Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘पुस्तिकेवर बंदी घाला’

$
0
0

कोल्हापूर: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल बदनामीकारक लिखाण केल्याबद्दल काँग्रेसच्या राष्ट्रसेवा दलाने प्रकाशित केलेल्या कार्य पुस्तिकेवर बंदी घालावी, अशी मागणी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्टने केली आहे. ट्रस्टचे अध्यक्ष मनोहर सोरप यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीला जयवंत निर्मळ, सचिव संजय कुलकर्णी, सुवर्णा पवार, शरद माळी, राजेंद्र शिंदे, संतोष पवार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोल्हापूर प्रेस क्लब पुरस्कार वितरण फोटो

$
0
0

कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे आयोजित कार्यक्रमात गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा झाला. डावीकडून प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन मेस्त्री, जिल्हाधिकारी दौलत देसाई, क्रीडा समीक्षक सुनंदन लेले, आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, कार्याध्यक्ष उद्धव गोडसे, मंजित भोसले. सोबत पुरस्कारप्राप्त पत्रकार संतोष मिठारी, विश्वास पानारी, फोटोग्राफर इम्रान गवंडी, कॅमेरामन मिथुन राजाध्यक्ष.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल

$
0
0

कोल्हापूर: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल बदनामीकारक लिखाण केल्याबद्दल काँग्रेसच्या राष्ट्रसेवा दलाने प्रकाशित केलेल्या कार्य पुस्तिकेवर बंदी घालावी, अशी मागणी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्टने केली आहे. ट्रस्टचे अध्यक्ष मनोहर सोरप यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीला जयवंत निर्मळ, सचिव संजय कुलकर्णी, सुवर्णा पवार, शरद माळी, राजेंद्र शिंदे, संतोष पवार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कोजिमाशि’च्या सीईओंना उपनिबंधकांची नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेविषयी ज्या संचालक व सभासदांनी माहिती मागवली आहे त्यांना तत्काळ उपलब्ध करुन द्यावी, असा लेखी आदेश जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी 'कोजिमाशी'चे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद पाटील यांना काढला आहे. तसेच त्या संबंधीचा अहवाल जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला सादर करावा. सभासद व संचालकांनी पतसंस्थेविषयी विचारलेली माहिती देणे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ३२ नुसार बंधनकारक असल्याचे म्हटले आहे.

'कोजिमाशि'चे संचालक समीर घोरपडे व संदीप पाटील यांनी सीईओ पाटील यांच्या विरोधात तक्रार केली होती. सीईओ पाटील हे पक्षपातीपणा करत आहेत. सत्ताधारी आघाडीच्या कारभाऱ्यांच्या हातचे ते बाहुले बनले आहेत. दोघांमध्ये संगनमत असून संचालकांचे अधिकार डावलत आहेत. सीईओंकडून मागितलेली माहिती मिळत नाही,' असेही निवेदनात म्हटले होते. २०१५ पासून आजपर्यंतच्या चेअरमन निवडीचा इतिवृत्तांत, मदतनिधी, दिवाळी भेट खरेदी पावत्या, सुवर्ण महोत्सवी भेट वस्तू खरेदी पावत्यांसह नऊ प्रकारची माहिती मागितली होती.

या संदर्भात सीईओ पाटील म्हणाले, 'त्या दोन्ही संचालकांनी प्रत्यक्ष संस्थेत येऊन कागदपत्रे बघितली आहेत. त्यांना जी कागदपत्रे आवश्यक होती, त्या विषयासंदर्भातील अंतिम बिले अजून तयार नव्हती. म्हणून संबंधित बिले त्यांना दाखविता आली नाहीत. शिवाय त्यांनी २०१५ पासून माहिती मागितली आहे, त्यासाठी पाच, सहा दिवसांचा कालावधी लागेल. सीईओ म्हणून निपक्षपातीपणे काम करत आहे. कोणत्याही संचालकांच्या अधिकाराला बाधा येईल असे काम केलेले नाही. '

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंढरपूर: मठाधीपती पिसाळ यांची निर्घृण हत्या

$
0
0

पंढरपूर: अनिलनगर परिसरातील प्रसिद्ध कराडकर मठाचे मठपती जयवंत हिंदुराव पिसाळ यांची भरदुपारी चाकूने वार करून निघृण हत्या केल्याने पंढरपुरात खळबळ उडाली आहे. याच मठाचे या पूर्वीचे मठाधीपती बाजीराव बुवा कराडकर यांनीच पिसाळ यांची हत्या केली आहे. पोलिसांनी कराडकर यांना ताब्यात घेतले आहे.

विजय वडेट्टीवार नाराज?; मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर


पंढरपुरातील अनिलनगरात बंडातात्या कराडकर यांचा कराडकर मठ आहे. आरोपी बाजीराव बुवा कराडकर हे या मठाचे मठाधीपती होते. मात्र ट्रस्टने ठराव करून सन २०१६ मध्ये कराडकर यांना पदावरून हटवले आणि त्यांच्या जागी जयवंत हिंदुराव पिसाळ यांची मठाधीपती म्हणून नियुक्ती केली. याचा मोठा राग कराडकरांच्या मनात होता. ट्रस्ट आणि कराडकर यांचे सतत वाद सुरु होते. या वादाचे पर्यवसन अखेर हत्येत झाल्याचे बोलले जात आहे.

आईशीवर एफआयआर; जावेद अख्तर संतापले

कराडकर यांनी आज दुपारी २ च्या सुमाराला आपल्या दोन हातात चाकू घेऊन पिसाळ यांच्यावर हल्ला केला. त्यांनी पिसाळ यांच्या मानेवर, डोळ्यावर तसेच शरीरावर अनेक भागांवर वार केले. यात त्यांचा मृत्यू झाला.

