Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सहा लाख महिलांना केडीसीसीचा आधार

$
0
0

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet:@satishgMT

कोल्हापूर : महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आघाडी घेतली असून ३२ हजार ३२९ महिला बचतगटांतील पाच लाख ९६ हजार ८६७ महिलांना आर्थिक बळ दिले आहे. या महिलांना ११७ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. छोट्या मोठ्या उद्योगातून महिला उदरनिर्वाह करत आहेत.

जिल्हा बँकेने वीस वर्षांपूर्वी, २००० मध्ये महिला बचतगटांना कर्जरुपाने पतपुरवठा सुरू केला. सुरुवातीच्या काळात १४ बचत गटांना कर्ज देण्यात आले. नंतर मोठ्या संख्येने महिला बचतगटांकडून कर्जाची मागणी होऊ लागली. त्यासाठी जिल्हा बँकेने स्वतंत्र महिला विकास कक्ष सुरू केला. गेल्या वीस वर्षांत जिल्हा बँकेने बचतगटांना कर्जपुरवठा करण्यात आघाडी घेतली आहे. आज जिल्हा बँकेच्या शहर आणि ग्रामीण भागात १८७ शाखा असून ग्रामीण भागातील महिला जिल्हा बँकेशी जोडल्या गेल्या आहेत.

आता मार्च २०१९अखेर जिल्ह्यात ४० हजार ८५१ गट स्थापन केले आहेत. ३२ हजार ३२९ गटांना ११७ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. महिला बचतगटांत दहा ते वीस सदस्या असतात. त्यांना या कर्जाचा फायदा होतो. पाच लाख ९६ हजार महिला बचतगटांच्या माध्यमातून व्यवहार करीत आहेत. बचतगटांना आर्थिक स्तराबरोबर व्यावसायिक स्तरावर सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री व्हावी यासाठी कायमस्वरुपी विक्री केंद्र उपलब्ध करून दिले आहे. महिला बचतगटांकडून सुरू असणाऱ्या व्यवसायांनाही २२९ कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा करण्यात आला आहे.

महिला बचत गटांकडून विविध वस्तू तयार केल्या जातात. त्यांची विक्री केली जाते. अनेक संस्था फक्त बचतगटांकडून तयार केलेल्या वस्तू खरेदी करतात. बचगटांच्या माध्यमातून विविध खाद्यपदार्थ, कोल्हापुरी चप्पल, आकाशकंदील, घोंगडी, गोधडी, पर्स, पिशव्या, पीठ, मसाले तयार केल्या जातात. काही संस्थांकडून खत विक्री केंद्र, स्वस्त धान्य दुकान, रॉकेल, बियाणे विक्री, सामुदायिक शेती, दूध संस्था, म्हैस पालन हे व्यवसाय केले जातात. जिल्हा बँकेत अनेक संस्थांना कर्ज दिल्यावर त्यांचे कर्ज थकीत असते. पण, महिला बचत गटांकडून कर्जफेडीचे प्रमाण अतिशय चांगले आहे. दरवर्षी ९७ ते ९८ टक्के कर्ज फेडले जाते. कर्ज फेडणाऱ्या संस्थांना त्यांची स्थिती पाहून बँकेकडून जादा कर्जही दिले जाते.

नाबार्डकडूनही कौतुक

महिला बचत गटांना आर्थिक सहाय्य करून त्यांना स्वावलंबी बनविण्याच्या प्रयत्नांबद्दल नाबार्डनेही नाविन्यपूर्ण योजना राबवणाऱ्या दोन महिला बचत गटांचा सन्मान केला. गोधडी आणि रजई तयार करणाऱ्या रिद्धी-सिद्धी महिला बचत गटाचा तर कोल्हापुरी चप्पल तयार करणाऱ्या वीरशैव कक्कैय्या महिला बचत गटांना हॉटेल ताजमध्ये प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली.

बेलवळे, शेळेवाडीत माहितीपट

कागल तालुक्यातील बेलवळे येथील भावेश्वरी बचत गट आणि राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी येथील जयलक्ष्मी महिला बचत गट या दोन संस्थांच्या कार्याबद्दल नाबार्डने माहितीपट बनवला आहे. भावेश्वरी बचत गट प्राप्तिकर भरत असून त्यांच्यावतीने खत विक्री, स्वस्त धान्य दुकान, रॉकेल विक्री, बियाणे विक्रीचे केंद्र चालवले जाते. जयलक्ष्मी बचत गटाकडून सामुदायिक शेती, महिला दूध संस्था, म्हैस पालन, ट्रॅक्टर भाड्याने देणे हे व्यवसाय चालवले जातात.

महिला बचत गटाकडून कर्जाची मागणी होत असून बँकेच्यावतीने सहकार्य केले जाते. अनेक बचत गटांनी मोठे व्यवसाय सुरू केले असून त्यांना दहा लाख रुपयांपर्यतही कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. बचत गटांकडून प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड केली जाते.

- स्नेहल कारंडे, विभाग प्रमुख महिला विकास कक्ष, जिल्हा बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सव्वा महिन्यात ९० कोटी वसूल

$
0
0

मनपा लोगो

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर

चालू आर्थिक वर्षातील वसुली कासवगतीने सुरू होती. नोव्हेंबरअखेर ३५ टक्क्यांचा आकडा पार केलेल्या महापालिका प्रशासनाने गेल्या सव्वा महिन्यात मात्र चांगलीच आघाडी घेतली आहे. या कालावधीत विविध विभागांनी ९० कोटींची भर महापालिकेच्या तिजोरीत टाकली आहे. वसुलीची टक्केवारी ४८ टक्क्यांपर्यंत असली तरी गेल्या महिन्याभरात अधिकाऱ्यांनी उल्लेखनीय काम केल्याने २३५ कोटींची वसुली करण्यात यश आले आहे.

