Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

गाजर, वरणा ८० रुपये किलो

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

मकर संक्रातीला मागणी वाढल्याने गाजर आणि वरण्याचे दर वाढले असून प्रतिकिलो ८० रुपये दराने विक्री होत आहे. लहान आकाराचा वाटाण्याची आवक अत्यंत कमी असल्याने प्रतिकिलो १०० ते १२० रुपये दर आहे. दरम्यान, भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने फळभाज्या, पालेभाज्या स्वस्त झाल्या आहेत.

गाजराची आवक कमी झाल्याने दर प्रतिकिलो ४० ते ६० रुपयांवरुन ६० ते ८० रुपयांवर पोहोचला आहे. लहान आकाराची गाजरे प्रतिकिलो ६० तर मोठ्या आकाराच्या गाजरांचा दर ८० रुपये आहे. सध्या मकर संक्रातीचे वाण देण्याचे कार्यक्रम जोरात सुरू असल्याने लहान गाजरांना मागणी आहे. मोठ्या गाजराचा दर वाढला असला तरी हलवा आणि कोशिंबिरीसाठी गाजराची मोठ्या प्रमाणात ग्राहकांकडून खरेदी केली जात आहे. वरण्याचा दर प्रतिकिलो ८० रुपयांवर टिकून आहे.

संक्रातीला 'घारी' हा पदार्थ केला जात असल्याने भोपळ्याला मोठी मागणी आहे. भोपळ्याचा दर प्रतिकिलो १०० ते १२० रुपये इतका आहे. पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने मेथी, पोकळा, पालक, शेपू, कांदा पात, कोथिंबिर पेंढीचा दर पाच रुपये होता.

फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

वांगी : ४० ते ६०

टोमॅटो : २०

भेंडी : ६०

ढबू : ४०

गवार : ८०

दोडका : ६०

कारली : ४०

वरणा : ६० ते ८०

वाटाणा : ८०

हिरवी मिरची : ४०

फ्लॉवर : १० ते ३० (प्रति गड्डा)

कोबी : १० ते २० (प्रति गड्डा)

बटाटा : २५ ते ३०

लसूण : ८० ते १००

कांदा : ३० ते ५०

आले : १००

मुळा : १२ ते १५ (प्रति नग)

गाजर : ६० ते ८०

काकडी : ४० ते ५०

पालेभाजी दर (पेंढी रुपयांत)

मेथी : ५

कांदा पात : ५

कोथिंबीर : ५

पालक : ५

शेपू :५

चाकवत : ५ ते १०

करडा : ५

फळांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

सफरंचद : १२० ते १४०

डाळिंब : ६० ते ८०

बोरे : ३० ते ४०

संत्री : ४० ते १००

द्राक्षे : ८० ते १००

चिकू : ६० ते १००

केळी : ३० ते ६० (डझन)

जवारी केळी : २० ते ६० (डझन)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एकसंधतेचा पाया राजर्षी शाहूंनी रचला

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'लोकराजा शाहू महाराजांनी दीन-दलित आणि वंचितांना न्याय देण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घातले. सामाजिक समतेचा संदेश देत शेवटच्या घटकांना न्याय देण्याचा सदैव प्रयत्न केला. सद्यस्थितीत नव्या कायद्यामुळे समाजात दुही आणि दुभंगेलपण येत असताना कोल्हापूर एकसंध राहीले आहे. त्याचा पाया संस्थानकाळात राजर्षी शाहू महाराजांनी घातला. जाती-धर्माला तिलांजली देणारी त्यांची भूमिका पुढे नेण्याची जबाबदारी भावी पिढीची आहे,' अशा भावना रविवारी लोकराजा शाहू समाधी स्मारक लोकार्पण सोहळ्यानिमित्ताने व्यक्त करण्यात आल्या. नर्सरी बागेत त्यांच्या समाधी स्थळ लोकार्पण सोहळ्याच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय लोटला. समता रॅली, शाहिरी कवनांतून त्यांना मानाचा मुजरा करण्यात आला.

याप्रसंगी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, 'शाहूंचा विचारांची प्रेरणा देणारे सुंदर स्मारक महापालिकेने निर्माण केले आहे. स्मारकांच्या माध्यमातून त्यांच्या विचारांचे प्रतिबिंब उमटत आहे. शाहू महाराजांनी सर्वांना समान संधी देताना आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, त्याचा सार्थ अभिमान आहे. कायद्यांची अंमलबजावणी त्यांनी कृतीतून केली. सद्यस्थितीत मतांचे राजकारण सुरू असताना त्यांनी केलेल्या कार्यातून त्यांचे द्रष्टेपण दिसून येते. अशा लोककल्याणकारी राजाचे विचार देशपातळीवर पोहोचवण्यासाठी आतापासून, ६ मे २०२२च्या शताब्दी कार्यक्रमांचे नियोजन करा. त्यासाठी लागेल ती मदत करू.'

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, 'पुरोगामीत्त्वाचा विचार जपणाऱ्या शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा व्हावा, अशी शहरवासियांची इच्छा होती. पदोपदी जातीयवादाची बिजे रोवली जात असताना शाहूंनी सर्व जाती-धर्मासाठी शिक्षणाची कवाडे खुली केली. अस्पृश्यता निवारणासारखे कायदे केलेल्या देशात एनआरसी आणि सीएएसारखे कायदे होत आहेत. शाहूराजांच्या काळात असले, कायदे करण्याचा प्रयत्न झाला असता, तर ते त्यांनी फाडून टाकले असते.'

खासदार संभाजीराजे यांनी, राजर्षी शाहूंचे विचार तळागाळापर्यंत पोहोचले आहेत. सत्यशोधक विचारांना त्यांनी नेहमीच बळकटी दिली,' असे सांगितले.

इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, शिल्पकार किशोर पुरेकर, आर्किटेक्ट अभिजित जाधव-कसबेकर, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, अमित आडसुळे, ठेकेदार व्ही. के. पाटील, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शाहीर दिलीप सावंत, दिप्ती व तृप्ती सावंत, डॉ. आझाद नायकवडी यांनी शाहिरीतून शाहू महाराजांना मानाचा मुजरा केला. जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. योगेश जाधव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रकांत जाधव, ऋतुराज पाटील, प्रकाश आवाडे, राजेश पाटील, पी. एन. पाटील, राजू आवळे, विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, स्थायी सभापती शारंगधर देशमुख, उपमहापौर संजय मोहिते, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे आदी उपस्थित होते. महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर यांनी प्रास्ताविक केले. संदीप मगदूम व शीतल हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आभार मानले.

माणगाव स्मारकासाठी कोटीचा निधी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत माणगावला परिषद झाली होती. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी राजर्षी शाहू महाराज होते. या घटनेला आता शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. परिषदेच्या ठिकाणी जीवन-विचारांचे स्मारक व्हावे अशी अपेक्षा आहे. त्यासाठी एक कोटीचा निधी देत असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी जाहीर केले.

आता कळले असेल पालकमंत्री का केले?

'स्मारकासाठी महापालिकेच्या माध्यमातून आम्ही तीन कोटींचा निधी दिला. उर्वरित कामांसाठी लागणारा पाच कोटींचा निधी मी आणि मुश्रीफ राज्य सरकारकडून मिळवून देऊ. त्यासाठी पवारसाहेब आणि थोरातसाहेब यांनी सहकार्य करावे,' अशी अपेक्षा पालकमंत्री पाटील यांनी व्यक्त केली. त्यांचा भाषणाचा संदर्भ देत मंत्री थोरात यांनी 'सतेज पाटील यांचे भाषण ऐकून त्यांना आम्ही पालकमंत्री का केले हे आता तुम्हाला कळले असेल' असे म्हणताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

२०२२ पर्यंत दुसरा टप्पा

'महापालिकेच्या स्वनिधीतून साकार झालेल्या समाधी स्मारकाचा लोकार्पण सोहळा आनंददायी क्षण आहे. राजर्षी शाहूंच्या भूमीत समाजकारण, राजकारण करत असल्याचा अभिमान आहे. शरद पवार यांनी शाहू गौरव ग्रंथासाठी निधी दिला. पण नंतर राज्य सरकारकडून निधी मिळाला नाही. २०१४ मध्ये शाहू मिल जागेत आंतरराष्ट्रीय स्मारक करण्यासाठी आराखडा तयार केला. पण पाच वर्षात अपेक्षापूर्ती झाली नाही. समाधीस्थळाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पाच कोटींचा निधी लागणार आहे. मंत्री मुश्रीफ यांच्यासह आम्ही यासाठी पाठपुरावा करू. २०२२पूर्वी दुसरा टप्पा पूर्ण करू. पुन्हा पवार व थोरात यांनाच समारंभासाठी निमंत्रीत करू' असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

०००

(मूळ कॉपी)