पंतप्रधान मोदी हे 'हिंदू जीना'; गोगोईंचे टीकास्त्र

घटना घडताच पोलिसांना माहिती मिळाली आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी कराडकरांना ताब्यात घेतले. दरम्यान पिसाळ यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंचन प्रकल्पांच्या पुर्णत्वाचे आव्हान

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : जिल्ह्यातील उचंगी, धामणी, सर्फनाला, नागनवाडी, आंबेओहोळ हे मोठे चार सिंचन प्रकल्प पंधरा वर्षांहून अधिक काळ राजकीय इच्छाशक्तीअभावी आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे रेंगाळले आहेत. नागनवाडी वगळता इतर प्रकल्पांचे काम ७० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. हे प्रकल्प मार्गी लावल्यास १४ हजार ६८७ हेक्टर कोरडवाहू क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. परिणामी येथील शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील तीन मंत्र्यांसमोर राजकीय कौशल्य आणि ताकद पणाला लावत प्रकल्प पूर्ण करण्याचे मोठे आव्हान आहे.

जिल्ह्यात अद्याप हजारो हेक्टर शेतजमीन पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. परिणामी शेती बेभरवशाची बनली आहे. त्यामुळे संरक्षित पाणी उपलब्ध होण्यासाठी लघू, मध्यम, मोठे पाटबंधारे प्रकल्प उभारले जात आहेत. १९९६ मध्ये शिवसेना, भाजप युतीचे सरकार असताना उचंगी तर २००० ते २००२ यांदरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारच्या काळात धामणी, सर्फनाला, नागनवाडी, आंबेओहोळ प्रकल्पांना मंजुरी मिळाली. निधीची तरतूद करण्यात आली. पहिल्या टप्यातील कामांना सुरुवातही झाली. मात्र सरकार आणि प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन न करताच धरणांचे काम सुरू केले. प्रकल्पात ज्यांच्या जमिनी, घरे गेली त्यांना प्रशासकीय यंत्रणेने केवळ गाजर दाखवले. कामाचा नारळ फोडलेल्या लोकप्रतिनिधींनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी शेवटचा मार्ग म्हणून धरणांच्या घळभरणीचे काम रोखले. पाणी अडविण्याचे काम बंद पाडले. त्यास दहा वर्षे उलटून गेली. नंतर काम सुरू करण्यासाठी फारसे प्रयत्न झाले नाहीत. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कमीत कमी साठणारे ७.८० टीएमसी पाणी वाहून जात आहे. १४ हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्र बागायत होण्यापासून वंचित राहिले.

गेल्या पाच वर्षात भाजप-शिवसेना सरकार सत्तेवर असतानाही प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला गती आली नाही. केवळ कागदोपत्री घोडे नाचविल्याचे आरोप होत आहेत. आता पुन्हा शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले आहे. जिल्ह्यात तीन मंत्री आहेत. राज्याच्या एकूण राजकारणात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील वजनदार मानले जातात. त्यांनी पुढाकार घेतल्यास प्रकल्प सुरू होण्यातील अडथळे संपणार आहेत. सरकारी पातळीवर काही प्रश्न वर्षानुवर्षे रेंगाळले आहेत. तिन्ही मंत्र्यांनी सरकारकडे पाठपुरावा केल्यास अडचणी दूर होणार आहेत.

उचंगी प्रकल्पाच्या कामाला १९९९मध्ये प्रारंभ झाला होता. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने सहा महिन्यांत काम बंद झाले. २००८ मध्ये पुन्हा काम सुरू झाले. मात्र प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न कायम राहिल्याने वर्षभरातच काम बंद पडले. आधी पुनर्वसन करा मगच घळभरणी करा, अशी भूमिका प्रकल्पग्रस्तांनी घेत सुरू असलेले काम बंद पाडले. इथल्या सर्व विस्थापितांना पसंत पडेल अशी जमीन परिसरात उपलब्ध नाही. यामुळे जमिनीऐवजी रेडिरेकनरच्या पाचपट पैसे देण्याचा तोडगा पुढे आला आहे. त्यासाठी हेक्टरी ४० लाख देण्यास महसूल प्रशासनाची तयारी आहे. यास गती यायला हवी.

धामणी प्रकल्पाचे काम २००२ मध्ये सुरू झाले. पुनर्वसनाचे काम न झाल्याने २०१३ मध्ये प्रकल्पग्रस्तांनी तीव्र विरोध करून काम बंद पाडले. काम पुन्हा सुरू होण्यासाठी तातडीने ७५ कोटी रुपयांची गरज आहे. उर्वरित भूसंपादन, पुनर्वसनासाठी १३६ कोटी, मातीने ६२५ मीटरपर्यंत घळभरणीसाठी १२७ कोटी, सांडवा व उर्वरित कामांसाठी १३७ कोटींची गरज आहे. त्यासाठीचा आराखडा पाटबंधारे विभागाने सरकारकडे पाठवला आहे. तो मंजूर करून निधी देणे आवश्यक आहे.

किमतीत सात पट वाढ

रखडलेल्या प्रकल्पांपैकी धामणी हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. प्रकल्पाची मूळ किंमत १२० कोटी ३० लाख रुपये होती. ती सातपट वाढून ७८२ कोटी झाली. भूसंपादन आणि पुनर्वसनासाठी १० कोटींची गरज आहे. नागनवाडी प्रकल्पाची किंमत १२ कोटी ९३ लाखांवरुन ७३ कोटी २८ लाख रुपये झाली. हीसुद्धा पाचपट आहे. सरकारकडून वाढीव निधी मिळवण्याचे मोठे आव्हान आहे. यासाठी मुश्रीफ, पाटील यांच्यासह राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी वजन वापरणे गरजेचे आहे.

