Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

दुभाजकांवरील धूळ झटकली

0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्यावतीने सुरू असलेल्या महास्वच्छता अभियानामध्ये रविवारी मुख्य रस्ते स्वच्छ करण्यास प्राधान्य देण्यात आले. रस्ते विकास प्रकल्पातंर्गत उभा करण्यात आलेल्या दुभाजकांवरील यानिमित्ताने धूळ झटकली. दुभाजक व रस्त्यावर स्वच्छता मोहीम राबवताना १२ टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. गोळा झालेला कचरा टिपरमधून कसबा बावडा येथील सरवळीमध्ये टाकण्यात आला. मोहिमेमध्ये शहरातील अनेक सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मे २०१९ पासून शहरात महापालिकेच्यावतीने दर रविवारी स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. सलग ३३ व्या रविवारी शहरवासियांनी मोहिमेमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. जयंती नाला, पंचगंगा घाट परिसरात होणाऱ्या स्वच्छतेएवजी आज मुख्य रस्ते सफाई करण्यास प्राधान्य देण्यात आले. कोटीतीर्थ तलाव येथून आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत अभियानाला सुरुवात झाली. त्यानंतर रंकाळा टॉवर ते फुलेवाडी फायर स्टेशन, कळंबा फिल्टर हाउस ते मध्यवर्ती कारागह, हॉकी स्टेडियम ते मोतीनगर मेनरोड, रिलायन्स मॉल परिसर, दसरा चौक ते खानविलकर पंप, शाहू नाका ते उड्डान पूल, टेंबलाई नाका ते कावळा नाका, डीएसपी ऑफिस ते भगवा चौक मेनरोड या परिसराची स्वच्छता केली. रस्त्यावरील प्लास्टिक व अन्य कचरा स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी गोळा केला. तर महापालिका कर्मचाऱ्यांच्यावतीने दुभाजकाची सफाई केली.

अभियानामध्ये शहरातील ज्येष्ठ नागरिक, स्वरा फाउंडेशन, परीट समाज कोटीतीर्थ, ताराबाई गार्डन हास्य क्लब, विवेकानंद कॉलेज, व्हाईट आर्मी स्कूलचे विद्यार्थी व शिक्षक यांच्याबरोबर सामाजिक संस्था आणि त्यांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, कनिष्ठ अभियंता आर. के. पाटील, लेखापाल बाबा साळोखे उपस्थित होते.

अशी राबवली यंत्रणा

जेसीबी

१३

डंपर

आरसी गाड्या

१५

टिपर

१५०

महापालिका कर्मचारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आमचं ठरलयं महापोर्टल बंद करायचं

0
0

फोटो ..........

दहाव्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचे उद्घाटन करताना विशेष पोलिस महानिरीक्षक कृष्णप्रकाश व आमदार सतेज पाटील. सोबत आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, डॉ.आनंद पाटील, संतोष पाटील, कन्नन गोपीनाथ आदी.

.........

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांचा महापोर्टलला विरोध आहे. विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेवून आम्ही महापोर्टल बंद करायचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. त्याचबरोबर लोकसेवा आयोगातील रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील,' अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली. स्टडी सर्कल, राजाराम कॉलेज व सतेज पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहाव्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य पोलिस प्रशासन विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक कृष्णप्रकाश होते.

राजाराम कॉलेजच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात संमेलन पार पडले. स्वागताध्यक्ष पदावरुन बोलताना आमदार पाटील म्हणाले,'गुगलचा वापर करुन आपल्याला कोणत्याही विषयाची माहिती मिळेल. पण संमेलनाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष अनुभवाची शिदोरी मिळेल. त्याचा फायदा नागरी सेवेतील करियरदरम्यान होईल. स्पर्धा परीक्षार्थींना अशी संमेलने प्रेरणादायी ठरतील.'

आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, 'नागरी सेवेत कशासाठी प्रवेश करायचा? हे प्रथम परीक्षार्थींनी निश्चित केले पाहिजे. ध्येय निश्चित झाल्यानंतर ते पूर्ण करण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती पाहिजे.'

यावेळी सरोजताई पाटील, प्राचार्य डॉ. आण्णासाहेब खेमनर, माजी सनदी अधिकारी कन्नन गोपीनाथन, डॉ. आनंद पाटील, राहुल पाटील आदी उपस्थित होते. संतोष पाटील यांनी आभार मानले.

.....

'कॅन' अॅपचा फायदा

२०२० च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेपूर्वी करिअर, अॅस्पिरेशन, नेविगेटर (कॅन) अॅप लाँच करण्यात येणार आहे. अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुविधा देण्यात येणार आहेत. संदर्भ पुस्तके, व्हिडिओ, नोकरीच्या संधी आदींचा त्यामध्ये समावेश असले. त्याचा फायदा विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होईल. या अॅपची माहिती किरण मोरे यांनी दिली.

.......

'स्वत:मध्ये सकारात्मक दृष्टीकोन वाढवा'

'कोणत्याही क्षेत्रातील यशोशिखर पादाक्रांत करता, तेव्हा ती यशोशिखरे इतरांना मार्गदर्शक बनली पाहिजे. यशासाठी जरुर प्रयत्न करु, पण तत्पूर्वी उत्कृष्ट व्यक्तिमत्त्वातून चांगला माणूस बनण्याची आवश्यकता आहे. चांगले व्यक्तिमत्त्व यशाच्या मार्गापर्यंत पोहोचवेल. त्यासाठी जिद्द आणि ध्येय सर करण्यासाठी स्वत:मध्ये सकारात्मक दृष्टीकोन वाढवा,' असे आवाहन राज्य पोलिस प्रशासनाचे विशेष पोलिस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांनी केले. राजाराम कॉलेज येथील दहाव्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनात बोलत होते.

अध्यक्षस्थानावरुन बोलताना कृष्णप्रकाश म्हणाले, 'परीक्षार्थींकडे जिद्द आणि चिकाटी नसेल तर सकारात्मक विचार येवू शकणार नाहीत. सकारात्मक वृत्ती वाढवण्यासाठी महापुरुषांच्या विचारांवर मार्गक्रमण करा. नोकरी किंवा प्रतिष्ठा म्हणून नागरी सेवेकडे न पाहता देशसेवा आणि जनतेप्रती सेवाभाव अंगीकारण्याची गरज आहे. त्यासाठी नि:पक्षता, सचोटी, निरपेक्षता आणि लोकांप्रती श्रद्धा वाढवण्याची आवश्यकता आहे. देशाला नागरी सेवेने मजबूत केले आहे. आणखी मजबूत बनवण्यासाठी सिस्टिमचा एक भाग न बनता लोकशाही मूल्यांची जपणूक करताना कर्तव्याचा विसर पडू देवून नका.'

अध्यक्षीय भाषणानंतर कृष्णप्रकाश यांची आयर्नमॅन पंकज रवाळू, हार्दिक पाटील, आकाश कोरगांवकर यांनी प्रकट मुलाखत घेतली. माजी सनदी अधिकारी कन्नन गोपीनाथ यांनी प्रशासकीय सेवेतील आपले अनुभव कथन केले. डॉ. आनंद पाटील यांनीही परीक्षार्थींना मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छोटे घटक ठरविणार ‘अध्यक्ष’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत स्थानिक आघाड्यांना कमालीचे महत्त्व प्राप्त होत आहे. सत्ताधारी भाजप व मित्रपक्ष आघाडी आणि विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादीने अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेनेतील गटबाजी कायम राहिल्यास छोट्या घटक पक्षांची मते अध्यक्ष ठरविण्याच्या प्रक्रियेत मोलाची ठरणार आहेत.

शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक शिवसेनेच्या सदस्यांची एकत्रित मोट बांधण्याच्या प्रयत्नात आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे दहा सदस्य एकत्र आल्यास राज्याच्या धर्तीवर जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीचा सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर होणार आहे. कारण काँग्रेसचे १४, राष्ट्रवादीचे ११ आणि शिवसेनेचे १० सदस्य मिळून ३५ संख्याबळ होते.

