Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

विवेकानंदमध्ये आनंदी मूड

$
0
0
सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त गेले आठवडाभर कॅम्पसमध्ये विविध कार्यक्रम सुरू आहेत. शुक्रवारी सकाळी बिंदू चौकातून अॅड. महादेवराव आडगुळे यांच्या हस्ते रॅलीचा प्रारंभ झाला. या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असल्याचा अभिमान वाटतो, असे सांगून आडगुळे यांनी या संस्थेत शिकल्यामुळेच जीवनात महत्वाच्या पदावर नावलौकिक कमावला, अशी कृतज्ञता व्यक्त केली.

कराराच्या मुळापर्यंत ​जाणे आवश्यक

$
0
0
खासगीकरणातून झालेल्या रस्ते प्रकल्पाविरोधात कोल्हापूरकर पेटून उठल्यानंतर त्याची धग अनेकांना बसू लागल्याने आता सारवासारव करण्यात येत आहे. करारावेळी नगरसेवकांना फसवण्यात आल्याचा थेट आरोप नगरसेवक करत असतील तर नगरसेवकांच्या नजरेच्या दूर करारात आणखी काय वाढून ठेवले आहे याचा पिच्छा पुरवल्याशिवाय कुणाचीच कारकिर्द सुरळीत होईल, असे वाटत नाही.

SSC बोर्डाजवळ बस उलटून ड्रायव्हर ठार

$
0
0
एसएससी बोर्डाजवळील धोकादायक वळणावर सहलीची बस उलटून झालेल्या अपघातात ड्रायव्हर जागीच ठार झाला. सागर विनायक नलवडे (वय २३ रा. कराड, जि. सातारा) असे मृताचे नाव आहे. अपघातात जयवंत राजेंद्र मुळीक (वय २०, रा. शनिवार पेठ, ता. कराड) हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला.

‘आरटीओ’वर राहणार कॅमेऱ्याची नजर

$
0
0
आरटीओ कार्यालयात आता २२ सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. कार्यालय परिसरातील चित्रीकरणाच्या फूटेजचा रिमोट आरटीओंकडे राहणार आहे. पहिल्या टप्पा म्हणून आरटीओच्या मुख्य केबिनमध्ये एक सीसीटिव्ही कॅमेरा कार्यन्वित करण्यात आला आहे. फेब्रुवारीत उर्वरित सर्व ठिकाणी कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

रेल्वे इन्स्पेक्शनची ट्रायल

$
0
0
राजर्षी शाहू महाराज टर्मिनस शुक्रवारी चकाचक झाले. रेल्वेस्टेशनसमोरील पार्किंग, रस्त्याची साफसफाई, स्टेशनला केलेली रंगरंगोटी, अनेक दिवस बंद असलेले मेटल डोअर डिटेक्टर, तिकीट काउंटरमधील रांगेची शिस्त, प्रवाशांना दिली जाणारी वागणूक, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रवाशांसाठीची वेटिंग रुम आदी सोयींनी रेल्वेस्थानक अपडेट झाले.

नागरिकांच्या प्रसंगावधानाने सुटका

$
0
0
वळणावरील फुटपाथवर बस कोसळल्याचा आवाज झाल्यावर कंजारभाट समाजाची वस्ती असलेल्या मोतीनगर व एस.सी.सी.बोर्ड परिसरातील अपार्टमेंटमधील नागरिक क्षणार्धात अपघातस्थळी मदतीला धावले.

कराराच्या मुळापर्यंत जाणे आवश्यक

$
0
0
खासगीकरणातून झालेल्या रस्ते प्रकल्पाविरोधात कोल्हापूरकर पेटून उठल्यानंतर त्याची धग अनेकांना बसू लागल्याने आता सारवासारव करण्यात येत आहे. करारावेळी नगरसेवकांना फसवण्यात आल्याचा थेट आरोप नगरसेवक करत असतील तर नगरसेवकांच्या नजरेच्या दूर करारात आणखी काय वाढून ठेवले आहे याचा पिच्छा पुरवल्याशिवाय कुणाचीच कारकिर्द सुरळीत होईल, असे वाटत नाही.

नागरिकांच्या प्रसंगावधानाने सुटका

$
0
0
वळणावरील फुटपाथवर बस कोसळल्याचा आवाज झाल्यावर कंजारभाट समाजाची वस्ती असलेल्या मोतीनगर व एस.सी.सी.बोर्ड परिसरातील अपार्टमेंटमधील नागरिक क्षणार्धात अपघातस्थळी मदतीला धावले.

बोर्डाजवळ बस उलटून ड्रायव्हर ठार

$
0
0
एसएससी बोर्डाजवळील धोकादायक वळणावर सहलीची बस उलटून झालेल्या अपघातात ड्रायव्हर जागीच ठार झाला. सागर विनायक नलवडे (वय २३ रा. कराड, जि. सातारा) असे मृताचे नाव आहे.

