Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी अधिकारी रस्त्यावर

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाकडे थकीत असलेल्या पाणीपट्टी वसुलीसाठी सोमवारी अधिकारी रस्त्यावर उतरले. मोहिमेचा धडाका लावताना दिवसभरात एक लाख ९६ हजार २४० रुपये वसूल करण्यात आले. तर १८ थकबाकीदारांचा पाणीपुरवठा खंडीत करण्यात आला. बुधवार पेठ, शनिवार पेठ, उत्तरेश्वर पेठ परिसरात कारवाई करण्यात आली.

आर्थिक वर्ष संपण्यास चार महिन्यांचा अवधी असला, तरी शहरातील अनेक मिळकतदारांकडे मोठी पाणीपट्टी थकीत आहे. पाणीपुरवठा विभागाची वसुली समाधानकारक नसल्याने आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गेल्या दोन आठवड्यांपासून वसुली मोहिमेने गती घेतली आहे. लिपिक व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्याकडून वसुली केली जात होती. सोमवारी मात्र वरिष्ठ अधिकारीच रस्त्यावर उतरले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली थकबाकीदारांकडून एक लाख ९६ हजारांची वसुली करण्यात आली.

पथकाने सोन्या मारुती चौक, गवळी गल्ली, शनिवार पेठ पोस्ट ऑफिस परिसर, बागवान गल्ली, उत्तरेश्वर पेठ या परिसरातील शंकर काटकर उर्फ उबाळे, अशोक शेणई, देवगिरी गोसावी, बळवंत भोसले, खंडेराव भोसले, सदाशिव निल्ले, दत्तात्रय वाली, चिराउद्दीन पाथरवट, महंमद अवटी, जमाल मुजावर, धोंडिराम मुरोडे, कासीम मणेर, औदुबंर माळी, महावीर कराळे, नेमिनाथ घोडके, रफीक मुल्ला, विजयमाला अथणे, ताराबाई सपाटे या थकबाकीदारांची नळ कनेक्शन तोडली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी गवळी गल्लीतील अमृत योजने अंतर्गत टाकण्यात आलेल्या पाइपलाइनची तपासणी केली. तसेच जोडलेल्या नळ कनेक्शनमधील त्रुटींबाबत संबंधित ठेकेदार तसेच अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. वसुली पथकांमध्ये पाणीपट्टी अधीक्षक प्रशांत पंडत, पथक प्रमुख पी. एस. माने, उदय पाटील, मिटर रीडर प्रथमेश माजगांवकर, रवी वडगांवकर, महावीर आवळे, उदय भोसले, आदिनाथ शेलार, बाजीराव कांबळे, सागर मिठारी यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कळंबा कारागृहातील अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कळंबा मध्यवर्ती कारागृहातील स्वच्छतागृहात लपवून ठेवलेला मोबाइल सापडल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत प्रशासनाने दोन अधिकारी आणि १० कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे. दोन दिवसांत मोबाइलच्या आयएमईआय क्रमांकावरुन कारागृहातून बाहेर कोणाशी संपर्क साधण्यात आला याचा अहवाल वरिष्ठांना पाठवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

शनिवारी रात्री कारागृहातील पाच क्रमांकाच्या सर्कलमधील दोन क्रमांकाच्या बराकीची झडती घेण्यात आली. यावेळी स्वच्छतागृहाच्या ड्रेनेज पाइपजवळ मोबाइल लपवून ठेवलेला आढळला. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा नोंदवण्यात आला. या घटनेची गंभीर दखल घेत राज्याचे कारागृह महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार कारागृह अधीक्षक दत्तात्रय गावडे यांनी सोमवारी चौकशी सुरुवात केली आहे. जुना राजवाडा पोलिसांनीही स्वतंत्रपणे चौकशी सुरू केली आहे. यापूर्वी कळंबा कारागृहात गांजा पार्टी, पिस्तूलसदृश्य वस्तू सापडल्याने कारागृहातील कारनाम्यांनी प्रशासन बदनाम झाले आहे. महानिरीक्षक रामानंद यांनी ऑगस्ट महिन्यात कारागृहाची तपासणी केली होती. तरीही कारागृहात कैद्यांना व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याची तक्रारी आल्या आहेत. अनेक कैद्यांना अंमली पदार्थ पुरवले जात असून ओल्या पार्ट्या सुरू असल्याची चर्चा आहे. कारागृहात गंभीर गुन्ह्यातील आरोपी असल्याने कारागृहाची सुरक्षितता धोक्यात येऊ नये याची काळजी महानिरीक्षक कार्यालयाकडून घेतली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निरीक्षक काळे यांची बदली

$
0
0

कोल्हापूर

अवैध धंद्यांवरील कारवाईस टाळाटाळ केल्याप्रकरणी हातकणंगले पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरविंद काळे यांची तडकाफडकी पोलिस मुख्यालयात बदली करण्यात आली. त्यांच्या जागी पोलिस निरीक्षक ए.आर. भवड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करावेत, असे आदेश पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिले होते. तसेच टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला होता. पण निरीक्षक काळे यांनी अवैध धंद्यांवर कारवाई न केल्याने पोलिस ठाण्याच्या हद्दीत मटका, जुगार सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून आल्या होत्या. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मुरगूड पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे यांचीही बदली नियंत्रण कक्षाकडे करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर लाटकर यांना महिन्याची मुदतवाढ शक्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसतंर्गत महापालिकेमध्ये ठरलेल्या सत्ता फॉर्मुल्यानुसार मंगळवारी राष्ट्रवादीकडील महापौरपदाचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. अॅड. सूरमंजिरी लाटकर यांची महापौरपदी निवड होऊन एक महिनाही झालेला नाही. त्यामुळे त्यांना आणखी एक महिनाची मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.