२०१९-२० साठी २६ विभागांना ४६४ कोटींचे उद्दीष्ट दिले होते. वर्षाच्या पहिल्या दिवसापासून करदात्यांवर विविध सवलतींचा वर्षाव केला. तरीही वसुली असमाधानकारक राहिली. आठ महिन्यात केवळ १३० कोटी म्हणजेच ३५ टक्क्यांपर्यंत वसुली झाली होती. त्यामुळे उर्वरित चार महिन्याच्या कालावधीत उद्दीष्टपूर्तीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. प्राप्त होणाऱ्या महसुलापैकी ५६ टक्के रक्कम कर्मचाऱ्यांचा वेतनावर खर्च होत आहे. सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर त्यामध्ये अधिकच वाढ होणार आहे. परिणामी होणाऱ्या वसुलीतून कर्मचाऱ्यांचे वेतन तरी भागेल का, असा प्रश्न निर्माण झाला होता. मिळणारी सर्व रक्कम वेतनावर खर्च झाल्यास त्याचा गंभीर परिणाम विकासकामांवर होणार असल्याचे निदर्शनास येताच आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी आणि स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी वसुलीबाबतची सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक घेतली. वसुलीचा वेग वाढविण्याच्या सक्तसूचना देताना कारवाई करण्याचा इशाराही दिला. केवळ इशारा न देता आठवड्यात पुन्हा वसुलीचा आढावा घेताना असमाधानकारक कामाबद्दल एका विभागाच्या विभागप्रमुखाला नोटीस बजावली. तसेच कररचनेबाहेरील मिळकतींचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्याचा चांगला परिणाम सव्वा महिन्यातील वसुलीवर दिसून आला आहे. सर्वच विभागांनी रस्त्यावर उतरुन वसुली करण्यास सुरुवात केली. पाणीपुरवठा, घरफाळा आदी विभागांनी थकीत करापोटी मिळकतदारांवर कारवाई केली. या कारवाईमुळे वसुलीची टक्केवारी ३५ वरुन ४८ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.

नगररचना व इस्टेट विभाग वगळता इतर विभागांनी उल्लेखनीय वसुली केली आहे. घरफाळा, अतिक्रमण, परवाना, आरोग्य, ड्रेनेज व पाणीपुरवठा विभागांनी ५० टक्क्यांपेक्षा जास्त वसुलीचा आकडा पार केला आहे. घरफाळा ५०, पाणीपुरवठा २६, ड्रेनेज आठ व परवाना विभागाने दोन कोटींची वसुली केली आहे. स्थानिक संस्था कर (अनुदान) राज्य सरकारकडून प्राप्त न झाल्याने वसुलीचा आकडा कमी दिसत असला, तरी नगररचना विभागाची बदललेली बांधकाम नियमावली आणि इस्टेट विभागाला भाडेकरुबाबत सुरू असलेल्या न्यायालयीन दाव्याचा फटका बसला आहे. आर्थिक वर्ष संपण्यास अद्याप तीन महिन्याचा अवधी असून या कालावधीत पुन्हा मिळकतदारांना सवलती देण्यात येतील. त्यामुळे वसुलीची टक्केवारी वाढेल, मात्र दिलेले उद्दीष्ट पूर्ण होईल का, याबाबत खुद्द प्रशासनच सांशक आहे.

......

चौकट

विभाग उद्दीष्ट वसुली (तीन जानेवारीपर्यंत)

सर्व आकडेवारी कोटीमध्ये

.......

स्थानिक संस्था कर (अनुदान) २०८ ३७

नगररचना ४३ १०

घरफाळा ७४ ५०

इस्टेट ५४ चार कोटी ८४ लाख

अतिक्रमण दोन एक कोटी ५० लाख

परवाना चार दोन

आरोग्य चार एक कोटी ७९ लाख

ड्रेनेज १२ आठ

पाणीपुरवठा ५७ २६

एकूण ४६४ २३५

....

कोट

'आर्थिक वर्षातील वसुली असमाधानकारक असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तातडीने आढावा घेण्यास सुरुवात केली. वसुलीमध्ये हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावली. तसेच कररचनेबाहेरील मिळकतींचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्याचा वसुलीवर चांगला परिणाम झाला. नागरिकांना ऑनलाइन कर भरण्यासाठी स्टेट बँकमध्ये सुविधा देत आहोत. त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद द्यावा.

डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोहिया सांस्कृतिक मंचतर्फे संगीत महोत्सव

$
0
0

साहित्य संस्कृती लोगो

कलाकरांचे फोटो आहेत.

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दि न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित रसिकाग्रणी मदनमोहन लोहिया सांस्कृतिक मंचतर्फे ९ ते ११ जानेवारी या कालावधीत संगीत महोत्सव व राज्यस्तरीय भावगीत-नाट्यगीत गायन स्पर्धेचे आयोजन केले आहे, अशी माहिती मंचचे अध्यक्ष विनोदकुमार लोहिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. तीन दिवसीय संगीत महोत्सवातून कलाप्रेमींना नाट्य, अभंग, भक्तीसंगीताच्या मेजवानीचा आस्वाद लुटण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

संगीत महोत्सव व गायन स्पर्धेचे सगळे कार्यक्रम राम गणेश गडकरी सभागृह येथे होणार आहेत. सगळे कार्यक्रम विनामूल्य आहेत. सलग तीन दिवस होणाऱ्या संगीत महोत्सवातील कार्यक्रम रोज सायंकाळी सहा वाजता सुरू होतील. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी 'नाट्यरंग'कार्यक्रमांतर्गत संवादिनी सादरकर्त्या संगीता इंदुलकर-सुतार यांचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये संवादिनीच्या सुरातून नाट्यगीतांची मैफल रंगणार आहे.

लोहिया म्हणाले, 'शुक्रवारी (ता.१०) 'स्वर नर्तन' कार्यक्रमांतर्गत ऐश्वर्या कडेकर व नीता कुलकर्णी मुतालिक यांचे शास्त्रीय गायन तर मंजिरी हसबनीस यांचा कथ्थक नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. शनिवारी (ता.११ ), संगीत महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी 'मर्मबंधातील ठेव' या विशेष कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे, गायिका मुग्धा वैशंपायन यांचा नाट्य, अभंग व भक्तीगीतांचा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमासाठी सहकलाकार म्हणून आशय कुलकर्णी व नितीन देशमुख हे तबला साथ करणार आहेत. सौरभ शिपूरकर हे हार्मोनियम, सचिन जगताप हे बासरी तर केदार गुळवणी व्हायोलिन साथ करणार आहे. सुनील गुरव हे की बोर्ड, ओंकार दळवी हे ढोलकी, गीता मनवाडकर हे सहगायक आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश्वरी गोखले व विघ्नेश जोशी करणार आहेत. पत्रकार परिषदेला संस्थेचे सहसचिव प्रभाकर हेरवाडे, प्राचार्य एस. एस. चव्हाण, डॉ. शीतल धर्माधिकारी, प्रा. सतिश कुलकर्णी, प्रा. गोविंद पैठणे, गौरी कुलकर्णी, एस. एस. अतिग्रे, सतिश माळी, मोहन भांडवले उपस्थित होते.

