Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

बँक ऑफ इंडिया २०० कोटींचे कर्ज वाटणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'बँक ऑफ इंडियाच्यावतीने 'हर घर दस्तक' योजनेद्वारे कोल्हापूर विभागात एक आठवड्यात २०० कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्याचा संकल्प आखला आहे,' अशी घोषणा बँकेचे मुंबई प्रधान कार्यालयाचे महाव्यवस्थापक सुनीलकुमार रेतन यांनी केली

ताराबाई पार्क येथील हॉटेलमध्ये बँक ऑफ इंडियाच्या कर्जमंजुरी पत्रांच्या वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विभागीय व्यवस्थापक नितीन देशपांडे, उपविभागीय व्यवस्थापक सुभाष फडते, मिथिलेशकुमार सिंग प्रमुख उपस्थित होते. यावेळी शेतकरी, महिला बचत गट, बांधकाम व्यावसायिक, लघु उद्योजक, व्यापारी अशा १२२ जणांना ११० कोटी रुपयांच्या कर्जवितरण पत्राचे वाटप करण्यात आले.

रेतन म्हणाले, 'बँकेच्यावतीने सर्व घटकांना प्रवाहात सामावून घेण्यासाठी 'हर घर दस्तक' योजना सुरू केली आहे. योजनेंतर्गत देशभरातील नागरिकांना नऊ लाख कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. सप्टेंबर २०२० पर्यंत १० लाख कोटी रुपये कर्जाचे उद्दिष्ट देण्यात असून ते ग्राहकांच्या सहकार्याने पूर्ण होईल.'

सुभाष फडते म्हणाले, 'कोल्हापूर विभागाला या योजनेंतर्गत १३ डिसेंबरपर्यंत २०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. अधिकारी, कर्मचारी, खातेदार, ग्राहकांच्या सहकार्याने ते पूर्ण करण्यात येईल.'

कोल्हापूर विभागीय कार्यालयाच्या विपणन व्यवस्थापक प्राजक्ता बिरंगे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राहुल माने, बांधकाम व्यावसायिक जयेश कदम, अभिजित मगदूम यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, ग्राहक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्लास्टिक विकणाऱ्या सात व्यापाऱ्यांना दंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्लास्टिक विक्री आणि साठवणूक करणाऱ्या व्यापारी, विक्रेत्यांविरोधात महापालिकेच्या आरोग्य विभागाने कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. शनिवारी विशेष पथकाने सात व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे ३५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. लक्ष्मीपुरी, बाजारगेट परिसरातील व्यापाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली.

केंद्र सरकारने जून महिन्यापासून प्लास्टिक व थर्माकोलवर बंदी घातली आहे. पाणी प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या या दोन्ही घटकांचा वापर आणि विक्रीबाबत कडक धोरण अवलंबण्याची सूचना संबंधीत सरकारी कार्यालयांना दिली आहेत. त्यानुसार गेल्या पंधरा दिवसांपासून आरोग्य विभागाकडून व्यापाऱ्यांवर कारवाई सुरू आहे.

शनिवारी पथकाने लक्ष्मीपुरी व बाजारगेट परिसरात प्लास्टिकविरोधी मोहीम राबवली. यावेळी आदर्श शिंदे, श्री प्लास्टिक, कार्तिक ट्रेडर्स, गुरुदत्त स्वीट मार्ट, जीओ पॅकिंग मटेरियल, कोहिनूर एंटरप्रायझेस व न्यू एजॉय शॉपी या दुकानांच्या मालकांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड वसूल केला. विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, सहायक आरोग्य निरीक्षक दिलीप पाटणकर, आरोग्य निरीक्षक शिवाजी शिंदे, सुशांत कावडे, नंदकुमार पाटील, श्रीराज होळकर, स्वप्नील उलपे, विकास भोसले आदींचा पथकात समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुसऱ्या दिवशी वाहतूक बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोर्टाच्या आदेशानुसार विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवरील कारवाई सुरू असल्याने विद्यार्थी वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रिक्षा व्यावसायिकांनी एकत्र बैठक घेऊन याप्रश्नी हायकोर्टात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला. वर्षानुवर्षे रिक्षा व्यावसायिक सुरक्षितपणे विद्यार्थी वाहतूक करीत आहेत. एका रिक्षातून दहा विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यास परवानगी मिळावी अशी कोर्टाला विनंती याचिका केली जाईल. मंगळवारी किंवा बुधवारी कोर्टात याचिका दाखल केली जाईल अशी माहिती विद्यार्थी वाहतूक ऑटोरिक्षा वाहतूक संघटनेचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी सांगितले.