दहा डिसेंबर २०१८ पासून राष्ट्रवादी काँग्रेसकडे महापौरपद आले. या कालावधीत सरिता मोरे व माधवी गवंडी यांची महापौरपदी निवड झाली. गवंडी यांच्या निवडीनंतर दोन महिन्यांनी अॅड. लाटकर यांना संधी देण्यात येणार होती. पण विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्यांना संधी मिळू शकली नाही. आचारसंहिता संपल्यानंतर त्यांची निवड झाली, मात्र निवड होऊन एक महिना होण्यापूर्वीच राष्ट्रवादीकडे असलेल्या महापौरपदाचा कार्यकाळ संपला आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये महापालिकेची निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी महापौर व उपमहापौर दोन्ही पदे काँग्रेसकडे राहणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचा तांत्रिकदृष्ट्या कार्यकाळ संपल्याने अॅड. लाटकर यांना पदाचा राजीनामा द्यावा लागतो. पण त्यांना दोन्ही पक्षांकडून एक महिना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. मुदतवाढीनंतर नव्या वर्षात त्यांचा राजीनामा होऊन नव्या महापौरांची निवड होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटण दराची कोंडी आज फुटणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या दीड महिन्यापासून मटण दरावरुन निर्माण झालेली कोंडी फुटण्याच्या मार्गावर आहे. मटण व्यावसायिक आणि विविध तालीम संस्था व संघटना प्रतिनिधींची संयुक्त बैठक मंगळवारी (ता.१०) सकाळी साडेअकरा वाजता शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरात होणार आहे. दरम्यान, राजारामपुरी येथे सोमवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत ग्राहक व मटण विक्रेते या दोघांनाही परवडेल असा सन्मानजनक तोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजूंकडून सकारात्मकता दर्शविण्यात आली.

संयुक्त राजारामपुरी व राजारामपुरी तालीम मंडळातर्फे बैठकीचे आयोजन केले होते. कृती समितीचे बाबा इंदूलकर यांनी 'कसबा बावडा येथे ४७० रुपये, राजारामपुरी विकास मंचतर्फे ४२५ रुपये प्रतिकिलो या दराने एक नंबर प्रतीच्या मटणाची विक्री केली. विक्रेत्यांनी याचा विचार करुन ४५० रुपये प्रति किलो दराने मटण विक्री करावी'असे आवाहन केले.

कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार व बाबा पार्टे म्हणाले, 'मटण दरवाढ विरोधातील आंदोलन कोणत्याही समाजाविरुद्ध नाही. ग्राहक व मटण विक्रेत्यांमधील हा वाद आहे. विक्रेत्यांनी चर्चा लांबविण्यापेक्षा मार्ग काढण्याची भूमिका स्वीकारावी.' शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण यांनी, मटण विक्रेत्यांनी हा विषय प्रतिष्ठेचा बनवू नये, असे सांगितले. नगरसेवक अजित राऊत यांनी मटण व्यावसायिकांनी सामंजस्याने निर्णय घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी नगरसेवक मुरलीधर जाधव, अनिल घाटगे आदींची भाषणे झाली. दुर्गेश लिंग्रस यांनी आभार मानले.

....

ग्राहकामुळेच व्यवसाय, दराबाबत मार्ग काढू

'मटण विक्रीचा व्यवसाय हा ग्राहकांमुळेच आहे. मटण व्यावसायिक व ग्राहकांचे संबंध चांगले आहेत. नागरिक, लोकप्रतिनिधी, महापालिकेचे सहकार्य नेहमीच मटण व्यावसायिकाला लाभले आहे. मटण दराबाबत व्यावसायिकांशी चर्चा करुन मंगळवारच्या बैठकीत निश्चित सकारात्मक मार्ग काढू,'अशी ग्वाही खाटिक समाजाचे जिल्हाध्यक्ष विजय कांबळे यांनी बैठकीत दिली. याप्रसंगी समाजाचे अध्यक्ष विजय घोटणे, किरण कोतमिरे, बाळासाहेब जाधव, महेश घोडके, सुनील कांबळे, दत्तात्रय इंगवले आदी उपस्थित होते.

....

मोठ्या हॉटेलमधील चढ्या दराचा प्रश्न

'मोठ्या हॉटेलमध्ये मटण ताटासाठी भरमसाठ पैसे घेतले जातात. त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. कृती समितीने आता अशा मोठ्या हॉटेलमधील चढ्या दराबाबत भूमिका घेण्याची आवश्यकता आहे,' असे मत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव व शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी मांडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभापती आरक्षण उद्या

$
0
0

कोल्हापूर

जिल्ह्यातील बारा पंचायत समिती सभापतीपदांसाठी बुधवारी (ता.११) आरक्षण काढण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सर्किट हाऊस येथील राजर्षी शाहू सभागृहात सकाळी ११ वाजता आरक्षण सोडतीला प्रारंभ होईल. २१ डिसेंबर २०१९ पासून पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी आरक्षण काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांमधील अनुसूचित जाती, अनूसुचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला प्रवर्गासाठी आरक्षण निघणार आहे. दरम्यान, पंचायत समिती सभापतींच्या निवडी झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थी वाहतूक सुरळीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुंबई हायकोर्टाने असुरक्षित विद्यार्थी वाहतूक रोखण्यासाठी दिलेल्या आदेशानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाई सुरू केल्यानंतर अॅटो रिक्षातून विद्यार्थी वाहतूक शनिवारपर्यंत बंद ठेवली होती. सोमवारी सुरक्षिततेची उपाययोजना करत रिक्षांतून विद्यार्थी वाहतूक सुरू करण्यात आली. त्यामुळे शाळांचा परिसर गजबजून गेला होता.