आधी पुनर्वसन, नंतर धरण असा कायदा आहे. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यास रखडलेल्या प्रकल्पांची कामे पूर्ण होतील. पुनर्वसनाचे काम प्रशासकीय इच्छाशक्ती नसल्याने रखडले आहे. प्रशासनाने गांभीर्याने प्रश्न सोडवले तर सर्व प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होऊ शकते. सर्वांचे पुनर्वसन झाल्यास प्रकल्पाच्या कामास कोणीही विरोध करणार नाहीत.

- मारुती पाटील, जिल्हा अध्यक्ष, श्रमिक मुक्ती दल

धामणी, सर्फनाला प्रकल्पाच्या कामास गती देण्याचा प्रयत्न सुरू आहे. धामणी प्रकल्पाचे काम घेलेले पूर्वीचे ठेकेदार न्यायालयात गेले आहेत. त्यातूनही मार्ग निघाला आहे. नव्याने निविदा काढण्याची प्रक्रिया केली जात आहे. पुनर्वसनाच्या कामास गती मिळाल्यास तिन्ही धरणांची कामे पूर्ण करता येतील.

- एस. आर. पाटील, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग

आंबेओहोळ, नागनवाडी, उचंगी प्रकल्पाचे रेंगाळलेले काम मार्गी लावले जात आहे. सर्व प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी पाठपुरावा केला आहे. पुनर्वसनावेळी जमीन न घेणाऱ्यांना पैसे वाटप करण्यात येतील. कामात कोणताही अडथळा न आल्यास दोन वर्षांत तिन्ही धरणांचे काम पूर्ण होईल.

- स्मिता माने, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग

मटा भूमिका

पुनर्वसन, प्रकल्पासाठी

निश्चित कालमर्यादा हवी

सिंचनाचे क्षेत्र वाढल्यास शेतीमधील उत्पादन वाढते. दरडोई उत्पन्न वाढल्यास त्याचा बाजारपेठेवर सकारात्मक परिणाम दिसतो. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावणे महत्वाचे आहे. यातील बहुतांशी प्रकल्पाचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच खासदार, मंत्री, आमदारांनी प्रयत्न करण्याची गरज ठळक झाली आहे. यासाठी शेतकऱ्यांचा दबावगट निर्माण व्हावा. शेतकरी संघटनांनीही हा प्रश्न प्राधान्याने घ्यावा. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी संघर्ष करणाऱ्या संघटनांनी प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सहकार्याची भूमिका घ्यावी. प्रशासन, सरकारने सर्व प्रकल्पग्रस्तांचे चांगल्या प्रकारे पुनर्वसन करण्यासाठी कृती आराखडा तयार करावा. तो पूर्ण करण्यासाठी निर्धारित वेळेची मर्यादा ठरवावी.

सिंचनाखालील प्रकल्पनिहाय क्षेत्र (हेक्टर)

२५१९

उचंगी (ता. आजरा)

२१००

धामणी (ता. राधानगरी)

२६४४

सर्फनाला (ता. आजरा)

१०६५

नागनवाडी (ता. भुदरगड)

६३५९

आंबेओहोळ (ता. आजरा)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनोख्या छंदातून जगाशी कनेक्टिव्हिटी

$
0
0

युवामुद्रा

Sachin.patil1@timesgroup.com

Tweet@sachinpMT

कोल्हापूर : छंद म्हणजे आनंद, आवड आणि विरंगुळा याचा मनोहारी संगम असतो. छंदातून स्वतःचा शोध घेता येतो. प्रत्येकाला कोणता ना कोणता छंद असतोच; त्यातून मिळणारी ऊर्जा रोजच्या कामात उपयोगी येते. याच अनुषंगाने लहानपणापासून जपलेल्या छंदाच्या माध्यमातून अपूर्वा पाटील या तरुणीने विविध देशातील मित्र मैत्रिणी जोडल्या आहेत. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून ६० देशातील पोस्टल तिकिटांचे संकलन केले असून तिच्याकडे पोस्टल तिकिटांचे दोन आंतरराष्ट्रीय, एक राष्ट्रीय अल्बम तयार झाला आहे.

जगात पोस्टल तिकिटांचे संकलन करणारे जवळपास १० करोड लोक आहेत. त्यापैकी भारतात ५० लाख जण तिकिटे एकत्र करण्याचा छंद जोपासतात. टाकाळा परिसरात राहणाऱ्या अपूर्वाने पाचवीपासून पोस्टल तिकिटे जमा करायला सुरुवात केली. तिला वडिलांनी दुबईतून आणलेले पोस्टाचे तिकीट भेट दिले होते. त्यानंतर तिकिटे जमवण्याचा छंद जडला. विविध देशांचे पोस्टल तिकिटे संकलित करण्याचा छंद जोपासणाऱ्यासाठी खास अनेक वेबसाइट कार्यरत आहेत. अपूर्वाने सोशल मीडियाच्या माध्यमातून अमेरिका, चीन, रशिया, जर्मनी, नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, डेनमार्क, सायप्रस, इटली, जपान, पोर्तुगाल, स्वीत्झर्लंड, थायलंड आदी देशातील पोस्टल तिकिटे संकलित केली आहेत. प्रत्येक तिकीट खास वैशिष्ट्यपूर्ण असून त्यावर त्या त्या देशाची संस्कृती, भौगोलिक, सामाजिक स्थितीचे चित्रण असते. वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येक देशातील संस्कृती जाणून घेता येते. प्रत्येक तिकिटाच्या माध्यमातून वेगळा संदेश दिला जातो. महत्त्वाच्या घडामोडी तिकिटावर छापल्या जातात. देशातील क्रीडा व इतिहास परंपरा तिकिटाच्या माध्यमातून समजायला मदत होते. दिसायला छोटी वाटणारी पोस्टल तिकिटे जगभरातील वैविध्यपूर्ण सांस्कृतिक परंपरा असणाऱ्या देशांना एकमेकांना जोडून ठेवतात. या छंदाच्या माध्यमातून एकत्र आलेले ग्रुप सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात राहून त्या त्या देशातील नाविन्यपूर्ण गोष्टी जाणून घेतात.