....

एक लाख आठ हजार रुपयांची बक्षीसे

संगीत महोत्सवादरम्यान राज्यस्तरीय भावगीत व नाट्यगीत गायन स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचे यंदाचे आठवे वर्ष आहे. यावर्षी स्पर्धेत १५० गायकांचा सहभाग राहील. ९ ते १४, १५ ते ३५ आणि ३६ ते ५५ या वयोगटांतर्गत स्पर्धा होणाार आहेत. प्रत्येक वयोगटातील पहिल्या तीन क्रमांकांच्या विजेत्यांना रोख बक्षीस, मानचिन्ह व प्रमाणपत्रांनी गौरविण्यात येणार आहे. उत्तेजनार्थ बक्षीसे दिली जाणार आहेत. एकूण एक लाख आठ हजार रुपयांची रोख बक्षीसे आहेत. दरम्यान, मंचतर्फे घेतलेल्या राज्यस्तरीय नाट्यगीत आणि भावगीत गायन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा शनिवारी (ता.११ )सायंकाळी आहे. दरम्यान, संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. वि. ह. वझे व कर्नल ए. बी. जाधव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अनुक्रमे डॉ.गिरीश वझे यांच्या हस्ते नाट्यगीत स्पर्धेतील विजेत्यांना तर डॉ. हेमिनी अजित चांदेलकर यांच्या हस्ते भावगीत गायन स्पर्धेचा पारितोषिक वितरण होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयसिंगपुरात नऊ मटणविक्रेत्यांना नोटिसा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

जयसिंगपुरात सोमवारी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मटणविक्रीच्या दुकानांची तपासणी केली. नऊ विक्रेत्यांकडे दुकानगाळ्यांचे परवानेच नसल्याचे निदर्शनास आले. यानंतर अधिकाऱ्यांनी तेथील विक्रेत्यांना नोटीसा बजाविल्या. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेल्या मटणाचीच विक्री करावी, मटणविक्री करताना सर्व नियम काटेकोरपणे पाळावेत, अशा सूचना त्यांना दिल्या. अधिकाऱ्यांनी या दुकानांतील मटणाचा साठा नष्ट करण्याचा पवित्रा घेतल्यानंतर या कारवाईच्या निषेधार्थ मटणविक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवली.

जयसिंगपूर शहरात मटण दराचा तिढा अद्याप सुटला नसताना आता मटणाच्या दर्जाचा प्रश्‍नही ऐरणीवर आला आहे. जयसिंगपूर शहर मटण दरवाढविरोधी कृती समितीने कोल्हापूर येथे अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. शहरातील मटण दुकानांत प्रमाणित नसलेल्या मटण व चिकनची विक्री केली जाते. अन्नसुरक्षा व प्रमाण कायद्यातील तरतुदींचे पालन केले जात नाही. या दुकानांतून मृत कोंबड्यांचे मांस, बकऱ्यांच्या मटणात मेंढीच्या मटणाची भेसळ करून ते विकले जाते. त्यामुळे अशा विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

दरम्यान, या पार्श्‍वभूमीवर सोमवारी दुपारी अन्न व औषध प्रशासनचे अन्न सुरक्षा अधिकारी ए. बी. कोळी व आर. पी. पाटील यांनी जयसिंगपूर येथे मटण मार्केटमधील दुकानांची तपासणी केली. विक्रेत्यांकडे दुकानगाळ्याच्या परवान्याची मागणी केली. मात्र, त्यांच्याकडे मटणविक्रीच्या ठिकाणचे परवाने नसल्याचे स्पष्ट झाले. यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईच्या पवित्र्यामुळे मटणविक्रेत्यांनी स्वतःच आपली दुकाने बंद केली.

मटण पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्रमाणित असावे, बकरी स्टीलच्या सत्तूरने कापावीत, स्वच्छ पाण्याने मटण धुवावे, टांगलेल्या मटणाच्या दर्शनी भागावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला टॅग असावा, मटणविक्री करणाऱ्या व्यक्तीच्या आरोग्य तपासणीचे प्रमाणपत्र गरजेचे आहे, यापैकी कोणताही नियम येथे पाळला जात नसल्याचे ए. बी. कोळी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मटणविक्री करण्याच्या ठिकाणचे परवाने असल्याशिवाय येथे मटणविक्री करता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शपथपत्र सादर करा एस.

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

कुरुंदवाड (ता. शिरोळ) येथील एस. के. पाटील सहकारी बँकेच्या अवसायानाला १० वर्षे व त्यानंतरची वाढीव मुदत संपूनही अद्याप जयप्रकाश व रत्नदीप या पतसंस्थांची सुमारे ८ कोटी ५० लाखांची देणी थकीत आहेत. या संदर्भात येत्या दोन आठवड्यात राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे आदेश न्यायमूर्ती के. के. तातेड व सारंग कोतवाल यांच्या हायकोर्टाने दिले आहेत.

संचालकांच्या आर्थिक गैरव्यवहारामुळे सन २००८ मध्ये एस. के. पाटील बँक बंद पडली. त्यामुळे सरकारने या बँकेवर २००८ मध्येच अवसायकाची नेमणूक केली. सुरुवातीला इन्शुरन्स कंपनीमार्फत एक लाखाच्या आतील ठेवी परत देण्यात आल्या. परंतु, कुरुंदवाड येथील जयप्रकाश पत संस्थेने सुमारे ३.५ कोटी रुपये तर तत्कालीन रत्नदीप पत संस्थेने पाच कोटी रुपयांची ठेव या बँकेत ठेवली होती. ती अद्याप त्यांना परत मिळालेली नाही. त्यामुळे दोन्ही संस्थांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. या संस्थांनी अवसायक राजकीय दबावापोटी काम करत नसल्याचा दावा करत ठेवी परत मिळाव्यात यासाठी अ‍ॅड. धैर्यशील सुतार यांच्या मार्फत याचिका दाखल केली आहे.