एकसंधतेचा पाया शाहू महाराजांनी घातला

ऐतिहासिक क्षणाच्या साक्षीदारांसाठी हजारोंचा जनसमुदाय लोटला

कोल्हापूर टाइम्स टीम

शिक्षण, कृषी, उद्योग-व्यापारांबाबत द्रष्टेपण असलेल्या लोकराजा शाहू महाराजांनी दीन-दलित आणि वंचितांना न्याय देण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घातले. सामाजिक समतेचा संदेश देत शेवटच्या घटकांना न्याय देण्याचा सदैव प्रयत्न केला. सद्य:स्थितीत नव्या कायद्यामुळे समाजात दुही आणि दुभंगेलपण येत असताना कोल्हापूर एकसंध आहे. त्याचा पाया संस्थानकाळात राजर्षी शाहूंनी पाया घातला. जाती-धर्माला तिलांजली देणारी त्यांची भूमिका पुढे नेण्याची जबाबदारी भावी पिढीची आहे, अशा भावना लोकराजा शाहू समाधीस्मारक लोकार्पण सोहळ्यानिमित्ताने व्यक्त करण्यात आल्या. नर्सरी बागेतील त्यांच्या समाधीस्थळाच्या लोकार्पण सोहळ्याच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय लोटला होता. समता रॅली, शाहिरी कवनातून त्यांना मानाचा मुजरा करण्यात आला.

शाहू समाधीस्मारकाचे लोकार्पण झाल्यानंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, 'शाहूंचा विचारांची प्रेरणा देणारे सुंदर स्मारक महापालिकेने निर्माण केले आहे. स्मारकांच्या माध्यमातून त्यांच्या विचारांचे प्रतिबिंब उमटत आहे. शाहू महाराजांनी सर्वांना समान संधी देताना आरक्षणाची मूहुर्तमेढ रोवली, त्याचा सार्थ अभिमान आहे. केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी त्यांनी कृतीतून केली. सद्य:स्थितीत मतांचे राजकारण सुरू असताना त्यांनी केलेल्या कार्यातून त्यांचे द्रष्टेपण दिसून येते. अशा लोककल्याणकारी राजाचे विचार देशपातळीवर पोहोचवण्यासाठी आतापासून त्यांचा शताब्दीनिमित्त कार्यक्रमांचे नियोजन करा. सहा मे २०२२ जगाला संदेश दिला जाईल, असा कार्यक्रम करा त्यासाठी लागेल ती मदत करु.' ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, 'पुरोगामीत्वाचा विचार जपणाऱ्या शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा व्हावा, अशी शहरवासियांची इच्छा होती. पदोपदी जातीयवादीची बिजे रोवली जात असताना शाहू राजांनी सर्व जातीधर्मासाठी शिक्षणाची कवाडे खुली केली. अस्पृश्यता निवारणासारखे कायदे केलेल्या देशात एनआरसी आणि सीएए सारखे कायदे होत आहेत. शाहू राजांच्या काळात असले, कायदे करण्याचा प्रयत्न झाला असता, तर ते फाडून टाकले असते. ' खासदार संभाजीराजे यांनी राजर्षी शाहूंचे विचार तळागाळापर्यंत पोहोचले आहेत. सत्यशोधक विचारांना त्यांनी नेहमीच बळकटी दिली, असे सांगितले.

सोहळ्यामध्ये इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, शिल्पकार किशोर पुरेकर, आर्किटेक्ट अभिजित जाधव-कसबेकर, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, अमित आडसुळे, ठेकेदार व्ही. के. पाटील, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शाहीर दिलीप सावंत, दिप्ती व तृप्ती सावंत, डॉ. आझाद नायकवडी यांनी शाहिरीतून शाहू महाराजांना मानाचा मुजरा केला. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. योगेश जाधव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रकांत जाधव, ऋतुराज पाटील, प्रकाश आवाडे, राजेश पाटील, पी. एन. पाटील, राजू आवळे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, उपमहापौर संजय मोहिते, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्यासह महाालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर यांनी प्रास्ताविक केले. संदीप मगदूम व शीतल हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आभार मानले.

माणगाव स्मारकासाठी एक कोटीचा निधी

घटनातज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत माणगाव येथे परिषद झाली. परिषदेचे अध्यक्षस्थान राजर्षी शाहू महाराजांनी भूषवले होते. त्याला आता शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. परिषदेच्या ठिकाणी जीवन-विचारांचे स्मारक व्हावे अशी अपेक्षा आहे. त्यासाठी एक कोटीचा निधी देत असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी जाहीर केले.

आता कळले असेल सतेज पाटील यांना कोल्हापूरचे पालकमंत्री का केले ?

'स्मारकासाठी महापालिकेच्या माध्यमातून आम्ही तीन कोटींचा निधी दिला. उर्वरित कामांसाठी लागणारा पाच कोटींचा निधी मी आणि नामदार मुश्रीफ मिळून राज्य सरकारकडून मिळवून देऊ. त्यासाठी पवारसाहेब आणि थोरातसाहेब यांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा पालकमंत्री पाटील यांनी व्यक्त केली. त्यांचा भाषणाचा संदर्भ मंत्री थोरात यांनी सतेज पाटील यांचे भाषण ऐकून त्यांना आम्ही पालकमंत्री का केले हे आता तुम्हाला कळले असेल. असे म्हणताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

२०२२ पर्यंत दुसरा टप्पा पूर्ण करु : पालकमंत्री पाटील

'महापालिकेच्या स्वनिधीतून साकार झालेल्या समाधीस्मारकाचा लोकार्पण सोहळा आनंददायी क्षण आहे. शाहू महाराजांच्या भूमित समाजकारण, राजकारण करत असल्याचा अभिमान आहे. शरद पवार यांनी शाहू गौरव ग्रंथासाठी निधी दिला, पण त्यानंतर राज्य सरकारकडून निधी मिळाला नाही. २०१४ मध्ये शाहू मिल जागेत आंतरराष्ट्रीय स्मारक करण्यासाठी आराखडा तयार केला. पण पाच वर्षात अपेक्षापूर्ती झाली नाही. कदाचीत नियतीच्या मनातही जनतेच्या सरकारकडून कामाला सुरुवात व्हावी, अशी अपेक्षा असेल. समाधीस्थळाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पाच कोटीचा निधी लागणार आहे. मंत्री मुश्रीफ यांच्यासह यासाठी पाठपुरावा करुन २०२२ पूर्वी दुसरा टप्पा पूर्ण करु. पुन्हा पवार व थोरात यांनाच समारंभासाठी निमंत्रीत करु.' असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकशाही, समतेचे प्रेरणास्थळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'सामान्य जनता, शोषित, पीडितांसाठी राजसत्ता वापरणारा द्रष्टा राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे समाधी स्मारक नव्या पिढीसाठी आधुनिकता, समता आणि लोकशाहीचे महत्त्व समजून देणारे प्रेरणास्थळ ठरेल', असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषीमंत्री, खासदार शरद पवार यांनी केले. महापालिकेच्यावतीने नर्सरी बागेत साकारलेल्या राजर्षी छत्रपती शाहू समाधी स्मारकाचे रविवारी दिमाखदार सोहळ्याद्वारे लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती होते.

लोकार्पण कार्यक्रमानंतर दसरा चौकात महसूलमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार प्रा. संजय मंडलिक, धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. कोल्हापूरबरोबरच ठिकठिकाणांहून आलेल्या शाहूप्रेमींनी दसरा चौक आणि समाधी स्मारक परिसर गर्दीने फुलून गेला होता.

यावेळी बोलताना पवार म्हणाले, 'देशात अनेक राजे आणि संस्थाने होऊन गेली. पण छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांनी केलेल्या कामगिरींमुळे ते देशाच्या कायमस्वरुपी लक्षात राहिले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत्व जागे करुन समाज संघटित केला आणि राज्य प्रस्थापित केले. तर राजसत्तेचा वापर सामान्यांसाठी करुन रयतेचे राज्य करणारा राजा असल्याचे छत्रपती शाहू महाराजांनी दाखवून दिले. म्हणूनच त्यांचे काम कोल्हापूर, महाराष्ट्रापुरतेच मर्यादित न राहता सबंध देशभर पोहोचले. परदेशातून शिक्षण घेऊन आल्याच्या पहिल्या दिवसापासून त्यांनी वेगळे निर्णय घेतले. त्यात शिक्षणाचा प्रसार, आरक्षण, प्रशासनातील शिस्त, जातीपातीच्या भिंती मोडण्याबाबतच्या अनेक धाडसी निर्णयांचा समावेश होता. शेवटच्या घटकापर्यंत या निर्णयांचा फायदा झाला पाहिजे हे त्यांच्या अंतकरणात होते. त्यासाठी त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना महिला आरक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर आमच्या पक्षाची सत्ता गेली. त्याबाबत कानोसा घेतल्यानंतर जनतेला हा निर्णय पचला नव्हता. पण शाहू महाराजांनी ५० टक्के आरक्षण आणि महिला शिक्षणाबाबत त्याकाळी घेतलेले निर्णय निश्चितच सोपे नव्हते.'