बहुमतासाठी ३४ सदस्य संख्या आवश्यक आहे. मात्र, गेल्या अडीच वर्षात माजी आमदार चंद्रदीप नरके गटाचे तीन, सत्यजित पाटील-सरुडकर गटाचे दोन, संजय घाटगे व सुजित मिणचेकर गटाचा प्रत्येकी एक असे सात सदस्य भाजप आघाडीसोबत आहेत. गटातटात विखुरलेल्या शिवसेनेच्या सदस्यांना एकत्र आणण्याच्या खासदार मंडलिकांच्या प्रयत्नांना कितपत यश येते यावर महाविकास आघाडीचे राजकारण अवलंबून आहे.

स्वाभिमानी संघटनेचे दोन सदस्य भाजप आघाडीला 'राम राम' करत काँग्रेस आघाडीसोबत राहणार आहेत. राजू शेट्टी यांनी भाजपविरोधी भूमिका घेतली आहे. याशिवाय ताराराणी विकास आघाडी, शाहू विकास आघाडीचे प्रत्येकी दोन सदस्य आहेत. शाहू विकास आघाडीचा पाठिंबा गेली अडीच वर्षे दोन्ही काँग्रेसना होता. सद्य:स्थितीचे राजकारण पाहिल्यावर शाहू विकास आघाडी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत राहणार हे स्पष्ट आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांच्याशी निगडित ही आघाडी आहे. यामुळे शिवसेनेचे संख्याबळ ११ पर्यंत पोहोचू शकते.

००००

शिंपींची अध्यक्षपदासाठी फिल्डिंग

आजरा तालुक्यतील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य जयवंतराव यांनी अध्यक्षपदासाठी तयारी सुरू केली आहे. त्यांनी पक्षाच्या मंडळींडे अध्यक्षपदासाठी दावाही केला आहे. गेल्या तीस वर्षांन अधिक काळ ते राजकारणात आहेत. सरपंच, कारखान्याचे संचालकपद, जिल्हा परिषदेत बांधकाम व आरोग्य समिती सभापतिपदाचा अनुभव आहे. शनिवारी त्यांनी खासदार संजय मंडलिक यांची भेट घेतली. याप्रसंगी चंदगडचे आमदार राजेश पाटील उपस्थित होते.

००००

महाविकास आघाडी येण्याअगोदरच अध्यक्षपदासाठी उचल

दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, या तीनही पक्षामध्ये अध्यक्षपदासाठी इच्छुक सदस्यांनी आघाडी स्थापन होण्याअगोदर पदावर दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसकडून सदस्य पांडुरंग भांदिगरे, सविता चौगुले, सरिता खोत, राष्ट्रवादीकडून जयवंत शिंपी, सतीश पाटील, युवराज पाटील यांची नावे चर्चेत आहेत. शिवसेनेकडून हंबीरराव पाटील, आकांक्षा पाटील, प्रवीण यादव यांच्याकडेही ओबीसाचा दाखला असल्याने त्यांच्या नावाची चर्चा आहे.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुतळा दहनावेळी कार्यकर्ता भाजून जखमी

0
0

राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने गांधी यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करताना कार्यकर्ता विशाल शिराळकर यांच्या पँटने पेट घेतल्याने एकच गोंधळ उडाला. या घटनेत शिराळकर यांच्या पायाला जखम झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. रविवारी स्टेशन रोड येथील जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयासमोर अभाविपतर्फे आंदोलन करण्यात आले.

काँग्रेस कमिटी कार्यालयासमोर सायंकाळी पाच वाजता आंदोलन करण्यासाठी अभाविपचे कार्यकर्ते आले असता कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून त्यांना विरोध करण्यात आला. काँग्रेस कमिटीच्या आवारात आंदोलन करण्यास विरोध केल्यामुळे आंदोलक व कर्मचारी यांच्यात वादावादी झाली. अखेर प्रवेशद्वारबाहेर अभाविपच्या कार्यकर्त्यांनी गांधी यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन केला. आंदोलनात सोहम कुऱ्हाडे, सचिन कोलकर,अद्वैत पत्की यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज निवेदन

0
0

कोल्हापूर: 'शहरातील खराब रस्त्यांमुळे निर्माण होणाऱ्या धुलीकणांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेला महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा,' या मागणीचे निवेदन सोमवारी (ता. १६) दुपारी १२ वाजता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड यांना जिल्हा वाहनधारक महासंघाच्यावतीने देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुशांत शेलार यांची तक्रार

0
0

महामंडळाचे संचालक रणजित जाधव यांनी शिवीगाळ करून, हातातील माइक हिसकावून घेत, मी कोल्हापूरचा आहे, तुम्हाला बघून घेईन अशी धमकी दिल्याने माझ्या जीविताला धोका आहे,' अशी तक्रार महामंडळाचे प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार यांनी जाधव यांच्याविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैद्यकीय क्षेत्रासाठी 'दि मेडिकल थीसॉरस' उपयुक्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर 'वैद्यकीय क्षेत्र हे समाजजीवनाशी निगडीत घटक आहे. या क्षेत्रामधील नव संशोधन, उपचारपद्धतीमुळे रुग्णांच्या सोयी सुविधेत वाढ झाली. साऱ्यांनाच वैद्यकीय क्षेत्राबद्दल उत्सुकता आहे. अभ्यासक, डॉक्टरना प्रत्येक गोष्टीतील अद्ययावत ज्ञान ठेवावे लागते. यासाठी त्यांना 'दि मेडिकल थीसॉरस'हा वैद्यकीय ज्ञानकोष अत्यंत उपयुक्त ठरेल,' असे प्रतिपादन राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक व पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले. येथील डॉ. सफिया सिराज मोमीन व सिराज जमाल मोमीन यांनी लिहिलेल्या 'दि मेडिकल थीसॉरस'या ज्ञानकोशाचे प्रकाशन डॉ. लहाने यांच्या हस्ते झाले. स्टेट नर्सिंग सुपरिटेंडट शोभा चाटसे, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या अधिष्ठाता मीनाक्षी गजभिये यांची प्रमुख उपस्थिती होती. शाहू स्मारक भवन येथे रविवारी दुपारी कार्यक्रम झाला. डॉ. लहाने म्हणाले, 'लेखिका सिराज मोमीन या सीपीआरमधील नर्सिंग कॉलेजमधून प्राचार्यपदावरून सेवानिवृत्त आहेत. तर सिराज मोमीन हे राजर्षी शाहू हायस्कूलमधून उपमुख्याध्यापकपदावरून निवृत्त आहेत. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी अतिशय कष्टपूर्वक वैद्यकीय ज्ञानकोश तयार केले आहे. हा ज्ञानकोश विद्यार्थ्यापासून डॉक्टरांना फायदेशीर ठरेल. वैद्यकीय क्षेत्रातील भाषा, उच्चार यासंबंधी ज्ञान वाढविणारा हा ज्ञानकोश आहे,' असे कौतुकोद्गार त्यांनी काढले. अधिष्ठाता गजभिये यांनी लेखिकेचा शिक्षणापासून लेखन निर्मितीपर्यंतचा प्रवास हा प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. नाझिमा जिया मोमीन यांनी प्रास्ताविक केले. शिल्पा पाटकर यांनी सूत्रसंचालन केले. अमन मोमीन यांनी आभार मानले. कार्यक्रमाला 'नॅब'कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष डॉ. मुरलीधर डोंगरे, कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष शकील मोमीन, स्थायी समितीचे माजी सभापती आदिल फरास यांची प्रमुख उपस्थिती होती. शुभांगी फुटाणे, तेजस्विनी गायडोळे, चिन्मयी गायडोळे यांनी स्वागतगीत सादर केले. फोटो ओळी राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते 'दि मेडिकल थीसॉरस'या वैद्यकीय ज्ञानकोशचे प्रकाशन झाले. याप्रसंगी डावीकडून प्रकाशक एस. जे. मोमीन, डॉ. सफिया मोमीन, डॉ. मीनाक्षी गजभिये, शोभा चाटसे, एम. आय. मोमीन आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरच्या सुपुत्राला जम्मू-काश्मीरमध्ये वीरमरण

0
0

गडहिंग्लज

जम्मू-काश्मीरच्या राजुरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत कोल्हापूरच्या सुपुत्राला वीरमरण आलं आहे. जोतिबा गणपती चौगुले (३६) असं शहीद जवानाचं नाव असून ते गडहिंग्लज तालुक्यातील महागावचे आहेत. जोतिबा चौगुले यांना वीरमरण आल्याची माहिती कळताच संपूर्ण महागावमध्ये शोककळा पसरली आहे.