पालक आणि विद्यार्थ्यांची अडचण होऊ नये यासाठी विद्यार्थी वाहतूक संघटनेने सोमवारी विद्यार्थी वाहतूक सुरू केली. रिक्षातून दहा विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याला प्राधान्य देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये याची काळजीही घेण्यात आली. विद्यार्थी वाहतूक सुरू झाल्याने पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

आजअखेर प्रदोशिक परिवहन कार्यालयाने १३१ रिक्षांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यापुढेही कारवाई सुरूच राहील, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, हायकोर्टात १७ रोजी सुनावणी होणार असून विद्यार्थी वाहतूक संघटनेकडून याचिका दाखल करण्यात येणार आहे. रिक्षातून विद्यार्थी वाहतूक करण्यास परवानगी देण्याची विनंती कोर्टाला करण्यात येणार आहे. त्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून जिल्हा बार असोसिएशनच्या माध्यमातून मुंबईतील वकिलांशी संपर्क करण्यात आला आहे.

दरम्यान, कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या निवेदनाचा आधार घेत शिक्षण उपसंचालक कार्यालयाने पुढील शैक्षणिक वर्ष जून २०२० पासून सर्वंकष विद्यार्थी वाहतूक धोरण निश्चित करून त्याची अंमलबजावणी करावी. सद्यस्थितीमध्ये विद्यार्थी वाहतूक पूर्ववत चालू ठेवावी अशी आपल्या स्तरावरुन हायकोर्टाकडे विनंती करावी,'असे पत्र शिक्षण उपसंचालक कार्यालयाने शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या अपर मुख्य सचिवांना पाठविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जावई, लेकीनेच चोरल्या सोन्याच्या साखळ्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

डुप्लिकेट चावीचा वापर करुन मुलीने तिच्या पतीच्या मदतीने वडिलांच्या घरातील सव्वा लाख किंमतीच्या सोन्याच्या तीन साखळ्या चोरुन नेल्या. हरिप्रिया निखिल कुराडे (वय २०) आणि निखिल रामचंद्र कुराडे (२९, रा. छत्रपती ताराराणी कॉलनी, स्टेट बँक कॉलनी, प्रतिभानगर) अशी संशयितांची नावे आहेत. राजारामपुरी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

फिर्यादी चंद्रकांत शंकर नकाते (वय ७०) यांचा शास्त्रीनगर मैदानाजवळील सागर माळ येथे 'लक्ष्मी शंकर' नावाचा बंगला आहे. नकाते बंगल्याला कुलूप घालून रविवारी रात्री आठ वाजता बाहेरगावी गेले होते. सकाळी दहा वाजता घरी आल्यावर घरातील सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांना चोरीबाबत माहिती दिली. फिर्यादी नकाते यांची मुलगी हरिप्रिया आणि जावई निखिल यांनी रविवारी रात्री डुप्लिकेट चावीचा वापर करुन बंगल्यात प्रवेश केला. नकाते यांच्या बेडरुममधील तिजोरीतून तीन सोन्याच्या साखळ्या चोरुन नेल्या. या साखळ्यांचे वजन ४० ग्रॅम असून दागिन्यांची किंमत सव्वा लाख रुपये आहे. नकाते यांनी मुलगी आणि जावयाने दागिने चोरुन नेल्याची फिर्याद राजारामपुरी पोलिस ठाण्यात दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


१७ गावातील पाणी योजनांचा उद्यापासून लेखाजोखा

$
0
0

जिल्हा परिषद लोगो.......

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत १७ गावांतील नळपाणी पुरवठा योजनेच्या कामाचा लेखाजोखा बुधवारी (ता.११) व गुरुवारी (ता.१२) मांडला जाणार आहे. योजना रखडण्यामागील कारणमीमांसा शोधली जाणार आहे. ग्रामसेवक, सरपंच, ठेकेदार, उपअभियंता, शाखा अभियंता आणि जिल्हा परिषद सदस्य यांची संयुक्त बैठक होणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक व मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक होईल.

जिल्हा परिषदेच्या शुक्रवारी (ता.६) झालेल्या सर्वसाधारण सभेत या गावांतील पाणी योजनेवरुन सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. याप्रश्नी सोमवारी (ता. ९) सुनावणी घेण्याचे ठरले होते. मात्र आठ तालुक्यात ही १७ गावे आहेत. त्यांची एकत्रित बैठक घेण्याऐवजी तालुका आणि मतदारसंघनिहाय बैठका घेण्याचे ठरले. सीईओ मित्तल यांनी सोमवारी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता मनीष पवार यांच्याकडून संबंधित योजनेची माहिती घेतली.

बुधवारी शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी, मजरेवाडी, शिरदवाड, शिवनाकवाडी, आलास तर भुदरगड तालुक्यातील डेळे चिवाळे, शिवडाव बुद्रुक या गावातील योजनांचा आढावा घेतला जाईल. याच दिवशी आजरा तालुक्यातील दाभिल, कागल तालुक्यातील कापशी गावातील योजनेविषयी बैठक होईल. गुरुवारी, चंदगड तालुक्यातील करेकुंडी, पाटणे, गडहिंग्लज तालुक्यातील चंदनकुड, शिप्पुरतर्फ नेसरीपैकी हेळेवाडी, मासेवाडी, दुंडगे, करवीरमधील चिखली आणि पन्हाळा तालुक्यातील कोतोली गावांची बैठक होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विठ्ठल -रुख्मिणी मंदिरात पुन्हा मोबाइल बंदी

$
0
0

पंढरपूर :

विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात एक जानेवारीपासून भाविकांना मोबाइल घेऊन जाता येणार नाही. या बाबतचा निर्णय मंदिर समितीने सोमवारच्या बैठकीत घेतला आहे. या निर्णयामुळे पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले आहे. भाविकांच्या रेट्यानंतर मंदिरात मोबाइल नेण्यास परवानगी दिली होती. आता पुन्हा समितीने हा निर्णय घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटणार आहे.