शाहू महाराज हे दिशा देणारे नेतृत्व होते, असे सांगून पवार म्हणाले, 'त्यांनी केवळ धरण बांधून शेती फुलवली नाही तर वीजनिर्मितीचा निर्णय घेतला. ती कारखान्यांना उपलब्ध करुन देऊन उद्यमनगरात कारखानदारी उभी केली. शेतीबरोबरच जोडधंद्यात पडले पाहिजे म्हणून धंदेवाईक शिक्षणाची सुविधा दिली. शाहूंची दृष्टी आणि प्रोत्साहनामुळे उद्यमनगरात तयार झालेले ऑइल इंजिन इजिप्तमध्ये पोहचले. शिक्षण, शेती, कुस्ती, शिकार, उद्योग-व्यापार असा सर्वव्यापी विचार शाहूंनी केला. शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केलेल्या मदतीतून देशाला घटनेची चौकट मिळाली. त्यामुळेच भारतात कधीही हुकूमशाही स्वीकारली गेली नाही.'

.. .. .. .. .. ..

शाहूंचे अनुयायी तयार व्हावेत

श्रीमंत शाहू छत्रपती म्हणाले, 'शाहू महाराजांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमास शरद पवार उपस्थित होते. त्यानंतरच्या काळात सरकार बनवण्यात व रुजवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. सध्या शाहूप्रेमी, शाहूभक्त भरपूर झाले आहेत. आता त्यांच्या समतेच्या विचाराने चालणारे अनुयायी तयार झाले पाहिजेत. राज्यात विविध पक्षांचे सरकार आहे. हे सरकार पुढे चालवण्यासाठी विकासाशिवाय पर्याय नाही. जिल्ह्यात तीन मंत्री झाले आहेत. त्यांच्याकडून गतीने विकास होत राहील, अशी अपेक्षा आहे. तरच हा सोहळा उपयोगी ठरला असे म्हणता येईल.'

.. .. .. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ गायिका डॉ. भारती वैशंपायन यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील ज्येष्ठ शास्त्रीय गायिका आणि शिवाजी विद्यापीठाच्या संगीत आणि नाट्य विभागाच्या माजी प्रमुख डॉ. भारती वैशंपायन (वय ६६) यांचे रविवारी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. नागाळा पार्क येथील निवासस्थानी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या निधनाने जयपूर अत्रौली घराण्याचा आश्वासक सूर हरपला, अशा भावना संगीत क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केल्या. शिवाजी विद्यापीठाच्या संगीत आणि नाट्य विभागाला उर्जितावस्था आणून देण्यात डॉ. वैशंपायन यांचा मोठा वाटा होता.

एक महिन्यापूर्वी डॉ. वैशंपायन यांना स्मृतिभ्रंशाचा आजार झाला. तेव्हापासून त्यांची प्रकृती बिघडली होती. काही दिवस त्यांच्यावर खासगी रूग्णालयात सुरू होते. त्यांच्या पश्चात पती अविनाश, मुलगा केदार, सून शीतल, मुली मीरा व मधुरा आणि जावई असा परिवार आहे.

... .. .. .. .. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन

$
0
0

कोल्हापूर

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय सोहळा रविवारी, २६ जानेवारी रोजी सकाळी सव्वा नऊ वाजता पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते होणार आहे. छत्रपती शाहू स्टेडियम येथे होणाऱ्या या सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेच्या ताफ्यात रुग्णवाहिका, पाण्याचे टँकर

$
0
0

कोल्हापूर

महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या ताफ्यात चार टँकर तर सावित्रीबाई फुले रुग्णालयामध्ये एक रुग्णवाहिका दाखल झाली. महापालिकेच्या स्वनिधीतून ही वाहने खरेदी करण्यात आली आहेत. म. विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते या वाहनांचे पूजन करण्यात आले. यावेळी उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती शारगंधर देशमुख, विरोधी पक्षनेता विजय सुर्यवंशी, गटनेता सत्यजित कदम, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सध्याचा काळ कठीण, संघर्षासाठी तयार रहा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'देशातील सद्यस्थिती पाहिली तर विद्यार्थ्यांनी संघर्षासाठी तयार राहण्याची गरज आहे. अभ्यास व संघर्ष या दोन्ही बाजू सांभाळत पुढे जाणे आणि देशाचे भवितव्य घडविणे हे विद्यार्थ्यांचे कर्तव्य आहे. संघर्ष हा चांगल्या विचारांचा आणि कृतींचा असला पाहिजे, ज्याद्वारे समाजाचे भले होईल,'असे मत इएफएल विद्यापीठाच्या माजी प्रकुलगुरू डॉ. माया पंडित यांनी व्यक्त केले.

स्टुडंडस फेडरेशन ऑफ इंडियाचे २१ वे जिल्हा अधिवेशन रविवारी झाले. या अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाचे सहकार्यवाह प्रा. सुभाष जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. चित्रदुर्ग मठ येथे हे अधिवेशन झाले.

'इतर देशात उच्चशिक्षण घेणाऱ्या तरुणांची टक्केवारी ५५ ते ६० टक्के तर भारतात तेच प्रमाण २० ते २५ टक्के आहे. सरकारने या बाबीकडे विशेष लक्ष द्यावे,'असे डॉ. पंडित यांनी नमूद केले. त्या म्हणाल्या 'आमच्यामध्ये माफीवीर सावरकरांचे रक्त नाही. तर शेतकरी, भूमिहीन व ग्रासलेल्या नागरिकांना स्वातंत्र्य देण्यासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचे रक्त आमच्यात आहे.' याप्रसंगी प्रा. जाधव, एसएफआयचे राज्य सचिव रोहिदास जाधव यांची भाषणे झाली.

....

अधिवेशनातील प्रमुख ठराव....

नोकरभरतीवरील बंदी तत्काळ उठवावी.

नवीन शैक्षणिक धोरण मसुदा २०१९ मध्ये मुलभूत सुधारणा कराव्यात.

शिष्यवृत्तीमध्ये वाढ, शिक्षण हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी.

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मोफत एसटी बस पास, सरकारी विद्यापीठांचे सक्षमीकरण.

नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी रद्द करावा.

लोकशाही पध्दतीने विद्यार्थी निवडणुका घेण्याच्या निर्णयाची त्वरीत अंमलबजावणी करावी.

.....

जिल्हाध्यक्षपदी सर्वेश सवाखंडे

अधिवेशनात जिल्हास्तरीय १९ जणांची कार्यकारिणी निवडण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी सर्वेश सवाखंडे, जिल्हा सचिवपदी रत्नदीप सरोदे, जिल्हा उपाध्यक्षपदी नवनाथ मोरे, पंकज खोत, तर जिल्हा सहसचिवपदी प्रेरणा कवठेकर, तुषार सोनुले यांची निवड झाली. सदस्यपदी मालोजीराव माने, अविकुमार पाटील, रणजित माने, अभिषेक शिंदे, केतन पाटील, प्रमोद मोहिते, विनय कोळी, गणेश भालेराव, केदार शिकलगार, राज शिकलगार, सौरभ जाधव, प्रवीण पुजारी, हरी आवळे आदींची एकमताने निवड झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘५५७७’ गाडीचा चर्चेचा प्रवास

$
0
0

फोटो आहे

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर

महापालिकेतील राजकारण नेहमीच विविध किश्श्यांनी चर्चेत राहते. यामध्येही खासकरून आपल्या नेत्यांवरील विशेष प्रेम दाखवण्यासाठी अनेकजण स्थायी किंवा महासभेचा आधार घेतात. त्यांची चाललेली धडपड अनेकजणांना माहित असते. त्याचे चवितचर्वणही होत असते. नेत्यांवरील आपले हे प्रेम व्यक्त करण्यासाठी दोन वर्षांपासून महापालिकेत नंबर गेम सुरू आहे. या नंबर गेममुळेच नवीन विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी आलेल्या विजय सुर्यवंशी यांच्या दिमतीला ५५७७ क्रमांकाची झेस्ट गाडी दाखल झाली. अतिरिक्त आयुक्तांकडे असलेली ही गाडी पुन्हा पदाधिकाऱ्यांच्या ताफ्यात आल्याने त्याची चांगलीच चर्चा होऊ लागली आहे.

