Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

निपाणी तालुक्याबाबत फेरविचार

$
0
0
‘भाजप सरकारने त्यांच्या सत्तेच्या काळात घाई गडबडीने तालुक्याच्या रचना केल्या असून, आवश्यक व अनावश्यक तालुके जाहीर झाले आहेत. त्यामुळे निपाणी तालुक्याचे पुन्हा परीक्षण होणार आहे, अशी माहिती बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी गुरुवारी दिली.

'जोतिबा',' महालक्ष्मी' विकास आराखड्यासाठी सर्व्हे

$
0
0
जोतिबा व महालक्ष्मी मंदिरासारख्या महत्वाच्या धार्मिक स्थळांचा विकास आराखडा राबवण्यासाठी या परिसरांचा सर्व्हे करण्याबरोबरच जोतिबा मंदिर परिसराचा आराखडा हा प्रादेशिक विकास आराखड्याचा भाग बनवण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी दिली.

धरणग्रस्तांचे आंदोलन तीव्र करू

$
0
0
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयापुढे वांग मराठवाडी धरणग्रस्तांनी गुरुवारी पावसात उभे राहून जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयक सुनिती सु.र. यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. सरकारने दखल न घेतल्यास उद्यापासून (२१ जून ) आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा सुनीती सु. र. यांनी दिला.

बोगस टीडीआरप्रकरणी सरनोबत यांच्यावर ठपका

$
0
0
साळोखेनगर येथील क्रीडांगणाचे आरक्षण असलेल्या जमिनीवरील बोगस टीडीआरप्रकरणी प्रभारी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत व उपशहर अभियंता एन. एम. निर्मळे यांच्यावर निष्काळजीपणा दाखविल्याचा ठपका आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी ठेवला आहे.

माळी काम करताना फुलवली शिक्षणाचीही बाग

$
0
0
कळत्या वयापासूनच गरिबीचे चटके बसलेले. आई-वडील आणि दोन भावंडे. वडिलांना मदत म्हणून अकराव्या वर्षापासून गवंड्याच्या हाताखाली काम सुरू केले. दिवसभर काम आणि रात्री शाळा. एकेदिवशी इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे पाठीच्या कण्याला जबर मार बसला.

क्रीडा संकुलाचे कामकाज वर्षात पूर्ण होईल

$
0
0
‘येत्या वर्षभरात क्रीडा संकुलाचे कामकाज पूर्ण होईल,’ असा विश्वास विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केला. तांत्रिक तसेच कामकाजाच्या ठिकाणी जाणवणाऱ्या अडचणींचा जवळपास दोन तासांच्या बैठकीत निपटारा करत विभागीय आयुक्तांनी येथील रखडलेल्या विभागीय क्रीडा संकुलाच्या कामाला गुरुवारी चालना दिली.

नृसिंहवाडीच्या चार एकर जागा खरेदीचा आदेश रद्द

$
0
0
इचलकरंजीतील यशवंत कॉलनीजवळील श्रीक्षेत्र नृसिंहवाडी देवस्थानची सुमारे ४ एकर जागा खरेदीचा आदेश उच्च न्यायालयाने रद्द ठरविला आहे. या निर्णयामुळे खरेदीदारांना मोठी चपराक बसली आहे.

थकीत बिलाची कटकट मिटणार

$
0
0
वेळेत वीज बिल भरूनदेखील पुढील महिन्यात पुन्हा मागचे बिल वाढवून आल्याचा प्रकार सर्रास पाहायला मिळतो. त्यामुळे पुन्हा बिल कमी करून घेऊन ते भरणा करायचा, या कटकटीतून आता ग्राहकांची सुटका होणार आहे.

केवळ दैव बलवत्तर म्हणून वाचलो...!

$
0
0
‘हरिद्वार येथील शंकराची इतकी प्रचंड उंचीची मूर्ती पाहिल्यानंतर ती कधी पाण्याखाली जाईल याचा मनातही विचार आला नव्हता, पण तिथून आम्ही बाहेर पडून केवळ बारा तासांनंतर झालेल्या पर्जन्यतांडवाची दृश्ये पाहिल्यावर केवळ नशीब बलवत्तर म्हणूनच वाचलो,’ असे सांगत राजारामपुरीतील गीता भंडारे देवाचे लाख लाख धन्यवाद व्यक्त करत होत्या.

धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

$
0
0
जिल्ह्यात दोन दिवसांत पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. घटप्रभा धरणात सर्वाधिक ९६.२२ टक्के पाणीसाठा झाला असून, राधानगरी धरणात ३५.६८ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. तुळशीत ३१, वारणात ४२, तर दूधगंगा धरणात २५.६२ टक्के पाणीसाठा झाला.