अपूर्वा सध्या चार्टड अकाऊटंट फायनल परीक्षेची तयारी करते आहे. तिचे प्राथमिक शिक्षण हॉलिक्रॉस कॉन्व्हेंट शाळेत तर उच्च माध्यमिक व पदवी डी. आर. के. कॉमर्स कॉलेजमधून झाले. वेल्थ मॅनेजमेंट फर्मच्या माध्यमातून ती आरोग्यविषयक चळवळीशी जोडली गेली आहे. तर अधिकाधिक लोकांनी आरोग्य विमा काढावा यासाठी ती प्रबोधनात्मक काम करते. तिचे वडील विजय हे बोन्साय आर्टिस्ट म्हणून काम करतात. त्यांचाही तिच्या छंदाला पाठिंबा आहे. लहानपणापासून आपल्या पाल्याची जिज्ञासा आणि मानसिक क्षितीज विस्तारावे, या हेतूने वडिलांनी रुजवलेला छंद अपूर्वाने पुढे कायम ठेवला आहे.

आयुष्यात प्रत्येकाने कोणता ना कोणता छंद आवर्जून जोपासावा. छंदातून आनंद मिळतो. त्याचबरोबर नवीन काहीतरी शिकण्याची संधीही मिळते. पोस्टल तिकिटांच्या संकलनातून जगभरात मित्र-मैत्रिणींचा ग्रुप तयार झाला. त्याचबरोबर तेथील संस्कृती, इतिहास, परंपरा, सामाजिक स्थिती जाणून घेता येते आहे. आपल्या देशातील वेगवेळ्या गोष्टीही तिथपर्यंत पोहोचवता आल्या.

अपूर्वा पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५० हजार शिक्षक, संस्थाचालक आंदोलनात

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठतर्फे जिल्ह्यातील पाच हजार शाळांमधील शिक्षक, संस्थाचालक, कर्मचारी आदी ५० हजारजण सहभागी होणार आहेत. गेल्या अनेक वर्षांतील रखडलेल्या मागण्यांबाबत शिक्षणक्षेत्रातर्फे या संपात आवाज उठवण्याचा निर्णय शैक्षणिक व्यासपीठच्यावतीने घेण्यात आला आहे.

या संपात प्रमुख २० मागण्या मांडण्यात येणार आहेत. अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी योजना लागू करावी. अनुदानास पात्र असलेल्या शाळांना प्रचलित निकषानुसार अनुदान द्यावे. निकषास अपात्र असलेल्या शाळांसाठी नियम शिथील करून अनुदानपात्रतेच्या कक्षेत आणावे. महागाई भत्ता लागू करावा. २० टक्के अनुदानासाठी पात्र शाळांना शंभर टक्के अनुदानाच्या कक्षेत सामावून घ्यावे. दर तीन वर्षांनी शाळांना मान्यता घेण्याचे धोरण रद्द करावे. वेतनश्रेणी, वेतनवाढ, ग्रंथपालासाठी पूर्णवेळ सेवामान्यता, महिला शिक्षक व कर्मचाऱ्यांना दोन वर्षासाठी बालसंगोपन रजा या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.

राज्य सरकारने गेल्या काही वर्षांत अशैक्षणिक व चुकीचे निर्णय घेतले आहेत. यामुळे शिक्षण क्षेत्रातील शिक्षक, संस्थाचालक, कर्मचारी यांच्यामध्ये नाराजीचे वातावरण आहे. परिणामी शिक्षणक्षेत्रातील अनेक प्रश्नही प्रलंबित राहिले आहेत. मोर्चे, आंदोलने यामाध्यमातून प्रश्नांसाठी लढा देण्याचे काम सुरू आहे. त्यासाठीच या देशव्यापी संपात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एस. डी. लाड, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘स्थायी’साठी जोरदार रस्सीखेच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्थायी समितीमधील आठ सदस्यांचा कार्यकाळ जानेवारीअखेर संपणार असल्याने नवीन सदस्य निवडीच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. महापालिकेच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभापतिपदांसह सदस्यांनाही महत्त्व प्राप्त झाले आहे. परिणामी सदस्यपदासाठी सर्वच पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. सोमवारी (ता. २०) महासभेमध्ये नवीन सदस्यांची नावे घोषित केली जाणार आहेत. त्यानंतर जानेवारीअखेर किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सभापती निवड होणार आहे.

स्थायी समितीमधील आठ सदस्यांचा कार्यकाल जानेवारीअखेर संपणार असल्याने सदस्यपदावर वर्णी लागण्यासाठी सर्वच पक्षातील इच्छुक नगरसेवकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. स्थायी समितीवर सत्तारुढ काँग्रेस आघाडीचे सत्ता असली, तरी भाजप, ताराराणी आघाडीने एक चमत्कार घडवून आणला आहे. या पार्श्वभूमीवर सदस्यपदांसाठी पक्षाशी अत्यंत एकनिष्ठ असणाऱ्या नगरसेवकांना प्राधान्य देण्याच्या हालचाली सुरू आहेत. ताराराणी आघाडीकूडन ईश्वर परमार व मेहजबीन सुभेदार यांच्या नावाची चर्चा आहे.

