Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

संगणक निरक्षरांची खातेनिहाय चौकशी

0
0

महापालिका ... लोगो

संगणकाचे चित्रही टाकता येईल.

........

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर

राज्य सरकारच्या निर्देशानुसार एमएससीआयटी (महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) प्रमाणपत्र सरकारी कर्मचाऱ्यांना बंधनकारक केले आहे. पण असे प्रमाणपत्र असूनही संगणक हाताळता येत नसलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी होणार आहे. त्याबाबतचे आदेश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सर्व विभागप्रमुखांना दिले. यापूर्वी असे प्रमाणपत्र नसलेल्या १३ कर्मचाऱ्यांची दरवर्षी होणारी वेतनवाढ रोखलेली असतानाच प्रमाणपत्र असूनही संगणक चालवता येत नसलेले कर्मचारी कारवाईच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गतिमान प्रशासन आणि कमीत-कमी कागदांचा वापर होण्यासाठी राज्य सरकारने २०१३ मध्ये सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना एमएससीआयटी प्रमाणपत्र बंधनकारक केले. या निर्णयातून ५५ वर्षांवरील कर्मचाऱ्यांना सूट देताना इतर कर्मचाऱ्यांना दरवर्षीची आयोगाच्या शिफारसीनुसार मिळणारी वेतनवाढ रोखणार असल्याचे नमूद करण्यात आले. या आदेशाची धास्ती घेवून अनेक कर्मचाऱ्यांनी ऐनकेनप्रकारे प्रमाणपत्र मिळवले. ज्यांना प्रमाणपत्र मिळाले नाही, त्यांना दरवर्षी जुलै महिन्यात वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार होणारी वेतनवाढीला (तीन टक्के) मुकावे लागले. अशा १३ संगणक निरक्षकांना या निर्णयाचा फटका बसला.

पण प्रमाणपत्र असूनही संगणकाचे ज्ञान नसलेले महापालिकेत अनेक कर्मचारी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संगणकावर चालणारा सर्व कार्यभार कार्यालयातील अन्य कर्मचारी किंवा रोजंदारी व ठोक मानधनावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून करुन घेतले जात आहे. महापालिकेत आकृतीबंधानुसार अनेक पदे रिक्त असताना कर्मचाऱ्यांवर वर्कलोड निर्माण होत असतानाच या संगणक निरक्षकांची त्यामध्ये अधिकची भर पडली आहे. कायम कर्मचाऱ्यांसोबत रोजंदारी व ठोकमानधनावरील कर्मचाऱ्यांची संख्या कमी असताना एका-एका विभागात एकाच संगणकावर काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. कामाचा निपटारा योग्य वेळेत होत नसल्याने, विभागप्रमुखांनाही वरिष्ठांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांनी हे प्रकरण थेट आयुक्तांच्या कानावर घातले. त्यांनीही चार ओळीचे पत्र देऊन जबाबदारी न झटकता संगणक प्रमाणपत्र असूनही चालवता येत नसेल, तर त्यांची खातेनिहाय चौकशी करुन यादी द्या, असे आदेशच दिले. चार दिवसांत सर्व विभागप्रमुख त्याबाबतचा अहवाल आयुक्तांना सादर करणार आहेत. त्यामुळे संगणक प्रमाणपत्र असूनही संगणक चालवण्याचे ज्ञान नसणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई होणार याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

...

मूळ वेतनावरच काम

राज्य सरकारने संगणक ज्ञानाची सक्ती केल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी स्वत:मध्ये बदल करुन नवीन तंत्रज्ञानाची कास धरली. त्याचा फायदा कार्यलयीन कामकाजाबरोबरच अभ्यागतांनाही झाला. पण ज्यांना असे प्रमाणपत्र मिळवता आले नाही, त्यांना चांगलाच फटका बसला. जुलै महिन्यात सर्व कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार तीन टक्के वाढ दिली जाते. पण असे प्रमाणपत्र प्राप्त करु न शकलेल्या कर्मचाऱ्यांना अद्यापही मूळ वेतनावरच काम करावे लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठी भाषा वाचवण्यासाठी तरुणाईचा पुढाकार

0
0

फाइल फोटो

Sachin.patil1@timesgroup.com

Tweet@sachinpMT

कोल्हापूर

सध्या सर्वच क्षेत्रांत तंत्रज्ञान आणि इंटरनेटचा वापर वाढला आहे. जगभरात अनेक भाषा वेगाने नष्ट होत असताना इंग्रजीच्या आक्रमणापुढे मराठी भाषा मागे पडत आहे. वाढत्या स्पर्धेत कोणतीही भाषा टिकवण्यासाठी भाषेचा इंटरनेट आणि विकिपीडियावर वावर वाढणे गरजेचे आहे. याच अनुषंगाने सोशल माध्यमावर सातत्याने लिखाण करणाऱ्या तरुणाईने पुढाकार घेत विकिपीडिया शब्दकोश समृद्ध करण्याची मोहीम हाती घेतली आहे. सध्या मराठी विकिपीडियावर ५५ हजार, हिंदी विकिपीडियावर १ लाख तर इंग्रजी विकिपीडियावर ५० लाखांहून अधिक लेख उपलब्ध आहेत.

सरकारी पातळीवर मराठी भाषा संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, इंटरनेट महाजालावर मराठी भाषेचा वावर वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे आवश्यक आहे. यासाठी खुला ज्ञानकोश म्हणून ओळख असलेल्या विकिपीडियाच्या मराठी विभागात प्रत्येकाने लेखन करत योगदान देणे गरजेचे आहे. यासाठी जिल्ह्यातील विविध कॉलेजच्या मराठी भाषा विभागांनी पुढाकार घेतला आहे. यानिमित्ताने इंटरनेटवर विविध हॅशटॅग देऊन स्थानिक संस्कृती, इतिहास, क्रीडा, परंपरा, ऐतिहासिक, पर्यटन ठिकाणे आदींची माहिती मोबाइल आणि संगणक वापरकर्ते विकिपीडियावर अपलोड करू शकतात. विकिपीडियासाठी प्रत्येकाने किमान एक परिच्छेद लिहिल्यास मराठी ज्ञानकोश अधिक समृद्ध होईल.