राजुरी सेक्टरमध्ये सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत जोतिबा चौगुले यांना गोळी लागून वीर मरण आले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी महागाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विवाहितेची दोन मुलींसह आत्महत्या

0
0

कोल्हापूर:
पती रागावल्यामुळे माहेरी केर्ली (ता. करवीर) येथे गेलेल्या विवाहितेने दोन मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी (ता. १६) सकाळी उघडकीस आला. शिल्पा नागेश चव्हाण (वय २८), देवयानी (वय ८ वर्षे) आणि राजनंदिनी (वय ६ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. मृत शिल्पा यांचे सासर शिंगणापूर (ता. करवीर) हे आहे. याप्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

यापूर्वी शिल्पा आणि तिच्या पतीमध्ये कधी भांडण झाल्याचं माहित नव्हतं असं निकटवर्तीयांकडून सांगण्यात आलं असलं तरी बुधवार (दि. ११) रोजी त्या दोघांमध्ये भांडण झालं. आणि रागाच्या भरात दुसऱ्या दिवशी गुरुवारी शिल्पा आपल्या दोन मुली देवयानी व राजनंदिनी यांना घेऊन माहेरी केर्ली येथे गेली.ती दोन दिवस माहेरी राहिली. शनिवार (दि. १४) रोजी दुपारी दोन्ही मुलींना घेऊन शिल्पा घराबाहेर पडली. सायंकाळीपर्यंत घरी परत आली नाही. त्यामुळे माहेरच्या लोकांनी पती नागेश यांच्याकडे चौकशी केली असता तिथेही ती परत आली नसल्याचे सांगितले. नातेवाईकांकडे चौकशी करूनही शिल्पा व दोन मुली मिळून न आल्याने रविवारी (दि. १५) सकाळी करवीर पोलिसांत बेपत्ता असल्याची फिर्याद दिली.

त्यानंतर शोध घेतला असता सोमवारी सकाळी गजानन बापू चौगुले यांच्या शेतातील विहिरीत शिल्पा, देवयानी, राजनंदिनी या तिघींचे मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे ग्रामस्थांना दिसून आले. याप्रकरणी करवीर पोलिस पुढील तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशाच्या खो-खो संघाचे केले प्रतिनिधित्व

0
0

युवा मुद्रा

लीड...

वस्त्रनगरी इचलकरंजीला मोठी क्रीडा परंपराही आहे. खो-खोची पंढरी म्हणून तिची नवी ओळख समोर येत आहे. त्याचबरोबर कबड्डी खेळातही या शहरातील अनेक दिग्गज खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळविला आहे. याच नगरीतील खो-खो खेळाडू बाळासाहेब सदाशिव पोकार्डे याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने नेपाळ येथे झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत बांगलादेशला पराभूत करून संघाला सुवर्णपदक मिळवून दिले.

राजेंद्र पाटील, इचलकरंजी

इचलकरंजी येथील एका सामान्य कुटुंबात बाळासाहेबचा जन्म झाला. घरची परिस्थिती तशी बेताचीच. वडील यंत्रमाग कामगार, त्यांच्या कमाईवरच पाचजणांच्या या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. गोविंदराव हायस्कूलमध्ये पाचवीत शिकत असताना त्याला खो-खो खेळाविषयी आवड निर्माण झाली, पण घरच्या परिस्थितीमुळे वडिलांचा त्याच्या खेळाला विरोध होता. मात्र, आई सावित्री यांच्यातील खेळाडूमुळे त्याला पाठबळ मिळाले. सावित्री या बेळगाव जिल्ह्यातील कृष्णाकित्तूर गावच्या. त्यांनाही लहानपणापासून खेळाची आवड होती. त्यातूनच त्यांनी शालेय विभागात १४ वर्षांखालील गटात राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यामुळेच बाळासाहेबला प्रोत्साहन मिळत गेले आणि तो खऱ्या अर्थाने खेळाडू बनला.

बाळासाहेबचा नातलग निरंजन कित्तुरे याच्यासोबत तो इलेव्हन संघ क्रीडांगणावर सरावासाठी जाऊ लागला. आठवीत असताना पहिल्यांदा त्याची पतियाळा-पंजाब येथे झालेल्या सबज्युनिअर नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली होती. त्यानंतर त्याच्या खेळात सातत्याने बदल होत गेले, विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत त्याने अनेक बक्षिसे मिळविली आणि त्याच्या या कामगिरीची दखल घेऊन सन २००५ मध्ये कोल्हापूर जिल्हा संघातून पहिल्या वहिल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. त्यामध्ये संघाला यश मिळवून देण्यात त्याने मोलाचा वाटा उचलला. त्यानंतर त्याच्या यशाची घोडदौड सुरू झाली. सन २००९ मध्ये गोवा येथील ज्युनिअर नॅशनल आणि सन २०११ मध्ये आंध्रप्रदेशातील सीनिअर नॅशनल स्पर्धेत खेळाची चमक दाखवून दिली. त्यातूनच सन २०१३ मध्ये नंदुरबार येथील भाई नेरुरकर चषक स्पर्धेत त्याने चमकदार कामगिरी केल्याने त्याला उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही.

सन २०१५ मध्ये केरळ येथे झालेल्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र संघातून खेळताना संघाला सुवर्णपदक मिळवून दिले. त्यानंतर बेंगलोर सीनिअर नॅशनल, सोलापूर सीनिअर नॅशनल स्पर्धेत संघाला विजय प्राप्त करुन दिले. सन २०१६ मध्ये आसाम-गुवाहाटी येथील दक्षिण आशियाई स्पर्धेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली होती. त्यावेळी भारतीय संघाच्या यशात त्याचा मोलाचा वाटा होता. इचलकरंजी येथे २०१८ मध्ये झालेल्या खो-खो स्पर्धेत तो एअरपोर्ट अथॉरिटी संघातून मैदानात उतरला होता. त्यानंतर इंग्लंड येथील स्पर्धेसाठी भारतीय संघात त्याला स्थान मिळाले होते. त्याचे सोने करत त्याने केलेल्या कामगिरीमुळे त्याला उत्कृष्ट खेळाडू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर जिल्हा खो-खो फेडरेशननेही त्याला पन्नास हजारांचे बक्षीस दिले होते. आपल्या कामगिरीच्या बळावर सरकारी सेवेत सामावून घेण्यात यावे यासाठी त्याने सातत्याने पाठपुरावा केला. त्याला यश येऊन ऑक्टोबर २०१८ मध्ये बालेवाडी पुणे येथे कनिष्ठ स्तरावरील नोकरी मिळाली.

नुकत्याच नेपाळ येथे झालेल्या १३ व्या दक्षिण आशियाई खो-खो स्पर्धेसाठी बाळासाहेबकडे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व सोपविले होते. मिळालेली ही संधी आणि सोपविलेला विश्‍वास सार्थ ठरवत त्याने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. देशभरातून वाहवा झाली. परंतु, यापेक्षाही त्याला सरकारी सेवेत चांगल्या पदावर कामाची संधी मिळण्याची गरज आहे. तो उच्चशिक्षित असून, त्याने आजवर खो-खोमध्ये केलेल्या कामगिरीची दखल घेऊन त्याला पुढे जाण्यासाठी पाठबळाची अत्यंत गरज आहे.

दक्षिण आशियाई खेळाशिवाय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याचे लक्ष्य आहे. दक्षिण आशियाई खेळानंतर आता आशियाई चॅम्पियनशिप आणि जागतिक स्पर्धेत सहभागी होऊन त्यामध्येही देशाला सुवर्णपदक जिंकून देणार आहे.