जिल्ह्यातील बहुतांश राजकीय नेते आपल्या वाहनांसाठी ठराविक क्रमांकाला पसंती देतात. त्यांच्या ताफ्यात अनेक वाहने असली, तरी विविध वाहनांचे क्रमांक एकच असतात. त्यामुळे हे वाहन क्रमांक नेत्यांची खास ओळख निर्माण करणारे ठरत आहे. वरिष्ठ राजकीय नेत्यांच्या नंबर गेमची कॉपी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते करत असतात. यामुळे त्यांचीही ठराविक नेत्यांचे समर्थक म्हणून ओळख बनली आहे. त्याला महापालिकेतील पदाधिकारी अपवाद ठरलेले नाहीत.

महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी विरुद्ध भाजप -ताराराणी आघाडी सत्तासंघर्षामध्ये २०१८ मध्ये भाजपच्या आशिष ढवळे यांनी स्थायी समितीचे सभापतीपद खेचून आणले. स्थायीचा पदभार स्वीकारल्याबरोबर झेस्ट कंपनीची कार त्यांच्या दिमतीला हजर झाली. त्याचा क्रमांक ५५७७ होता. या क्रमांकाची सर्व वाहने माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या वाहनांची असल्याने त्यांच्या कारची चांगलीच चर्चा झाली. वर्षभर त्यांच्या ताफ्यात ही कार होती. २०१९ मध्ये अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे शारंगधर देशमुख स्थायी सभापतीपदी विराजमान झाले. आमदार सतेज पाटील यांचे विश्वासू कार्यकर्ते असल्याने त्यांनी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्याकडे असलेली 'मांझा' त्यांनी वापरण्यास सुरुवात केली. गेल्या वर्षभरापासून ती त्यांच्याकडे होती.

गेल्या आठवड्यात विरोधी पक्षनेतेपदी भाजपच्या विजय सूर्यवंशी यांची निवड झाली. त्यांनी लगेचच माजी विरोधी पक्षनेते विलास वास्कर यांच्याकडे असलेली गाडी पुन्हा अतिरिक्त आयुक्तांना देवून त्यांच्याकडील ५५७७ क्रमांकाची कार आपल्याकडे घेतली. गेल्या चार दिवसांपासून राजर्षी शाहू समाधीस्मारक लोकार्पण सोहळ्याची धामधूम सुरू असताना त्यांच्याकडील कार सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. महापालिकेची निवडणूक पुढील ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात महासभेच्या माध्यमातून अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतील आणि हळूहळू निवडणुकीचे वातावरण तापू लागेल.

.....

अतिरिक्त आयुक्त सॉफ्ट टार्गेट

ढवळे यांनी नवीन कार खरेदी केल्यानंतर पूर्वीची कार अतिरिक्त आयुक्त देसाईंना देण्यात आली. त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर त्यांच्याकडील कार स्थायी समिती सभापतींना देण्यात आली व त्यांना ढवळे यांच्याकडे असलेली कार दिली. आता त्यांच्याकडील कार पुन्हा विरोधी पक्षनेत्यांकडे आली असून पूर्वीच्या विरोधी पक्षनेत्यांची कार देसाईंना दिली आहे. त्यामुळे कारच्या आदलाबदलीमध्ये अतिरिक्त आयुक्त सॉफ्ट टार्गेट ठरत असल्याची चर्चाही महापालिका वर्तुळात रंगली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षकांच्या न्याय्य मागण्या सोडवू

$
0
0

मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याचे शरद पवार यांचे आश्वासन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'प्राथमिक शिक्षकांच्या मागण्या न्याय्य असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षणमंत्री आणि शिक्षणासंबधित मंत्र्यांची एकत्रित बैठक घेऊन टप्प्याटप्प्याने या मागण्या सोडवण्यात येतील', असे आश्वासन खासदार शरद पवार यांनी दिले. नवीन बदली धोरणाबाबतही लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या अधिवेशनात पवार आणि मुश्रीफ यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिक्षक नेते संभाजी थोरात यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी, नवीन बदली धोरण करावे, शिक्षकांना बीएलओसह इतर शैक्षणिक कामातून मुक्त करावे, यासह अन्य मागण्या मांडल्यानंतर त्याचा आधार घेत खासदार शरद पवार म्हणाले, 'शिक्षकांनी मागण्यांबाबत चिंता करु नये. राज्यात नवीन सरकार स्थापन झाले असून मुंबईत लवकरच मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, नगरविकास मंत्री, ग्रामविकास मंत्र्यांची बैठक घेतली जाईल. शिक्षकांच्या मागण्या या अर्थखात्याशी निगडीत असून त्या मागण्या टप्प्याटप्प्याने सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. शिक्षकांना मोकळ्या हाताने पाठवणार नाही'.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, 'ग्रामीण भागात शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्व असून शिक्षकांनी शिक्षणक्षेत्रात आपल्या कामाने चैतन्य आणले आहे. शिक्षकांच्या मागण्या योग्य असून त्या सोडवण्यासाठी सहकार्य राहील.'

भाजप महायुती सरकारने प्राथमिक शिक्षण, ग्रामविकासाकडे दुर्लक्ष करत मेट्रो, बुलेट ट्रेनकडे लक्ष दिले असा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. ते म्हणाले, '२७ फेब्रुवारी २०१७ च्या बदली धोरणात आवश्यक ते बदल करुन सर्वसमावेशक नवीन बदली धोरण करावे, या मागणीबाबत लवकर निर्णय घेतला जाईल. शरद पवार यांनी केलेल्या सूचनेनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण खात्याशी संबधित मंत्र्यांची बैठक घेतली जाईल.' इंग्रजी शाळांचे मोठे आव्हान असून ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षकांनी आपले ज्ञान अपडेट ठेऊन शिक्षणाचा दर्जा वाढवण्याचे आवाहनही मुश्रीफ यांनी केले. मोहन भोसले यांनी प्रास्ताविक केले. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब तांबारे यांनी आभार मानले.

...

शहाणा गुरुजींचा नाद करत नाही.

शिक्षक नेते संभाजी थोरात यांनी भाषणात चांगल्याच कोपरखळ्या मारल्या. भाजप महायुती सरकारने शिक्षकांच्या कोणत्याच मागण्या मान्य केल्या नाहीत, असा आरोप करून ते म्हणाले, 'शहाणा अधिकारी, शहाणा राजकारणी गुरुजींचा नाद करणार नाही. शिक्षकांची ताकद मोठी असल्याने आपले सरकार सत्तेवर आले आहे. गुरुजींचे उपद्रव्यमूल्य २८८ मतदारसंघात आहे.' २००५ नंतर आलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी करताना 'हे शिक्षक ३५ वर्षांनी निवृत्त होणार आहेत, त्यावेळचे सरकार बघेल की, तुम्ही कशाला काळजी करता?' अशी टिप्पणीही त्यांनी मंत्र्यांना उद्देशून केली.

...

फोटो अर्जुन टाकळकर, २९८०, ३०१०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभिवादन करण्यासाठी शाहूप्रेमींची गर्दी

$
0
0

म. टा.प्रतिनिधी,कोल्हापूर

लोकराजा राजर्षी शाहू महाराज समाधीस्मारकाचे रविवारी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण झाले. कोनशिलेचे अनावर झाल्यानंतर 'छत्रपती शाहू महाराज की जय' च्या घोषणांनी परिसरात चैतन्य निर्माण झाले. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत समाधीस्मारकस्थळी अभिवादनासाठी शाहूप्रेमींनी गर्दी केली होती.

लोकार्पण सोहळ्याच्या मुख्य दिवशी स्मारक परिसर सुशोभित केला होता. येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि करवीर संस्थापिका ताराराणी यांची मंदिरे फुलांच्या माळांनी सजविली होती. प्रवेशद्वाराजवळच ढोल ताशांचा ठेका वातावरणात जोश निर्माण करत होता. शाहीर रंगराव पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या पोवाड्यांनी वातावरणात वीरश्री निर्माण केली. पोलिस बँडने सोहळ्याला संगीत साज चढवला होता.

शाहूप्रेमाने भारलेल्या रयतेने हा सोहळा याची देही अनुभवला. त्यानंतर नागरिकांनी दर्शनासाठी स्मारकाजवळ गर्दी केली. सोहळ्याचे औचित्य साधून खासबाग येथील राधाकृष्ण सत्कार्य सवंर्धन मंडळाच्यावतीने शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी आणि पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी अध्यक्ष प्रदीप मराठे, उपाध्यक्ष विवेक कोरडे यांच्यासह मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

...