आज झालेल्या सुनावणीवेळी अवसायक यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. शेतकरी सहकारी तंबाखू संघ कोल्हापूर यांच्याकडे सुमारे एक कोटी, ९० लाख रुपये येणे आहे. त्यापोटी शिरोली पुलाची येथील मिळकत जप्त केली असून त्याचा लिलाव करून दोन कोटी ५३ लाख वसूल करणार आहे. मयूर दुध संघ अथवा इतर संस्थांचे पेट्रोल पंप चालू असून त्यांची बँक खाती सील केले जातील असेही अवसायकांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये अवसायानाचा १० वर्षाचा कालावधी पूर्ण होऊनही अद्याप प्रक्रिया पूर्ण झाली नाही. तसेच संबधित पतसंस्थांच्या ठेवीही अद्याप परत मिळालेल्या नाहीत. त्यानंतर ऑक्टोबर २०१९ पर्यंत एक वर्षाची मुदतवाढ दिली. परंतु या कालावधीतसुद्धा अवसायनाची गती धीमीच राहिली. त्यामुळे अशा परिस्थितीत अवसायकाला पुन्हा मुदतवाढ देता येईल, का असा सवाल उपस्थित झाला. त्यावर राज्य शासन यासंबंधी काय कार्यवाही करणार याची भूमिका स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संचालकांच्या एकजुटीमुळेच विजय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'पाच वर्षापूर्वी गट तट न मानता सर्व पक्षातील प्रमुखांनी जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध केली. मुश्रीफांच्या नेतृत्वाखाली पाच वर्षात संचालकांनी एकजूट दाखवत बँकेला वैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. संचालकांत एकजूट झाल्याने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जिल्हा बँकेच्या संचालकांनाच मदत केली पाहिजे, असा निर्णय सर्व संचालकांत झाला होता', असा गौप्यस्फोट खासदार संजय मंडलिक आणि राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केला. त्यामुळे बँकेचे संचालक काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, जनसुराज्य, अपक्ष म्हणून लढले असले तरी ते विजयी संचालकांतील एकजुटीमुळे झाले याकडे त्यांनी लक्ष वेधले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मात्र याला दुजोरा देण्याचे टाळले.

जिल्हा बँकेच्या प्रांगणात तिन्ही मंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्री आणि संचालकांनी राजकीय टोलेबाजी करत कार्यक्रमात रंगत आणली. 'आमचं ठरलंय' हे वाक्य सतेज पाटील यांनी राज्यभर प्रसिद्ध केल्याचे सांगत माजी खासदार निवेदिता माने यांनी 'आता तुमचं काय ठरलंय?' असा सवाल करत 'आम्ही तुमच्या पाठीशी आहे', असे सांगितले. माने यांच्या भाषणाचा धागा पकडत सतेज पाटील यांनी यापुढे 'सहकारातही आमचं ठरलंय, त्यामध्ये मुश्रीफही आहेत', अशी घोषणा केली. पण मुश्रीफांनी आपल्या भाषणात जिल्हा बँक बिनविरोध करण्याचे आवाहन केले असले तरी 'गोकुळ'बाबत मात्र कोणतेही वक्तव्य केले नाही.

खासदार मंडलिकांनी यड्रावकरांचे कौतुक करताना त्यांच्याकडे सांस्कृतिक खाते असल्याचे सांगितले. कोल्हापूर ही कलानगरी असून चित्रनगरीत शूटिंग सुरू झाले पाहिजे, असे मत व्यक्त केले. आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर म्हणाले, 'माझ्या नावात डॉक्टर असल्याने नेत्यांनी मला वैद्यकीय संबधित सर्व खाती दिली असावीत. वस्त्रोद्योग खाते हे कुणाचेही समाधान न होणारे खाते आहे. हे खाते कठीण असले तरी मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्या मदतीने कारभार करु.'

मुश्रीफांना ग्रामविकास खाते मिळाल्याबद्दल गृहराज्यमंत्री पाटील यांनी त्यांचे कौतुक केले. यापूर्वी आर.आर. पाटील, जयंत पाटील यांनी या खात्याचा चांगला कारभार केला असून मुश्रीफ त्यांच्यापेक्षाही वेगळी योजना आणून चांगले काम करतील अशा शुभेच्छा दिल्या.

.....

न खाऊंगा, न खाने दूँगा

मंत्री मुश्रीफ यांनी, आम्ही सरसकट कर्जमाफी केली असली तरी प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पुढील पंधरा दिवसात नवीन योजना आणली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी विकाससंस्थांना टाळे लावण्याचे आंदोलन करु नये, असे आवाहन केले. मंत्रिपद मिळाल्यानंतर हजारो शेतकरी, कार्यकर्ते आम्हाला भेटायला येत आहेत. हे सरकार लोकांच्या मनातील सरकार आहे. आम्हाला भेटण्यासाठी अपॉईंटमेंट, विनंती, अर्ज करण्याची गरज नाही. आपल्या अडचणी सांगा. त्या सुटल्या नाहीतर आंदोलन करा, आंदोलन करण्यासाठी आमच्या सरकारमध्ये बंदी नसल्याचा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. यापुढे जिल्हा बँकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे 'न खाऊंगा, न खाने दूँगा', असा कारभार असेल, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांच्या ताफ्यात सहा इन्व्हेस्टिगेशन आय-बाइक

सशक्त बालरंगभूमीतूनच सुजाण प्रेक्षक घडेल

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'अभिनयाचे धडे शालेय वयात मिळाले तर व्यावसायिक रंगभूमीला अधिक सशक्त कलाकार लाभतील. तसेच बालवयात नाटकाची जाण यावी यासाठीही बालरंगभूमीचे महत्त्व आहे. यादृष्टीने कोल्हापूरच्या नाट्यवर्तुळात बालरंगभूमी अधिक सक्रिय व्हावी यासाठी महापालिका स्तरावर विशेष प्रयत्न केले जातील' अशी ग्वाही महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली. राज्य सांस्कृतिक संचलनालयातर्फे १७ राज्य बालनाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्रातील प्राथमिक फेरीला आजपासून संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात सुरूवात झाली. डॉ. कलशेट्टी यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन झाले. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी संजय हळदीकर, प्रशांत आयरेकर, परीक्षक प्रा. कैलास पोपुलवार, प्रा. केशव भागवत आणि प्रा. अमजद सय्यद उपस्थित होते.