- बाळासाहेब पोकार्डे, कर्णधार, भारतीय खो-खो संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँका, पतसंस्थांतही अध्यक्षपदांचे तुकडे

0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर : महानगरपालिकेत राज्यकर्त्यांनी 'सत्तेच्या राजकारणासाठी वाट्टेल ते' या नितीचा अवलंब करत महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती अशा मानाच्या पदांच्या कालावधीची विभागणी केली. शहराचा विकास, दीर्घकालीन धोरण यापेक्षा मर्जीतील सदस्यांना संधी असे सोयीचे धोरण स्वीकारत पद विभागणीचा खेळखंडोबा सुरू केला. राजकारण्यांच्या पावलावर पाऊल ठेवत प्राथमिक शिक्षक बँक, कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्था, जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीपासून तालुकास्तरावरील पतसंस्थांच्या कारभाऱ्यांनी ओढली आहे. ९७ व्या घटनादुरुस्तीला फाट्यावर बसवत 'हम करे सो कायदा' या वृत्तीने चेअरमन आणि व्हाइस चेअरमनपदाची सहा महिने ते एक वर्षासाठी तुकडे केले जात आहेत.

राजकारणाच्या या खेळीमुळे शहर आणि जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांत वर्षातून दोन वेळेला पदाधिकारी निवडीचा खेळ रंगत आहे. शिक्षक बँक, कोजिमाशी, सोसायटी या संस्थांचा कार्यविस्तार झाला आहे. सभासद हिताचे निर्णय घेतले आहेत. एकीकडे या जमेच्या बाजू असताना दुसरीकडे या संस्था म्हणजे जणू आपला 'राजकीय अड्डा' अशा भूमिकेने काही मंडळी कारभार हाकत आहेत. वास्तविक, सहकार खात्याने ९७ व्या घटनादुरुस्तीनुसार सहकार क्षेत्रातील बँका, पतसंस्थांतील अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा कार्यकाल पाच वर्षासाठी केला. त्यासंबंधी स्पष्ट आदेश काढले. मात्र, राजकारण्यांच्या ताब्यातील संस्थांमध्ये पद विभागणीचा जो घाट घातला गेला, त्याचीच पुनरावृत्ती सध्या प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक व सरकारी कर्मचाऱ्यांच्या संस्थेत सुरू आहे. सत्ताधारी गट मर्जीतील संचालकांना संधी मिळावी म्हणून नियमांना फाटा देत आहेत. पदाधिकारी आणि संचालक प्रत्यक्ष काम करण्यापेक्षा चेअरमन आणि व्हाइस चेअरमनपदाची पाटी मिरवण्यात धन्यता मानत असल्यासारखे चित्र आहे.

शिक्षक बँकेत वर्षाला अध्यक्ष

जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्राथमिक शिक्षकांचे आर्थिक सत्ता केंद्र म्हणून दि प्राथमिक शिक्षक बँकेची ओळख आहे. ७२०० हून अधिक सभासद, ११ शाखेमुळे जिल्हाभर कार्यक्षेत्र विस्तारले आहे. सुकाणू समितीद्वारे संस्थेचा कारभार चालतो. गेल्या काही वर्षात बँकेला भक्कम आर्थिक स्थिती, नफ्यामध्ये भरीव वाढ व सभासदाभिमुख निर्णय घेतल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा आहे. बँकेवर २००९ पासून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांच्या नेतृत्वाखालील गटाची सत्ता आहे. पहिली सहा वर्षे बँकेचे अध्यक्षपद वरुटे यांच्याकडे होते. अधिकाधिक संचालकांना अध्यक्षपदाची संधी म्हणून गेल्या पाच वर्षांपासून दरवर्षी पदाधिकारी निवडीचा खेळ सुरू आहे. गेल्या पाच वर्षात राजमोहन पाटील, संभाजी बापट, शिवाजी पाटील, साहेबराव शेख, बजरंग लगारे, दिलीप पाटील हे चेअरमन झाले. नामदेव रेपे यांनी नुकतीच चेअरमनपदाची सूत्रे हाती घेतली आहेत.

'कोजिमाशी'त कारभाऱ्यांचीच सोय

कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेतील राजकारण सध्या चर्चेत आहे. शिक्षक संघटनेचे नेते दादासाहेब लाड यांची 'कोजिमाशी'त निर्विवाद सत्ता आहे. पतसंस्थेच्या सभासदांची संख्या ८५०० आहे. ठेवी व कर्जाची रक्कम मिळून पतसंस्थेची उलाढाल ६०० कोटीहून अधिक असल्याचे संचालक सांगतात. गेल्या पाच वर्षांत दहा चेअरमन निवडले. काही चेअरमनांचा कालावधी तर साडेचार पाच महिन्याचा होता. संख्याबळानुसार दोन तज्ज्ञ संचालकांची नियुक्ती करण्यात आली. यापैकी एक तज्ज्ञ संचालक वर्षानुवर्षे त्या पदावर आहेत. तर दुसरा तज्ज्ञ संचालक तीन, साडेतीन महिन्यातून एकदा बदलला जातो. 'कोजिमाशी'त चेअरमनऐवजी सगळी सूत्रे कायमस्वरुपी तज्ज्ञ संचालकांच्या हाती आहेत. मध्यंतरी विरोधी आघाडीच्या प्रमुखाचे चेअरमनपदाचे लाड पुरविले गेले. कारभाऱ्यांच्या या अजब कारभाराविषयी सभासदांत चर्चा सुरू आहे.

कर्मचारी सोसायटीतही संगनमत

कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे ३४०० सभासद आहेत. गेल्या काही वर्षांत सोयायटीने कात टाकत सभासद हितासाठी वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी केल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा आहे. मात्र, प्रत्येकाला पदाची हौस पूर्ण करायची असल्यामुळे पदाधिकारी बदलले जातात असे विरोधकांचे म्हणणे आहे. अनेकांना चेअरमनपदाविषयी आकर्षण असल्यामुळे प्रत्येकवर्षी निवडीचे नाट्य पाहावयास मिळते. सध्याच्या कार्यकारिणीत पहिल्यांदा चेअरमनपदाची संधी एम. आर. पाटील यांना मिळाली. त्यांनी दीड वर्षात राजीनामा दिला. त्यानंतर महावीर सोळांकुरे, के. आर. किरुळकर, आर. डी. पाटील, राजीव परीट हे चेअरमन बनले. सोसायटीसाठी सुकाणू समितीची स्थापना केली आहे. मात्र संगनमताने पद विभागणी सुरू आहे.

पद वर्षभर मिळाले तरी संस्थेच्या कामकाजावर व दीर्घकालीन धोरणांवर परिणाम होत नाही. संचालक मंडळ एकसंघपणे संस्थेच्या विकासासाठी कार्यरत असते. धोरणात्मक निर्णय एकमताने घेतले जातात. शिक्षकांची प्रमुख संस्था असलेल्या या बँकेच्या प्रमुख पदावर काम करण्याची संचालकांची आंतरिक ईच्छा असते.

- नामदेव रेपे, अध्यक्ष, प्राथमिक शिक्षक बँक

सहकार कायद्यातील ९७ व्या घटनादुरुस्तीनुसार अध्यक्षपदाचा कालावधी जास्तीत जास्त पाच वर्षांसाठी राहील अशी तरतूद आहे. मात्र, अनेकदा पदावरील व्यक्ती वैयक्तिक कारणासाठी राजीनामा देतात, अशावेळी रितसर नवी अध्यक्षनिवड केली जाते. मात्र, चुकीच्या पद्धतीने अध्यक्ष निवड झाल्याची तक्रार झाल्यास किंवा अयोग्य मार्गाने पदाचा राजीनामा झाला असेल तर त्यासंदर्भात चौकशी केली जाईल.

- अमर शिंदे, जिल्हा उपनिबंधक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉकी स्टेडियम परिसराला अवकळा

0
0

कोल्हापूर, टाइम्स टीम

महापालिकेचे आंतरराष्ट्रीय मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम सध्या समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. मैदानावरील प्राथमिक सोयी-सुविधांचा बोजवारा उडाला आहे. खेळाऐवजी 'ओपन बार'साठी याचा अधिक वापर होत आहे. खेळाडू कमी अन् बाहेरच्यांचा जास्त वावर मैदानावर दिसतो. कोल्हापुरातील कुस्ती आणि फुटबॉल यांसोबत हॉकीच्या विकासासाठी या मैदानाचा विकास महत्वाचा आहे. महापालिकेने त्याकडे अधिक सजगतेने लक्ष द्यायला हवा. 'खेलो इंडिया' उपक्रमांतर्गत केंद्र सरकारने साडेपाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. या निधीचा सुयोग्य वापर व्हावा अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींची आहे.