मोबाइल ही भाविकांची गरज असल्याने वयस्कर भाविक आपल्यासोबत मोबाइल ठेवत असतात. मंदिर समितीने पूर्वी सुरक्षेच्या कारणावरून मंदिरात मोबाइल बंदीचा निर्णय घेतल्यावर मंदिर परिसरात मोबाइल लॉकरच्या नावाने पैसे वसूल करण्यात येत असल्याचे आरोप झाले होते. यात अनेक गैरप्रकारामुळे भाविकांची फसवणूक होत असल्याचाही दावा करण्यात आला होता. या प्रकाराविरोधात वारकरी संप्रदाय आणि भाविकांनी आवाज उठविल्यावर मंदिरातील मोबाइल बंदी उठविण्यात आली होती. आज पुन्हा मंदिरात मोबाइल बंदी करून समितीने मोबाइल लॉकरचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना खुश केले आहे. विठूरायासमोर अनेक भाविक फोटो काढतात, असे कारण देत ही मोबाइल बंदी घातली आहे. मात्र, फोटो काढायचे प्रकार राजकीय नेते व उद्योगपती यांच्याकडून होतो. मंदिर समितीच्या निर्णयाचा फटका सर्वसामान्य भाविकांना बसणार असल्याचा आरोप होत आहे. या मोबाइल बंदीमुळे वयस्कर भाविकांच्या त्रासात भर पडणार असून, आता आधी मोबाइल ठेवण्यासाठी पैसे मोजायचे आणि पुन्हा आपल्या माणसांना शोधण्यासाठी वेळ घालवावा लागणार आहे. राज्यात सरकार बदलल्याने आता पुन्हा लवकरच नवीन मंदिर समिती अस्तित्वात येणार आहे. त्या नंतर पुन्हा निर्णयाबाबत फेरविचार होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सनद रद्दचा प्रस्ताव

$
0
0

कोल्हापूर: मोक्का कायद्याखाली दाखल करण्यात आलेल्या संजय तेलनाडे टोळीतील संशयित अॅड पवनकुमार उपाध्ये याची वकिलीची सनद रद्द करावी, असा प्रस्ताव कोल्हापूर पोलिसांनी मुंबई आणि गोवा बार असोसिएशनकडे पाठवला आहे. खंडणी, मारामारीसह अवैध धंद्याप्रकरणी इचलकरंजीतील एसटी गँगचा म्होरक्या संजय तेलनाडेसह १८ जणांवर मोक्का लावण्यात आला आहे. मोक्का गुन्ह्यात अॅड उपाध्येही संशयित आहे. पोलिसांनी उपाध्येची वकिलीची सनद रद्द करावी, असा प्रस्ताव बार असोसिएशनकडे पाठवला आहे. या प्रस्तावाची चौकशी करण्यासाठी स्थानिक वकिलांची नियुक्ती न करता कोल्हापूर वगळून अन्य जिल्ह्यातील वकिलांची नियुक्ती करावी, अशी विनंतीही बार असोसिएशनला केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हत्तींवर नियंत्रणासाठी तंबूची उभारणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चंदगड

तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर हत्तीचे संकट हटलेले नाही. मात्र आता शेतकरी वर्गाला वनविभागाच्या हत्ती हटाव मोहीमेमुळे दिलासा मिळाला आहे. वनविभागाने हत्तीचा वावर असलेल्या ठिकाणी हत्तींच्या हलचालींवर लक्ष ठेवून त्याला जंगलात पिटाळून लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. हत्ती व्यवस्थापन मोहिमेंतर्गत पाटणे विभागाने पार्ले धनगरवाड्यानजिक केंद्र सुरू करून तेथे तंबूची उभारणी केली आहे.

तालुक्यामध्ये चंदगड व पाटणे असे दोन विभाग आहेत. त्यांच्यामार्फत रोज हत्ती बाधीत क्षेत्रात गस्त घालून हत्तीचा बंदोबस्त करण्यासाठी उपयोजना केल्या जातात. मात्र कर्मचाऱ्यांच्या मर्यादांमुळे ही उपाययोजना तोकडी पडते. आता पाटणे वनपरिक्षेत्रामार्फत पार्ले धनगरवाडा येथे दोन तंबूंची उभारणी करण्यात आली आहे. त्यामध्ये ५ लोकांचा गट कार्यरत आहे. या वनपरिक्षेत्रात हत्तीचे आगमन हे पार्ले धनगरवाड्याच्या आसपासच्या क्षेत्रात होते. त्यामुळे धनगरवाड्यावरून हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवणे सोयीचे होईल असे वनविभागाचे म्हणणे आहे. तंबूत फटाके, सुरबाण, ढोल-ताशे, दोरखंड, अॅम्प्लिफायर आदींची व्यवस्था केली आहे. या उपक्रमाचे हत्ती व्यवस्थापन केंद्र असे नामकरण केले आहे.

हत्तीचा वावर असलेल्या क्षेत्रात माहिती व सूचना फलक लावण्यात आले आहेत. भात, नाचणी पिकांच्या सुगीचा हंगाम संपत आला असून ऊस तोड सुरू आहे. नजीकच्या सर्व साखर कारखान्यांशी पत्रव्यवहार करून हत्तीबाधीत शेतातील ऊस तोड प्राधान्याने करण्याची विनंती करणेत आली आहे. वनविभागाचे गस्तीपथक हत्तींच्या वावरावर लक्ष ठेवून आहे असे पाटणेचे वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांनी सांगितले. मोहिमेत वनपाल बी. आर. भांडकोळी, ए. डी. शिदे, एन. एम. धामणकर, वनरक्षक एस. एस. पाटील, एस. एस. जितकर, डी. एम. बडे, डी. एस. रावळेवाड, ओ. जी. जंगम, एम. आई. सनदी, जी. पी. वळवी, बी. बी. न्हावी, वनसेवक चंद्रकांत बांदेकर, अर्जुन पाटील, तुकाराम गुरव, मोहन तुपारे, विश्वनाथ नार्वेकर असे पथक कार्यरत आहे.