पहिल्या दिवशी, सोमवारी बेळगाव येथील वरेरकर नाट्य संगीत बेळगाव यांच्यातर्फे ईश्वरा या बालनाट्यने स्पर्धेचा मंच खुला झाला. त्यानंतर श्री मथुरा शिक्षण संस्था (इचलकरंजी) या संस्थेचे पांडवांची दीदी या नाटकाचे सादरीकरण झाले. श्री बालाजी पब्लिक स्कूल (टाकवडे) यांचे खेळ हे बालनाट्य आणि श्री बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज (इचलकरंजी) यांचे हालगी सम्राट या बाल नाटकांचे सादरीकरण झाले.

डॉ. कलशेट्टी म्हणाले, 'बालरंगभूमीमुळे नवनवीन कलाकार रंगभूमीला मिळत आहेत. तसेच बाल रसिक प्रेक्षकांच्या माध्यमातून भविष्यात रंगभूमीला एक सुजाण प्रेक्षकवर्ग लाभत आहे. सांस्कृतिक चळवळ सजग ठेवण्यासाठी हा उपक्रम स्तुत्य आहे. स्पर्धेतील नाटकांचे भविष्यात प्रयोग करण्यासाठी प्रयत्न व्हावेत.'

आयुक्त कलशेट्टी यांचा सत्कार समन्वयक प्रशांत जोशी यांचे हस्ते तर संजय हळदीकर आणि प्रशांत आयरेकर याबरोबरच तिन्ही परीक्षकांचा सत्कार कलशेट्टी यांच्या हस्ते शाल आणि ग्रंथ भेट देऊन करण्यात आला. संजय जोग, केशवराव भोसले नाट्यगृहाचे व्यवस्थापक समीर महाबरी व उदय माने यांच्यासह बाल प्रेक्षकांची मोठी उपस्थिती होती. पंडित कंदले यांनी निवेदन केले.

आजचे नाटक

सकाळी १० वाजता सोनेरी पिंजऱ्यातील पोपट

सकाळी ११.१५ वाजता गणपती बाप्पा हाजीर हो

दुपारी १२.३० वाजता प्रश्न

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उद्धव ठाकरे आले तरी बेळगाव देणार नाही

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बेळगाव

'उद्धव ठाकरेच काय, कुणीही आले तरी बेळगाव महाराष्ट्राला देणार नाही', अशी दर्पोक्ती कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी सोमवारी येथे केली.

कर्नाटक नवनिर्माण सेनेचे स्वयंघोषित नेता भीमाशंकर पाटील याने सीमालढ्यासंबंधी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे उठलेला धुरळा खाली बसत असतानाच महाराष्ट्रातील नेत्यांबाबत बेताल वक्तव्य करून सवदी यांनी वाद निर्माण केला आहे.

'सीमाप्रश्नाबाबत दोन वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी काय वक्तव्य केले होते त्याचे स्मरण उद्धव ठाकरे यांनी करावे. अविवेकीपणे बोलणे त्यांना शोभत नाही. कोणीही काहीही म्हणाले तरी बेळगाव हे कर्नाटकचे अविभाज्य अंग आहे. ठाकरेंच काय, कुणीही आले तरी बेळगाव देणार नाही, असे वक्तव्य सवदी यांनी केले. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या दाव्याबाबत आम्ही योग्य ती काळजी घेऊ. या दाव्यात काहीही नाही', असेही सवदी म्हणाले.

चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी बेळगावात येऊन सीमाभाग महाराष्ट्राचाच अविभाज्य भाग आहे, असे वक्तव्य केले होते. याबाबत पत्रकारांनी विचारल्यावर सवदी यांनी 'भुंकणाऱ्या कुत्र्यांना आपण चावायचे काय? खिजगणतीत नसलेली व्यक्ती काहीतरी बोलली म्हणून त्याला किंमत द्यायची आवश्यकता नाही', असे सवदी म्हणाले.

सवदी यांनी केलेल्या वक्तव्याचा मए समितीने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. उपमुख्यमंत्री सवदी यांनी वापरलेली भाषा त्यांना शोभत नाहीत. सवदी यांना सीमाप्रश्नाचा इतिहास माहीत नाही. कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री निजलिंगप्पा यांनी विधानसभेत बोलताना मराठी भाषिकांचा मोठा प्रदेश कर्नाटकात आला आहे. तो महाराष्ट्राला द्यायला पाहिजे असे म्हणाले होते. राजीव गांधी यांनीही तत्कालीन मुख्यमंत्री हेगडे यांना सीमाप्रश्नाविषयी पत्र लिहिले आहे. इंदिरा गांधी यांनीही यावर तोडगा निघायला पाहिजे, असे म्हटले होते. हा सारा इतिहास सवदी यांना माहीत नाही, अशी प्रतिक्रिया समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर यांनी दिली.

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँक बिनविरोध करावी

$
0
0

फोटो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बँकेवरील प्रशासक हटल्यानंतर राजकीय अभिनिवेश बाजूला सारुन सर्व पक्षांनी एकत्रित येऊन चांगला कारभार केला. बँकेने कर्जावरील एनपीए कमी करुन पाच हजार कोटी रुपये ठेवी जमा करण्याकडे वाटचाल सुरू केली आहे. गेल्या पाच वर्षात सर्व संचालकांनी अनावश्यक खर्चांना फाटा दिल्याने जिल्हा बँक राज्यात पहिल्या क्रमांकाची झाली आहे. बँकेची हीच परंपरा कायम ठेवण्यासाठी आणि सर्वसामान्य शेतकरी व सहकारी संस्था बळकट करण्यासाठी पुन्हा एकदा जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करावी', असे आवाहन बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने सोमवारी कार्यालयाच्या प्रांगणात ग्रामविकास मंत्री मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला. खासदार प्रा. संजय मंडलिक अध्यक्षस्थानी होते.