...

सरकारनेही घेतला पुढाकार

मराठी विकिपीडिया अधिक समृद्ध करण्यासाठी सरकारने विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. मराठी विश्‍वकोश संकेतस्थळावरील माहिती आता विकिपीडियावर उपलब्ध होणार आहे, त्यासाठी विश्‍वकोश मंडळ आणि विकिपीडिया यांच्यात नुकताच करार झाला आहे.

...

बोलीभाषांचा ऑनलाईन

संग्रह करण्याची सुविधा

बोलीभाषांचे जतन व्हावे यासाठी शैलेश खडतरे या तरुणाने पुढाकार घेत बोलीभाषांचा ऑनलाईन संग्रह करण्याची सुविधा इंटरनेटवर उपलब्ध करून दिली आहे. याला अफलातून प्रतिसाद मिळत असून बोलीभाषेतील पाच हजारांहून अधिक शब्दांचा संग्रह झाला आहे. शैलेशने ऑनलाइन शब्दकोशासाठी विशिष्ट गुगल फॉर्म तयार केला असून तो सर्वसामान्यांसाठी सहज उपलब्ध आहे.

...

गुगल इंडिकचा वापर वाढला

पूर्वी मराठी भाषेचे टायपिंग जिकिरीचे होते. गुगलच्या माध्यमातून मराठीसाठी गुगल इंडिक की बोर्ड सहज उपलब्ध झाला आहे. त्याद्वारे मराठी भाषेतून इंटरनेटसाठी मजकूर टाईप करणे सोपे झाले आहे. हा की बोर्ड संपूर्णतः मोफत असल्याने त्याचा वापर मोबाइलधारक करू शकतात.

...

कोट

'बदलत्या काळानुसार इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या भाषेचे जतन होईल. यासाठी मराठी भाषिकांनी तयार असणे गरजेचे आहे. मराठी भाषा टायपिंगचा मुद्दा मागे पडला आहे. गुगुलवर मराठी भाषेतील कोणताही शब्द सर्च केल्यास त्यासंबधी अधिकाधिक माहिती मिळावी यासाठी जास्तीत जास्त लोकांनी इंटरनेट मराठीतून लिखाण करावे.

प्रा. डॉ. प्रकाश हुलेनवार, मराठी भाषा अभ्यासक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक पुरस्कारांना मिळेना मुहूर्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीतर्फे दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा करुन चार महिन्याचा कालावधी उलटला. पहिल्यांदा आचारसंहिता आणि मंत्री महोदयांच्या हस्ते कार्यक्रम करण्याचा आग्रह यामुळे पुरस्कार वितरण लांबणीवर पडत आहे. शैक्षणिक वर्ष संपण्याआधी तरी शिक्षकांचा सन्मान होणार का? अशी विचारणा आता होऊ लागली आहे. शिक्षक संघटनांतर्फे प्रशासनाकडे पाठपुरावा करुनही पदाधिकारी आणि अधिकारी स्तरावरुन कार्यक्रमासाठी चालढकल सुरू असल्याच्या तक्रारी आहेत.

प्राथमिक शिक्षण समितीतर्फे दरवर्षी शिक्षक दिनाचे औचित्य साधून पाच सप्टेंबर रोजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण होते. महापालिका शाळांतील पाच, खासगी शाळांतील पाच, विशेष शिक्ष पुरस्कार दोन आणि आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी दोन अशा बारा जणांचा सन्मान केला जातो. शिक्षक दिनी पुरस्कार वितरणाला वेगळे महत्व आहे. गेल्यावर्षी शिक्षक पुरस्कारांची घोषणा झाली. पण वितरण झाले नाही. त्यामुळे पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा हिरेमोड झाला. विधानसभा निवडणुकीआधी पुरस्कारांची घोषणा झाली. राज्यात सत्ता भाजप, शिवसेनेची तर महापालिकेत सत्ता दोन्ही काँग्रेसची. त्यामुळे गेल्यावर्षी पुरस्कार वितरण लांबणीवर टाकण्यामागे राजकीय कारण दडल्याची चर्चा होती. नंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे कार्यक्रम लांबणीवर पडला.

शिक्षण सभापती श्रावण फडतारे हे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचे समर्थक आहेत. तर उपसभापती सचिन पाटील हे राष्ट्रवादीचे सदस्य आहेत. ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ व राज्यमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम व्हावा म्हणून दोन्ही पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. मात्र राज्य पातळीवरील घडामोडीमुळे मंत्र्यांच्या तारखा निश्चित करताना वेळ चालला आहे. आता नवीन वर्ष उजाडले. पुरस्कार जाहीर करुन चार महिने झाले. शिक्षक संघटनांनी पुरस्कार वितरण व्हावे यासाठी शिक्षण समितीचे प्रशासन व पदाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. मात्र काही झालेले नाही.

यासंदर्भात, शिक्षण समिती सभापती फडतारे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी यासंदर्भात सहकारी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती देऊ असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालनाट्याच्या मंचावर पर्यावरणाचा जागर

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

आदिमानव ते तंत्रज्ञान या युगापर्यंतचा मानवी प्रवासातील खाचखळगे, अस्वच्छतेचे दु:ष्परिणाम, पर्यावरणाच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या चळवळी, आंदोलने, जागतिक तापमानवाढीचे धोके, प्रदूषणातून होणारे आजार यांसह विविध विषयातून पर्यावरणाचा जागर करणाऱ्या नाट्यकृतींनी बालरंगकर्मींनी रसिकांना अंतर्मुख केले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, इको फोक्स व्हेंचर आणि प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्यावतीने राज्यस्तरीय माध्यमिक पर्यावरण बालनाट्य महोत्सवास सोमवारपासून संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात सुरूवात झाली.