हायकोर्टाच्या आदेशानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयाने रिक्षांवर कारवाईचा बडगा उगारल्यावर सलग दुसऱ्या दिवशी, शनिवारी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांनी रिक्षा बंद ठेवल्याने पालकांची प्रचंड धावपळ उडाली. बसला गर्दी, रिक्षांचा बंद यामुळे शनिवारी सकाळी शाळा गाठताना विद्यार्थ्यांचीही दमछाक झाली. शाळेपासून जवळ असणाऱ्या विद्यार्थ्यांनी चालत शाळा गाठली. सुमारे ७५० व्यावसायिकांनी विद्यार्थी वाहतूक बंद ठेवल्याने सहा हजाराहून अधिक विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला. उपनगरातील मुलांची गैरसोय झाली.

सायंकाळी रिक्षाचालकांनी काँग्रेस कमिटीत बैठक घेऊन कोर्टात दाद मागण्याचा निर्णय घेतला. संघटनेचे शिवाजी पाटील, सुभाष शेटे, मधूसुदन सावंत, विश्वास नांगरे आदींच्या उपस्थितीबाबत पुढील धोरणाबाबत चर्चा केली. रिक्षा व्यावसायिकांनी हात उंचावत कोर्टात दाद मागण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला.

शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत परवानगी द्या

'चालू शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत विद्यार्थी वाहतुकीला परवानगी असावी आणि जून २०२०पासून विद्यार्थी वाहतूक धोरण निश्चित करुन अंमलबजावणी करावी' अशी मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समिती, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व पालकांनी केली आहे. सहाय्यक शिक्षण उपसंचालक सुभाष चौगुले, शिक्षण उपनिरीक्षक डी. एस. पोवार यांना निवेदन दिले. कृती समितीचे अशोक पोवार म्हणाले, ' विद्यार्थी वाहतुकीबाबत अन्य पर्यायी व्यवस्था नाही. सद्यस्थितीत रिक्षांवर कारवाई सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना शाळेला ये-जा करण्यात अडचणी निर्माण होतील.'

चर्चेत शिक्षक संघटनेचे नेते दादा लाड, अॅड. पंडितराव सडोलीकर, रमेश मोरे, राहुल ढवळे, विनोद डुणुंग यांनी सहभाग घेतला. शिष्टमंडळात महादेव पाटील, चंद्रकांत बराले, किरण पडवळ, भाऊ घोडके, संभाजी जगदाळे, मोहनराव सावंत आदींचा समावेश होता. सुभाष चौगुले यांनी, 'हायकोर्टाच्या आदेशाचा सन्मान सर्वांना राखावा लागेल. कृती समिती, पालकांनी केलेली मागणी शिक्षण विभागाला कळवू' असे सांगितले.

प्रत्येक शाळेत परिवहन समिती, शाळा व्यवस्थापन समिती व पालक-शिक्षक संघटना आहेत. त्यांनी संयुक्त बैठक घेऊन हायकोर्टाचा आदर राखत मार्ग काढावा असे पत्र शिक्षण उपसंचालक कार्यालयाने शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविले जाईल. शिक्षणाधिकारी कार्यालयमार्फत शाळा स्तरावर पुढील कार्यवाही होईल.

- डी. एस. पोवार, शिक्षण उपनिरिक्षक

वाहतूक सोमवारपासून

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा व्यावसायिकांनी सोमवारपासून (ता. ९) विद्यार्थी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. एका रिक्षातून दहा विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाईल असे रिक्षाचालकांनी सांगितले. याप्रश्नी रिक्षा व्यावसायिकांचा १५ डिसेंबर रोजी काँग्रेस कमिटी येथे सकाळी दहा वाजता पालकांचा मेळावा बोलावला आहे.

फोटो ओळी ५७०७

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा, शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी बंद राहिल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. मुलांना शाळेत सोडण्यासाठी पालकांना शाळा गाठावी लागली.

कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने विद्यार्थी वाहतूकप्रश्नी सहायक शिक्षण उपसंचालक सुभाष चौगुले व शिक्षण उपनिरीक्षक डी. एस. पोवार यांच्यासोबत चर्चा केली. समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे, संभाजी जगदाळे, विनोद डुणुंग, अॅड. पंडितराव सडोलीकर आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडपीठप्रश्नी मुख्यमंत्र्यांना भेटणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ कोल्हापुरात स्थापन होण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सर्व खासदार, आमदारांना एकत्र करून हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली जाणार आहे. गेली ३४ वर्षे सुरू असलेल्या लढ्याला निश्चित यश मिळविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील' अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली. सर्वपक्षीय नागरी खंडपीठ कृती समितीच्यावतीने शनिवारी दसरा चौकातील शाहू स्मारक भवनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलेल्या निर्णयानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचा निर्णय यावेळी झाला.

आमदार सतेज पाटील म्हणाले, 'तत्कालीन भाजप सरकारने कोल्हापुरात खंडपीठ स्थापन होण्यासाठी फारसे प्रयत्न केले नाहीत. आघाडीच्यावतीने याप्रश्नी सतत आंदोलने, रास्ता रोको केले. खंडपीठ स्थापनेसाठी निर्णायक भूमिका सरकारकडून जाहीर केली जाईल, किमान सहा जिल्ह्यांसाठी सर्किट बेंचची घोषणा केली जाईल, अशी आशा कृती समितीला होती. मात्र तत्कालीन सरकारकडून ही आशा फोल ठरली. डिसेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशनाची सुरुवात होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व खासदार, आमदारांना खंडपीठासाठी पत्रे पाठविली जाणार आहे. त्यांना एकत्र करून मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेऊन कोल्हापूर खंडपीठासाठी आग्रह धरला जाणार आहे.'

आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, 'खंडपीठासाठी एकसंघपणे लढा दिला जाणार आहे. खंडपीठ झाले पाहिजेच, यासाठी प्रसंगी कोल्हापूरची ताकद दाखवू.'

आमदार चंद्रकांत जाधव म्हणाले, 'गेली ३४ वर्षे खंडपीठासाठी लढा सुरु आहे. मात्र हा प्रश्न गांभीर्याने घेतला गेला नाही. सरकारकडून खंडपीठासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू. मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्तींची भेट घेण्याचे नियोजन आहे.'

शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार म्हणाले, 'खंडपीठासाठी शिवसेनेचा पहिल्यापासून पाठिंबा आहे. जोपर्यंत खंडपीठ स्थापन होत नाही, तोपर्यंत शिवसेना सर्वपक्षीय कृती समितीच्या पाठीशी उभी राहणार आहे.'

यावेळी राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, अॅड. धनंजय पठाडे, बाबा पार्टे, माजी उपमहापौर सुलोचना नायकवडी, किसनराव कुराडे, सुरेश कुराडे, गणी आजरेकर, सुभाष जाधव आदी उपस्थित होते. किशोर घाटगे, फिरोजखान उस्ताद, प्रसाद जाधव, अॅड. बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, आप्पा पाटील, किसन कल्याणकर यांची भाषणे झाली. माजी महापौर मारुतराव कातवरे यांनी आभार मानले.

टोलचे गुन्हे मागे घेऊ

'रस्ते विकास प्रकल्पातील टोल आंदोलनावेळचे गुन्हे मागे घेतले नसल्याची तक्रार बैठकीत काहींनी केली. आमदार सतेज पाटील म्हणाले, 'जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अधिकारात काही गुन्हे मागे घेतले आहेत. काही गुन्हे मागे घेण्यासाठी सरकारकडे प्रयत्न करावे लागणार होते. तत्कालीन भाजप सरकारने हे गुन्हे मागे घेतलेले नाही. मात्र शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आंदोलकांवरील गुन्हे निश्चितच मागे घेईल. येत्या काही दिवसांत विधी व न्याय खात्याच्या संभाव्य मंत्र्यांकडे त्याचा पाठपुरावा करू.'

फोटो ओळ...