संभाजीनगर रिंगरोडलगत असणाऱ्या मेजर ध्यानचंद हॉकी मैदानावर ग्रामीण व शहरी भागातील खेळाडू सरावासाठी येतात. अधिकाधिक चांगल्या दर्जाचे आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू तयार व्हावेत, यासाठी खेळाडूंना पायाभूत सुविधा गरजेच्या आहेत. मात्र, मैदानावर पायाभूत सुविधांची वानवा आहे. येथील स्वच्छतागृहाकडे दुर्लक्ष झाले आहे. प्रसाधनगृहातील भांड्यांची मोडतोड झाली आहे. स्वच्छतेअभावी दुर्गंधी पसरली असते. धनराज पिल्ले हॉकी प्रॅक्टिस ग्राउंडच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील खिडकीच्या काचा फुटल्या असून दक्षिणेकडील बाजूला व्यायाम शाळेजवळील स्वच्छतागृहाचा पत्रात गंजून तुटला असून दरवाजा गायब आहे. स्वच्छतागृहात प्लास्टिकचे ग्लास पडलेले दिसतात. लगतच्या भिंतीला तडे गेले आहेत. येथील स्वच्छतागृहात पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही. कित्येक महिने त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.

मैदानात पावलोपावली प्लास्टिक कचरा आढळतो. मैदानाच्या पूर्वेकडील बाजूने सुरक्षा जाळी तोडून ये-जा करण्यासाठी नवा मार्ग तयार करण्यात आला आहे. त्यामुळे अनैतिक प्रकारांना आयती संधी मिळते. मैदानातील बांधकामाची पडझड झाली आहे. प्रॅक्टिस ग्राउंड लगतच्या प्रवेशद्वाराच्या भिंतीला तडे गेले आहेत. पूर्वेकडे मुलींसाठी असलेली चेंजिंग रुम बंद आहे तर व्यायामशाळेचाही वापर होत नसून भिंतीवरील सिमेंटचे पापुद्रे गळून पडले आहेत. बैठक व्यवस्थेला भगदाड पडले आहे. पश्चिमेकडील बाजूच्या झाडांचे कठडे तुटले असून मैदानात अनेक ठिकाणी झुडूपे उगवली आहेत. प्रवेशद्वारालगत प्लास्टिक कचरा एकत्र करून पेटवून दिल्याचे दिसून येते. मैदानातील विद्युत व्यवस्थाही निकामी झाली असून विद्युत खांबांच्या फ्यूज वायर उघड्यावरच आहेत.

तळीरामांसाठी हक्काचे ठिकाण

हॉकी स्टेडियमच्या शारदा विहार अपार्टमेंटसमोरील बाजूला प्रेक्षक गॅलरीखाली दुकानगाळ्यांचे नियोजन आहे. मात्र, तेथे अजूनही गाळे तयार नाहीत. संरक्षक भिंत नसल्याचा गैरफायदा तळीराम घेतात. रात्री दारू पिणाऱ्यांसाठी हे मैदान म्हणजे हक्काचे ठिकाण बनले आहे. तळीरामांची टोळी बसलेली आढळतात. मैदानाची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर असून मद्यपान झाल्यानंतर रिकाम्या बाटल्या मैदानातच फोडून टाकल्या जातात. त्यामुळे परिसरात रिकाम्या बाटल्यांचा खच पडल्याचे दिसते. सरावासाठी आलेल्या खेळाडूंना अनेकदा या त्रासाला सामोरे जावे लागते. जिल्हा असोसिएशनकडून सुविधांसाठी महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा केला जातो. मात्र, प्रशासनाकडून त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार आहे. या प्रभागांतील नगरसेवकांनी याकामी भूमिका घ्यावी अशी मागणी क्रीडाप्रेमींतून होत आहे

चांगल्या दर्जाचे अॅस्ट्रो टर्फ मैदान हवे

हॉकी स्टेडियमवर टर्फ मैदान तयार व्हावे यासाठी वारंवार पाठपुरावा केला जात होता. अॅस्ट्रो टर्फसाठी केंद्र सरकारकडून साडेपाच कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. खासदार संभाजीराजे यांनी केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू यांच्याकडे याप्रश्नी सातत्याने पाठपुरावा केला होता. टर्फ उभारणीसाठी स्थायी समितीचे माजी समिती सभापती विजय साळोखे प्रयत्नशील होते. निधी मंजुरीचे पत्र खासदार संभाजीराजेंना मिळाले आहे. क्रीडामंत्री रिजिजू यांनी खास बाब म्हणून 'खेलो इंडिया'च्या माध्यमातून मैदानासाठी हा निधी मंजूर झाला आहे. या निधीचा योग्य वापर व्हावा, चांगल्या दर्जाचे काम व्हावे अशी अपेक्षा आहे.

उपलब्ध निधीमधून हॉकी स्टेडियमसाठी चांगल्या दर्जाचे काम करून घेतले जाईल. मैदानातील गाळ्यांच्या माध्यमातून मैदानाचा मेन्टेनन्स केला जाईल. चेंजिंग रुम, चांगल्या दर्जाचे प्रसाधनगृह त्याचबरोबर महिला व पुरुष खेळाडूंसाठी सर्व सोयींनीयुक्त वसतिगृह तयार करण्याचा मानस आहे. याकामी सर्व क्रीडाप्रेमींनी पाठबळ द्यावे.

- विजय साळोखे, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा हॉकी असोसिएशन

शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकी स्टेडियम उभारले गेले. मात्र, येथे सुरुवातीपासून सुविधांची वानवा आहे. खेळाडूंसाठी चांगले प्रसाधनगृह, चेंजिंग रुम उपलब्ध करून द्यावे. त्याचबरोबर मैदानातील स्वच्छता महत्त्वाची आहे. मैदानाच्या सुरक्षिततेच्या बाबतीत प्रशासनाने पुढाकार घ्यावा. अधिकाधिक चांगल्या पद्धतीची खेळाडू तयार व्हावेत, यासाठी स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांनी महापालिकेकडे पाठपुरावा करावा.

- अनिकेत पाटील, खेळाडू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोजिमाशित लाड यांची अरेरावी

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'जास्तीत जास्त संचालकांना पदावर बसवण्यासाठी पदाच्या कालावधीचे तुकडे करून पाच वर्षात दहा चेअरमन करण्याच्या प्रकाराने कोजिमाशि पतसंस्थेची बदनामी झाली आहे. या पदावर एखादी व्यक्ती जास्त काळ न बसू नये तसेच कारभारातील माहिती होऊ नये व आपली अरेरावी चालावी म्हणून सत्ताधारी आघाडीचे नेते दादासाहेब लाड यांची खेळी आहे' असा आरोप विरोधी संचालक समीर घोरपडे यांनी पत्रकार परिषदेत केला. घोरपडे यांच्यासह तीन विरोधी संचालकांनी या पद्धतीला विरोध करत सभेवर बहिष्कार घातला.

घोरपडे म्हणाले, 'गेल्यावेळी विरोधी आघाडीचे राजेंद्र रानमाळे यांना चेअरमन केले गेले. ते पद उर्वरित कालावधीसाठी असेल असे वाटत असतानाच रविवारी नवीन चेअरमन निवडीचा कार्यक्रम लावला. संस्थेची पंचवार्षिक निवडणूक लागणार असल्याने ते आता अवघे तीन महिन्यांसाठी असतील. सभासद हितासाठी आघाडी बदलत असल्याचे सांगून रानमळे गेले होते. पण ते ज्या सभासद कर्ज व्याजदर कमी करणे, शेअर्स रक्कम किमान ५० हजार करणे, कर्जमुक्ती ठेव परत देणे अशा सभासदांच्या हितासाठी भांडत होते, त्यातील एकही मागणी चेअरमनपदाच्या कालावधीत त्यांना पूर्ण करता आली नाही.'