महोत्सवाचे यंदा १२ वे वर्ष असून विद्यार्थीवयात मुलांमध्ये पर्यावरण रक्षणाविषयी जागरूकता निर्माण व्हावी तसेच अंगभूत अभिनय कलेला योग्य दिशा मिळावी या उद्देशाने हा महोत्सव आयोजित केला जातो. महोत्सवात पहिल्या दिवशी ग्रामीण विभागातून पोहाळे येथील नवनाथ हायस्कूल, भैरवनाथ शिक्षण संस्था, पाचगाव येथील माध्यमिक विद्यालय, आंबवडे येथील आदर्श विद्यालय, भुयेवाडी येथील भैरवनाथ माध्यमिक विद्यालय बाचणी येथील ज्ञान प्रबोधिनी इंग्लिश स्कूल, गिजवणे हायस्कूल यांचे सादरीकरण झाले.

पाचगावच्या माध्यमिक विद्यालयातर्फे 'गॅझेट' हे नाटक सादर करत वाहवा मिळवली. माणसाच्या आदिमानव या अवस्थेपासून आजच्या तंत्रज्ञानयुगातील प्रगतीपर्यंतचा प्रवास मांडत असताना त्याला अनेक गोष्टींचे सुख घेता आले नाही याकडे लक्ष वेधणारे हे नाटक होते. पोहाळे येथील नवनाथ हायस्कूलच्या विद्यार्थी रंगकर्मींनी 'ग्रेट ग्रेट ग्रेटा' या नाटकातून प्रदूषणाने निसर्गावर केलेल्या आक्रमणाला अधोरेखित केले. वाढत्या प्रदूषणामुळे माणसाला कोणते धोके निर्माण होतील याचा वेध या नाटकातून घेण्यात आला. बाचणीच्या ज्ञान प्रबोधिनी हायस्कूलतर्फे 'वनकन्या' हे नाटक सादर करण्यात आले. रामायण या महाकाव्यात भेटणाऱ्या शबरीच्या पर्यावरणप्रेमाची ही गोष्ट रुपक माध्यमातून विद्यार्थ्यांनी सादर केली. गिजवणे हायस्कूलने 'हिरवी बाभळ' हे नाटक सादर केले.

१४ जानेवारीला शहरी विभागातून म. ल. ग. हायस्कूल, दादासाहेब मगदूम हायस्कूल, आदर्श गुरुकुल विद्यालय, ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल (पेठवडगाव), लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर, उषाराजे हायस्कूल, वि. स. खांडेकर प्रशाला, विद्यापीठ हायस्कूल, संजीवन पब्लिक स्कूल, संजीवन विद्यानिकेतन (पन्हाळा), एमआर पाटील विद्यानिकेत, साईदिशा पब्लिक स्कूल, सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट सेकंडरी स्कूल, नानासाहेब गद्रे हायस्कूल, राणी सरस्वती देवी कन्या शाळा, बालाजी माध्यमिक विद्यालय इचलकरंजी या शाळांतर्फे नाट्य सादरीकरण होणार आहे.

फोटो : अर्जुन टाकळकर

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, इको फोक्स व्हेंचर आणि प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्यावतीने राज्यस्तरीय माध्यमिक पर्यावरण बालनाट्य महोत्सवात नाट्यसादरीकरण करताना बालरंगकर्मी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोटारसायकलवरून पडून एकजण ठार

0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

गडहिंग्लज-नेसरी रस्त्यावर महागावनजिक ताबा सुटल्याने मोटारसायकल रस्त्याच्या कडेला जाऊन घसरली. यावेळी मोटारसायकलवर पाठीमागे बसलेले अशोक लक्ष्‍मण जाधव (वय ७४, बसर्गे, ता. गडहिंग्लज) हे ठार झाले.

अशोक जाधव हे सागर भारत जाधव यांच्या मोटरसायकलवरून (एमएच ०९ एफडी ८५२९) गडहिंग्लज-नेसरी रस्त्याने गावी जात असताना महागावच्या हद्दीत कोपर्डे यांच्या घरासमोर वेगाने जाणाऱ्या सागरचा मोटरसायकलवरील ताबा सुटला. मोटारसायकल रस्त्याकडेला जाऊन घसरली. यावेळी पाठीमागे बसलेले अशोक जाधव मोटारसायकलसह खाली पडले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना गडहिंग्लज येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी आणण्यात आले. तेथून त्यांना गडहिंग्लजला उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी मृत अशोक जाधव यांचा मुलगा सुनील (बसर्गे ता. गडहिंग्लज) यांच्या फिर्यादीवरून मोटारसायकलस्वार सागर जाधव याच्यावर गडहिंग्लज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिक वापर करणाऱ्यांना दंड

0
0

कोल्हापूर

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने प्लास्टिक वापर करणाऱ्या सहा व्यापाऱ्यांकडून तीस हजारांचा दंड वसूल करण्यात आला. रंकाळा रोड, शाहूपुरी व पंचशील हॉटेल परिसर येथील इन्टाइस गेम झोन, राजेंद्र कोळी, हॉटेल कैलरु, शक्ती फ्लॉवर्स, ट्यूलिप फ्लॉवर्स व अवंती वडा सेंटरवर कारवाई केली. त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजारांचा दंड वसूल करण्यात आला. विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, निखिल पाडळकर, आरोग्य निरीक्षक शिवाजी शिंदे, मुनीर फरास, करण लाटवडे, श्रीराज घोळकर, सुशांत कावडे, नंदकुमार पाटील यांनी कारवाईत सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप जिल्हा ग्रामीणअध्यक्षपदी समरजीत घाटगे

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भाजप जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांची मंगळवारी निवड झाली. भाजपचे राज्य सरचिटणीस आणि प्रदेश निवडणूक अधिकारी माजी आमदार सुरेश हाळवकर यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुष्पहार घालून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी समरजीत घाटगे यांचे नेतृत्व पारदर्शी असल्याचे सांगितले. 'राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या घराण्यातील आणि शेतकऱ्यांचे नेते विक्रमसिंह घाटगे यांचा वारसा त्यांच्याकडे असल्याने ग्रामीण भागातील प्रश्न ते चांगल्या पद्धतीने हाताळतील', असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

सत्काराला उत्तर देताना समरजीत घाटगे म्हणाले, 'कुणाची जिरवण्यासाठी किंवा कुणाला नमवण्यासाठी आम्ही कधीही आंदोलन करणार नसून फक्त शेतकऱ्यांच्या हितासाठी संघर्ष करण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून अनेक अटी लावल्यामुळे त्याचा लाभ शेतकऱ्यांना होणार नाही.' दिवंगत विक्रमसिंह घाटगे यांना शेतकऱ्यांचा आशिर्वाद होता. त्यांचा आदर्श ठेवून शेतकऱ्यांसाठी काम करणार असून दहा टक्के शेतकऱ्यांचा जरी आशिर्वाद मिळाला तरी मी स्वत:ला भाग्यवान समजेन,' अशी भावना घाटगे यांनी व्यक्त केली.