फोटो

पाटणे (ता. चंदगड) येथील वनविभागाने हत्ती व्यवस्थापन केंद्र सुरू केले असून हत्तींचा वावर असलेल्या भागात तंबूची उभारणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर ठरलं, मटण दर ४८० रुपये किलो

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: मटण दराविरोधात पुकारलेल्या आंदोलनाला तब्बल तीन आठवड्यानंतर सर्वपक्षीय कृती समितीला यश आले. शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथे कृती समिती आणि विक्रेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत मटणाचा दर प्रतिकिलो ४८० रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला. आंदोलनामुळे प्रतिकिलो ११० रुपये दर कमी झाला. अध्यक्षस्थानी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष माजी महापौर आर.के. पोवार, शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजीत चव्हाण, अॅड बाबा इंदुलकर, दुर्गेश लिंग्रस, बाबा पार्टे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मटण विक्रेत्यांनी ऐन दीपावलीत भाऊबीज सणाच्यावेळी मटण दरात वाढ केली. मटण दरात प्रतिकिलो ४५० रुपयांवरुन ५७० पर्यंत वाढ झाल्यावर कसबा बावडा येथे दरवाढीविरोधात पहिली ठिणगी पडली. बावड्यात मटण दुकाने बंद पाडल्यानंतर तेथील स्थानिक विक्रेत्यांनी मटणाचा दर ४६० रुपये करण्याचा निर्णय घेतला. पण शहरातील विक्रेत्यांनी मटण दर कमी करण्यास विरोध केला. राजारामपुरी, शिवाजी पेठेत मटण दरवाढीविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटली. राजारामपुरी आणि शिवाजी पेठेतील तटाकडील तालीम मंडळाने थेट प्रतिकिलो ४२५ रुपये दराने मटण विक्री केली. शहराच्या आसपास मटणाचा दर प्रतिकिलो ४२० ते ४५० रुपये असताना शहरातील मटण विक्रेते दरावर ठाम राहिल्याने सर्वपक्षीय कृती समितीने त्याविरोधात आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला.

मटण दरवाढीविरोधात कृती समितीने थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत प्रशासनाने हस्तक्षेप करण्याची विनंती केली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आंदोलक आणि मटण विक्रेत्यांच्या संयुक्त बैठक झाली. मटण विक्रेत्यांनी मटणाचा दर ५६० रुपयांवर ५४० रुपये करण्याची तयारी दर्शवली पण आंदोलक प्रतिकिलो ४६० रुपये दरावर ठाम होते. अखेर शहर आणि ग्रामीण भागातील मटण दराच्या तफावतीवर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी महानगरपालिका आरोग्यधिकारी आणि अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली.

समितीला तीन दिवसात अहवाल देण्याचे आदेश दिले पण मटण विक्रेते प्रतिकिलो ५४० रुपये दरावर ठाम राहिले. अखेर शिवाजी पेठ, राजारामपुरीसह शहरातील प्रमुख पेठात दराविरोधात असंतोष जाणवू लागला. पेठांतील मटण विक्रीची दुकाने बंद करण्यात आली. कृती समितीने मटण दर कमी करण्यासाठी विक्रेत्यांना अल्टिमेट दिल्यावर आज मंगळवारी शिवाजी मंदिरात बैठक झाली. बैठकीत खाटीक समाजाच्यावतीने विजय कांबळे यांनी प्रतिकिलो ५०० रुपये दर करण्याची तयारी दर्शवली. पण त्यांच्या निर्णयाला कृती समितीने कडाडून विरोध केला. कृती समितीने ४७० रुपये दर करण्याची तयारी दर्शवली. पण मटण विक्रेत्यांनी नकार दिला. कृती समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी चर्चा करुन प्रतिकिलो ४८० रुपये दर मान्य करण्याची विनंती खाटीक समाजाला केली. समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन खाटीक समाजाने प्रतिकिलो ४८० रुपये दराला मान्यता दिली. यावेळी बोलताना विजय कांबळे म्हणाले, खाटीक समाजाने पोटाला चिमटा लावून कोल्हापूरातील जनतेच्या मागणीला मान्यता दिली. महेश जाधव आणि सुजीत चव्हाण यांनी कृती समितीच्या विनंतीला मान राखल्याबद्दल खाटीक समाजाचे अभिनंदन केले. आंदोलनाला यश आल्याने कार्यकर्त्यांनी पेढे आणि साखर वाटून आनंदोत्सव केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवती भवती,

$
0
0

माणसं तीच, कृती समिती नवी

एखाद्या विषयाची समस्या निर्माण झाली. आंदोलनाचा निर्णय झाला की कोल्हापुरत कृती समिती आकाराला येते. कृती समितीच्या माध्यमातून वेगवेगळी आंदोलने झाली. बऱ्याच आंदोलनांना यशही मिळाले. मात्र यामधून नवे नेतृत्व समोर आली का याचा शोध घेतला तर हाताच्या बोटावर मोजण्याइतपतही नावे आठवत नाहीत, हे अन्य कुणाचे नाही तर समितीमधील काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. कारण प्रत्येक प्रश्नावर नवीन कृती समिती स्थापन झाली की त्या समितीमधील माणसे मात्र तीच आहेत. यामध्ये महापालिकेतील माजी पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवकांची संख्या अधिक. निमत्रंकापासून अध्यक्षापदापर्यंत सारं काही पूर्वनियोजित. यामुळे ठराविक चेहरेच कृती समितीच्या व्यासपीठावर. कृती समितीमधील काही मंडळी तर हाती माइक आले की, राणा भीमदेवी थाटात वेगवेगळ्या गोष्टीवर भाषणाबाजी करायला लागतात. समितीतील सीनिअर मंडळी त्यांना आवरणार का? असा प्रश्न एका नव्या कार्यकर्त्याला पडला आहे.

