Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

चोरीचे सोने खरेदी; सराफांना अटक

$
0
0
चेन स्नॅचिंग करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांकडून सोने खरेदी करणाऱ्या संतोष तुळशीराम जाधव (वय ३१ रा. गुजरी) व अमर शांताराम नकाते (वय ३७, रा. गजानन महाराज कॉलनी) या दोघा सराफांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली.

संशोधनामुळेच भारत महासत्ता

$
0
0
‘जागतिकीकरणामुळे तंत्रज्ञानाचा वेग वाढला आहे. हा क्रांतीकारक बदल आहे. इंजिनीयरींगमध्ये नवे संशोधन सातत्याने होणे गरजेचे आहे. कारण संशोधन हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे.

पोलिसांमुळे चिरागची सुटका

$
0
0
कुरूंदवाड पोलिसांनी राहुल शामराव कांबळे (वय २५, रा. कुरूंदवाड) याला पकडल्यानंतर गांधीनगर येथील कांदा बटाटा व्यापाऱ्यांचा नातू चिराग विजय चूघ (वय ५, रा. गांधीनगर) याची सुखरूप सुटका होण्यास मदत झाली.

कॅरीबॅग बंदी आजपासून

$
0
0
जिल्हा परिषदेच्यावतीने आजपासून (ता. २६ ) जिल्ह्यात प्लास्टिक कॅरी बॅग्ज बंदीची अंमलबजावणी होत आहे. जिल्हा परिषदेच्यावतीने प्रथम लोकप्रतिनिधी आणि कर्मचारी यांच्यामार्फत या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

कोल्हापूर-बेंगळुरू ‘शिवनेरी’

$
0
0
प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधून एसटीच्या कोल्हापूर आगारातर्फे कोल्हापूर ते बेंगळुरू ही शिवनेरी ए. सी. स्लिपर कोच व्होल्व्हो सेवा सुरू होत आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना डोळ्यांसमोर ठेवून ही सेवा सुरू करत असल्याचे अतिरिक्त विभागीय वाहतूक अधिकारी एस. टी. भुरे व आगार व्यवस्थापक ए. एम. रॉड्रिक्स यांनी पत्रकार परिषदेत दिली.

टोलच्या निर्णय एमएसआरडीसीचा

$
0
0
‘रस्ते विकास प्रकल्पासाठी झालेला खर्च आयडियल रोड बिल्डर्सला (आयआरबी) कोणी द्यायचा याचा निर्णय रस्ते विकास महामंडळाने घ्यायचा आहे,’ असे सांगत पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राज्य सरकार भरपाईची जबाबदारी घेणार नसल्याचेच संकेत दिले. राज्य सरकारने खर्चाचा वाटा उचलण्यास नकार दिल्यास महापालिकेपुढे संकट उभे राहण्याची शक्यता आहे.

उद्योजकांचे ‘दक्षिणायन’

$
0
0
‘जिल्ह्यातील उद्योजक उद्योग कर्नाटकात स्थलांतरित करण्याच्या निर्णयावर ठाम असून, ज्यांना उद्योगासाठी कर्नाटकात जागा हवी आहे, त्यांनी गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्सच्या कार्यालयात अर्ज करावेत,’ असे आवाहन ‘गोशिमा’चे अध्यक्ष उदय दुधाणे यांनी केले आहे. उद्योजकांनी कर्नाटकात जाऊ नये, असे आवाहन पालकमंत्री आणि गृह राज्यमंत्र्यांनी केले आहे. या प्रश्नावर स्थानिक लोकप्रतिनिधी मात्र आग्रही भूमिका घेताना दिसत नाहीत.

लेझीमचा विक्रम, गिनीजमध्ये नोंद

$
0
0
मिरवणूकींमध्ये लेझीमच्या तालावर अनेक जणांना थिरकताना आपण पाहतो. मात्र आता याच मराठमोळ्या खेळाची गिनीज बुकमध्ये नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात लेझीम मोठ्या प्रमाणात खेळला जातो.

अजित पवार चौकशीला सामोरे जा!

$
0
0
‘माझ्यावर झालेल्या आरोपाला मी पोलिस चौकशीस सामोरे गेलो, आता अजित पवार तुमच्यात हिंमत असेल तर तुमच्यावरील भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणात चौकशी समित्या नेमण्यापेक्षा तुम्हीही पोलिस चौकशीला सामोरे जावून दाखवा.’ असे आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी दिले.

नाट्य संमेलनात ‘कोल्हापुरी साज’

$
0
0
पंढरपूर येथे होत असलेल्या ९४ व्या नाट्यसंमेलनात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेच्यावतीने ‘कोल्हापुरी साज’ हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना हेमसुवर्णा मिरजकर यांची असून दिग्दर्शन संजय मोहिते करीत आहेत.

