशात ताल संस्कृती त्याच्याही आधी रुजली असावी, असं म्हणणं तालबद्ध वाटावे. तालाशिवाय नृत्य, संगीत, नाटक आणि एकूणच ललितकला अपूर्णच आहेत.

हायटेक रिक्षा

$
0
0
एलसीडी स्क्रिन, प्रवाशांसाठी प्रथमोपचार पेटी, चार्जर, छोटा फ्रीज, कुलर, शुद्ध पाणी, आकर्षक डिझाइन, लाइटिंग, बॅक कॅमेरा यांसह कोल्हापूर दर्शनासह हायटेक सुविधा असलेल्या रिक्षाने पहिला क्रमांक मिळविला.

‘मेजवानी किचन क्वीन’ प्राथमिक फेरी आज

$
0
0
ई टिव्ही-मराठीची संपूर्ण महाराष्ट्रात गाजणारी स्पर्धा म्हणजे ‘मेजवानी किचन क्वीन -२०१४’. हा किताब पटकावण्याची संधी तुम्हालाही मिळू शकते. ई टिव्ही मराठीच्यावतीने स्पर्धेची पहिली फेरी कोल्हापुरात आयोजित करण्यात आले आहे.

किटी इन द सिटी

$
0
0
महाराष्ट्र टाइम्सच्यावतीने कोल्हापुरात यंदा प्रथमच कोल्हापूर टाइम्स कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत विविध कार्यक्रम होणार आहेत. यातीलच एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे महिलांसाठी किटी पार्टी.

स्मरण शौऱ्याचे

$
0
0
वीर शिवा काशीद म्हटले की पन्हाळगडावरील रणसंग्राम नजरेसमोर तरळतो. स्वराज्यासाठी प्राणाचे बलिदान करणारा, प्रति शिवाजी बनून सिद्दी जौहरच्या भेटीस जाणारा आणि स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणारा हा मावळा. छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या या स्वामीनिष्ठ मावळ्याची शिल्परूपात साकारलेली शौर्यगाथा पूर्णत्वास आली आहे.

सव्वाशे कोटींचा ‘झोल’

$
0
0
राज ठाकरे यांच्या आदेशानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यभर टोल विरोधात तुडवातुडवी आंदोलन केले. या आंदोलनाची धग नागपुरातही दिसून आली. सुमारे पावणे चारशे कोटी रुपये खर्च केलेल्या रस्त्यांच्या कामासाठी राज्य सरकारने टोलच्या माध्यमातून केलेली वसुली मात्र साडेपाचशे कोटी रुपयांहून अधिक आहे. एवढेच नाही तर हे टोल नाके वर्षानुवर्षे सुरू आहेत.

बाथ टॅब

$
0
0
आपण टब बाथ ऐकलं असेल, पण ‘बाथ टॅब’ माहीत असण्याचं कारण नाही. बाथ टॅब आणि टब बाथ या दोन्हीचा संबंध आंघोळीशी आहे. म्हणजे एकाचा आंघोळ करण्याशी तर दुसऱ्याचा आंघोळ न करण्याशी. विशेषतः होस्टेलवर राहणाऱ्यांमध्ये बाथ टॅब घेणाऱ्यांचं प्रमाण मोठं असतं. होस्टेल सरकारी असेल तर विचारायलाच नको.

‘दौलत’च्या कारभा-यांची गय नाही

$
0
0
‘हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत कारखाना गेले दोन हंगाम बंद अवस्थेत आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उसाचे पीक घेतले जात असल्याने उसाची वेळेत उचल, गाळप हे प्रश्न भेडसावत आहे. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे ‘दौलत’ च्या कारभारात गैरव्यवहार करणाऱ्यांची गय करणार नसल्याचे सहकार तथा पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

अंगणवाडी सेविकांचा ‘रास्ता रोको’

$
0
0
आमच्या आयुष्याचा खेळखंडोबा करू नका, आम्ही खुर्ची मागत नसून आमच्या हक्काचे वेतन मागत आहोत. त्यामुळे आमच्या मागण्यांची दखल न घेतल्यास सरकारला येत्या निवडणुकीत धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा सर्व श्रमिक संघटनेचे नेते कॉ. दत्तात्रय अत्याळकर यांनी दिला.