घोरपडे म्हणाले, 'तज्ज्ञ संचालक असलेल्या लाड यांनी गेल्या चेअरमन निवडीच्या सभेला उपस्थिती लावून सही केली होती. पण नंतर इतिवृत्तावर व्हाइटनर लावून त्या सह्या पुसल्या आहेत. तसेच यापूर्वीच्याही काही निवडीच्या सभेचा भत्ता उचलला असेल तर त्याबाबत आक्षेप घेणार आहोत. स्वत:ची अरेरावी चालवण्यासाठी लाड यांनी पदांची खांडोळी केली आहे. पाच वर्षात दहा चेअरमन झाले असून यातून सत्कार, स्वागत, आदरातिथ्य यातून संस्थेचे म्हणजेच सभासदांचे आर्थिक नुकसान झाले आहे. यातून संस्थेची बदनामीही होत असून विश्वासार्हता कमी झाली आहे. लाड यांना कायम प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची सवय लागली आहे. ते कारभारावरुन सभासदांचे लक्ष विचलीत करुन दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत.'

पत्रकार परिषदेस विरोधी संचालक संदिप पाटील, शहाजी पाटील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बटाटाही महागला

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

या आठवड्याच्या बाजारात कांद्यापाठोपाठ बटाटाही महागला असून दरात प्रतिकिलो १० रुपयांची वाढ झाली आहे. फळभाज्या, पालेभाज्यासह फळांची मोठी आवक झाली आहे. आवक मोठ्या प्रमाणावर आल्याने पालेभाज्यांचे दर आवाक्यात आले असून मेथी, हरबरा, पालक, करडा या भाज्यांच्या खरेदीला चांगला प्रतिसाद लाभला.

कांद्याचा दर उतरला असला तरी तो सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने ग्राहकांकडून मोजून मापून खरेदी केली जात आहे. कांद्याचा दर प्रतिकिलो ४० ते ८० रुपये इतका होता. बटाट्याच्या दरात प्रतिकिलो पाच १० ते १५ रुपयांनी वाढ झाली आहे. प्रतिकिलो २५ ते ३० रुपये दर असलेला बटाटा प्रतिकिलो ४० रुपयांवर पोचला आहे. फ्लॉवर गड्ड्याचा दर १५ ते ४० रुपये होता. गाजराची आवक झाली असून प्रतिकिलो ४० ते ६० रुपयांनी विक्री झाली. संत्री, अॅपल बोरे, चमेली बोरे, सिताफळांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. संत्र्यांचा दर प्रतिकिलो ६० ते १५० रुपये तर अॅपल बोरांचा ३० ते ४० रुपये इतका आहे. जवारी केळी या आठवड्यात महागली असून प्रतिडझन ३० ते ६० रुपये असा दर होता.

फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

वांगी : ४०

टोमॅटो : २०

भेंडी : ४०

ढबू : ४०

गवार : ६०

दोडका : ४० ते ६०

कारली : ४०

वरणा : ४०

हिरवी मिरची : ४०

फ्लॉवर : १५ ते ४० (प्रति गड्डा)

कोबी : १० ते २० (प्रति गड्डा)

बटाटा : ४०

लसूण : ८० ते १००

कांदा : ४० ते ८०

आले : ८०

मुळा : १० (प्रति नग)

पालेभाजी दर (पेंढी रुपयांत)

मेथी : १०

कांदा पात : १५

कोथिंबीर : १५ ते २०

पालक : १०

शेपू :१०

चाकवत : १०

करडा : १०

फळांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

सफरंचद : १२० ते १४०

डाळिंब : ६० ते ८०

सिताफळ : ५० ते १००

संत्री : ५० ते १५०

अॅपल बोर : ३० ते ४०

केळी : ३० ते ६० (डझन)

जवारी केळी : ३० ते ६० (डझन)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैद्यकीय क्षेत्रासाठी 'दि मेडिकल थीसॉरस' उपयुक्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर 'वैद्यकीय क्षेत्र हे समाजजीवनाशी निगडीत घटक आहे. या क्षेत्रामधील नव संशोधन, उपचारपद्धतीमुळे रुग्णांच्या सोयी सुविधेत वाढ झाली. साऱ्यांनाच वैद्यकीय क्षेत्राबद्दल उत्सुकता आहे. अभ्यासक, डॉक्टरना प्रत्येक गोष्टीतील अद्ययावत ज्ञान ठेवावे लागते. यासाठी त्यांना 'दि मेडिकल थीसॉरस'हा वैद्यकीय ज्ञानकोष अत्यंत उपयुक्त ठरेल,' असे प्रतिपादन राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक व पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले. येथील डॉ. सफिया सिराज मोमीन व सिराज जमाल मोमीन यांनी लिहिलेल्या 'दि मेडिकल थीसॉरस'या ज्ञानकोशाचे प्रकाशन डॉ. लहाने यांच्या हस्ते झाले. स्टेट नर्सिंग सुपरिटेंडट शोभा चाटसे, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या अधिष्ठाता मीनाक्षी गजभिये यांची प्रमुख उपस्थिती होती. शाहू स्मारक भवन येथे रविवारी दुपारी कार्यक्रम झाला. डॉ. लहाने म्हणाले, 'लेखिका सिराज मोमीन या सीपीआरमधील नर्सिंग कॉलेजमधून प्राचार्यपदावरून सेवानिवृत्त आहेत. तर सिराज मोमीन हे राजर्षी शाहू हायस्कूलमधून उपमुख्याध्यापकपदावरून निवृत्त आहेत. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी अतिशय कष्टपूर्वक वैद्यकीय ज्ञानकोश तयार केले आहे. हा ज्ञानकोश विद्यार्थ्यापासून डॉक्टरांना फायदेशीर ठरेल. वैद्यकीय क्षेत्रातील भाषा, उच्चार यासंबंधी ज्ञान वाढविणारा हा ज्ञानकोश आहे,' असे कौतुकोद्गार त्यांनी काढले. अधिष्ठाता गजभिये यांनी लेखिकेचा शिक्षणापासून लेखन निर्मितीपर्यंतचा प्रवास हा प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. नाझिमा जिया मोमीन यांनी प्रास्ताविक केले. शिल्पा पाटकर यांनी सूत्रसंचालन केले. अमन मोमीन यांनी आभार मानले. कार्यक्रमाला 'नॅब'कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष डॉ. मुरलीधर डोंगरे, कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष शकील मोमीन, स्थायी समितीचे माजी सभापती आदिल फरास यांची प्रमुख उपस्थिती होती. शुभांगी फुटाणे, तेजस्विनी गायडोळे, चिन्मयी गायडोळे यांनी स्वागतगीत सादर केले. फोटो ओळी राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते 'दि मेडिकल थीसॉरस'या वैद्यकीय ज्ञानकोशचे प्रकाशन झाले. याप्रसंगी डावीकडून प्रकाशक एस. जे. मोमीन, डॉ. सफिया मोमीन, डॉ. मीनाक्षी गजभिये, शोभा चाटसे, एम. आय. मोमीन आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कॅमेरा....अॅक्शन....गोंधळ