चौकट

राजर्षी शाहू सलोखा मंचतर्फे समता ज्योतीचे आयोजन करण्यात आले होते. कसबा बावडा येथील शाहू जन्मस्थळापासून ज्योत घेवून शाहूप्रेमी समाधीस्मारकस्थळी दाखल झाले. तेथून शाहू मॅरेथॉन मंडळाचे कार्यकर्ते ज्योत घेवून दसरा चौक, शिवाजी चौक, बिंदू चौक, मिरजकर तिकटी येथून बिनखांबी गणेश मंदिर येथे दाखल झाले. तेथे 'शाहू मिल बचाव' या आशयाच्या डिजीटल फलकाजवळ ज्योत ठेवण्यात आली. यावेळी मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना शाहू महाराजांच्या जीवन चरित्रावरील पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शक्तीप्रदर्शनाने सत्ताधारी दाखल करणार ठराव

$
0
0

गोकुळ निवडणूक ... लोगो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीसाठी सत्ताधारी संचालक मंडळाकडून शक्तीप्रदर्शनाद्वारे ठराव दाखल केले जाणार आहे. ताराबाई पार्क येथील गोकुळच्या कार्यालयात आज, सोमवारी (ता.२०) आमदार पी.एन. पाटील आणि माजी आमदार महादेराव महाडिक यांच्याकडे सत्ताधारी मंडळातील संचालक ठराव देण्यात येणार आहेत. २५०० ठराव गोळा करण्यात आले आहेत, असा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे.

गोकुळच्या निवडणुकीसाठी ३६५९ क्रियाशील मतदार आहेत. मतदार असलेल्या दूध संस्थांकडून मतदारांचे ठराव दाखल करण्याची प्रक्रिया महिनाभर सुरू असून सत्ताधारी आणि विरोधकांकडून ठराव गोळा केले जात आहेत. काही संचालकांनी थेट पन्नास हजार रुपयांपासून दीड लाख रुपये मोजून ठराव खरेदी केले आहेत. ६५ ते ७० टक्के ठराव गोळा केल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. सोमवारी सकाळी साडेदहा वाजता पी.एन. पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडे ठराव देण्यात येणार आहेत.

दरम्यान, विरोधकांकडूनही ठराव गोळा करण्यात आले असून तेही आज, सोमवारी ठराव दाखल करण्याची शक्यता आहे. विरोधकांनी सोमवारी ठराव दाखल केले तर सत्ताधारी मंगळवारी (ता. २१)सहनिबंधक दुग्ध विभागाला ठराव देणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तेरा हजार शिक्षकांनी दिली टीइटी परीक्षा

$
0
0

म.टा.प्रतिनिधी,कोल्हापूर

महा-टीईटी परीक्षा शहरातील विविध ४४ केंद्रावर रविवारी दोन सत्रात पार पडली. पेपर क्रमांक एकसाठी ६५९६ शिक्षक तर तर पेपर क्रमांक दोनसाठी ६५१३ शिक्षक उपस्थित होते. एकूण नोंदणीपैकी १४ शिक्षकांनी परीक्षेला दांडी मारली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने रविवारी शहरातील विविध शाळा, महाविद्यालयात टीईटी परीक्षा झाली. सकाळपासून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून उमेदवार परीक्षा केंद्रावर येत असल्याने मोठी गर्दी होती. सकाळच्या सत्रातील पेपर क्रमांक एकसाठी ७०९० उमेदवारांनी नोंदणी केली होती. यापैकी ४९४ परीक्षार्थी गैरहजर राहिले. पेपर क्रमांक दोनसाठी ७०४४ नोंदणीकृत परीक्षार्थींपैकी ५३१ जण अनुपस्थित राहिले. बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, भाषा गणित व परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र हे विषय परीक्षेसाठी होते. परीक्षेसाठी चार भरारी पथके नेमण्यात आली होती. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. सर्व केंद्रांवर परीक्षा सुरळीत झाली, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसेकडूननोटिसींची होळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

संभाजीनगर येथील कामगार चाळ धोकादायक बनली असल्याने महापालिका प्रशासनाने रहिवाशांना नोटिसा दिल्या आहेत. निवारा हिरावून घेणाऱ्या या नोटिसांची होळी शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने महापालिकेच्या मुख्य इमारतींसमोर करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, 'महापालिका कर्मचाऱ्यांसाठी संभाजीनगर येथे कामगार चाळीची उभारणी केली आहे. कर्मचाऱ्यांकडून मासिक वेतनातून घरभाडे घेतले जाते. मात्र या इमारतीची कधीही दुरुस्ती केली नाही. सद्य:स्थितीत इमारत धोकादायक बनली असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून कर्मचाऱ्यांना इमारत खाली करण्यासाठी नोटीस दिली आहे. कर्मचाऱ्यांचा निवारा हिरावून जागा बांधकाम व्यावसायिकांच्या घशात घालण्याचा डाव आखला जात आहे. हा डाव हाणून पाडू.' यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव, बबन चावरे, रितेश पटवणे, नर्मदा पटवणे, पूजा पटवणे, रेवती धनवाल आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विविध शिष्टमंडळांनी घेतली पवारांची भेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'राज्यात बांधकाम क्षेत्र हे अत्यंत आव्हानात्मक व मंदावलेल्या अवस्थेतून जात असून त्यासाठी राज्य सरकारने प्रोत्साहन आणि उत्तेजन द्यावे', अशी मागणी 'क्रिडाई' ने खासदार शरद पवार यांच्याकडे केली. क्रिडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष राजीव परीख, जिल्हाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, माजी अध्यक्ष महेश यादव यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. बांधकाम व्यावसायिक व्ही.बी. पाटील यांच्या निवासस्थानी अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पवारांची भेट घेऊन निवेदने दिली.

'क्रिडाई'ने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, बांधकाम व्यवसाय हा देशातील संपत्ती आणि रोजगार निर्मिती करणारा दुसऱ्या क्रमांकाचा व्यवसाय आहे. महाराष्ट्र सरकारने सर्वसमावेशक विकास नियंत्रण नियमावली तयार केली असून त्याचा अध्यादेश काढलेला नसल्याने प्रकल्प रखडले आहेत. नवी नियमावली लवकर प्रसिद्ध करावी. काही प्रकल्पांना रेरा रजिस्ट्रेशन सक्तीचे नसल्याचे स्पष्टीकरण महारेरा नोंदणी कार्यालयाला कळवले आहे. तरीही महारेराकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे दस्त नोंदणी घटली आहे. रहिवासी विभागातील भोगवटदार वर्ग १ या विभागातील जमिनी आपोआप बिगरशेती करण्याची तरतूद असूनही बऱ्याच कागदपत्रांची मागणी करुन नागरिकांची अडचण केली जात आहे. गेली दोन वर्षे रेडिरेकनरच्या किंमतीत वाढ झालेली नव्हती. यावर्षी व्यवसायाची परिस्थिती बिकट असल्याने रेडिरेकनरच्या किंमतीमध्ये वाढ न करता काही विभागातील वास्तवता पाहून किंमती कमी कराव्यात.

मागासवर्गीय महामंडळाचे कर्ज सरसकट माफ करावे, अशी मागणी अखिल भारतीय चर्मकार सेवा संघाने केली. या शिष्टमंडळात संघाचे राज्याध्यक्ष रघुनाथ मोरे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल नांगरे, शहराध्यक्ष रमेश टोणपे, हिंदूराव पोवार, भगवान रोटे यांच्यासह कार्यकर्त्यांचा समावेश होता.

...

हिंद केसरी कुस्ती स्पर्धा आयोजनाची मागणी

कोल्हापूरला हिंद केसरी कुस्ती स्पर्धा आयोजनाची संधी द्यावी, अशी मागणी कोल्हापूर शहर आणि जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाने केली. पवार हे राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. तालीम संघाचे अध्यक्ष व्ही.बी. पाटील, सचिव अॅड महादेवराव आडगुळे, हिंदकेसरी दिनानाथसिंह, विनोद चौगुले, नामदेव मोळे, विष्णू जोशीलकर, संभाजी वरुटे यांच्या शिष्टमंडळाने पवारांना निवेदन दिले.

...

जिल्ह्यातील नेत्यांनी घेतली पवारांची भेट

व्ही.बी. पाटील यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाच्यावेळी जिल्ह्यातील नेत्यांनी पवारांची भेट घेतली. त्यामध्ये आमदार प्रकाश आवाडे, पी.एन. पाटील, खासदार संभाजीराजे छत्रपती, धैर्यशील माने, माजी आमदार श्रीपतराव शिंदे, के.पी.पाटील, मालोजीराजे यांचा समावेश होता. यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती, महापौर सूरमंजिरी लाटकर, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री, हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील आदी नेते, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

...