कोल्हापुरात शनिवारी आयोजित सर्वपक्षीय नागरी खंडपीठ कृती समितीच्या बैठकीत बोलताना आमदार सतेज पाटील. उपस्थितात डावीकडून किसनराव कुराडे, अॅड. धनंजय पठाडे, आमदार चंद्रकांत जाधव, ऋतुराज पाटील, बाबा पार्टे, मारुतराव कातवरे, सुलोचना नायकवडी, सुरेश कुराडे. (अर्जुन टाकळकर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूररेषा निश्चितीमुळे बांधकामांवरील स्थगिती उठेल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरानंतर पूररेषीतील बांधकामांना महापालिका प्रशासनाने स्थगिती दिली. शुक्रवारी जलसंपदा विभागाने शहरातील पूररेषा निश्चित केल्यानंतर ही स्थगिती उठण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे या परिसरातील ३५ प्रकल्प लवकरच मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यातील सर्वच नदी खोऱ्यांतील रेडझोन निश्चित करण्याची प्रक्रिया २०१६पासून सुरू होती. गेल्यावर्षी रेडझोन निश्चित होण्याची शक्यता होती. मात्र या विरोधात तक्रारी झाल्यानंतर प्रक्रिया रखडली. जलसंपदा विभागाला प्रथम शहरांतील रेडझोन निश्चित करण्याचे निर्देश मिळाले होते. आयआयटी पवई संस्थेच्या मदतीने 'फ्लड फ्रिक्वेन्सी' पद्धतीद्वारे रेषा निश्चित करण्याचे काम सुरू होते. शहरातील १२ किलोमीटर अंतरातील रेडझोन निश्चित केला होता. महापालिका प्रशासनही रेडझोन निश्चितीसाठी सातत्याने पत्रव्यवहार करून पाठपुरावा करीत होते. मात्र, ऑगस्ट २०१९ मध्ये आलेला महापूर शहराच्या मध्य वस्तीपर्यंत पोहोचला. त्यामुळे पुन्हा रेडझोन निश्चितीचा मुद्दा चर्चेत आला होता.

महापालिकेने डिसेंबर २०१८ पासून सुरू असलेल्या सर्व बांधकाम प्रकल्पांना स्थगिती दिली होती. जलसंपदा विभागाकडून रेडझोन निश्चित केल्याशिवाय बांधकाम प्रकल्पांना परवानगी देणार नसल्याचे २१ ऑगस्ट रोजी स्पष्ट केले होते. रेड व ब्ल्यू लाइनमध्ये जानेवारी २०१९पासून सुरू असलेल्या प्रकल्पांवरही बंदी घालण्यात आली होती. रेडझोनमधील शंभर हेक्टर क्षेत्रापैकी २५ हेक्टर क्षेत्रावरील ३५ गृहप्रकल्पांना स्थगिती देण्याचा आदेश लागू झाला. त्या आदेशामुळे ३५ गृहप्रकल्पांचे, गेल्या पाच महिन्यांपासून बांधकामे ठप्प राहिली. त्यामुळे प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केलेल्या बांधकाम व्यावसायिकांसह त्यावर अवलंबून असलेल्या अनेकांना फटका बसला. मात्र पूररेषा निश्चित झाल्याने बांधकाम व्यावसायिक व त्यावर अवलंबून असलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

शहरातील महापुरामुळे महापालिका प्रशासनाने बांधकामांना स्थगिती दिली होती. जलसंपदा विभागाने पूररेषा निश्चित केल्याने त्याची बांधकामावरील स्थगिती उठण्यास मदत होईल. पूररेषा निश्चित करताना नव्याने ग्रीन लाइनची आखणी केली आहे. शहर विकास आराखडा अस्तित्वात येताना या लाइनचा विचार झाल्यास आमची संस्था त्याबाबत म्हणणे मांडेल.

- विद्यानंद बेडेकर, अध्यक्ष, क्रिडाई

१९८९च्या पुरानंतर ब्ल्यू लाइन अस्तित्वात येण्यापूर्वी बांधकामे झाली होती. क्लास 'डी' नियमामध्ये अशी बांधकामे दुरुस्ती करण्याची मुभा दिली आहे. मात्र, त्यामध्ये नवीन बांधकामे करता येणार नसल्याचे नमूद केले आहे.