अध्यक्षपदासाठी घाटगे यांचे नाव हाळवणकर यांनी सुचवले तर राधानगरी तालुकाध्यक्ष संभाजी आरडे आणि गगनबावडा तालुकाध्यक्ष संदीप पाटील यांनी अनुमोदन दिले. यावेळी निवडणूक अधिकारी अॅड. भरत पाटील, माजी जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके, गोकुळचे संचालक बाबा देसाई, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे उपस्थित होते. सरचिटणीस विजय जाधव यांनी सूत्रसंचलन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदणीत विद्यार्थ्यांनी घेतली पृथ्वीरक्षणाची शपथ

0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

नांदणी (ता. शिरोळ) येथे नंदादीप शिक्षण संकुलाच्या ताराबाई आण्णासाहेब नरदे हायस्कूल व नंदादीप बालविकास मंदिरातील विद्यार्थी- विद्यार्थिनींनी पृथ्वी रक्षणाची शपथ घेतली. 'सुंदर आणि स्वच्छ पर्यावरण हा माझा हक्क आहे, स्वच्छ व सुंदर वसुंधरा हे माझे व्रत आहे', अशी शपथ घेण्यात आली.

'महाराष्ट्र टाइम्स'ने पर्यावरण समतोल साधण्यासाठी सुरू केलेल्या पृथ्वीरक्षण उपक्रमांतर्गत विद्यार्थी व शिक्षकांनी शपथ घेतली. मुख्याध्यापक बी. एस. जाधव यांनी या उपक्रमाची माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांबरोबरच उपस्थितांना शपथ दिली. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कार्यरत राहू असा संकल्प करून या उपक्रमात नंदादीप शिक्षण संकुलातील प्रत्येक व्यक्तीने सहभागी होण्याचे निश्चित केले. सकाळी विद्यालयाच्या प्रांगणात प्रार्थनेसोबत ही शपथ घेण्यात आली. परिसर स्वच्छता, वृक्षारोपण तसेच त्याचे संवर्धन करण्याबरोबरच प्लास्टिकचा वापर टाळण्याची तसेच प्रदूषण रोखण्याची शपथ घेतली.

नंदादीप संकुलाने आजअखेर पर्यावरण संरक्षण व संतुलनासाठी लाखो वृक्ष बिया संकलन, बीजरोपण, वृक्ष लागवड, संवर्धन, पाणी संरक्षण, संवर्धन यासह विविध उपक्रम राबवल्याचे मुख्याध्यापक बी. एस. जाधव यांनी सांगितले. महाराष्ट्र टाइम्सचा उपक्रम स्तुत्य व समाजाला प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी सांगितले. एस. बी. जैनापूरे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चंदगडला विद्यार्थी बनले पृथ्वीरक्षक

0
0

म. टा. वृत्तसेवा, चंदगड

चंदगड येथील दी न्यू इंग्लिश स्कूलमधील माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी पृथ्वीरक्षणाची शपथ घेतली. महाराष्ट्र टाइम्सच्यावतीने हा उपक्रम राबविला जात आहे. यामध्ये विद्यालयातील सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

टी. टी. बेरडे म्हणाले, 'मानवाचे पर्यावरणावर अतिक्रमण होत असून हे माणसाला विनाशाकडे नेणारे आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे पृथ्वीचे तापमान झपाट्याने वाढत असल्याने पृथ्वीला धोका निर्माण झाला आहे. भविष्यातील धोका ओळखून मानवाने पर्यावरणाच्या रक्षणासाठी आतापासून ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. छोट्या-छोट्या गोष्टीतून पर्यावरण संवर्धन करावे.'

प्राचार्य व्ही. जी. तुपारे यांनी पर्यावरण रक्षण ही काळाची गरज असून विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणासाठी कार्य करावे असे आवाहन केले. एम. व्ही. कानूरकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना शपथ दिली. न्यू इंग्लिश स्कूल, न. भु. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य ए. जी. बोकडे, पर्यवेक्षक एस. आर. देवण यांनी उपक्रमासाठी पुढाकार घेतला. सहा. शिक्षक एस. जी. सातवणेकर, एम. एल. कांबळे, आर. पी. पाटील, टी. एस. चांदेकर, जे. जी. पाटील, एस. जी. साबळे, डी. जी. पाटील, एस. जे. शिंदे, टी. व्ही. खंदाळे, व्ही. के. पाटील, सौ. पी. एस. सुतार, व्ही. के. गावडे, एस. व्ही. तुपारे, व्ही. एस. शिंदे आदींसह विद्यार्थी उपस्थित होत्या.

फोटो

चंदगड येथील दी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी पृथ्वीरक्षणाची शपथ घेतली. यावेळी उपस्थित शिक्षक, विद्यार्थी.

14-1-20-2- शिक्षक एम. व्ही. कानुरकर पृथ्वीरक्षणाची शपथ देताना.

-------------------------------------------------------------------------------------------------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

0
0

अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

सातारा :

महाड-पंढरपूर पालखी महामार्गावर पिंप्रद (ता. फलटण) येथील पहाटे फिरायला आलेल्या दाम्पत्याला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. पिंप्रद येथील किसन मारुती बोराटे (वय ५१) व छाया किसन बोराटे (वय ४७) हे दोघे पती पत्नी पहाटे सव्वा पाचच्या दरम्यान फिरायला गेले असता पिंप्रद हद्दीतील राजीव दिक्षीत गुरुकुल व्यसन मुक्ती केंदाच्या स्वागत कमानी नजीक पंढरपूरहून फलटणच्या दिशेने भरधाव वेगात तरकारी घेऊन चाललेल्या अज्ञात पिकअप गाडीने या दाम्पत्याला जोरदार धडक दिली. गाडी न थांबता निघून गेली. या अपघातात डोक्याला, छातीस गंभीर मार लागल्याने दोघे दाम्पत्य रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पहाटे फिरायला गेलेले अजून घरी परत का आले नाहीत म्हणून बोराटे कुटुंबातील लोकांनी त्यांना शोधण्यासाठी रोडला गेले असता त्यांना अपघातस्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.