केजी टू पीजी परफेक्ट एज्युकेशनल सोल्यूशन

$
0
0
श्रोत्यांसाठी नेहमीच नावीन्यपूर्ण मनोरंजनासोबत सामाजिक उपक्रमांचे कार्यक्रम सादर करणाऱ्या आपल्या लाडक्या रेडीओ मिर्चीकडून आता केजी टू पीजी परफेक्ट एज्युकेशनल सोल्यूशनचा करेक्ट अड्डा हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.

टोलसाठी आयआरबीकडून हालचाली सुरू

$
0
0
आयआरबी कंपनीने टोल नाक्यांवर पोलिसांकडून बंदोबस्ताची मागणी केली आहे. मात्र, शहरातील वाढती गुन्हेगारी आणि त्यासाठी लागणारा अपुरा स्टाफ या कारणावरून अद्याप आयआरबीला बंदोबस्त देण्यात आलेला नाही. आयआरबीकडून मात्र तत्काळ बंदोबस्त मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याने टोल लवकरच सुरू करण्याबाबत हालचालींना वेग आला आहे.

यंदा विठ्ठलाचे दर्शन होणार फक्त २ तासांत

$
0
0
वारकरी सांप्रदायात सर्वोच्च महत्त्व असलेल्या आषाढी यात्रेत या वर्षी भाविकांना आता केवळ दोन तासांत विठ्ठलाचे दर्शन देण्याची योजना मंदिर समितीने आखली आहे. यासाठी भाविकांनी दर्शनासाठी मोफत आगाऊ आरक्षण करण्याचे आवाहन मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे यांनी केले आहे.

कोल्हापुरातील पहिले शाहू मराठा बोर्डिंग बंद

$
0
0
सर्व जातीजमातींच्या मुलांना शिकता यावे म्हणून राजर्षी शाहू महाराज यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या अनेक विद्यार्थी वसतिगृहांना कुलूप लागले आहे. काही वसतिगृहांच्या इमारती असल्या तरी आता तेथे दुकानगाळे, शाळा आणि मंगल कार्यालये थाटली आहेत.

चार तासांचा थरारक पाठलाग...!

$
0
0
बुधवारची सकाळची ११ वाजून पाच मिनिटांची वेळ. पंचगंगा पुलाकडून चालत आलेल्या एका तरुणावर गस्तीला असलेले लक्ष्मीपुरी स्टेशनचे पोलिस सुहास पोवार यांची नजर खिळली. डीवायएसपी ऑफिसमोरील चौकात सुहास पोवार व तो तरुण दिलीप लहरिया यांची नजरानजर झाली.

सीरियल किलर पकडला

$
0
0
‘मुझे गाली दी, इसलिये मैने दोनोंको खत्म किया,’ अशी कबुली पोलिसांनी अटक केलेला संशयित दिलीप कुंवरसिंह लहरिया (वय २३) याने गुरुवारी दिली. आतापर्यंत दगड डोक्यात घालून नऊ खून करण्यात आले आहेत.

कोल्हापूर प्लास्टरवरच, गोव्याला शाडू

$
0
0
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीवर काही राज्यांनी आणि महापालिकांनी बंदी घातल्यामुळे मूर्तीकारांनी त्यावरही उपाय शोधला आहे. गोवा राज्याने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना बंदी घातल्यामुळे त्यांच्यासाठी खास शाडूच्या मूर्ती पाठविण्यात येणार आहेत. तर कोल्हापूरकरांसाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्याच मूर्ती कुंभारवाड्यात तयार होऊ लागल्या हेत. त्यामुळे कोल्हापूरकरांना यंदाही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे घरात पूजन करावे लागेल.

पर्यटकांच्या नजरेत भरले म्युझियम

$
0
0
कोल्हापुरच्या संस्थानकालीन इतिहासातील दुर्मिळ ऐवज पाहण्याची पर्वणी देणाऱ्या टाउन हॉल म्युझियमला गेल्या सहा महिन्यात तब्बल ३० हजार २४४ पर्यटकांनी भेट दिली आहे.

आवाडे संस्थेकडून उद्यान, गाट समूहाकडून आयलंड

$
0
0
‘लोकसहभागातून विकासकामे’ या महापालिकेच्या योजनेला संस्थांचा प्रतिसाद मिळत आहे. रूईकर कॉलनीतील महापालिकेच्या बागेसाठी आरक्षण असलेल्या भूखंडावर कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट अॅन्ड इंटिग्रेटेड टेक्सटाई पार्क लिमिटेडतर्फे नवीन उद्यान विकसित करण्याचा प्रस्ताव महापालिकेला दिला आहे.

जिल्हा बार असोसिएशन खंडपीठासाठी सरसावले

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images