तर भाजप आघाडीकडून संभाजी जाधव यांच्यासह विजयसिंह खाडे-पाटील, संतोष गायकवाड, अश्विनी बारमेत आदी पक्षनेतृत्वाकडे आपले नाव पोहोचवत आहेत. तर शिवसेनेकडून राहुल चव्हाण इच्छुक आहे. काँग्रेसकडून प्रतापसिंह जाधव, राहुल माने तर राष्ट्रवादीकडून अद्याप याबाबतची चर्चा झालेली नाही. मात्र यावर्षी स्थायी सभापतिपद राष्ट्रवादीकडे असल्याने त्यासाठी संदीप कवाळे व सचिन पाटील यांची नावे चर्चेत आहेत. महापालिकेच्या विठ्ठल रामजी चौकामध्ये सदस्यपदाच्या चर्चा होत असल्या, तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या दौऱ्याच्या नियोजनात सर्वजण व्यस्त आहेत. नसर्री बागेतील राजर्षी शाहू समाधी स्मारकाचे उद्घाटन होण्यापूर्वी सदस्य व सभापतिपदाचे नाव निश्चित होण्याची शक्यता आहे.

जानेवारीअखेर उपमहापौर संजय मोहिते, ताराराणीचे गटनेते सत्यजित कदम, दीपा मगदूम, सविता घोरपडे, प्रतीक्षा पाटील, प्रतिज्ञा उत्तूरे, भाग्यश्री शेटके, गीता गुरव यांचा स्थायी समिती सदस्यत्वाचा कार्यकाळ संपणार आहे. निवृत्त सदस्यांच्या जागी सोमवारी (ता. २०) होणाऱ्या महासभेत सर्व पक्षाचे गटनेते नावे देतील. त्यानंतर नावाची घोषणा झाल्यानंतर सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर होईल.

विरोधी पक्षनेतेपदासाठी

ठाणेकर, खाडेंची चर्चा

एकीकडे स्थायी समिती सदस्यपदासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू असताना विरोधी पक्ष नेतेपदासाठीही भाजपमध्ये जोरदार हालचाली सुरू आहेत. चार वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तीन वर्षे ताराराणी आघाडीकडे तर एक वर्ष भाजपकडे हे पद होते. सुरुवातीस भाजपचे संभाजी जाधव यांनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर ताराराणी आघाडीचे किरण शिरोळे व विलास वास्कर यांच्याकडे पद आले. वास्कर यांच्याकडे सलग दोन वर्षे पद असल्याने शेवटच्या वर्षी भाजपने या पदाची मागणी केली आहे. या पदासाठी अजित ठाणेकर व विजयसिंह खाडे-पाटील यांची नावे चर्चेत आहेत.

स्थायी समितीतील सध्याचे पक्षीय बलाबल

काँग्रेस : ५

राष्ट्रवादी : ३

ताराराणी : ४

भाजप : ३

शिवसेना : १

एकूण : १६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंढरीत मठाधिपतीचा खून

$
0
0

कराडकर मठातील प्रकाराने खळबळ

माजी मठाधिपतीकडूनच कृत्य

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

मठाधिपतीपदाच्या वादातून पंढरपुरातील प्रसिद्ध कराडकर मठात विद्यमान मठाधिपतीचा निर्घृण खून करण्यात आला. या धक्कादायक घटनेमुळे वारकरी संप्रदाय हादरून गेला आहे. जयवंत पिसाळ (वय ३० , लवंगमाची ता. वाळवा, जि. सांगली) असे खून झालेल्या मठाधिपतीचे नाव आहे. बाजीराव भागवत जगताप ऊर्फ बाजीरावबुवा कराडकर (वय ३५ , कोडोली, ता. कराड) असे आरोपीचे नाव आहे. कराडकरने चाकू आणि वरवंट्याचे घाव घालून पिसाळ यांचा खून केला. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास हा प्रकार घडला.

येथील कराडकर मठातील बाजीराव जगतापची संस्थेच्या विश्वस्तांनी वर्षभरापूर्वी मठाधिपतीपदी नियुक्ती केली होती. मात्र त्याची वर्तणूक आक्षेपार्ह असल्याने त्याला हटवून जयवंत पिसाळ यांची नेमणूक केली होती. त्यानंतर गेल्या वर्षभरापासून अनेक वाद आरोपी आणि ट्रस्टी यांच्यात सुरू होते. यातील आरोपी बाजीराववर ट्रस्टचे अध्यक्ष यशवंत माने यांना बेदम मारहाण केल्याचा गुन्हाही दाखल आहे.

कालच पुत्रदा एकादशी झाली होती. सर्व वारकरी मंडळी मठात आली होती. या काळात दशमी, एकादशी आणि द्वादशी असे तीन दिवस कीर्तन सेवा असते. यातील एक कीर्तन देण्याची मागणी आरोपीने केली होती, असे सांगितले जात आहे. यावरूनच दोघांत वाद झाला. यानंतर मंगळवारी दुपारी मठाधिपती पिसाळ आपल्या खोलीत गेल्यावर बाजीरावने आपल्या खोलीत जाऊन चाकू आणि वरवंटा आणला आणि थेट पिसाळ यांच्यावर हल्ला केला. पिसाळ यांच्या डोळ्यावर आणि शरीरावर बाजीरावने सपासप वार केले. त्यात पिसाळ यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकाराने मठात एकच धावपळ उडाली. पोलिसांना या प्रकाराची माहिती देण्यात आली. पोलिसांनी प्रसंगावधान राखत मठातील लोकांना त्या खोलीचा दरवाजाला बाहेरूनन कडी घालण्याची सूचना केली. त्यानंतर तातडीने पोलिस घटनास्थळी दाखल झाले. कडी असल्याने बाजीराव हत्यारासह पोलिसांना सापडला.