.........

'मागासवर्गीयांना सरसकट कर्जमाफी द्या'

सातारा :

मागासवर्गीयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, त्यांच्या विकासाचा योजनेतील निधीत हेराफेरी करणाऱ्यांवर कारवाई करावी, यासह अन्य मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) गटाच्या अधिकारी व कार्यकर्त्यांनी सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करून जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. राज्यातील विविध प्रकारच्या महामंडळांची महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, संत रोहिदास चर्मकार, वसंतराव नाईक खादी ग्राम उद्योग कर्ज वितरण करण्यासाठी अनेक अटी, शर्ती आहेत. त्यामध्ये सबसिडी दिली जाते, त्यामुळे अनेक मागासवर्गीय व अल्पसंख्यांक बेरोजगारांना कर्जासाठी शेतीचे उतारे, घराचे उत्तरे घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तरी राज्यात पडलेला दुष्काळ, अतिवृष्टी महापूर या नैसर्गिक आपत्तीमुळे तरुणांनी घेतलेल्या कर्जाची रक्कम नियमित न भरल्यामुळे जप्ती सारख्या गोष्टीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तरुणांना दिलेले सरसकट कर्ज माफ करावे, असे निवेदनात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोकुळ’ निवडणुकीत भाजप महाडिकांसोबत

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत भाजपने माजी आमदार महादेवराव महाडिकांना पाठिंबा दिला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेत ही घोषणा केली. तसेच भाजपकडे चारशे ठराव असून ते महाडिकांना सादर केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

हॉटेल अयोध्या येथे मंगळवारी ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीनंतर त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. सोमवारी त्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यावर टीका केली होती. मंगळवारी त्यांनी दोघांवर टीका केली नसली तरी 'हम किसीको टोकेंगे नही, पर कोई टोकेगा तो छोडेंगे नही' असा इशारा विरोधकांना दिला. भाजपविरोधात सर्वजण एकत्र येऊन लढत आहेत. हिंमत असेल तर विरोधी पक्षांनी स्वतंत्र लढावे, असे आव्हानही त्यांनी दिले.

जिल्ह्यातील महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा बँक, गोकुळच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढविण्याची घोषणा करत प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, 'यापुढे भाजप, महाडिक गट, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे यांना सोबत घेऊन सर्व निवडणुका लढविल्या जातील. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काँग्रेस,राष्ट्रवादी, शिवसेनेचे प्रेम बेगडी आहे. 'आज के शिवाजी: नरेंद्र मोदी' हे पुस्तक लिहिणारे लेखक जयभगवान गोयल यांचा भाजपशी काहीही संबध नाही. गोयल हे २८ वर्षे शिवसेनेत होते. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून पराभूत झालेल्या संभाजीराजेंना भाजपचे सदस्यत्वपद स्वीकारावे लागू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती कोट्यातून त्यांना राज्यसभेवर संधी दिली. समरजीत घाटगे यांना म्हाडावर संधी दिली. छत्रपती शिवाजी महाराज काय आहेत, हे आम्हाला शिकवू नये.'

...

पी.एन. यांना महापालिकेत रस नाही

प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी, ग्रामीण भागातील प्रत्येक कार्यकर्त्यांने शहरातील नातेवाईकांची यादी करुन त्यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. माजी आमदार हाळवणकर यांच्याकडे पाहून, सध्या राष्ट्रवादीत नगरसेवक असलेली त्यांची पुतणी पुढच्यावेळी भाजपमध्ये असेल, अशी मिश्किल टिप्पणीही केली. आमदार पी.एन. पाटील यांना महापालिकेच्या निवडणुकीत इंटरेस्ट नसल्याने हिंदूराव निंबाळकर यांची कन्या उदयानीदेवी या महापालिका निवडणुकीत भाजपला मदत करु शकतील, असेही ते म्हणाले.

.......

शिवाजी महाराज व मोदी तुलना योग्यच

'आज के शिवाजी: नरेंद्र मोदी' या पुस्तकात शिवाजी महाराज व पंतप्रधान मोदी यांची तुलना केली आहे, ती योग्यच आहे, असे खळबळजनक वक्तव्य माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी या कार्यक्रमात केले. या लेखकाचे मी समर्थन करतो, असे म्हणत त्यांनी शिवाजी महाराजांचा हा सन्मानच आहे, अशी पृष्टीही जोडली. मोदींनी शेतकरी सन्मान योजना सुरू करत वर्षाला प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर सहा हजार रूपये जमा करण्यास सुरूवात केली. आयुष्यमान योजनेच्या माध्यमातून गरीब रूग्णांवर पाच लाखांपर्यंत मोफत उपचाराची सोय केली. यामुळे मोदी हे शेतकरी व गरीबांचे तारणहार आहेत. म्हणून दोघांची तुलना योग्यच असल्याचे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप आघाडीत साशंकता

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत वर्चस्व सिद्ध करण्यासाठी महाविकास आघाडीने मोर्चेबांधणी केली आहे. दुसरीकडे भाजप व मित्रपत्र आघाडीच्या पातळीवर सभापतिपदाच्या निवडणुकीविषयी फार हालचाली नाहीत. सदस्यांची बैठकही झाली नाही. निवडणूक एक दिवसाच्या तोंडावर येऊन ठेपली असताना सदस्यांना कोणताही निरोप नाही. त्यामुळे भाजप आघाडी समिती सभापतिपदाची निवडणूक लढविणार की नाही याविषयी सदस्यांत साशंकता निर्माण झाली आहे.