- प्रकाश देवलापूरकर, उपाध्यक्ष, क्रिडाई

०००

(मूळ कॉपी)

पूररेषा निश्चितीमुळे बांधकामावरील स्थगिती उठेल

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरानंतर पूररेषीतील बांधकामांना महापालिका प्रशासनाने स्थगिती दिली होती. राज्याच्या जलसंपदा विभागाने शुक्रवारी शहरातील पूररेषा निश्चित केल्यानंतर ही स्थगिती उठण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे या परिसरातील ३५ प्रकल्प लवकरच मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यातील सर्वच नदी खोऱ्यातील रेडझोन निश्चित करण्याची प्रक्रिया २०१६ पासून सुरू होती. गतवर्षी रेडझोन निश्चित होण्याची शक्यता होती. पण याविरोधात तक्रारी झाल्यानंतर रेडझोन प्रक्रिया रखडली होती. राज्याच्या जलसंपदा विभागाला प्रथम शहरातील रेडझोन निश्चित करण्याचे निर्देश मिळाले होते. आयआयटी पवई संस्थेच्या मदतीने 'फ्लड फिकवेन्सी' पद्धतीद्वारे रेषा निश्चित करण्याचे काम सुरू होते. शहरातील १२ किमी अतंरातील रेडझोन निश्चित केला होता. महापालिका प्रशासन रेडझोन निश्चित करण्यासाठी सातत्याने पत्रव्यवहार करुन पाठपुरावा करत होते. मात्र ऑगस्ट २०१९ मध्ये आलेल्या महापूर शहराच्या मध्यवस्थीपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे पुन्हा एकदा रेडझोन शहरात चर्चेचा मुद्दा बनला होता.

२१ ऑगस्ट २०१९ रोजी महापालिका प्रशासनाने जलसंपदा विभागाकडून रेडझोन निश्चित झाल्याशिवाय येथील बांधकाम प्रकल्पाला परवानगी देण्यार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच डिसेंबर २०१८ पासून सुरू असलेल्या सर्व बांधकाम प्रकल्पांना स्थगिती दिली होती. रेड व ब्ल्यू लाइनमध्ये जानेवारी २०१९ पासून सुरू असलेल्या प्रकल्पांचाही त्यामध्ये समावेश होता. रेडझोनमधील शंभर हेक्टर क्षेत्रातील २५ हेक्टर क्षेत्रावर ३५ गृहप्रकल्पांना स्थगिती आदेश लागू झाला होता. आदेशामुळे ३५ गृहप्रकल्पांचे गेल्या पाच महिन्यापासून बांधकाम ठप्प राहिले होते. त्यामुळे प्रकल्पामध्ये गुंतवणूक केलेल्या बांधकाम व्यावसायिकांसह त्यावर अवलंबून असलेल्या अनेकांना फटका बसला होता. मात्र पूररेषा निश्चित झाल्याने बांधकाम व्यावसायिक व त्यावर अवलंबून असलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

..........................

कोट

शहरात आलेल्या महाप्रलयकारी पुरामुळे महापालिका प्रशासनाने बांधकामांना स्थगिती दिली होती. जलसंपदा विभागाने पूररेषा निश्चित केल्याने बांधकामावरील स्थगिती उठण्यास मदत होईल. पूररेषा निश्चित करताना नव्याने ग्रीन लाइनची आखणी केली आहे. शहर विकास आराखडा अस्तित्वात येताना या लाइनचा विचार झाल्यास आमची संस्था त्याबाबत म्हणणे मांडेल.

विद्यानंद बेडेकर, अध्यक्ष, क्रिडाई

.....................

१९८९ च्या पुरानंतर ब्ल्यू लाइन अस्तित्वात येण्यापूर्वी बांधकामे झाली होती. 'डी' क्लास नियमामध्ये अशी बांधकामे दुरुस्ती करण्याची मुभा दिली आहे. मात्र त्यामध्ये नवीन बांधकामे करता येणार नसल्याचे नमूद केले आहे.

प्रकाश देवलापूरकर, उपाध्यक्ष, क्रिडाई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योगोत्सव १३ डिसेंबरपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सध्याच्या गतिमान जीवनशैलीत ताणतणावात वाढ होते आहे. त्यामुळे आरोग्याकडे सजगतेने लक्ष देणे काळाची गरज बनली आहे. शरीराबरोबर मनाचेही स्वास्थ महत्वाचे आहे. त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. त्याचसाठी पुण्यातील इन्स्टिट्यूट ऑफ योग, पद्माराजे हायस्कूल आणि महाराष्ट्र टाइम्स यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापुरातील पद्माराजे हायस्कूलच्या रामगणेश गडकरी सभागृहात १३ ते १५ डिसेंबर या कालावधीत योगोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. योगोत्सव जेष्ठ संस्कृत पंडित वसंतराव गाडगीळ आणि योगाचार्या विदुला शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे.