आमचे परममित्र...

शहर आणि जिल्हा शिवसेनेत संघटन कमी आणि गटबाजी जास्त असे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. विधानसभा निवडणूक आणि निकालानंतर शहर शिवसेनेतील गटबाजी उफाळली. शहर संघटनेच्या आजी-माजी प्रमुखांनी एकमेकांविरोधात पत्रकबाजी केली. आरोप-प्रत्यारोपांना ऊत आला होता. शिवसेनेचा एक पदाधिकारी शिवाजी पेठेतून बाण सोडत होता, तर दुसरा राजारामपुरीतून पलटवार करत होता. या धुमाळीत पेठेतील दोन पदाधिकाऱ्यांमध्ये वाद विवादाने कळस गाठला. मात्र हे तिघेही पदाधिकारी मटण दरवाढीच्या आंदोलनावरून राजारामपुरीत एकाच व्यासपीठावर आले आणि एकमेकांचा 'माझे परममित्र' असा उल्लेख करायला सुरुवात केली. बैठकीला उपस्थित काही मंडळीही या उल्लेखाने गोंधळून गेली. कालपरवापर्यंत एकमेकाला पाण्यात पाहणारे, वाटेल त्या शब्दांत एकमेकांचा उद्धार करणारे आता समोरासमोर आली की एकमेकावर स्तुतिसुमने उधळतात. हा प्रकार पाहून कार्यकर्तेही गोंधळून गेले.

आप्पासाहेब माळी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रक्रिया उद्योगातून भरारी

$
0
0

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर : शेतीमालावर प्रक्रिया करण्यासाठी आणि मालाची गुणवत्ता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री कृषी अन्नप्रक्रिया योजनेतून जिल्ह्यातील ३५ प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. योजनेतून गूळ, ऑइल मिल, राईस मिल या प्रक्रिया उद्योगांना सुरुवात झाली आहे. कृषी विभागाची योजना स्थानिकपातळीवर रोजगार निर्मिती आणि शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यास साह्यभूत ठरली आहे.

ग्रामीण भागातील युवकांनी लघू उद्योग करावा आणि दर्जेदार कृषी मालाची गुणवत्ता वाढवण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया योजनेला २०१७ पासून सुरुवात झाली. सोयाबीन, काजू, बेदाणे, राईस मिल, ऑईल मिल यासह टोमॅटोपासून सॉस निर्मिती करण्यासाठी योजना सुरू केली. दहा लाखांपासून ५० लाखांपर्यंतच्या प्रक्रिया उद्योगांसाठी ३० टक्के अनुदान असलेल्या योजनेला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. दोन वर्षांत १६० प्रस्ताव पाठवण्यात आले. त्यापैकी ३० प्रस्तावांना विभागीय आयुक्तांनी मान्यता दिली आहे.

मान्यता मिळालेल्या लाभार्थ्यांनी प्रक्रिया उद्योगास सुरुवात केली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने गूळ निर्मिती, ऑईल मिल, राईल मिल आणि वेपर्स बववण्याचा उद्योगाला सुरुवात झाली आहे. स्थानिक पातळीवर सुरू झालेल्या प्रक्रिया उद्योगांमुळे परिसरातील महिला व युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यातील ३५ लाभार्थी आत्मनिर्भर बनली आहेत. विशेषत: चंदगड, भुदरगड, गडहिंग्लज, कागल तालुक्यात लूघ उद्योगांना सुरुवात झाली आहे.

बटाट्यापासून वेफर्स तयार करणारे संदीप कांबळे म्हणाले, 'अन्नप्रक्रिया योजनेत प्रस्ताव पाठवल्यानंतर त्याला मंजुरी मिळाली. खासगी बँकेचे अर्थसाह्य घेऊन उद्योगाला सुरुवात केली. सद्य:स्थितीत दररोज सुमारे १०० ते १५० किलो वेफर्सची निर्मिती केली जात आहे. मालाची निर्मिती केल्यानंतर विक्रीसाठी मार्केटिंगचे तंत्र आत्मसात करत आहे. योजनेच्या निकषाप्रमाणे अनुदानाचा पहिला हप्ता बँक खात्यावर जमा झाला असून दुसरा हप्ता देण्यासाठी कृषी विभागाने कागदपत्रे पाठवण्याची सूचना केली आहे.'

५० प्रस्ताव प्रलंबित

अन्नप्रक्रिया योजनेसाठी पहिल्या वर्षी दाखल झालेल्या ५० प्रस्तावांना अद्याप मंजुरी मिळालेली नाही. काही तांत्रिक कारणामुळे लाभार्थ्यांना पुणे विभागीय आयुक्तांकडे हेलपाटे मारावे लागत आहेत. जिल्हा कृषी कार्यालयाकडून प्रस्ताव पाठवल्यानंतर अनुदानही वितरित केले जाते. पण त्याची पडताळणी मात्र आयुक्तस्तरावर होत असल्याने प्रस्ताव प्रलंबित राहिले आहेत. मान्यता आणि अनुदान जिल्हा कृषी कार्यालयाकडून मिळावे, अशी अपेक्षा लाभार्थ्यांकडून केली जात आहे.

अन्नप्रक्रिया लघू उद्योगांतून स्थानिक पातळीवर युवकांना रोजगार निर्माण झाला आहे. विशेषत: महिलांना रोजगार देण्यास यश मिळाले आहे. तसेच आर्थिक स्थैर्य मिळवण्यास योजना फायदेशीर ठरली आहे.