बांधकाम, शिक्षण, समाजकल्याण आणि महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी गुरुवारी (ता. १६) निवडणूक होत आहे. राजर्षी शाहू सभागृहात दुपारी दोन वाजता प्रत्यक्ष निवडीच्या कामकाजाला सुरुवात होईल. दरम्यान, चारही समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत वर्चस्व राखण्यासाठी दोन्ही काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, चंदगड विकास आघाडी, शाहू विकास आघाडी व अपक्ष मिळून तयार झालेल्या महाविकास आघाडीने तयारी केली आहे. आघाडीने सदस्यांना सहलीवर पाठविले आहे. सहलीवरील सदस्य बुधवारी ता. १४ कोल्हापुरात दाखल होत आहेत. आघाडीचे संख्याबळ ४३ पर्यंत पोहचले आहे. यामुळे समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत औपचारिकता शिल्लक राहिल्यासारखी स्थिती आहे.

आघाडीकडील बहुमताच्या संख्याबळामुळे विरोधी भाजप आघाडी पिछाडीवर पडल्याचे चित्र आहे. भाजप, जनसुराज्य शक्ती, आवाडे गट, व ताराराणी आघाडी मिळून २३ इतके संख्याबळ होते. सभापतिपदाच्या निवडणुकीसंदर्भात सदस्यांची अद्याप बैठक झाली नाही. उमेदवार कोण असणार याविषयी सदस्यांना कल्पना नाही. यामुळे निवडणूक लढविली जाणार की नाही याविषयी संभ्रमावस्था निर्माण झाल्याचे भाजप आघाडीतील सदस्यांचे म्हणणे आहे.

पदांची लॉटरी कोणाला?

महाविकास आघाडीने सत्तेची जुळवाजुळव करताना पदाधिकाऱ्यांसाठी एका वर्षाचा कालावधी निश्चित केला आहे. वर्षभरानंतर सहाही पदाधिकाऱ्यांना बदलण्यात येणार आहे. दरम्यान समिती सभापतिपदाच्या चारपैकी तीन पदे शिवसेनेच्या वाट्याला तर एक पद इतर मित्र पक्ष व अपक्षासाठी असा फॉर्म्युला ठरला आहे. बांधकाम, शिक्षण समिती सभापतिपदासाठी शिवसेना व मित्रपक्षांत रस्सीखेच आहे. शिवसेनेचे सदस्य हंबीरराव पाटील, प्रविण यादव यांना 'बांधकाम'हवे आहे. अपक्ष सदस्या रसिका पाटील यांनीही या पदासाठी दावा केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पद्माराणी पाटील यांचा शिक्षण समिती सभापतिपदासाठी प्रयत्न आहे. शिवसेनेच्या वंदना जाधवसुद्धा शिक्षणसाठी इच्छूक आहेत. हंबीरराव पाटील यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड झाली आहे. यामुळे सरुडकर गटाच्या दुसऱ्या सदस्या आकांक्षा पाटील यांचे नाव बांधकाम समितीच्या शर्यतीत आहे. समाजकल्याण समिती सभापतिपदासाठी शिवसेनेच्या सदस्या स्पर्धक आहेत. नरके गटाकडून कोमल मिसाळ, मनिषा कुरणे व माजी आमदार उल्हास पाटील गटाकडून सदस्या स्वाती सासने यांच्यामध्ये स्पर्धा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक परिषदेकडून जितेंद्र पवारांना उमेदवारी

0
0

फोटो आहे,

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून सोलापूर येथील जितेंद्र पवार यांची उमेदवारी जाहीर केली आहे. शिक्षक परिषदेकडे पाच जिल्ह्यातून ११ जणांनी उमेदवारी मागितली होती. शिक्षक परिषदेच्या नागपूर येथे झालेल्या कार्यकारिणीत पवार यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले.

त्यांच्यासह, माजी आमदार भगवानराव साळुंखे, विजयराव माने, अंजनी पाटील, राजेंद्र नागरगोजे (सर्व सांगली जिल्हा), सोलापुरातून विनायक कुलकर्णी, औदुंबर देशमुख, सातारा येथील बाबूराव लोटेकर, पुण्यातून प्रा. ए. टी. कुलकर्णी, पांडूरंग ठाकर, कोल्हापुरातून पंडितराव पवार यांनी शिक्षक परिषदेकडे शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. नागपूर येथील कार्यकारिणी बैठकीच्या अगोदर इच्छुक ११ जणांची सांगली येथे बैठक झाली होती. या बैठकीत परिषद ज्यांना उमेदवारी देईल ते साऱ्यांनी मान्य करुन प्रचारात सक्रिय होण्याचे ठरले होते.

दरम्यान, पवार यांच्या उमेदवारीनंतर परिषदेच्या जिल्हानिहाय पदाधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या. त्यामध्ये परिषदेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनिती आखण्यात आली. पवार हे सोलापूर येथील दयानंद काशीनाथ असावा प्रशाला येथे मुख्याध्यापकपदी कार्यरत आहेत. क्रीडाशिक्षक म्हणून ते परिचित आहेत. १९९२ पासून संघटनेत सक्रिय आहेत. परिषदेने निवडणूक प्रमुख म्हणून माजी आमदार भगवानराव साळुंखे, प्रचारप्रमुख म्हणून सातारा येथील अमित कुलकर्णी यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंद्रकांत पाटील यांच्या संपत्तीची चौकशी होणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याविषयी बोलताना भान ठेवावे. त्यांनी एक लक्षात ठेवावे, हे पुणे नाही, कोल्हापूर आहे. तुम्ही पाच वर्षापूर्वी कोठे होता, कोठून आला आणि सत्ताकालावधीत किती संपत्ती जमवली याची चौकशी होईल. काँग्रेस आघाडीच्या नेत्यांविषयी पुन्हा अशी वक्तव्ये केली तर जशास तसे उत्तर देऊ,'असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सोमवारी मंत्री मुश्रीफ व राज्यमंत्री पाटील यांच्या संपत्तीविषयी विधान केले होते. त्याला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी मंगळवारी प्रत्युत्तर दिले. महापालिकेतर्फे येत्या रविवारी, राजर्षी शाहू समाधीस्थळाचा लोकार्पण सोहळा आहे. या सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार उपस्थित राहणार आहेत. पवारांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयात नियोजनाची बैठक झाली. महापौर सूरमंजिरी लाटकर अध्यक्षस्थानी होत्या. शाहू समाधीस्थळ लोकार्पण सोहळा हा लोकोत्सव म्हणून साजरा व्हावा यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या सोहळ्यात सामील व्हावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.