महाराष्ट्र एकिकरण समितीचे निवेदन

महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, सात डिसेंबर रोजी सुप्रीम कोर्टातील स्थितीबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती. या बैठकीत चांगले निर्णय झाले असून त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली. शिष्टमंडळात खजिनदार प्रकाश मरगाळे, दिनेश ओऊळकर, महेश जुवेकर, प्रकाशबापू पाटील, महादेव मंगणरकर, सुनिल आनंदाचे यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्धव ठाकरेंनी तहसीलदारासाठी सोडली खुर्ची

$
0
0

सांगली: राजकारणात सगळी धडपड ही खुर्ची मिळवण्यासाठीच सुरू असते असं म्हटलं जातं. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेगळे उदाहरण निर्माण करून लोकांना आश्चर्याचा धक्का दिला. मुख्यमंत्री सांगलीतील वाळवा तालुक्यातील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. उद्घाटनानंतर इमारतीची पाहणी करण्यासाठी ते तहसीलदार कार्यालयात पोहोचले. तिथे त्याना तहसीलदाराच्या खुर्चीवर बसवण्यात आले. मात्र, बसल्यानंतर ही तहसीलदारांची खुर्ची असल्याचे समजताच मुख्यमंत्री त्या खुर्चीवरून उठले आणि त्यांनी सन्मानाने खुर्चीवर तहसीलदाराला बसवले. मुख्यमंत्र्यांच्या या वागणुकीमुळे त्यांचे कौतुक होत आहे.

'पैशाची कमी नाही, सरकारमध्ये निर्णय घेण्याची हिंमत नाही'


'ही खुर्ची तुमची आहे'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खुर्चीवरून उठले आणि समोर उभे असलेले नेते आणि मोठ्या अधिकाऱ्यांच्या गर्दीत उभे असलेले तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्या जवळ गेले. मुख्यमंत्र्यांनी तहसीलदाराला खुर्चीपर्यंत आणले. त्यांनी विचारले, ' तुम्हीच तहसीलदार आहात ना?. मग ही खुर्ची तुमच्यासाठी आहे, तुम्हीच या खुर्चीवर बसा.'

'नाइट लाइफ'ला ब्रेक? पोलिसांची तयारी नाही

उद्धव यांची साधी वागणूक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सहज आणि साधी वागणूक पाहून सर्वजणांनी त्यांची प्रशंसा केली आहे. मात्र, जेव्हा जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, मंत्री, राज्यमंत्री यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या आग्रहामुळे शिष्टाचाराचा भाग म्हणून तहसीलदार खुर्चीवर बसण्यास तयारच होईनात तेव्हा खरी गम्मत आली. मी या खुर्चीवर कसे बरे बसू शकतो, असे तहसीलदार नम्रपणे म्हणाले. तेव्हा मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, 'ही इमारत तुमची आहे, इथले प्रमुख अधिकारी या नात्याने तुम्हाला काम करायचे आहे, ही खुर्ची तुमची आहे, या खुर्चीवर मी स्वत: तुम्हाला बसवत आहे.'

सेना-काँग्रेस आघाडीचा प्रस्ताव २०१४ मध्येही!

तहसीलदार खुर्चीवर बसले

शेवटी तहसीलदार रवींद्र सबनीस यांना खुर्तीवर बसावे लागले. मुख्यमंत्री त्यांच्या शेजारी उभे राहिले. त्यानंतर या कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य लोकांशी देखील अधिकारी चांगला व्यवहार करतील, त्यांचा यथोचित सन्मान करतील, अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री तर उद्घाटन करून निघून गेले. मात्र, त्यानंतर जेव्हा जेव्हा मी या खुर्चीवर बसलो, तेव्हा तेव्हा मुख्यमंत्री माझ्या बाजूला उभेच आहेत असे मला वाचत राहते, असे तहसीलदार संबनीस यांनी सांगितेल. मुख्यमंत्र्यांचा सुसंस्कृतपणा, साधेपणा आणि त्यांनी आमचा केलेला सन्मान यामुळे सर्व कर्मचारी प्रभावित झाले आहेत. या सन्मानामुळे आमचे काम पूर्ण जबाबदारीने करण्याची प्रेरणा आम्हाला मिळत राहील, असेही सबनीस म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोल्हापूरच्या तन्वीच्या हाती मुंबई रेल्वेचे स्टेअरिंग

$
0
0

Anuradha.kadam@timesgroup.com

कोल्हापूर
परिघाबाहेरील करिअरचे आकाश शोधणाऱ्या आणि अथक परिश्रमातून तिथंपर्यंतचे ध्येय गाठणाऱ्या मुलींच्या पंक्तीत कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगे या छोट्या गावातील तन्वी तानाजी चौगुले हिचे नाव समाविष्ट झाले आहे. मुंबईच्या पश्चिम रेल्वेमध्ये लोको पायलट म्हणून तन्वीने स्टेअरिंग हाती घेऊन यशस्वी करिअरचा प्रेरणादायी प्रवास सुरू केला आहे. जिल्ह्यातील पहिली महिला लोको पायलट म्हणून तन्वीने कोल्हापूरला नव्या वर्षाची भेट दिली आहे.

वडणगे या गावात शेतकरी कुटुंबातील ही कन्या. गावातल्या शाळेत सातवीपर्यंतचे शिक्षण घेऊन कोल्हापुरातील एमएलजी शाळेतून माध्यमिक शिक्षण तन्वीने पूर्ण केले. मेकॅनिकल या विषयात
रस असल्याने या शाखेतून तिने पदवी घेतली. महाविद्यालयीन जीवनापासूनच करिअरची वेगळी वाट निवडण्याचे स्वप्न तिला खुणावत होते. त्यासाठी सतत तन्वीची शोधक नजर वर्तमानपत्रे, तज्ज्ञांची व्याख्याने यामध्ये नवं काही करण्याची ऊर्मी देणारे शब्द शोधायची. दरम्यान, रेल्वे खात्यात लोकापायलट या पदासाठीची जाहीरात तिच्या वाचनात आली. अर्ज केल्यानंतरच तन्वी या पदाच्या परीक्षेच्या तयारीसाठी लागली. लेखी परीक्षेसोबत या पदासाठी मानसिक सक्षमतेचीही चाचणी द्यावी लागते. हजारो प्रवाशांचा जीव लोको पायलटच्या हातात असल्याने तसेच इमर्जन्सीमध्ये येणाऱ्या प्रसंगात त्वरीत निर्णय घेणे, प्रसंगावधान राखणे यासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक असते. पूर्व, मुख्य आणि मानसिक चाचणी या परीक्षांमध्ये तन्वीने बाजी मारली आणि तिचा प्रशिक्षणाच्या दिशेने प्रवास सुरू झाला. वडणगेसारख्या ग्रामीण भागातून केवळ शिक्षणासाठी शहरात आलेल्या तन्वीला रेल्वे खात्याच्या परीक्षेचे मार्गदर्शन नसतानाही तिने जिद्दीने यश मिळवले.

या परीक्षेसाठी बिहार, उत्तर प्रदेशमधून अधिक अर्ज आले होते. त्यातही मुलींची संख्या खूपच कमी होती. या पदासाठी आवश्यक असलेले मनोधैर्य मला माझ्या ग्रामीण जीवनशैलीने दिले. या पदासाठी अंतिम निवड झालेल्या देशातील तीन मुलींमध्ये मला स्थान मिळाल्याचा आनंद आहे.
तन्वी चौगुले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिनविरोधसाठी प्रस्ताव

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत आमच्याकडे सोमवारअखेर २२०० ठराव जमा आहेत. सत्तारुढ गटाला कोणतीही अडचण नाही. मात्र, दूध संघांच्या हितासाठी सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची आमची भूमिका असून संचालक मंडळात विरोधकांनाही जागा देण्याची तयारी आहे. विरोधकांना सामावून निवडणूक बिनविरोध करण्याची तयारी आहे. बिनविरोधाचा प्रस्ताव मी स्वत: विरोधकांकडे घेऊन जाईन' असे 'गोकुळ'मधील सत्तारुढ गटाचे नेते, काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांनी सांगितले. दरम्यान, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा झाली आहे. ते निवडणुकीपासून बाजूला थांबायला तयार आहेत असे सांगताना गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासोबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.

गोकुळच्या ताराबाई पार्कातील कार्यालयात आमदार पी. एन. पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडे ठराव देण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार पाटील म्हणाले, 'निवडणुकीसंदर्भात ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्यासोबत चर्चा झाली आहे. त्यांचा मल्टिस्टेटला विरोध होता. संचालक मंडळाने हा ठराव रद्द केला. वाहतूक आणि वाहनांवरील खर्चाविषयी तक्रारी होत्या. आम्ही वाहने बंद केली. उत्पादक व दूध संघांच्या हितासाठी जे आवश्यक आहे ते कराला आम्ही तयार आहोत. यात कसलेही राजकारण नाही. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची तयारी आहे. मुश्रीफ यांच्यासोबत झालेल्या चर्चेत त्यांनी निवडणुकीपासून बाजूला थांबतो असे सांगितले होते. निवडणूक बिनविरोध करण्याची तयारी आहे. यासाठीचा प्रस्ताव मी स्वत: विरोधकांकडे घेऊन जायला तयार आहे. आतापर्यंत २२०० ठराव जमा झाले आहेत. आणखी काही लोक आमच्यासोबत येतील. सर्वांचे गैरसमज दूर होतील.'