प्रज्ञा कांबळे, लाभार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये आजपासून विज्ञान प्रदर्शन

$
0
0

कोल्हापूर: माध्यमिक शिक्षण विभाग व सेंट झेवियर्स हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ११ ते १३ डिसेंबर या कालावधीत ४५ वे कोल्हापूर शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. सेंट झेवियर्स हायस्कूल येथे प्रदर्शन भरणार आहे. या प्रदर्शनासाठी ८० शाळांनी नोंदणी केली आहे. इयत्ता सहावी ते आठवी, इयत्ता नववी ते बारावी विद्यार्थी गट, शिक्षक गटाचा सहभाग असणार आहे. बुधवारी (ता.११) सकाळी नऊ वाजता शाळांची नोंदणी व उपकरणांची दालनामध्ये मांडणी केली जाईल. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या हस्ते दुपारी १२.३० वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. याप्रसंगी शिवाजी विद्यापीठातील संख्याशास्त्र विभागातील प्रा. शशीभूषण महाडिक, पर्यावरण अभ्यासक सुहास वायंगणकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. प्रदर्शनाचे नियोजन हायस्कूलचे व्यवस्थापक फादर डेनिस बोर्जीस, प्राचार्य फादर जेम्स थोरात आदी करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोहिया सांस्कृतिक मंचतर्फे राज्यस्तरीय गायन स्पर्धा

$
0
0

लोगो : साहित्य संस्कृती

कोल्हापूर: न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित मदनमोहन लोहिया सांस्कृतिक मंचतर्फे ९ ते ११ जानेवारी २०२० या कालावधीत राज्यस्तरीय भावगीत व नाट्यगीत गायन स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेचे हे आठवे वर्षे आहे. संस्थेच्या राम गणेश गडकरी सभागृहात स्पर्धा होणार आहे. महिला व पुरुष कलाकारांसाठी भावगीत व नाट्यगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

संस्थेचे माजी अध्यक्ष रसिकाग्रणी मदनमोहन लोहिया यांच्या कलात्मक स्मृती जपण्यासाठी संस्थेने त्यांच्या नावांनी सांस्कृतिक मंचची स्थापना केली. या मंचतर्फे आजवर संगीत सौभद्र, संगीत स्वयंवर यासारख्या संगीत नाटकांची निर्मिती केली. राज्यातील हौशी कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी गेली सात वर्षे राज्यस्तरीय भावगीत व नाट्यगीत स्पर्धा भरवित आहे.

जानेवारी महिन्यात होणारी स्पर्धा नऊ ते १४, १५ ते ३५ व ३६ ते ५५ वयोगट अंतर्गत होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश फी २०० रुपये आहे. या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांच्या विजेत्यांना रोख बक्षीसे, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. नऊ ते १४ वयोगटासाठी रोख बक्षीस अनुक्रमे पाच हजार, तीन हजार आणि दोन हजार रुपये आहे. १५ ते ३५ व ३६ ते ५५ वयोगटासाठी दहा हजार, सात हजार व पाच हजार रुपयांचे बक्षीस आहे. शिवाय सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

या स्पर्धेसाठी प्रवेशिका भरण्याची अंतिम तारीख येत्या पाच जानेवारीपर्यंत आहे. अधिक माहितीसाठी प्रा. सतीश कुलकर्णी (९३२६४९९९१०), डॉ. शीतल धर्माधिकारी (९३२६००९३८६), गोविंद पैठणे, गौरी कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधावा. तसेच स्पर्धेचा ऑनलाइन फॉर्म व स्पर्धेविषयीची माहिती www.neskolhapur.comया वेबसाइटवर उपलब्ध आहे. जास्तीत जास्त कलाकारांनी स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन मंचचे अध्यक्ष विनोदकुमार लोहिया यांनी केले आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ११ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता स्पर्धासाठी होणार अहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३३ अभ्यासगटाचा आदेश रद्द करा

$
0
0

फोटो अर्जुन ५७२१

कोल्हापूर टाइम्स टीम

'राज्य सरकारने शिक्षण क्षेत्रातील विविध बाबींवर अभ्यास करण्यासाठी ३३ अभ्यास गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. हा आदेश राज्यातील शिक्षण व्यवस्था मोडीत काढणारा असून तो रद्द करावा,' या मागणीचे निवेदन खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती व अन्य शिक्षक संघटनेतर्फे सहायक शिक्षण उपसंचालक सुभाष चौगुले यांना देण्यात आले.

समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे, आनंदा हिरुगडे, राजेश कोंडेकर, शिक्षक नेते दादा लाड आदींच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन दिले. तसेच अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. पत्रकांत 'अभ्यासगटांना मान्यता देणे म्हणजे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व अनुदानित शिक्षण व्यवस्था संपवून टाकण्याचा प्रकार आहे. अनुदान व्यवस्था रद्द करून व्हाउचर सिस्टिम सुरू करणे, वेतन आयोगाप्रमाणे शिक्षकांना वेतन न देता विद्यार्थी संख्येनुसार फीचे पैसे देणे व त्यातून पगार भागविणे, छोट्या शाळा बंद करणे, अल्पसंख्यख्यांक शाळांचे अधिकार संपविण्याचा हा प्रकार आहे. जुन्या सरकारच्या काळातील शिक्षणमंत्र्यांच्या सूचनेनुसार काढण्यात आलेला हा आदेश रद्द व्हावा. या आदेशामुळे शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.' शिष्टमंडळात शिवाजी भोसले महादेव डावरे, अशोक पाटील, राजेश वरक, विकास कांबळे, सचिन साळवी, अरुण गोते आदींचा समावेश होता.