बडव्यांनी अखेर विठोबा सोडला

$
0
0
शेकडो वर्षापासून पंढरपूरच्या विठोबावर आपला एकाधिकार सांगून दक्षिणा उकळणा-या बडव्यांना अखेर आजपासून दूर व्हावे लागले. सर्वोच्च न्यायलयाचा निकाल आजपासून प्रत्यक्षात लागू झाला आणि पंढरीच्या विठोबानेही अखेर मोकळा श्वास घेतला.

मंदिर समितीकडून विठ्ठल-रुक्मिणीचे नित्योपचार

$
0
0
विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील शेकडो वर्षांपासूनची बडवे आणि उत्पातांची परंपरा शनिवारी खंडित झाली. सुप्रीम कोर्टाच्या निकालाने शेकडो वर्षांपासून चालत आलेली पंरपरा मोडीत निघून विठुरायाने बडव्यांविना मोकळा श्वास घेतला.

मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याचा हल्ला

$
0
0
आजरा तालुक्यातील सोहाळे बाची परिसरामध्ये मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला केला. त्यामध्ये एक ठार झाली तर बारा मेंढ्या अद्याप गायब आहेत. शुक्रवारी (ता.१७) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. वडील बाजारास गेले असताना घडलेल्या या घटनेमुळे त्यांची दोन मुले कमालीची भेदरली आहेत.

धास्ती मंडलिकांच्या राजीनाम्याची... निर्णय टोलमुक्तीचा

$
0
0
टोल रद्द न केल्यास खासदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी घेतला आणि त्याक्षणी राष्ट्रवादीच्या गोटातून हालचाली वेगावल्या. काही करून मंडलिक राजीनामा देण्यापूर्वी उपोषण थांबविण्याचा आणि टोलचा प्रश्न मिटविण्याचा निर्णय झाला.

गोपाळराव पाटील यांना मारहाण

$
0
0
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखाना गेले दोन हंगाम बंद असून कारखाना चालविण्यासाठी येणाऱ्या कंपनीला सहकार्य करत नसल्याचा भावनेतून सभासदांनी शनिवारी हलकर्णी फाटा (ता. चंदगड) येथे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ संचालक गोपाळराव पाटील यांची गाडी अडवून त्यांना जाब विचारला.

वंध्यत्व उपचाराला मिळणार बळ

$
0
0
‘दिवसेंदिवस ज्ञानाच्या कक्षाच्या विस्तारत आहे. प्रत्येक शाखेचा उपयोग अन्य शाखांनी करून घेतला पाहिजे. वैद्यकीय शास्त्राने सूक्ष्म कणशास्त्रातील ज्ञानाचा वापर वंध्यत्व उपचारासाठी केल्यास मदत होईल,’ असे मत दक्षिण कोरियातील हॅन्यांग विद्यापीठाचे संशोधन केंद्राचे संचालक प्रा. वाय. पी. ली यांनी व्यक्त केले.

पक्षांच्या वादात, उमेदवार पेचात

$
0
0
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ कोणत्या पक्षाला, याचा वाद वाढतच चालल्याने या मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची घालमेल वाढत आहे. जागा कोणत्याही पक्षाला गेली, तरी लढत मात्र धनंजय महाडिक व प्रा. संजय मंडलिक यांच्यातच होण्याची दाट शक्यता आहे.

विश्वजित कदम यांचा अर्ज दाखल

$
0
0
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विद्यमान अध्यक्ष विश्वजित कदम यांनी शनिवारी सांगलीत काँग्रेस कमिटीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

लिंग्रजला खंडणीप्रकरणी अटक

$
0
0
लेडीज रेडिमेड कपड्याच्या दुकानदारांकडून एक हजार रुपयाची खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेना शहर उपप्रमुख दुर्गेश लिंग्रज यांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. जितेंद्रकुमार प्रकाशचंद्र जैन (वय ३६ रा. विश्वकर्मा पार्क बंगला, राजारामपुरी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

कोल्हापूरचे लोण सांगलीत

$
0
0
कोल्हापुरातील टोल आंदोलन यशस्वी झाल्यानंतर आता टोलविरोधासाठी सांगलीकरही सरसावले आहेत. विविध संघटना, सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांनी शनिवारी सांगलीवाडीच्या टोलनाक्यावर एकत्र येऊन ‘आम्ही टोल देणार नाही’ असा एल्गार केला. उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर यांनी टोल कर्मचाऱ्यांना टोल न घेण्याची विनंती केली.

डॉ. व्ही. एम. पाटील यांना गुणवंत सेवक पुरस्कार

$
0
0
येथील डॉ. व्ही. एम. पाटील यांना सातारा येथील रयत सेवक संघातर्फे देण्यात येणारा गुणवंत रयत सेवक पुरस्कार देण्यात आला आहे. डॉ. पाटील हे पलूस येथील कला, वाणिज्य, विज्ञान कॉलेज रामानंदनगर येथे प्राध्यापक आहेत.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images