0
0

फाइल फोटो दुकॉलमी

Anuradha.kadam@timesgroup.com

Tweet@anuradhakadamMT

कोल्हापूर

कोल्हापुरात शंभर वर्षापूर्वी कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी भारतीय बनावटीचा कॅमेरा बनवून चित्रपट निर्मिती व्यवसायाला चालना दिली. कोल्हापूरला सिनेमा जन्माला घालणारी भूमी बनवले. मराठी सिनेमाच नव्हे तर हिंदी सिनेमाच्या निर्मितीचा धागाही कोल्हापूरच्या मातीशी जोडलेला आहे. याच कोल्हापुरात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ही मातृसंस्था स्थापन झाली. यंदा महामंडळाच्या सभेचे ५० वे वर्ष होते. सभास्थळी सभागृहाबाहेर लावलेल्या कमानीतून आत आल्यानंतर २५ भावी योजनांचा फलक लावला होता. पण सभागृहात यापैकी एकाही विषयाला स्पर्शही न करता केवळ गोंधळ, दमदाटी, तुला बघून घेतो अशा भाषेत घमासान रंगले. सायलेन्स ...कॅमेरा...अॅक्शन हे शब्द सिनेमानिर्मितीची ओळख आहेत. पण महामंडळाच्या सभेचे वर्णन करायचे तर कॅमेरा...अॅक्शन...गोंधळ या तीन शब्दांतच चार तासांच्या सभेचा इतिवृत्तांत सांगता येईल असा प्रकार घडला.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ असे नाव असलेल्या या महामंडळाचा कार्यविस्तार देशस्तरावर आहे. देशभरात मराठी सिनेसृष्टीशी निगडीत असलेला प्रत्येक पडद्यावरचा व पडद्यामागचा कलाकार या संस्थेशी जोडला आहे. सर्वसाधारण सभेचे यजमानपद अर्थातच महामंडळाचे मुख्य कार्यालय असलेल्या कोल्हापूरकडे असते. यंदाही सभागृह सभासदांनी खचाखच भरले होते. मात्र विकास, नव्या योजना, सुविधा, अनुदान पुनर्रचना, थिएटर उपलब्धता, नव्या प्रमोशन कल्पना, तंत्रज्ञानाचा वापर, लघुपटासाठी योजना यासह अनेक विषय सभागृहाबाहेर लावलेल्या फलकावरच राहिले. ५० हजार सभासदांच्या विविध प्रश्नांना मागे सारत सभा गाजली ती केवळ तीन सभासदांच्या सदस्यत्व रद्दच्या मागणीसाठी उठलेल्या गदारोळानेच. चार वर्षांपूर्वी एक महिला सदस्य काही कामासाठी महामंडळाच्या कार्यालयात येते तेव्हा तिला कागदपत्र देण्यावरून होणाऱ्या वादाचे पर्यवसन तत्कालीन उपाध्यक्षांनी माझा विनयभंग केला या आरोपात होते. कोर्टात गुन्हा दाखल होतो. सुनावणीअंती माजी उपाध्यक्ष निर्दोष सुटतात. याचा अर्थ विनयभंगाचा आरोप खोटा ठरतो म्हणून संबंधित महिला व दोन सहकारी सदस्य यांचे सदस्यत्व महामंडळ रद्द करते. दरम्याच्या काळात सदस्यत्व पुन्हा दिल्याने माजी उपाध्यक्षांचा अहंकार दुखावतो. निर्दोष मुक्ततेचा आनंद आणि खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या सभासदांच्या सदस्यत्व रद्दची मागणी करणारा फलक महामंडळाच्या दारात उभारला जातो. फलकाचे जनक निर्दोष मुक्त झालेले माजी उपाध्यक्षच आहेत. अशा प्रकारच्या फलकबाजीने महामंडळाची बदनामी झाल्याने हा वाद न्यायालयात जातो. या एका मुद्द्यावर महामंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वार्षिक सभेत तीन तास केवळ एकमेकांवर तोंडसुख घेण्याचा घातला गेलेला गोंधळ पाहता महामंडळाची बदनामी झालीच आहे.

महामंडळाच्या सभेत दरवर्षी पुणे, मुंबईचे सभासद एकीकडे आणि कोल्हापूर सांगली भागातील सभासद एकीकडे असा सामना रंगलेला असतो. विदर्भ, मराठवाड्याचे सभासद शांतपणे जे जे होते ते ते पहावे या अविर्भावातच असतात. यावर्षी मुंबई पुणे विरूद्ध कोल्हापूर हा वाद सभासदांचा नव्हता तर तो होता, महामंडळाच्या कार्यालय जागा खरेदीचा. कोल्हापुरातील खासबागेतील जागा विकून मुंबईसाठी जागा खरेदी करण्याचा घाट घातला जात असल्याचा वास कोल्हापूरच्या सभासदांना आल्याने हा एकमेव दुसरा विषय सभेत चर्चेला आला. तर अहवालातील ताळेबंद जुळला नसल्याने आर्थिक प्रश्न उपस्थित झाले. सभा सुरू झाल्यापासून संपेपर्यंत किंवा उरकेपर्यंत फक्त आणि फक्त वाद, अरेरावी, गोंधळ, कागदांची फेकाफेकी, हातवारे, अंगावर धावून जाणे असे अनेक सीन सुरू होते. त्यात अध्यक्ष मेघराज राजेभोसले, कार्यवाह सुशांत शेलार यांनी गोंधळाचे वातावरण पहिल्या अर्ध्या तासात शांत करण्याऐवजी जेवणाचा ब्रेक घेतल्याने व त्यासाठी व्यासपीठ सोडल्याने चिघळलेले वातावरण राष्ट्रगीताची शेवटची ओळ संपेपर्यंत सुरूच होते. त्यानंतर समांतर सभेचा रंगलेला पट, त्यातील गोंधळ सुरूच राहिला.

.......

चौकट

... तरच हेतू साध्य

सध्याच्या कार्यकारिणीकडे अजून दीड वर्षांचा अवधी आहे. अहवालात छापलेल्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी काम करण्याची संधी दवडू नये. सभासदांच्या प्रश्नांबाबत, नव्या योजनांबाबत संचालकांनी काम केले तरच महामंडळाचा हेतू साध्य होईल. पडद्यावरचा सिनेमा अधिकाधिक सशक्त कसा होईल आणि त्यावर जगणारे कलाकार समृद्ध कसे होतील हे पाहिले पाहिजे. नाहीतर महामंडळाचा वेगळ्या अर्थाने 'सिनेमा ' व्हायला वेळ लागणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दंडाची रक्कम शेतकऱ्यांना द्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मागील हंगामातील एकरकमी एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांनी दंडाची १५ टक्के व्याजाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, या मागणीसाठी अंकुश शेतकरी संघटनेच्यावतीने साखर सह संचालक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. गेल्या हंगामातील दंडाच्या रक्कमेची माहिती साखर आयुक्त केली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच या हंगामात १५ दिवसात एकरक्कमी एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांनी व्याजाची रक्कम सुरुवातीपासून कळवावी अशी मागणीही केली.

शुगर केन कंट्रोल ऑर्डर १९६६ च्या तरतुदीनुसार एकरकमी एफआरपी १४ दिवसांत न देणाऱ्या शेतकऱ्यांला १५ टक्के व्याज देण्याचा कायदा आहे. पण या कायद्याचे पालन साखर सहसंचालक कार्यालयाकडून होत नसल्याने अंकुश संघटनेने पाठपुरावा केला आहे. हंगाम सुरू झाल्यावर २५ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कारखानदार आणि संघटनेच्या संयुक्त बैठकीत कारखान्यांनी वेळेत एफआरपी न दिल्याबद्दल १५ टक्के व्याजाची माहिती साखर आयुक्त कार्यालयाला कळवावी, असा आदेश दिला होते. पण साखर सहसंचालक कार्यालयाकडून व्याजाची रक्कम कळवण्यास टाळाटाळ केल्याने आज अंकुश संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी कार्यालयात सुमारे दोन तास ठिय्या मारला. जोपर्यंत व्याजाची रक्कम साखर आयुक्त कार्यालयाला पाठवत नाही तो पर्यंत कार्यालय सोडणार नाही, असा इशारा दिला. आंदोलनाच्या ठिकाणी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल गुजर यांनी भेट दिली. कार्यालयीन अधीक्षक रमेश बारडे यांच्या संघटनेच्या नेत्यांनी चर्चा केली. गेल्या हंगामातील थकीत व्याजाची रक्कम साखर आयुक्तालयाला पाठवण्यात येईल, असे आश्वासन देऊन त्याची प्रत देण्यात आली. तसेच या हंगामात साखर आयुक्तांना पाठवण्यात आलेल्या अहवालात मुदतीत एफआरपी न दिल्याबद्दल कारखान्यांनी व्याजाची रक्कम दर १५ दिवसाला कळवण्यासाठी कारखान्यांना आदेश दिले आहेत.