प्रभाकर देशमुखांच्या कागदपत्रांची शहनिशा सुरू

$
0
0
पुणे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी त्यांच्या जमिनीची कागदपत्रे सादर केली आहेत. या कागदपत्रांची शहनिशा सुरु असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

टोलवसुली नाही; तयारी मात्र कायम

$
0
0
आयआरबीने टोलवसुलीबाबत मंगळवारी दिवसभरात जरी हालचाली केल्या असल्या तरी टोलवसुली सुरू केली नाही. नाके व कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी मात्र पोलिस बंदोबस्त वाढविला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील मंत्र्यांची मंगळवारी मुख्यमंत्र्यांशी टोल रद्दबाबत चर्चा होऊ शकली नाही.

कुणी मजुरी, तर कुणाचे दागिने गहाण

$
0
0
‘मला दीड वर्षांचा मुलगा आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अंगणवाडी संपामध्ये मी मुलाला घेऊन सहभागी होत आहेत. नवरा गवंडी काम करत असल्यामुळे घरात जेमतेमच पैसे येतात.

चैनीसाठी चेन स्नॅचिंग

$
0
0
शिक्षण पाचवीपर्यंत. काम गवंड्याच्या हाताखाली. ज्या घरात गवंडीकाम त्याच घरात घरफोडी. दारू, चमचमीत जेवणासाठी चेन स्नॅ​चिंग व प्रवाशांच्या बॅग चोरीही. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धनराज गुरूनाथ दुथर्डी (वय २०, रा. लक्ष्मी मंदिरजवळ, नांदणी नाका, जयसिंगपूर) व बाळू दीपक बागडी (वय १९, रा. नांदणी रोड, शाहूनगर, जयसिंगपूर) या दोघा तरूणांना अटक केली.

१५ अधिकाऱ्यांच्या सरकारी वेतनाला ‘ब्रेक’

$
0
0
विविध पदांवरील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून शिक्षण सहसंचालक कार्यालय आणि शिवाजी विद्यापीठ यांच्यामध्ये अद्यापही एकवाक्यता नाही. विद्यापीठाकडून नियुक्त १५ पदांच्या निवड नेमणूक प्रक्रियेला आक्षेप घेत शिक्षण सहसंचालक कार्यालयाने गेल्या नऊ महिन्यापासून संबंधित अधिकाऱ्यांचे वेतन मंजूर केलेले नाही.

उद्योजकांच्या अडचणींप्रश्नी शिवसेनेचा ‘रास्ता रोको’

$
0
0
वीज, पाणी, रस्ते या मूलभूत सुविधा देण्याबरोबरच वाढलेली महागाई याला कंटाळलेले उद्योजक कर्नाटकात जाण्याच्या तयारीत आहेत. याच्या निषेधार्थ शिवसेनेने गोकुळ शिरगाव येथे महामार्गावर रास्तारोको आंदोलन करत सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध केला.

वीरपत्नी सोनाबाई हलाखीत

$
0
0
स्वातंत्र्यसैनिकाची पत्नी असल्याचा अभिमान आणि नवऱ्याच्या आझाद हिंद सेनेत असल्याच्या पुराव्याचा कागद .स्वातंत्र्यसंग्रामाची मशाल पेटलेली असताना आझाद हिंद सेनेच्या युध्दात प्राणांची आहुती दिलेल्या कागल तालुक्यातील स्वातंत्र्यसेनानी सदाशिव कांबळे यांच्या वीरपत्नी सोनाबाई यांच्या सद्यस्थितीचं वर्णन यापेक्षा वेगळ्या शब्दांत करता येणार नाही.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images