सूर उमटले, स्वर झंकारले

$
0
0
शाहू स्टेडियमवर झालेल्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात शहरातील अडीचशे विद्यार्थी-विद्यार्थिनींनी गायलेल्या समूहगीताने वीरश्री संचारली. पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ‘उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतो’ हे समुह गीत पुन्हा सादर करण्याची विनंती केल्यावर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे गीत सादर केले.

वसंतोत्सवातील तरुणाई

$
0
0
समोरच्या दृश्याचं हुबेहूब चित्रण करणं हे निसर्ग चित्रणातील पहिलं कसब मानलं जातं, तर त्या निसर्गाचं भावलेलं रूप तितक्याच तरल सुलभीकृत आणि भावस्पर्शी आकारात रंगवणं हे कारागिरी पलीकडचं समजलं जातं.

साकारला आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव

$
0
0
येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या पटांगणावर साकारलेल्या ‘राष्ट्रीय जलतरणपटू सागर प्रशांत पाटील आंतरराष्ट्रीय जलतरण तलावा’चे उदघाटन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार व त्यांच्या सुविद्य पत्नी प्रतिभाताई पवार यांच्याहस्ते २ फेब्रुवारीला होणार आहे. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अॅड. रावसाहेब शिंदे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.

डीएसएलआर फिल्ममेकिंग, थिएटर लाइटवर कार्यशाळा

$
0
0
सिनेमा निर्मितीतील सध्याचा सर्वांत महत्त्वाचा घटक असलेला आणि अत्याधुनिक तंत्र समजला जाणारा डीएसएलआर कॅमेरा होय. या कॅमेऱ्याच्या सहायाने सिनेमा कसा बनवला जातो याचे, त्याचबरोबर आधुनिक प्रकाशयोजना यावरील कार्यशाळा आयोजित केली आहे.

‘व्हिटेज’ हातांची करामत

$
0
0
निव्वळ हौस आणि नॉस्टॅलजिया म्हणून कोल्हापुरात अनेक व्हिंटेजकार शौकिन आहेत. मात्र जुन्या काळातील असे व्हिंजेट मॉडेल एकवेळ मिळवणे सोपे पण ते दुरूस्त करून वापरात येणे तेवढेच कठीण! अशा कार दुरुस्त करणारे काही मेकॅनिक कोल्हापुरात आजही आहेत. गुलाब इमाम नदाफ आणि इमामखान वजीरखान पठाण ही दोन ठळक नावे!

उलगडले मुलाखतींचे अंतरंग

$
0
0
कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (केआयटी) कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये जल्लोष २०१४ च्या समारोपप्रसंगी मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांची मुलाखत अनुभवण्याची संधी तरुणाईला मिळाली. आतापर्यंत देश-विदेशातील ३६८२ मान्यवरांची मुलाखत घेणारे गाडगीळ यांनी आपल्या वाणीने आणि अनुभवांनी श्रोत्यांनी मंत्रमुग्ध केले.

चोराकडून ३.५ लाखांचे दागिने जप्त

$
0
0
विवेक शंकर दिंडे (वय २२, रा. शाहूनगर, राजारामपुरी कोल्हापूर) येथे राहणाऱ्या साखळीचोराकडून विश्रामबाग पोलिसांनी साडेतीन लाख रुपयांचे दागिने जप्त केले आहेत. सांगली आणि परिसरातील चार महिलांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून पळविल्याची कबुली त्याने दिली आहे.

बेंगळुरू ‘शिवनेरी’ हाऊसफुल्ल

$
0
0
प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधून एसटीच्या कोल्हापूर आगारातर्फे कोल्हापूर ते बेंगळुरू शिवनेरी ए. सी. स्लिपर कोच व्होल्वो सेवा सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी ही व्होल्व्हो हाऊसफुल्ल झाली.

सदाभाऊंविरोधात राष्ट्रवादीचे षडयंत्र

$
0
0
माढा लोकसभा मतदारसंघातून सदाभाऊ खोत यांची उमेदवारी जाहीर केल्याने कृषीमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी सर्किट हाउस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला.

सूचना आणि हरकतींचे काय?

$
0
0
थेट पाइपलाइन योजनेच्या सादरीकरणानंतर तीन दिवसातच टेंडर नोटीस प्रसिद्ध केल्याने महापालिकेने मागविलेल्या नागरिकांच्या सूचना, हरकतींचा योजनेमध्ये समावेश कसा केला जाणार हा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. सादरीकरणावेळीच झालेल्या चर्चेच्या आधारावर टेंडरची प्रक्रिया पुढील टप्प्यात पोहचली आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images