सत्काराला उत्तर देताना मुश्रीफ म्हणाले, 'सहकार ही माझ्या राजकारणाची जननी आहे. १९७४ मध्ये विक्रमसिंह घाटगे यांच्या आशीर्वादाने शाहू कारखान्यात संचालक झालो, तर १९८५ मध्ये जिल्हा बँकेत संचालक झालो. गेली चाळीस वर्षे सहकार चळवळीत काम करत असून बँकेमुळे थेट शेतकरी, विकाससंस्था यांच्यापर्यंत पोचलो. जिल्हा बँकेनेच मला आत्मसन्मान मिळवून दिला. पाच वर्षापूर्वी आम्ही सत्तेवर आल्यावर सर्व संचालकांनी बँकेची गाडी, भत्ते, हॉटेलिंग असा वायफळ खर्च टाळला. कर्जांची वसुली करताना कुणाचाही मुलाहिजा ठेवला नाही. ढोल वाजवून, सनई वाजवून कर्जदारांच्या दारात गेल्याने काही कर्जदार संस्थांमध्ये कटुता निर्माण झाली असली तरी आम्ही हे बँकेसाठी करत आहोत हे लोकांना पटले. राजकीय कुरघोडी न करताना अडचणीत आलेल्या संस्थांना मदत केली.'

मुश्रीफांनी कणखर नेतृत्व करत नियमाप्रमाणे काम केल्याने बँकेने पुन्हा वैभव प्राप्त केले , असे मत व्यक्त करुन गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, 'मुश्रीफांनी शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. बँकेने सहा हजार कोटी रुपयांच्या ठेवीचे उद्दिष्ट ठेवले असले तरी पुढील वीस वर्षांचे नियोजन केले पाहिजे. त्यासाठी चांगले अधिकारी, कर्मचारी निवडून बँक टिकली पाहिजे, वाढली पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.'

सार्वजनिक आरोग्य मंत्री यड्रावकर यांनी मुश्रीफांचे कौतुक करताना बँक कशी चालवायची याचे त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केल्याचे सांगितले. ते म्हणाले, 'जिल्हा बँकेमुळे सहकारातील अनेक गोष्टींची माहिती मिळाली. माझ्या विजयात जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे'.

खासदार प्रा. संजय मंडलिक म्हणाले, 'पाच वर्षापूर्वी बँकेचे लायसन टिकेल का अशी परिस्थिती होती. पण सर्व संचालकांनी राजकीय पक्ष, गट, तट विसरुन मुश्रीफांच्या नेतृत्वाखाली काम केल्याने ४५०० कोटींच्या ठेवी जमल्या असून सहा हजार कोटी रुपयांकडे वाटचाल सुरू आहे. जिल्हा बँकेत चांगले काम केल्याने सहा संचालक आमदार तर एक खासदार झाला. तसेच तीन संचालकांना मंत्रिपदे मिळाली असल्याने बँकेचे काम वाढले आहे.'

कार्यक्रमाला संचालक आमदार राजू आवळे, राजेश पाटील, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, संचालक पी.जी. शिंदे, अशोक चराटी, विलासराव गाताडे, अनिल पाटील, बाबासाहेब पाटील, रणजितसिंह पाटील, उदयानीदेवी साळुंखे, असिफ फरास, आर.के. पोवार उपस्थित होते. संचालक भैय्या माने यांनी प्रास्ताविक केले.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए.बी. माने यांनी स्वागत केले.

....

फोटो अर्जुन टाकळकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकशाही दिनामध्ये १३ अर्ज

$
0
0

कोल्हापूर

महापालिकेसंदर्भातील नागरिकांच्या तक्रारींची वेळीच निर्गत व्हावी यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित होणाऱ्या लोकशाही दिनामध्ये १३ अर्ज दाखल झाले . सर्वात जास्त अर्ज नगररचना विभागाशी संबंधित होते. विविध प्रकरणे प्रलंबित असल्याच्या सहा तक्रारी दाखल झाल्या होत्या. आरोग्य विभागाच्या तीन तर पवडी व घरफाळा विभागाशी संबंधित दोन अर्ज दाखल होते. प्राप्त झालेल्या तक्रार अर्जांचे तातडीने निराकरण करा, अशी सूचना आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी संबंधित विभागाप्रमुखांना केल्या. यावेळी सर्व विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यूथ बँकेस कॅश क्रेडिट कर्ज नुतनीकरणास मान्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रिझर्व्ह बँकेने यूथ डेव्हलपमेंट बँकेवर आणखी सहा महिने निर्बंध कायम ठेवले असले तरी बँकेकडून थकबाकी वसुलीसाठी केलेले प्रयत्न लक्षात घेऊन कॅश क्रेडिट कर्जाच्या नुतनीकरणास मान्यता दिली आहे, असे पत्रक बँकेचे अध्यक्ष आर.पी. पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

पत्रकात म्हटले आहे, गेल्या वर्षी पाच नोव्हेंबर २०१९ रोजी रिझर्व्ह बँकेने यूथ बँकेवर निर्बंध लादले होते. रविवारी एक वर्षाची निर्बंधाची मुदत संपली. पण निर्बंध उठवण्यासाठी अजूनही एक कोटी ६८ लाख रुपये थकबाकी वसुलीची आवश्यकता आहे. ही वसुली न झाल्याने बँकेवर आणखी सहा महिने निर्बंध लादले आहेत. आजअखेर बँकेने १५ कोटी ४५ लाख रुपयांची थकबाकी वसुली केली आहे. बड्या थकबाकीदारांच्या मालमत्ता सिक्युरिटीझेशन कायद्याखाली बँकेने ताब्यात घेतल्या असून त्या मालमत्ता विक्रीसाठी नोटीस प्रसिद्ध केली आहे. थकबाकीदारांची वसुली न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने विलंब होत आहे. जानेवारी २०२० अखेर वसुलीचे संपूर्ण उद्दिष्ट पूर्ण करुन बँक स्वत: रिझर्व्ह बँकेकडे निर्बंध उठवण्याची मागणी करणार आहे.