'निवडणुकीसाठी सत्तारुढ गटाला अडचण नाही. संघाचा कारभार उत्कृष्टपणे सुरू आहे. केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर संघाच्या कामगिरीचे कौतुक झाले आहे. सहा लाख दूध उत्पादक, शेतकऱ्यांचे हित नजरेसमोर ठेऊन कामकाज सुरू आहे' असे आमदार पाटील म्हणाले.

महाडिकांनी प्रश्न टाळला

माजी आमदार महाडिक, चेअरमन आपटे हे पत्रकार परिषदेवळी उपस्थित होते. सध्याच्या घडामोडींविषयी महाडिक यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी 'आमदार पी. एन. पाटील बोलले आहेत. त्यांनी बोलल्यानंतर पुढे काही बोलायचे नसते. ते बोलले यातच सगळे आले' असे सांगत प्रश्न टाळला.

'काय घडले माहीत नाही'

गोकुळचे संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे यांनी स्वतंत्रपणे ठराव जमा केले. त्यांच्यासोबत शशिकांत पाटीलही होते. यासंदर्भात आमदार पाटील म्हणाले, 'पाटील, डोंगळे हे संचालक आहेत. विश्वास पाटील यांच्यासोबत चर्चा झाली होती. मात्र, अचानक काय घडले? याविषयी मला कल्पना नाही. अधिवेशनानिमीत्त मी मुंबई आणि नागपुरात असल्यामुळे कार्यकर्त्यांना ठराव विश्वास पाटील यांच्याकडे द्यायला सांगितले होते. त्यांचा आणि आमचा गट एकच आहे. आम्ही एकत्र आहोत. मात्र डोंगळे का नाराज आहेत मला माहीत नाही. शशिकांत पाटील संचालक नाहीत.'

(मूळ कॉपी)

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीत सत्ताधारी घटकाला कोणतीही अडचण नाही. सत्ताधाऱ्यांकडे सोमवारअखेर २२०० ठराव जमा आहेत. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा केली आहे. ते निवडणुकीपासून बाजूला थांबतो असे म्हटले आहेत. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासोबत कसलीही चर्चा झाली नाही. मुळात गोकुळ हा शेतकऱ्यांचा दूध संघ आहे. दूध संघांच्या हितासाठी सगळयांना बरोबर घेऊन जाण्याची आमची भूमिका आहे. संचालक मंडळात विरोधकांनाही जागा देण्याची तयारी आहे. विरोधकांना सामावून घेऊन गोकुळची निवडणूक बिनविरोध करण्याची आमची तयारी आहे. बिनविरोधाचा प्रस्ताव मी स्वत: विरोधकाकडे घेऊन जाईन' असा नवा पवित्रा गोकुळमधील सत्ताधारी घटकाचे नेते आणि काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांनी घेतला.

'गोकुळ'च्या निवडणुकीसाठी सत्ताधारी संचालक मंडळाकडून दूध संस्थाचे ठराव सोमवारी जमा केले. ताराबाई पार्क येथील गोकुळच्या कार्यालयात आमदार पी. एन. व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडे ठराव दिले. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना आमदार पाटील यांनी, 'आगामी, 'गोकुळ'च्या निवडणुकीत सत्ताधारी घटकाला कोणतीही अडचण नाही. गोकुळचा कारभार हा उत्कृष्टपणे सुरू आहे. केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर गोकुळच्या कामगिरीचे कौतुक झाले आहे. सहा लाख दूध उत्पादक व शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून कामकाज केला जातो.'

मुश्रीफांसोबत चर्चा, गृहराज्यमंत्र्यासोबत कसलीही चर्चा नाही

पी. एन. म्हणाले, 'गोकुळच्या निवडणुकीसंदर्भात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत चर्चा झाली आहे. मल्टिस्टेला विरोध होता. संचालक मंडळाने मल्टिस्टेटचा ठराव रद्द केला. वाहतूक आणि वाहनांवरील खर्चाविषयी तक्रारी होत्या. आम्ही वाहने बंद केली. दूध उत्पादक व दूध संघांच्या हितासाठी जे आवश्यक आहे ते कराला आम्ही तयार आहोत. यामध्ये कसलेही राजकारण नाही. सगळयांना बरोबर घेऊन जाण्याची तयारी आहे. मुश्रीफांसोबत झालेल्या चर्चेत त्यांनी निवडणुकीपासून बाजूला थांबतो असे म्हटले होते. गोकुळची निवडणूक बिनविरोध करण्याची तयारी आहे. बिनविरोधाचा प्रस्ताव मी स्वत विरोधकांकडे घेऊन जायला तयार आहे.सोमवार दुपारअखेर २२०० ठराव जमा झाले आहेत.अजून काही लोक आमच्यासोबत येतील. गैरसमज दूर होतील'

........................

पी. एन. बोलले की झाले

माजी आमदार महादेवराव महाडिक, गोकुळचे चेअरमन रवींद्र आपटे हे पत्रकार परिषदेवळी उपस्थित होते. गोकुळमधील सध्याच्या घडामोडीविषयी माजी आमदार महाडिक यांना पत्रकारांनी छेडले. त्यावर महाडिक यांनी 'आमदार पी. एन. पाटील बोलले आहेत. त्यांनी बोलल्यानंतर पुढे काही बोलायचे नसते. पी. एन. बोलले सगळे झाले'असे उत्तर देत अधिक बोलणे टाळले.

................

अचानक काय घडले माहित नाही

गोकुळचे संचालक विश्वास पाटील व अरुण डोंगळे हे गोकुळ कार्यालयात न येता स्वतंत्रपणे ठराव जमा केले. त्यांच्यासोबत शशिकांत पाटील ही होते. यासंदर्भात आमदार पी. एन. म्हणाले, 'विश्वास पाटील व अरुण डोंगळे हे संचालक आहेत. तर शशिकांत पाटील काही संचालक नाहीत. विश्वास पाटील यांच्यासोबत चर्चा झाली होती. मात्र अचानक काय घडले ? याविषयी मला काही कल्पना नाही. मी अधिवेशनच्या कालावधीत मुंबईत आणि नागपुरात असल्यामुळे कार्यकर्त्यांना ठराव विश्वास पाटील यांच्याकडे द्यायला सांगितले होते. त्यांचा आणि आमचा गट एकच आहे. आम्ही सगळे एकत्र आहोत. मात्र डोंगळे का नाराज आहेत मला माहित नाही.'

.......................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापुरातील पुलांची चेन्नई आयआयटीद्वारे तपासणी

$
0
0

Uddhav.Godase @timesgroup.com Tweet : Uddhavg_MT कोल्हापूर : ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील बहुतांश महत्त्वाच्या मार्गांवरील पूल पाण्याखाली गेले होते. महापूर ओसरताच पुलांचे प्राथमिक सेफ्टी ऑडिट करून वाहतूक सुरू झाली. पाण्यातील पुलांची शास्त्रीय तपासणी करण्यासाठी चेन्नई आयआयटीचे पथक दाखल झाले असून, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील प्रमुख ४५ पुलांची तपासणी सुरू आहे. तपासणीनंतर उपाययोजनांचा अहवालही पथकाकडून मिळणार आहे. यंदा विक्रमी अतिवृष्टीने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापुराचा जनजीवनावर परिणाम झाला. दोन्ही जिल्ह्यातील प्रमुख रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. पुणे-बेंगलोर, कोल्हापूर-रत्नागिरी, कोल्हापूर-सांगली या महामार्गांसह कोल्हापूर-गगनबावडा, कोल्हापूर-राधानगरी अशा सर्वच प्रमुख मार्गांवर महापुराचे पाणी होते. कोल्हापूर जिल्ह्यात ४७९ पूल आहे, तर सांगली जिल्ह्यात ४५२ पूल आहेत. यातील बहुतांश पूल पाण्याखाली गेल्याने त्यांच्या सुरक्षेची चिंता वाढली होती. पंचगंगा नदीवरील शिवाजी पूल, नवीन पर्यायी पूल, महामार्गावर वारणा नदीवरील पूल काही काळासाठी वाहतुकीसाठी बंद ठेवले होते. महापूर ओसरताच सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलांची प्राथमिक तपासणी केली. सुरक्षित पुलांवरून वाहतूक पूर्ववत सुरू केली. मात्र, पाण्याखालील पुलांचे खांब, बांधकामाचा दर्जा याची नेमकी तपासणी करण्याचे साधन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे उपलब्ध नव्हते. पुरात वाहून आलेले लाकडाचे ओंडके आणि अवजड वस्तुंमुळे पुलाच्या बांधकामासही धोका पोहोचू शकतो. याशिवाय भूस्खलन, गाळ, वाळू वाहून जाण्यामुळे पाण्यातील खांबांवरही परिणाम होऊ शकतो. याची माहिती मिळवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रयत्न सुरू होते. चेन्नई येथील आयआयटीचे तज्ज्ञ प्राध्यापक आणि संशोधक विद्यार्थी पाण्यातील पुलांची शास्त्रीय तपासणी करीत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने यांना मिळाली. त्यांच्याशी माने यांनी संपर्क साधून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुलांची तपासणी करण्याची विनंती केली. चेन्नई आयाआयटीचे पथक कोल्हापुरात दाखल झाले असून, त्यांच्याकडून महापुरातील पुलांची तपासणी सुरू आहे. अत्याधुनिक साधनांद्वारे पुलाची बाह्यस्थिती, पाण्यातील खांबांची स्थिती आणि बांधकामांचा दर्जाही तपासला जात आहे. आरओव्ही मशीनद्वारे (रिमोटली ऑपरेटेड व्हेईकल) पाण्यात ८० मीटर खोल जाता येते. लेजर किरणांद्वारे पुलांच्या नुकसानीची नेमकी माहिती मिळते. कॅमेऱ्यांद्वारे फोटो आणि व्हिडिओ मिळतात. मार्च २०२० पर्यंत दोन्ही जिल्ह्यातील सर्व प्रमुख पुलांची तपासणी होणार आहे. यानंतर जीर्ण किंवा धोकादायक पुलांची आवश्यक डागडुजी केली जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्री पदावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत ठिणगी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून सुरू झालेल्या इर्ष्येने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ठिणगी पडली आहे. आपले ज्येष्ठत्व डावलू नये, यासाठी कॉँग्रेसने बाहेरच्या जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्याची पालकमंत्रीपदी नियुक्ती करावी, असा आग्रह ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी धरला होता. मात्र, गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांनी राजकीय ताकतीचा वापर करून पालकमंत्रीपदी स्वत:ची वर्णी लावल्याने मंत्री मुश्रीफांच्या गोटात नाराजी आहे. या नाराजीतूनच राष्ट्रवादीमधून काँग्रेसविरोधात मोठी धूसफूस सुरू झाली आहे.

महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या करण्यावरून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये पेच निर्माण झाला होता. ज्या जिल्ह्यात आपले आमदार जास्त असतील, तिथे कॉँग्रेसचे पालकमंत्री असतील असा तोडगा काँग्रेसने काढला. यानुसार पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात पालकमंत्रीपदावरून ज्येष्ठत्वाचे राजकारण रंगले. जिल्ह्यातील ज्येष्ठ मंत्री असल्याने सन्मानाने पालकमंत्रीपद मिळावे, अशी ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांची अपेक्षा होती. ज्येष्ठत्वानुसार पालकमंत्रीपद मिळणार नसल्यास जिल्ह्याच्या राजकारणात आपल्यापेक्षा ज्युनिअर असलेले सतेज पाटील यांना ते मिळू नये, असा मुश्रीफ यांचा अप्रत्यक्ष आग्रह होता. तशी कल्पना त्यांनी वरिष्ठांना दिली. त्यामुळे कॉँग्रत्ने प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी घोषणा झाली.

नंतर नाट्यमयरित्या मंत्री थोरातांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिला. त्यांच्याजागी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे नाव जाहीर झाले. मात्र, कदम हे तरुण असल्याने जिल्ह्यातील कॉँग्रेसमधून त्यांनाही विरोध झाला. दरम्यान, मंत्री मुश्रीफ यांनी पदावरील आपला दावा कायम ठेवला. 'सतेज पाटील यांनी मोठ्या मनाने मोठ्या भावाला संधी द्यावी,' असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांनी मंत्री पाटील यांनाही याबाबत विनंती केली होती. कॉँग्रेसच्या नियमाला बगल देऊन अहमदनगर आणि कोल्हापूरमध्ये परस्पर बदल करावा, यासाठीही त्यांनी प्रयत्न केले.

मात्र कॉँग्रेसश्रेष्ठींनी अखेर कोल्हापूरसाठी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या नावाची घोषणा केली. घोषणेनंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी मंत्री मुश्रीफ आणि पाटील एकत्र रेल्वेने कोल्हापुरात पोहोचले. रेल्वे स्टेशनवर पालकमंत्र्यांचे जंगी स्वागत झाले. 'कोण म्हणतंय होत नाही, झाल्याशिवाय राहत नाही,' अशी घोषणाबाजी करीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुश्रीफ यांना खिजवण्याची संधी सोडली नाही. 'सतेज यांनाच पालकमंत्री का केले हे लवकरच कळेल' असे विधान महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. त्यामुळे राष्ट्रवादीतील नाराजीचे परिणाम गेल्या दोन दिवसातील घटनांमध्ये दिसले आहेत.

पालकमंत्रीपदावरून दोन्ही पक्षांतील नाराजी वाढत राहिल्यास त्याचे परिणाम जिल्ह्यातील राजकारणावर होऊ शकतात. गोकुळ दूध संघ, जिल्हा बँक आणि कोल्हापूर महापालिका या संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नाराजी दोन्ही काँग्रेससाठी घातक ठरू शकते. मुश्रीफ यांची विरोधाची उघड भूमिका नसली तरी, राजकीय महत्त्वाकांक्षा आणि इर्ष्या लपून राहिलेली नाही. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू झाल्यास स्थानिक राजकारण आणि विकासावरही याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मंत्री मुश्रीफांकडून उल्लेखाची टाळाटाळ

पालकमंत्री पदी सतेज पाटील यांची निवड झाल्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना नाराजी लपवता आली नाही. राजर्षी शाहू महाराज समाधी लोकार्पण सोहळ्यातील कार्यक्रमात त्यांनी सतेज पाटील यांचा उल्लेख करताना पालकमंत्री म्हणण्याऐवजी गृह राज्यमंत्री म्हणण्यास प्राधान्य दिले. त्यावरून दोघांत दरी निर्माण झाल्याचे स्पष्ट होते.

ज्येष्ठत्वाच्या निकषावर पालकमंत्रीपद मिळावे, अशी माझी भूमिका होती. मंत्री सतेज यांनादेखील मी विनंती केली होती. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला संधी द्यावी किंवा कोल्हापूर आणि अहमदनगरमध्ये परस्पर बदल करावा असाही माझा प्रस्ताव होता. पण, यावर विचार झाला नाही. आता पालकमंत्री झालेल्या पाटील यांना माझ्या शुभेच्छा आहेत.

- हसन मुश्रीफ, ग्रामविकास मंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोगस डॉक्टरांवर कारवाई करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'शहरासह जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी भिंतींवर डॉक्टरांच्या जाहिराती मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. त्यामध्ये त्यांचा पत्ताही दिला आहे. त्यांची तपासणी करावी. बोगस डॉक्टरांविरुध्द जिल्ह्यात व्यापक मोहीम राबवावी. संबंधीतावर कारवाई करावी,' असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी आरोग्य प्रशासनास दिले. स्पर्श कुष्ठरोग, क्षयरोग जनजागृती अभियान राबविण्यासंबंधी आयोजित जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थिती होते. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, 'वैद्यकीय आणि जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट योग्यरित्या होते की नाही याबाबतही तपासणी करा. ग्रामपंचायतींच्या प्रशासनाने गॅस दाहिनी प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा. सुरुवातील मोठ्या ग्रामपंचातींमध्ये प्रकल्प उभारण्याबाबत प्रयत्न करावेत.'

मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल म्हणाले, 'शहरी भागात महिन्याला किमान पाच तर ग्रामीण भागामध्ये किमान तीन बोगस डॉक्टर शोधण्याचे उद्दिष्ट पथकाला द्यावे. मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टर आहेत. त्यांच्याबाबत शोधमोहीम राबवावी. संबंधीत बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल करावेत.'

बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, आरोग्य सेवा विभागाचे (कुष्ठरोग) सहायक संचालक डॉ. प्रकाश पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मानसी कदम, डॉ. हर्षला वेदक, डॉ. अमोलकुमार शंकर माने, डॉ. शुभांगी रेंदाळकर, डॉ. बाबासाहेब लंब आदी उपस्थित होते.

कुष्ठरुग्ण निर्मूलन मोहीम

'कुष्ठरोगाविरुद्ध अखेरचे युध्द' या घोषवाक्यानुसार ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी यांदरम्यान स्पर्श कुष्ठरोग जनजागृती मोहीम यशस्वी करा. क्षयरोग आणि कुष्ठरोगमुक्त जिल्हा करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सहकार्य करावे. लवकर रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करावेत. जनजागृतीसाठी शाळा, महाविद्यालयत जावे. कुष्ठरोग निर्मूलनासंबंधी शपथ घ्यावी,' असे आवाहन जिल्हाधिकारी देसाई यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images