आंदोलनात संघटनेचे धनाजी चुडमुंगे, शिवाजी माने, विकास शेषवरे, श्रीकांत माने गावडे, चंद्रकांत माळी, सदाशिव कुलकर्णी, दत्ता पाटील, भैरवनाथ मगदूम, प्रताप चव्हाण उत्तम पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकीत एफआरपीचे ९८ कोटी व्याज थकले

0
0

ऊस .... फाइल फोटो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मागील साखर हंगामात एफआरपीचे तुकडे करुन कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर उसाचे बिल जमा केले होते. पण एकरकमी एफआरपी न दिल्याने १५ टक्के व्याजाची आकारणी कारखान्यांवर करण्यात आली आहे. या थकीत एफआरपीचे तब्बल ९८ कोटी रुपये व्याज थकले असून सर्वाधिक वारणा कारखान्यांचे १५ कोटी १२ लाख रुपये व्याज थकले आहे. आठ दिवसांत थकीत व्याज न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा अंकुश आंदोलन संघटनेने दिला आहे.

ऊस गाळप झाल्यावर १४ दिवसांत एफआरपी देण्याचे कायद्याने कारखान्यांना बंधनकारक असून एफआरपी न दिल्यास ऊस बिलावर १५ टक्के व्याज कारखान्याने देण्याचा कायदा आहे. पण गतवर्षी साखर हंगाम आर्थिक अडचणीत आल्याने कारखान्यांनी एफआरपीचे तुकडे केले होते. त्याविरोधात शेतकरी संघटनांनी साखर आयुक्त कार्यालयाकडे पाठपुरावा केला होता. अंकुश आंदोलनने बेमुदत ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कारखान्यांना थकीत एफआरपीवरील व्याजाची आकडेवारी मागितली होती. पण गाळप अहवालात कारखान्यांनी व्याजाचा रकाना रिकामा ठेवला होता. त्यावर पुन्हा 'अंकुश'ने आंदोलन केल्यावर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कारखान्यांना व्याजाची आकडेवारी देण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार साखर सहसंचालक कार्यालयाने थकीत व्याज रक्कमेची आकडेवारी संघटनेला उपलब्ध करुन दिली.

कोल्हापूर विभागात ३८ कारखाने असून कोल्हापूर जिल्ह्यात २२ तर सांगली जिल्ह्यात १५ कारखाने आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांची थकीत व्याजाची रक्कम ६४ कोटी ५४ लाख इतकी असून सांगलीची ३३ कोटी ४२ लाख रुपये इतकी आहे.

.....

कारखान्यांचे थकीत व्याज(कोटीत)

आजरा २.९१, भोगावती २.६०, राजाराम १.१६, शाहू २.२८, दत्त शिरोळ २.९०, बिद्री २.०३, नलवडे १.३४, जवाहर ५.०७, हमिदवाडा २.०८, कुंभी ३.१०, पंचगंगा ३.६३, शरद १.८१, वारणा १५.१२, गायकवाड १.६०, डी. वाय. पाटील १.२५, दालमिया ३.०९, गुरुदत्त २.८५, इको केन २.८, हेमरस २.२३, महाडिक १.२१, संताजी २.२५, इंदिरा ९.८.

....

'वारणा' ला टनाला ५०० रुपये दंड

गतवर्षीची एफआरपी थकल्याने वारणा साखर कारखान्याला गाळप परवाना मिळालेला नाही. तरीही कारखान्याने बेकायदेशीर गाळप सुरू केले आहे. कारखान्यावर कोणती कारवाई केली, अशी विचारणा आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी केली. यावर सहकार अधिकारी शंकर बारडे यांनी वारणा कारखान्याला गाळप होणाऱ्या एक टन उसाला पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे सांगितले.

....

कोल्हापूर विभागात २९ लाख

मेट्रिक टन उसाचे गाळप

कोल्हापूर विभागात ३८ कारखाने असून तीन आठवड्यात २९ लाख २४ हजार ८५९ मेट्रिक टनाचे गाळप झाले. कोल्हापूर जिल्ह्यात १९ लाख ४८ हजार ५७३ मेट्रिक टन तर सांगली जिल्ह्यात ९ लाख ७६ हजार २८५ मेट्रिक टन गाळप झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दोन लाख दहा हजार ६८५ मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले असून सांगली जिल्ह्यात एक लाख तीन हजार ७४६ मेट्रिक टन उत्पादन झाले आहे.

....

साखर उतारा घटला

यंदा साखर हंगाम एक महिना उशिरा सुरू झाला आहे. बहुतांशी कारखाने २२ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत सुरू झाले. परतीचा पाऊस आणि थंडी नसल्याने साखरेचा उतारा एक ते दीड टक्क्याने घटला आहे. जिल्ह्यात दूधगंगा बिद्री कारखान्याचा साखर उतारा १०.८२ असून सर्वाधिक कमी उतारा महाडिक शुगर्सचा ६.६४ इतका आहे. सांगली जिल्ह्यात सर्वाधिक उतारा निनाईदेवीचा ११.५३ इतका आहे. सर्वात कमी विश्वास कारखान्याचा ९.६८ इतका आहे. कोल्हापूरचा सरासरी उतारा १०.३२ तर सांगली जिल्ह्यातील १०.३८ इतका आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल फूड टेस्टिंग व्हॅनचे लोकार्पण

0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खाद्यपदार्थातील भेसळ ओळखण्यासाठी सोमवारी मोबाइल फूड टेस्टिंग लॅबचा लोकार्पण सोहळा भवानी मंडप येथे पार पडला. या लॅबद्वारे खाद्यपदार्थातील भेसळ ओळखण्यात येणार आहे. 'केंद्र सरकारच्यावतीने राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळालेल्या सुविधेमुळे भेसळीला आळा बसेल,' असा विश्वास यावेळी उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव यांनी व्यक्त केला.

मानवाच्या मुलभूत गरजांमध्ये अन्न हा सर्वात महत्वाचा घटक आहे. मात्र सध्या सकस आणि भेसळमुक्त अन्न मिळवणे कठीण बनले आहे. दैनंदिन वापरातील अनेक पदार्थ भेसळयुक्त असल्याचे निदर्शनास येते. भेसळयुक्त पदार्थांमुळे डायरीया, फूड पॉयझनिंग यासारखे आजार वाढत आहेत. कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारांची भिती अधिकच वाढली आहे. अशा आजारांपासून नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी फूड टेस्टिंग लॅब महत्त्वाची ठरणार आहे. सर्वसामान्यांना खाद्यपदार्थांतील भेसळ त्वरीत ओळखता येणार आहे. संपूर्ण जिल्ह्यात ही टेस्टिंग व्हॅन फिरणार आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग गावनिहाय त्याचा दैनंदिन कार्यक्रम जाहीर करणार आहे.

जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, 'हळद किंवा काळी मिरीमधील भेसळ आपल्याला कळते पण तेंव्हा खूप वेळ झालेला असतो आणि त्याबाबत पुढे काय करायचे हे ग्राहकांना समजत नाही. मात्र, या व्हॅनमुळे ग्राहक आणि विक्रेते यामध्ये दुवा साधला जाईल. जे चुकीचे काम करत आहेत, खाद्यपदार्थांची भेसळ करत आहेत, त्यांना जरब बसणार आहे.'

यावेळी महापौर ॲड. सूरमंजिरी लाटकर, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. सुहास वारके, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, प्रभारी पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर, अन्न विश्लेषक डॉ. रवींद्र शिंदे, उपमहापौर संजय मोहिते, नगरसेवक ईश्वर परमार, राहुल चव्हाण प्रमुख उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचगावच्या उपसरपंचपदी प्रकाश गाडगीळ

0
0

कोल्हापूर: पाचगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रकाश गाडगीळ यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंच प्रवीण कुंभार यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे जागा रिक्त झाली होती. सरपंच संग्राम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत सदस्यांची बैठक झाली. ग्रामविकास अधिकारी एस. एम. लंबे यांनी निवड प्रक्रियेचे कामकाज पाहिले. सदस्य सुशांत शेटगे हे सूचक तर ज्योतिराम पवार यांनी अनुमोदन दिले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांच्या गटाची ग्रामपंचायतीत आहे. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढली. याप्रसंगी कोअर कमिटीचे अध्यक्ष नारायण गाडगीळ, उपाध्यक्ष संजय पाटील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images