बँकेची एकूण गुंतवणूक ७२ कोटी रुपये असून सरकारी रोख्यांमध्ये ६४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. बँक व्यवस्थापन खर्चात ६० टक्के कपात केली आहे. बँकेकडे सध्या ७८ कोटी रुपयांची तरलता आहे. हार्डशिपच्या माध्यमातून विवाह, शैक्षणिक फी, औषधोपचार आणि उदरनिर्वाहाकरिता १२ कोटी ४२ लाखांच्या ठेवी परत केल्या आहेत. बँकेकडे सक्षम लिक्विडिटी असल्याने ठेवी परत करण्याच्या सध्याच्या मर्यादेत वाढ करावी, अशी मागणी केली आहे. ठेवीदारांनीसुद्धा संयम राखून वसुलीच्या कामात सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष पाटील आणि ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस दलाच्यावतीनेआज महिलांसाठी कार्यक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पोलिस दलाच्यावतीने रेझिंग डे निमित्त आज, मंगळवारी सकाळी दहा वाजता पोलिस परेड मैदानावर महिला, मुली व विद्यार्थींनीसाठी रस्सीखेच (टग ऑफ वॉर), आत्मसंरक्षण प्रशिक्षण, सायबर सुरक्षाविषयक माहिती, पोवाडा, पथनाट्य आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सहभागी महिला, मुली, विद्यार्थीनींना प्रोत्साहनपर बक्षीसे देण्यात येणार आहेत. तसेच जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमांनतर पोलिस परेड मैदान ते धैर्यप्रसाद हॉल चौक या मार्गावर रॅली काढण्यात येणार आहे. रॅलीमध्ये मुलींचे लेझीम पथक, झांज पथक, ढोलपथक सहभागी होणार आहे. या उपक्रमात महिला, मुली विद्यार्थीनींनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहनही पोलिस विभागामार्फत करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वच्छता दर्पण’मध्ये जिल्ह्याचा देशपातळीवर गौरव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्र सरकारच्या 'पेयजल व स्वच्छता मंत्रालय'मार्फत २०१९-२० मध्ये घेण्यात आलेल्या हागणदारीमुक्त जिल्हा अभियानमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम गुणांकनावर आहे. विशेष म्हणजे, या अभियानातील चांगल्या कामगिरीमुळे देशातील दहा अव्वल जिल्ह्यांमध्ये कोल्हापूरचा समावेश आहे. गुणांकन प्रणालीनुसार देशपातळीवर अव्वल ठरलेल्या दहा जिल्ह्यांचा गौरव रविवारी (ता. १२) नवी दिल्ली येथे होणार आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या स्वच्छतेविषयक कामगिरीचा पुन्हा एकदा देशपातळीवर गौरव होत आहे.

जि.प.तर्फे स्वच्छताविषयक अभियानावर भर राहिला आहे. स्वच्छता दर्पण गुणांकन पद्धतीमध्ये हागणदारीमुक्त गाव, शौचालय बांधकाम आणि वापर, गावांची पडताळणी, शौचालय बांधकाम जिओ टॅगिंग, आर्थिक प्रगती नोंद संबंधी ऑनलाइन माहिती भरण्यात आली होती. तसेच गावस्तरावरील जनजागृती उपक्रम, श्रमदान, लोकसहभाग आणि सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन या घटकांचा समावेश होता.

एक जून ते ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत ऑनलाइन गुणांकन प्रक्रियेची नोंद घेण्यात आली होती. जिल्ह्यातील विविध कामातील प्रगतीचे मुद्दे विचारात घेऊन तयार केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने गुणांकन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक आणि कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नामुळेच जिल्हा परिषदेचा सन्मान होत असल्याची भावना व्यक्त होत आहेत.

...

ग्रामविकासमंत्र्याकडून

सीईओंचे अभिनंदन

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी 'स्वच्छता दर्पण'मधील जिल्हा परिषदेच्या यशाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी सीईओ मित्तल यांनी, 'जिल्हा परिषदेमार्फत स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबवली आहे. हागणदारीमुक्त अभियानमध्ये देशपातळीवरही कोल्हापूर जिल्हा परिषद अव्वल क्रमांक पटकावेल,'अशी ग्वाही दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुय्यम निबंधकच्या क्लार्कसह दोघांना अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

प्लॉटचा मूल्यांकन दाखला देण्यासाठी १५०० रुपयांची लाच घेणाऱ्या दुय्यम निबंधक कार्यालयातील लिपिकासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. सोमवारी दुपारी शिरोळ तहसील कार्यालयाच्या मध्यवर्ती इमारतीमध्ये ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी लिपिक दिलीप आनंदा लाड (वय ३१) व उमेदवार राजेंद्र सातलिंगा कुंभार (वय ५१) यांना अटक केली आहे.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, तक्रारदाराच्या बहिणीने जयसिंगपूर येथील बिगरशेती प्लॉट खरेदी केला आहे. हा भूखंड नियंत्रितसत्ता प्रकारातील असून पुरेशी माहिती नसल्याने प्लॉट खरेदी करताना सरकारची पूर्व परवानगी घेतली नव्हती. यामुळे खरेदीनंतरही प्लॉट मूळ मालकाच्या नावाने आहे. ही खरेदी नियमित होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. हा अर्ज चौकशीसाठी शिरोळ तहसील कार्यालयातून जयसिंगपूर मंडल अधिकाऱ्यांकडे आला होता. व्यवहार नियमित करण्यासाठी कागदपत्रे घेऊन २८ जानेवारीला उपस्थित राहण्याबाबत कळविले होते.

दरम्यान, या प्लॉटच्या दुय्यम निबंधक यांच्या मूल्यांकन दाखल्याची गरज असल्याने ४ जानेवारीला शिरोळ दुय्यम निबंधक कार्यालयात अर्ज केला होता. यावेळी तक्रारदार व त्यांच्या बहिणीने लिपिक दिलीप लाड यांची भेट घेतली होती. मूल्यांकन दाखल्यासाठी लाडनी एक हजार रुपयांची मागणी केली होती. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कोल्हापूर कार्यालयात तक्रार दिली होती.

सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी केली असता लाडने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पथकाने सापळा रचला. लाडने मूल्यांकन दाखला देऊन लाचेची रक्कम खासगी उमेदवार कुंभारकडे देण्यास सांगितली. ही रक्कम कुंभारने स्वीकारल्यानंतर दोघांना पकडण्यात आले. ही कारवाई उपअधीक्षक आदीनाथ बुधवंत, हवालदार मनोज खोत, रुपेश माने, मयूर देसाई यांच्या पथकाने केली.

.. .. . .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोकुळसाठी २२ ठराव दाखल

$
0
0

कोल्हापूर: जिल्हा सहकार दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीसाठी सोमवारी (ता. ६) २२ दूध संस्थांचे ठराव सहाय्यक दुग्ध निबंधक कार्यालयात दाखल झाले. आजअखेर ८० ठराव दाखल झाले आहेत. गोकुळ निवडणुकीसाठी २१ डिसेंबरपासून ठराव दाखल करून घेतले जात आहेत. गोकुळच्या निवडणुकीसाठी ३६५९ मतदार आहेत. ठराव दाखल करण्याची अंतिम तारीख २२ जानेवारी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशयिताने घेतला हवालदाराच्या हाताचा चावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चोरीच्या गुन्ह्यातील संशयितास ताब्यात घेण्यास गेलेल्या पथकावरच संशयिताने हल्ला चढवला. संशयिताने हवालदाराच्या हाताचा चावा घेतला. तात्यासो आप्पासो कांबळे असे जखमी हवालदाराचे नाव आहे. सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सदर बाजार येथे ही घटना घडली.

सदर बाजार येथील मंदिरात चोरी झाली असून शाहूपुरी पोलिस तपास करत आहेत. चोरीतील संशयित सदर बाजारात असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांचे पथक त्याच्या घरी गेले. पोलिसांनी संशयितास ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. हवालदार कांबळे यांच्या हाताचा चावा घेतला. तरीही त्यांनी संशयिताला अटक केले. कांबळे यांना उपचारास सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छता स्पर्धेसाठी महापालिकेचे आवाहन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वच्छ भारत अभियानातंर्गत केंद्र सरकारच्यावतीने स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेसाठी शहरवासियांच्या सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवण्याची आवश्यकता आहे. महापालिकेला या अभियानामध्ये उत्कृष्ट गुणांकन मिळण्यासाठी प्रतिक्रिया नोंदवाव्यात, असे आवाहन महापाौर अॅड. सूरमंजिरी लाटकर यांनी केले. त्यासाठी केंद्र सरकारच्या https://swachhsurvekshan2020.org या संकेतस्थळाचा वापर करावा.

संपूर्ण देशामध्ये स्वच्छ सर्वेक्षण २०२० च्या स्पर्धेची अंमलबजावणी सुरू केली आहे. स्पर्धा ही देशामधील सर्वात मोठी स्पर्धा आहे. सहा गुणांच्या स्पर्धेमध्ये नागरिकांच्या स्वच्छतेसंबंधींच्या प्रतिक्रियांसाठी १,५०० गुण मिळणार आहेत. कोल्हापूर शहराची तपासणी करण्यासाठी येणाऱ्या केंद्र सरकारच्या पथकांकडून संकेतस्थळाच्या लिंकवर विचारण्यात येणाऱ्या आठ प्रश्नांची होकारअर्थी उत्तरे दिल्यास स्पर्धेत महापालिकेचे मूल्यांकन किंवा गुणामध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे. स्पर्धेत नगरसेवकांचा सहभाग व त्यांच्यामार्फत वॉर्डातंर्गत स्वच्छतासंबंधी जनजागृतीपर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांसाठीही गुण देण्यात येणार आहेत. त्यासाठी नागरिकांना संकेतस्थळावरूनही अॅप डाऊनलोडही करता येणार आहे. 'महापालिकेला जास्तीतजास्त गुणांकन मिळवून देण्यासाठी नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवाव्यात,' असे आवाहन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाभार्थी योजनेसाठी शिफारशी बंद करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेसाठी सदस्यांची शिफारस ही पद्धत कायद्याला धरुन नाही. सदस्यांच्या शिफारशी बंद कराव्यात यासाठी आंदोलन अंकुश या सामाजिक संस्थेतर्फे जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना निवेदनही दिले. शिरोळ तालुक्यातील महिलांचा आंदोलनात समावेश होता.

समाजकल्याण, महिला व बालकल्याण, कृषी विभाग, पशू संवर्धन विभागामार्फत विविध लाभार्थी योजना राबविल्या जातात. या अर्जावर जिल्हा परिषद सदस्याकडून होणारी शिफारस बंद करावी. सदस्यांकडून लाभार्थ्यांच्या नावाची शिफारस करुन निवडणुकीत ते लोकांवर दबाव टाकण्याची भीती आहे. त्यामुळे अर्जावर कोणाची शिफारस न होता सामान्य माणसाला न्याय मिळावा, अशी मागणी संघटनेने केली. तसेच शिरोळ तालुक्यातील दानोळी, कोथळी, उमळवाढ, जैनापूर, निमशिरगाव, चिपरी, कवठेसार या गावातील व्यक्तिगत लाभार्थ्यांच्या नावाची यादी जाहीर करावी, अशी मागणी केली. आंदोलनात अभिजित पाटील, वसंत गावडे, सुवर्णा पाटील, वैजयंता पाटील, सरोजिनी पाटील, विजयमाला कल्याणी आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मार्गदर्शक तत्वे ठरवा’

$
0
0

कोल्हापूर: विद्यार्थी वाहतुकीसंदर्भात येत्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होण्यापूर्वी निर्णय घ्यावा. आणि मार्गदर्शक तत्वे ठरवावीत, अशी मागणी युवक विद्यार्थी, पालक प्रवेश हक्क व संरक्षण संघटनेतर्फे शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे करण्यात आली आहे. संघटनेचे फिरोज सरगुर, सुशांत बोरगे, सचिन पोवार, राज पोवार, शेखर वडणगेकर, स्वप्नील कदम आदींनी निवेदन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images