.. .. .. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेएनयूमधील हल्याचा निषेध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील जेएनयू विद्यार्थी व शिक्षकांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा एन. एस. यू. आय. च्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. गांधी मैदानमधील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर कार्यकर्त्यांनी तोंडाला काळ्या फिती बांधून हल्लेखोराचा निषेध नोंदविला. आंदोलनात उमेश पाडळकर, यश शिर्के, अक्षय शेळके, अमित चव्हाण, मुजफ्फर टिनवाले, शुभम गवंडी, शिवतेज मोहिते आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पी. एन. गटाला हवे ‘बांधकाम’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या चार समिती सभापतिपदासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. १६ जानेवारी रोजी या निवडी होणार आहेत. काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील गटाकडून बांधकाम समिती सभापतिपदासाठी दावा करण्यात येणार आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला शिक्षण समिती सभापतिपद हवे आहे. दरम्यान सभापती निवडीअगोदर महाविकास आघाडीच्या सदस्याना कोकण दर्शन घडविण्यात येणार आहे. दुसरीकडे भाजप आघाडीकडे पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत आहेत. सभापतिपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी अंतर्गत रस्सीखेच आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व मित्रपक्षांच्या महाविकास आघाडीमध्ये पदासाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे. अध्यक्ष व उपाध्यक्षपद अनुक्रमे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. शिवसेनेचे दहा सदस्य असून त्यांना तीन पदे हवी आहेत. अपक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदस्यासाठी एक पद असा फॉर्म्युला निश्चित केला आहे. दरम्यान काँग्रेसच्या १४ सदस्य संख्येत आमदार पी. एन. गटाचे चार सदस्य आहेत. या गटाचे सदस्य पांडुरंग भादिंगरे यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत होते.

प्रत्यक्ष अध्यक्षपदाच्या निवडीत गृहराज्यमंत्री सतेज पाटील गटाचे सदस्य बजरंग पाटील यांनी बाजी मारली. आता पी. एन. गटाच्या सदस्यांकडून समिती सभापतिपद मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पी. एन. गटाच्या चार सदस्यात राहुल पाटील, सुभाष सातपुते, शिल्पा पाटील व पांडुरंग भादिंगरे यांचा समावेश आह. या गटाचे सदस्य राहुल पाटील यांना बांधकाम समिती सभापतिपद मिळावे, असे या गटाच्या सदस्यांचे म्हणणे आहे. याच गटाचे सदस्य सुभाष सातपुते यांचे नाव समाजकल्याण समिती सभापतिपदासाठी चर्चेत आहे. दुसरीकडे बांधकाम समिती सभापतिपदासाठी शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील गटाचे सदस्य हंबीरराव पाटील, डॉ. सुजित मिणचेकर गटाचे सदस्य प्रवीण यादव यांची नावे चर्चेत आहेत. महाविकास आघाडीच्या सदस्यांना सहलीवर पाठविण्याचे नियोजन सुरू आहे. हे सदस्य शनिवारी किंवा रविवारी कोकण दौऱ्यावर रवाना होतील, अशी माहिती समजते.

स्वाभिमानीला हवे 'शिक्षण'

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दोन सदस्य आहेत. संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी काँग्रेस आघाडीला सर्वात आधी पाठिंबा जाहीर केला होता. जिल्हा परिषदेत स्वाभिमानी संघटनेला शिक्षण समिती सभापतिपद देऊन सन्मान करावा, असे संघटनेतील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. संघटनेच्या जि.प.सदस्या पद्माराणी पाटील यांचे नाव 'शिक्षण'साठी चर्चेत आहे. याशिवाय शिवसेनेचे सदस्य प्रवीण पाटील, वंदना जाधव यासुद्धा प्रयत्नशील आहेत. अपक्ष सदस्या रसिका पाटील यांच्याकडूनही पदावर दावा करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरोजिनी बाबरांमुळे बहुजन स्त्रीला आत्मभान

$
0
0

\Bम. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

\B'कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्वातून बहुजन स्त्रीला आत्मभान प्रदान करण्याचे कार्य डॉ. सरोजिनी बाबर यांनी केले,'असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण अध्यासन केंद्र व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने 'सरोजिनी बाबर: कार्य व संशोधन लेखन' या विषयावरील एकदिवसीय चर्चासत्रात ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र सभागृहात झालेल्या या चर्चासत्राचे उद्घाटन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते. यावेळी डॉ. बाबर यांच्या भगिनी कुमुदिनी पवार यांचे नातू करण पवार प्रमुख उपस्थित होते.

डॉ. गवस म्हणाले, 'डॉ. बाबर या बहुजन समाजातील कर्तृत्ववान स्त्री तर होत्याच, शिवाय, लोकज्ञानाचा संचय करणारी कर्तबगार संशोधक आणि गोतावळा जपण्याची वृत्ती असणारी उत्तम माणूसपणा हाही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक अभिन्न घटक होता. या तिहेरी भूमिकांत वावरत असताना साहित्य, संशोधन, राजकारण, समाजकारण अशा विविध क्षेत्रांत त्यांनी आपले योगदान दिले. त्या माध्यमातून समाजाला काही ना काही देण्याचा कसोशीने प्रयत्न केला. हे सर्व त्यांनी कोणत्याही मान्यतेसाठी केले नाही. किंबहुना, मान्यतेला नकार देऊन स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यामध्ये जसे दलित साहित्य यशस्वी झाले, तसेच मान्यतेचे निकष बाजूला ठेवून काम करणाऱ्यांत सरोजिनी बाबर यांचे नाव अग्रेसर आहे.'