फोटो ओळी: खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीतर्फे सहाय्यक शिक्षण उपसंचालक सुभाष चौगुले यांनी निवेदन देऊन चर्चा केली. शिष्टमंडळात समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे, दादा लाड, आनंदा हिरुगडे, राजेश कोंडेकर आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर ठरलं, मटण दर ४८० रुपये किलो

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मटण दराविरोधात सर्वपक्षीय कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनाला तब्बल तीन आठवड्यानंतर यश आले. शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथे कृती समिती आणि विक्रेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत मटणाचा दर प्रतिकिलो ४८० रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला. आंदोलनामुळे प्रतिकिलो ११० रुपये दर कमी झाला आहे. आंदोलनाला यश आल्याने कार्यकर्त्यांनी पेढे आणि साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष माजी महापौर आर.के. पोवार, शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजीत चव्हाण, अॅड बाबा इंदुलकर, दुर्गेश लिंग्रस, बाबा पार्टे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कृती समितीने मटण दर कमी करण्यासाठी विक्रेत्यांना अल्टिमेटम दिल्यानंतर मंगळवारी शिवाजी मंदिरात बैठक झाली. बैठकीला शिवाजी पेठ, राजारामपुरी, कसबा बावड्यासह शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत खाटीक समाजाच्यावतीने विजय कांबळे यांनी प्रतिकिलो ५०० रुपये दर करण्याची तयारी दर्शवली. पण त्यांच्या निर्णयाला कृती समितीने कडाडून विरोध केला. कृती समितीने ४७० रुपये दर करण्याची तयारी दर्शवली. पण मटण विक्रेत्यांनी नकार दिला. कृती समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी चर्चा करुन प्रतिकिलो ४८० रुपये दर मान्य करण्याची विनंती खाटीक समाजाला केली. समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन खाटीक समाजाने प्रतिकिलो ४८० रुपये दराला मान्यता दिली. महेश जाधव आणि सुजीत चव्हाण यांनी कृती समितीच्या विनंतीचा मान राखल्याबद्दल खाटीक समाजाचे अभिनंदन केले.

मटण दरवाढीवरुन गेले तीन आठवडे वाद धुमसत होता. कसबा बावड्यात मटण दरात प्रतिकिलो ४५० रुपयांवरुन ५७० पर्यंत वाढ झाल्यावर नागरिकांनी मटण दुकाने बंद पाडली. तेथील स्थानिक विक्रेत्यांनी मटणाचा दर ४६० रुपये करण्याचा निर्णय घेतला. पण शहरातील विक्रेत्यांनी मटण दर कमी करण्यास विरोध केला. विक्रेत्यांच्या विरोधात राजारामपुरी आणि शिवाजी पेठेतील तटाकडील तालीम मंडळाने थेट प्रतिकिलो ४२५ रुपये दराने मटण विक्री केली. शहराच्या आसपास मटणाचा दर प्रतिकिलो ४२० ते ४५० रुपये असताना शहरातील मटण विक्रेते दरावर ठाम राहिल्याने सर्वपक्षीय कृती समितीने त्याविरोधात आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला.

मटण दरवाढीविरोधात कृती समितीने थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत प्रशासनाला हस्तक्षेप करण्याची विनंती केली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आंदोलक आणि मटण विक्रेत्यांमध्ये संयुक्त बैठक झाली. मटण विक्रेत्यांनी मटणाचा दर ५६० रुपयांवर ५४० रुपये करण्याची तयारी दर्शवली, पण आंदोलक प्रतिकिलो ४६० रुपये दरावर ठाम होते. अखेर शहर आणि ग्रामीण भागातील मटण दराच्या तफावतीवर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी महानगरपालिका आरोग्यधिकारी आणि अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. समितीला तीन दिवसात अहवाल देण्याचे आदेश दिले. पण मटण विक्रेते प्रतिकिलो ५४० रुपये दरावर ठाम राहिले. पण गेल्या चार दिवसांत दरवाढीविरोधात मटण विक्री दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे दर कमी करण्यासंदर्भात बैठकांचे सत्र सुरू झाले. मंगळवारी कृती समिती आणि आंदोलकांनी चर्चा करुन प्रतिकिलो ४८० रुपये दराची घोषणा केली.

.....

४९९ रुपयेच्या मागणीवर

आंदोलक संतापले

मटण दर ५०० रुपये करा, अशी मागणी विक्रेत्यांनी केली. पण आंदोलकांनी नकार दिल्यावर एका विक्रेत्याने मग ४९९ रुपये दर करा अशी सूचना केली. त्यावर आंदोलक भडकले. कार्यकर्त्यांनी विक्रेत्यांवर प्रश्नांचा भडिमार केला. मटण दर प्रतिकिलो ३७० रुपयांवरुन ४५० रुपये झाला तरी ग्राहकांनी कधीही तक्रार केली नाही. पण अचानक प्रतिकिलो १०० रुपये दरवाढ केल्यास जनता सहन करणार नाही, असा इशारा दिला. बूट, चप्पलांची किंमत ४९९ असते. तुम्ही आमच्या जखमेवर मीठ चोळायला लागला आहात का, असा सवाल कार्यकर्त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘खातेवाटप २० नंतर’

$
0
0

कोल्हापूर: 'खातेवाटप व मंत्रिमंडळ विस्तार २० डिसेंबरनंतर होईल, असे सुतोवाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी सोमवारी सतेज कृषी प्रदर्शनात केले. मंत्रिपदासाठी त्यांच्यासह काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, पी. एन. पाटील व सेनेचे आमदार प्रकाश अबिटकर यांच्या नावाची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

जिल्ह्यात दोन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात वर्णी लावण्यासाठी स्थानिक नेत्यांनी आपआपल्या पक्षश्रेष्ठींकडे मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीकडून आमदार मुश्रीफ यांच्यासह काँग्रेसकडून आमदार पाटील, पी. एन. पाटील व सेनेकडून अबिटकर यांची नावे चर्चेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images