या बैठकीप्रसंगी ए. वाय. यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, 'ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन कारखान्याची उभारणी केली आहे. राज्यमंत्री पाटील यांच्याकडे वडिलोपार्जित संपत्ती आहे. या दोन्ही नेत्यांविषयी त्यांनी जपून बोलावे. राष्ट्रवादीची कळ काढू नये. चंद्रकांत पाटील हे पूर्वी सायकलवरुन, स्कूटरवरुन फिरत होते. त्यांनी पाच वर्षात काय काम केले याचा पहिल्यांदा हिशेब द्यावा. '

सरचिटणीस सुनील देसाई यांनी प्रास्ताविक केले. करवीर तालुकाध्यक्ष मधुकर जांभळे यांनी आभार मानले. बैठकीला नगरसेवक शिक्षण समिती उपसभापती सचिन पाटील, माजी नगरसेवक रमेश पोवार, अनिल कदम, महेश गायकवाड, रामराजे बदाले, कागल तालुकाध्यक्ष शिवानंद माळी, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब देशमुख आदी उपस्थित होते.

....

दसरा चौकात सोहळा, मान्यवरांचा सहभाग

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार म्हणाले, 'राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या हस्ते हा समाधीस्थळ लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम होईल. त्यानंतर दसरा चौक येथे लोकोत्सव सोहळा होणार आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकासमंत्री मुश्रीफ, गृहराज्यमंत्री पाटील, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यांच्यासह प्रमुख नेते मंडळींचा सहभाग असणार आहे.'

...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारभाऱ्यांकडून नियम धाब्यावर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीसमोर चारचाकी वाहनांचे पार्किंग करायचे नाही हा सर्वसाधारण सभेने घेतलेला निर्णय महाविकास आघाडीच्या काही कारभाऱ्यांनी धाब्यावर बसविला. सर्वसाधारण सभेच्या निर्णयानंतर प्रशासनाने मुख्यालय परिसर 'नो पार्किंग झोन'म्हणून जाहीर केला. मात्र, नुकत्याच सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीच्या काही कारभाऱ्यांनी सर्वसाधारण सभेची मान्यता न घेता 'हम करे सो कायदा' या उक्तीप्रमाणे चारचाकी वाहने लावण्यास सुरुवात केली आहे.

वाहतुकीची शिस्त आणि मुख्यालय परिसरात वाहनांची वर्दळ नको यासाठी आजही सगळे अधिकारी आणि अनेक सदस्य आपापली वाहने कागलकर हाऊस परिसरात लावतात. दुसरीकडे महाविकास आघाडीतील काही सदस्य व कारभारी असलेले माजी सदस्य नियम पायदळी तुडवत आहेत. प्रशासनाने, सर्वसाधारण सभेची मान्यता नसताना 'नो पार्किंग झोन' बदलता येणार नाही हे संबंधितांच्या निदर्शनास आणले. मात्र, त्याकडे काणाडोळा करुन नियम मोडण्यात काहीजण धन्यता मानत असल्याची टीका नागरिकांतून होऊ लागली आहे.

जि.प.मध्ये तत्कालीन भाजप व मित्रपक्ष आघाडीने मुख्यालय परिसरात चारचाकी वाहनांचे पार्किंग करायचे नाही असा निर्णय घेतला. सर्वसाधारण सभेने तसा ठराव मंजूर केला. कागलकर हाऊस परिसरात प्रशासनाने पार्किंगची सुविधा केली. जवळपास चाळीस लाख रुपये खर्च करुन पत्र्याचा शेड मारला. काही ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक बसविले. तरीही कारभाऱ्यांचा नियम धाब्यावर बसविला. याविषयी नाराजीचा सूर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नांदणीत बडोदा बँकेचे एटीएम मशीन फोडले

0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

नांदणी (ता. शिरोळ) येथे बँक ऑफ बडोदा शाखेचे एटीएम फोडणाऱ्या संशयीतास शिरोळ पोलिसांनी अवघ्या चार तासात जेरबंद केले. जमीर आबालाल सादुले असे त्याचे नाव आहे. संशयिताने गुन्ह्यात वापरलेली लोखंडी कुदळ व लोखंडी कटर जप्त करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, नांदणी येथे बँक ऑफ बडोदा शाखेचे एटीएम मशीन आहे. सोमवारी मध्यरात्री चोरट्याने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याच्या हाती काही लागले नाही. एटीएम मशीनचे सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी बँकेमार्फत शिरोळ पोलिसांत फिर्याद देण्यात आली.

दरम्यान सहाय्यक पोलिस निरीक्षक ए. बी. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास गतिमान केला. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता सादुले हा संशयीत असल्याचे दिसले. संशयीत धरणगुत्ती गावच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी पाठलाग करुन त्याला पकडले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. हवालदार ज्ञानेश्वर सानप, निलेश कांबळे, सागर खाडे, अमित पवार, हनुमंत माळी, ताहीर मुल्ला यांनी तपास मोहीम राबविली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेने घातले कर्नाटक सरकारचे श्राद्ध

0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

निपाणीच्या मराठी साहित्य संमेलनाला कर्नाटक पोलिसांनी विरोध केला. त्यामुळे शिवसेनेने मराठी भाषिक व साहित्यीकांच्या विषयी कर्नाटक पोलीस दडपशाही करत आहे. ती दडपशाही कदापिही चालू देणार नाही, असा इशारा देत कर्नाटक सरकारचे श्राद्ध घालून निषेध नोंदविला. शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील दूधगंगा पात्राजवळ आंदोलन झाले. या आंदोलनावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दोन्ही राज्यांतील पोलिस कुमक मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आली होती.

निपाणीतील साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस भूषवणार होते. ग्रामीण कथाकार बबन पोतदार, गुंफण अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेनगे, निवृत्त पोलिस उपाधिक्षक शिवाजीराव फाटक, साहित्यप्रेमी प्रदीप शिंगवी, मुकुंदराव महामुनी, आत्माराम हारे, चंद्रकांत जोगदंड यांच्या उपस्थितीत १२ जानेवारी रोजी कर्नाटकात साहित्य संमेलन होणार होते. मात्र, कर्नाटक सरकारने पोलिसांकरवी दडपशाही केली.