यावेळी डॉ. जयसिंगराव पवार यांनी डॉ. बाबर यांच्या आठवणींना उजाळा दिला. अध्यक्षीय भाषणात डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, 'विद्यापीठातील प्रस्तावित नूतन संग्रहालयामध्ये लोकसाहित्याचे एक दालन असावे आणि त्यात सरोजिनी बाबर यांच्या कार्याचा समावेश असावा, अशा स्वरुपाचा प्रस्ताव अध्यासनामार्फत सादर करावा.' डॉ. प्रकाश पवार यांनी प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहू समाधीस्थळाचा १९ रोजी लोकार्पण

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नर्सरी बागेतील राजर्षी शाहू समाधीस्थळाचा लोकार्पण सोहळा रविवारी (ता. १९) भव्यदिव्य आणि दिमाखदार करण्याचा निर्णय मंगळ‌वारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाल्यानंतर महापालिका पदाधिकारी व समिती सदस्यांनी शाहू समाधीस्थळाची पाहणी केली. शाहूंच्या कार्याप्रमाणे भव्य उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्याबाबतच्या नियोजनासाठी गुरुवारी (ता.९) शाहूप्रेमींची बैठक होणार आहे.

समाधीस्थळ समिती सदस्य व अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना महापौर अॅड. लाटकर म्हणाल्या, 'राजर्षी शाहू महाराजांचे कार्य मोठे आहे. त्यांच्या कार्याप्रमाणे हा सोहळा राजघराण्याला शोभेल असा व्हावा. यासाठी तालीम संस्था, बोर्डिंग्ज, कुस्तीगीर, मर्दानी खेळाडू, शाहीर, राजघराण्यांशी संबंधित सरदार घराणी, माजी महापौर यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे. उत्सवादिवशी पोलिस अथवा आर्मी बँड असावा. तीन दिवस सोहळ्याचे आयोजन करावे. त्यामध्ये एक दिवस 'अग्निदिव्य' नाट्यप्रयोग, शाहिरी व पारंपरिक कलांचा समावेश असावा. महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी महापालिकेतून एकत्र सोहळ्यासाठी प्रयाण करु.'

बैठकीस आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, विरोधी पक्षनेता विलास वास्कर, सभागृहनेता दिलीप पोवार, नगरसेविका सरीता मोरे, नगरसेवक ईश्वर परमार, जय पटकारे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, पुरभिलेखा अधिकारी गणेश खोडके, माजी नगरसेवक राजेश लाटकर, नंदकुमार मोरे, समिती सदस्य वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, स्थापत्य अभियंता अभिजीत जाधव, ठेकेदार व्ही. के. पाटील आदी उपस्थित होते. सर्वांनी बैठकीनंतर समाधीस्थळाची पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्न, औषधकडून मटणाची तपासणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरात मटण दरावरून सुरू झालेल्या संघर्षानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मटण विक्री करणाऱ्या दुकाने, मार्केट व मॉलची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी जुन्या राष्ट्रीय मार्गावरील स्टार बझार व ताराबाई पार्क, खानविलकर पेट्रोल पंपाजवळील स्टार मार्केटची तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये दोन्ही ठिकाणी मटण नसल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.

सर्वच वस्तूंचे दर वाढत असताना गेल्या काही महिन्यांपासून मटण दरात चांगलीच वाढ झाली आहे. मटण दरावरून विक्रेते आणि मटण दरवाढविरोधी कृती समितीमध्ये चांगलाच संघर्ष उफाळून आला आहे. तोडग्यानुसार प्रतिकिलो ४८० रुपये दराने विक्री परवडत नसल्याने विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवली आहेत. जादा दराने विक्री करताना, नियम धाब्यावर बसवला जात असल्याचा आरोप कृती समितीच्यावतीने केला जात आहे. नियम आणि कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी करत त्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात ठिय्या मारला. त्यानंतर सहायक आयुक्त मोहन केंबळकर, अन्न सुरक्षा अधिकारी विजय कोनवणे, अशोक कोळी, आर. पी. पाटील यांनी स्टार बझार व स्टार मार्केटची तपासणी केली. तपासणीदरम्यान केवळ चिकन व माशे मिळाले. 'कृती समितीच्या मागणीनुसार दोन ठिकाणी तपासणी केली, पण तेथे मटण विक्रीसाठी उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले,' असे सहायक आयुक्त केंबळकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संपातील कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

$
0
0

कोल्हापूर

बुधवारी होणाऱ्या संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने म्हटले आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात येणार आहे. तसेच 'विना काम, विना वेतन'चा अवलंब करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. आंदोलनात किती कर्मचारी सहभागी झाले आहेत, रजेवर किती कर्मचारी आहेत, यासंदर्भातील माहिती सकाळी ११ वाजेपर्यंत कळविण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाकडून सर्व विभागप्रमुख, पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जि.प. बातमी जोड....

$
0
0

महाविकास आघाडीकडून चर्चेतील नावे

बांधकाम सभापती : राहुल पाटील (काँग्रेस), हंबीरराव पाटील व प्रवीण यादव (शिवसेना), शिक्षण सभापती : पद्माराणी पाटील (स्वाभिमानी), प्रवीण यादव, वंदना जाधव (शिवसेना), रसिका पाटील (अपक्ष), समाजकल्याण सभापती : सुभाष सातपुते (काँग्रेस), कोमल मिसाळ, मनीषा कुरणे व स्वाती सासने (शिवसेना).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शास्त्रीय सुरांनी रसिक मुग्ध

$
0
0

म. टा. प्रतिनधी

'स्वरपौर्णिमेचे चांदणे' अशा शब्दांत ज्यांच्या गायनाची ओळख आहे त्या पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या गायनाने समृद्ध झालेल्या स्वरांचा वर्षाव कोल्हापूरकर रसिकांवर करण्यात आला. अभिषेकी यांचे शिष्य हेमंत पेंडसे व सुमेधा देसाई यांच्या गायनाने रसिक मुग्ध झाले. गायन समाज देवल क्लबच्यावतीने निवृत्त न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी यांच्या स्मृतिनिमित्त या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.

पंडित जितेंद्र अभिषेकी नेहमी सादर करत असलेल्या पंडित रामाश्रय झा यांच्या रागमालेने या मैफलीची सुरूवात झाली. पेंडसे यांनी मर्म बंधातली ठेव ही, छेडून गेले मधून, हे सूरांनो चंद्र व्हा, अबीर गुलाल, विष्णूमय जग ही नाट्यगीते व भक्तीगीते सादर करत रसिकमनाचा ठाव घेतला.

सुमेधा देसाई यांनी देवा घरचे ज्ञात कुणाला, छत आकाशाचे, गर्द सभोती रान साजणी, शब्दावाचून कळले सारे, सुखाचे हे सुख, रंध्रात पेरली मी ही नाट्यगीते सादर केली.

यावेळी श्रीकांत कुलकर्णी यांचे प्रतिमापूजन केले. श्रीकांत डिग्रजकर यांनी गायकांचा परिचय करून दिला. सुलभा कुलकर्णी यांनी आभार मानले. राया कोरगावकर यांनी संवादिनी साथ तर महेश देसाई यांनी तबला साथ दिली. यावेळी देवल क्लबचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, निवृत्त पोलिस उपअधीक्षक प्रभाकर पाटील, डॉ. सुभाष आठले, विनोद डिग्रजकर यांच्यासह संगीत क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीक्षान्त समारंभ सहा फेब्रुवारीला

$
0
0

कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाचा ५६ वा दीक्षान्त समारंभ येत्या सहा फेब्रुवारी रोजी होणार आहे. विद्यापीठ प्रशासनाकडून दीक्षान्त समारंभाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. प्रशासकीय पातळीवर बैठका घेऊन अधिकाऱ्यांवर कामाची जबाबदारी निश्चित केली जात आहे. परीक्षा विभागातील लगबग वाढली आहे. यंदाच्या दीक्षान्त समारंभाला राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन हे प्रमुख पाहुणे असणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. गेले दोन दिवस तयारीने वेग घेतला आहे. विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभाविषयी स्नातकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. विद्यापीठाचे कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्हा कार्यक्षेत्र आहे. विद्यापीठाचा पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा हा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची पर्वणी असते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यूथ बँकेस कॅश क्रेडिट कर्ज नुतनीकरणास मान्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रिझर्व्ह बँकेने यूथ डेव्हलपमेंट बँकेवर आणखी सहा महिने निर्बंध कायम ठेवले असले तरी बँकेकडून थकबाकी वसुलीसाठी केलेले प्रयत्न लक्षात घेऊन कॅश क्रेडिट कर्जाच्या नुतनीकरणास मान्यता दिली आहे, असे पत्रक बँकेचे अध्यक्ष आर.पी. पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

पत्रकात म्हटले आहे, गेल्या वर्षी पाच नोव्हेंबर २०१९ रोजी रिझर्व्ह बँकेने यूथ बँकेवर निर्बंध लादले होते. रविवारी एक वर्षाची निर्बंधाची मुदत संपली. पण निर्बंध उठवण्यासाठी अजूनही एक कोटी ६८ लाख रुपये थकबाकी वसुलीची आवश्यकता आहे. ही वसुली न झाल्याने बँकेवर आणखी सहा महिने निर्बंध लादले आहेत. आजअखेर बँकेने १५ कोटी ४५ लाख रुपयांची थकबाकी वसुली केली आहे. बड्या थकबाकीदारांच्या मालमत्ता सिक्युरिटीझेशन कायद्याखाली बँकेने ताब्यात घेतल्या असून त्या मालमत्ता विक्रीसाठी नोटीस प्रसिद्ध केली आहे. थकबाकीदारांची वसुली न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने विलंब होत आहे. जानेवारी २०२० अखेर वसुलीचे संपूर्ण उद्दिष्ट पूर्ण करुन बँक स्वत: रिझर्व्ह बँकेकडे निर्बंध उठवण्याची मागणी करणार आहे.

बँकेची एकूण गुंतवणूक ७२ कोटी रुपये असून सरकारी रोख्यांमध्ये ६४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. बँक व्यवस्थापन खर्चात ६० टक्के कपात केली आहे. बँकेकडे सध्या ७८ कोटी रुपयांची तरलता आहे. हार्डशिपच्या माध्यमातून विवाह, शैक्षणिक फी, औषधोपचार आणि उदरनिर्वाहाकरिता १२ कोटी ४२ लाखांच्या ठेवी परत केल्या आहेत. बँकेकडे सक्षम लिक्विडिटी असल्याने ठेवी परत करण्याच्या सध्याच्या मर्यादेत वाढ करावी, अशी मागणी केली आहे. ठेवीदारांनीसुद्धा संयम राखून वसुलीच्या कामात सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष पाटील आणि ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images