याबाबत विजय देवणे म्हणाले, 'या देशात भाषा व प्रांतावर मत मांडण्याचे व्यक्तीस्वातंत्र्य आहे. या स्वातंत्र्यावर कर्नाटक सरकारने मोठा आघात केला आहे. बेळगाव-कारवार, भालकी, निपाणी सह वीस लाख मराठी माणसांचा अपमान केला आहे. याच्या निषेधार्थ आज राज्याच्या सीमेवर दूधगंगा पात्राजवळ श्राद्ध घालून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदविला. सीमेवर राहणाऱ्या वीस लाख मराठी लोकांच्या भावना समजून घ्याव्यात. ही दडपशाही चालू देणार नाही.'

यावेळी सुजित चव्हाण, शिवगोंड पाटील, अशोक पाटील, विराज पाटील, राजू यादव, विनोद खोत, विद्यागिरी सुर्वे, संदीप पाटील, अभिषेक देवणे, आनंदा खोंद्रे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निपाणीचे सीपीआय संतोष सत्यनाईक, पीएसआय बी. टी. तळवार, दोन सहाय्यक फौजदार, हवालदार, कॉन्स्टेबल आदी सीमेवर गस्त घालत होते. महाराष्ट्राच्या हद्दीत कागल पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी बंदोबस्त तैनात केला.

देवचंद कॉलेजमध्ये संमेलन घेणार

दरम्यान, निपाणी येथील साहित्य संमेलन रद्द झाल्यास महाराष्ट्राच्या हद्दीत कागल तालुक्यातील देवचंद कॉलेज अर्जुननगर येथे कर्नाटक पोलिसांच्या नाकावर टिच्चून हे साहित्य संमेलन घेण्यात येणार आल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांधीनगरमध्ये लाला लोही सण उत्साहात

0
0

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा

गांधीनगर येथील मकर संक्रातीच्या पूर्वसंध्येला सिंधी व पंजाबी बांधवांनी लाला लोही (लाहोरी) सण मोठ्या उत्साहात साजरा केला. सणानिमित्त सिंधी व पंजाबी बांधवांनी अग्नीदेवाची पूजा करून प्रार्थना करण्यात आली.

सिंधी आणि पंजाबी बांधवांमध्ये लाला लोही सणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पुराणकाळात देवतांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी हा सण साजरा केला जातो. दरवर्षी मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला सिंधी बांधव होळीसारखा लाला लोही सण साजरा करतात. घरातील सरपण आणून ते एकत्र करून त्याच्या अवतीभवती रांगोळी काढली जाते. त्यानंतर त्याला हार फुलांनी सजवले जाते. त्याची पूजा करून अग्नी दिला जातो. त्यानंतर नारळ फोडून प्रार्थना केली जाते. अग्नीच्या प्रदक्षिणा घालून उपवास सोडला जातो. गांधीनगरमध्ये ठिकठिकाणी सण साजरा करण्यात आला. पूजा झाल्यानंतर महाप्रसादाचेही आयोजन केले होते.

फोटो ओळ

गांधीनगरमध्ये लाला लोही सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरभरती रद्द करा

0
0

कोल्हापूर

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीतील नोकरभरती रद्द करावी, अशी मागणी शासन नियुक्त संचालक अॅड किरण पाटील यांनी केली आहे. समितीने २४ पदांच्या नोकरभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

समितीला लिहिलेल्या मागणी अर्जात अॅड पाटील यांनी म्हटले आहे की, समितीकडे सध्या १४५ पदे मंजूर असून १२० पदे कार्यरत आहेत. २०१३ मध्ये भरती केलेल्या ३७ कर्मचाऱ्यांना कायम करावे असा आदेश कामगार कोर्टाने दिला आहे. पण या निर्णयाविरोधात समितीने औद्योगीक कोर्टात धाव घेत स्थगिती मिळवली आहे. पण भविष्यात या कर्मचाऱ्यांना कामावर घ्यावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदींशी तुलना म्हणजे शिवाजी महाराजांचा सन्मानच; भाजप नेत्याची मुक्ताफळे

0
0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाऱ्या 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकावरुन राजकारण चांगलेच तापलेलं असताना आता आणखी एका भाजप नेत्यानं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदींशी केलेली तुलना म्हणजे शिवाजी महाराजांचा सन्मानच समजायला हवा', अशी मुक्ताफळं भाजप माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी उधळली आहेत.

आज के शिवाजी- नरेंद्र मोदी या पुस्तकावरुन निर्माण झालेल्या वादावर बोलत असताना हळवणकर यांनी मोदी आणि शिवाजी महाराजांच्या कामात साम्य असल्याचा दावा केला आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवाजी महाराजांशी तुलना करण्यात काही गैर नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मानच आहे. पुस्तकाच्या लेखकाचे मी समर्थन करतो', असे हळवणकर म्हणाले.

भाजपकडून मोदींची छत्रपती शिवरायांशी तुलना; पुस्तक प्रकाशनानंतर संताप

हळवणकर यांनी मोदींनी सुरु केलेल्या योजनांचा संदर्भ देत त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. 'देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न गंभीर असताना शेतकऱ्याच्या खात्यात ६ हजार रुपये जातील अशी महत्त्वाकांक्षी योजना सुरू करुन शेतकऱ्याला मोदींनी सावरलं. या युगात मोदींनी केलेलं काम नक्कीच दखलपात्र आहे', असं हळवणकर म्हणाले.

छत्रपतींच्या पुस्तकाचा वाद संपला; जुनी मढी उकरू नका: शिवसेना

दरम्यान, आज के शिवाजी- नरेंद्र मोदी या पुस्तकावरुन भाजपवर विरोधकांनी शरसंधान केल्यानंतर भाजप नेत्यांनी या पुस्तकावरुन आपले हात झटकले आहेत. प्रकाशकांकडून हे पुस्तक देखील मागे घेण्यात आलं आहे. पण हळवणकर यांच्या नव्या विधानामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

'जाणता राजा' उपमाही गैर; उदयनराजेंचा पवारांना टोला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images