योगोत्सवामध्ये गर्भधारणेपासून ते जेष्ठ व्यक्तींपर्यंत विविध योग प्रात्यक्षिकांसह शास्त्रोक्त योग प्रशिक्षण सहभागी व्यक्तींना दिले जाणार आहे. योग शिकवताना शिक्षकांना अनेक अडचणी येतात. योगाभ्यासाठी सातत्यपूर्ण प्रशिक्षण गरजेचे असते. काळानुरूप योग शिकविण्याच्या पद्धतीमध्ये सकारात्मक बदल होत असतात. त्यानुसार प्रशिक्षकांना अपडेट राहावे लागते. साधकांना त्यांच्या व्याधींच्या गरजेनुसार योगाभ्यास देणे ही बदलत्या काळाची गरज बनली आहे. त्यासाठी विविध योग प्रकारांची प्रात्यक्षिके आणि प्रशिक्षणाची ओळख व माहिती असावी लागते. यानिमित्ताने ही संधी उपलब्ध होत आहे. सर्वसामान्यांनाही योगोत्सवामध्ये विविध योग प्रकारांची ओळख आणि योग प्रशिक्षण घेता येईल.

योगोत्सवात स्वामी स्वास्थ्यानंद (मुंबई), योगी हरीभाऊ क्षीरसागर (नागपूर), गव्यसिद्ध नीतेश ओझा (सांगली), रामदासी समीर लिमये (मुंबई), वैद्य ओंकार कुलकर्णी (बेळगाव), योगी श्रीकांत क्षीरसागर (मुंबई) हे अभ्यासक योग, निसर्गोपचार, पंचगव्य चिकित्सा, ॲक्युप्रेशर चिकित्सा, शक्तिपात, आयुर्वेद चिकित्सा, मन-मेंदू-मनगट या विषयांवर सहभागी साधकांना प्रशिक्षण देणार आहेत. योगोत्सवामध्ये भाग घेण्यासाठी योगाच्या पूर्वानुभवाची अथवा वयाची अट नाही. कार्यक्रमावेळी नाश्ता, दुपारचा अल्पोपहार आणि चहा अशी सोय करण्यात आली आहे. प्रत्येक सहभागी व्यक्तीला योगोत्सवाचे प्रमाणपत्र देण्यात येईल. योगोत्सवासाठी नावनोंदणी आवश्यक असून इच्छुकांनी ९६५७३११११७/९०४९२९६५३९/७३५०५१४१९५ या क्रमांकावर संपर्क करावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटण दरवाढीला शिवाजी पेठेचा विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विक्रेत्यांनी प्रतिकिलो ४५० रुपयांपेक्षा जास्त दराने मटण विक्री केल्यास शिवाजी पेठेतील मटण विक्रीची दुकाने बंद करण्याचा निर्णय शिवाजी मंदिरातील बैठकीत घेण्यात आला. दरवाढीच्या विरोधात पेठेतील तालीम, मंडळांच्या प्रतिनिधींची शिवाजी मंदिरात बैठक झाली. मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

अॅड. अशोकराव साळोखे म्हणाले, '१९७०मध्ये मटणाचा दर प्रतिकिलो २० रुपये होता. त्यावेळी विक्रेत्यांनी प्रतिकिलो १० रुपये दरवाढ केल्यानंतर कोल्हापुरात मोठे आंदोलन झाले होते. विक्रेत्यांच्या मनमानी दरवाढीविरोधात ग्राहकांनी दुकानांवर बहिष्कार घालून आंदोलन करावे.

'दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यात प्रशासनाला अपयश आले असून सरकार बघ्याची भूमिका घेत आहे,' असा आरोप कॉ. चंद्रकांत यादव यांनी केला. महानगरपालिकेने शिक्के मारून मटणाची विक्री करण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यासाठी आरोग्यधिकाऱ्यांवर दबाव वाढवला पाहिजे,' अशी सूचनाही त्यांनी केली.

नगरसेवक अजित राऊत म्हणाले, 'महानगरपालिकेच्या मटण दुकानांच्या गाळ्यांचे भाडे थकीत आहे. प्रशासनाने ते भरून घ्यावे. महानगरपालिकेचा शिक्का असलेल्या मटणाची विक्री झाली पाहिजे'.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दरवाढ करणारी दुकाने उद्यापासून बंद करावीत, अशी मागणी केली.

मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण यांनी दरवाढीचा निषेध केला. शिवाजी पेठेने दरवाढीविरोधात आंदोलन हातात घेतले असून आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. संभाजी साळोखे, माजी नगरसेवक दत्ता टिपुगडे यांनी पेठेतील दरवाढ करणारी दुकाने बंद करण्याची मागणी केली. बैठकीला मंडळाचे सहसचिव सुरेश जरग, खजानीस सदाशिव शिर्के, संचालक अजित खराडे, लाला गायकवाड, राजेंद्र चव्हाण, शिवाजीराव जाधव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्भवती महिलेचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ताप आल्याने खासगी रुग्णालयात दाखल केलेल्या साडेसहा महिन्यांच्या गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान शनिवारी सकाळी मृत्यू झाला. नेहा प्रथमेश कल्याणकर (वय ३०, रा. बुरुड गल्ली, शुक्रवार पेठ) असे त्यांचे नाव आहे.

नेहा यांना चार दिवसापूर्वी ताप आल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारास दाखल केले. ताप उतरत नसल्याने डॉक्टरांनी रक्ततपासणी केली असता टॉयफॉईडचे निदान झाले. नंतर त्यांना निमोनिया झाल्याने फुफ्फुसात संसर्ग झाला. त्यानंतर त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांचा सकाळी मृत्यू झाला. नेहाच्या अचानक झालेल्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. नेहा या अर्किटेक्ट प्रथमेश कल्याणकर यांच्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, नणंद, सासरे, सासू, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी नऊ वाजता होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मंत्रिमंडळ मान्यतेसह सिनेटची मंजुरी अत्यावश्यक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार 'छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ'असा करण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया त्वरित सुरू करावी अशी विनंती राज्यपाल आणि कुलपती भगतसिंग कोश्यारी यांना केली. त्यामुळे विद्यापीठाच्या नामविस्ताराचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना यासंबंधीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याविषयी कळविले असले तरी या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता व विद्यापीठातील व्यवस्थापन परिषद आणि अधिसभेची मंजुरी महत्वाची ठरणार आहे. विशेषत: विद्यापीठाशी संबंधित हा निर्णय असून अधिसभेच्या भूमिकेला अनन्यसाधारण महत्व राहील. नामविस्तारासाठी विद्यापीठीय कायदा आणि नियमावली पूर्ण करावी लागणार आहे.

राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आठवडाभरापूर्वी विद्यापीठाच्या नामविस्ताराबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार 'छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ' असा करावा असे त्या पत्रात म्हटले होते. शिवाय संभाजीराजे यांनी याविषयी ट्विट केले होते. मुख्यमंत्र्यांनी, त्यांच्या मागणीची दखल घेत शनिवारी राज्यपालांना विद्यापीठाच्या नामविस्ताराबाबत कार्यवाही सुरू करण्याची विनंती केली.

शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेस ५७ वर्षे झाली आहेत. १८ नोव्हेंबर १९६२ रोजी विद्यापीठाची स्थापना झाली. विद्यापीठाच्या स्थापनेप्रसंगीच काहींनी विद्यापीठाच्या नावाबाबत वेगळी मते नोंदवली होती. तत्कालिन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापर्यंत हा विषय पोहचला. तेव्हा त्यांनी, विद्यापीठाचे नाव 'शिवाजी विद्यापीठ' हेच असावे यावर ठाम राहिले. शिवाय या नावामुळे छत्रपतींचे नाव आणि कार्यकर्तृत्व कायम लोकांसमोर, विद्यार्थ्यांसमोर राहील. विद्यापीठाच्या या नावामध्येही छत्रपती शिवाजी विद्यापीठ सूचित होते' अशा शब्दांत त्यांनी संबंधितांची समजूत काढली होती, याकडेही अनेकजण लक्ष वेधतात.

कायदेशीर प्रक्रिया गरजेची

नामविस्तार प्रक्रियेबाबत शिक्षण क्षेत्रातील जाणकर व विद्यापीठाच्या विविध समित्यावर कार्य केलेल्या मंडळीचे म्हणणे वेगळे आहे. नामविस्तारासाठी विद्यापीठीय नियमावली व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. अभ्यासकांचे म्हणणे आहे की, 'मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव विद्यापीठाकडे सादर होईल. विद्यापीठ प्रशासनाकडून नामविस्ताराबाबत रितसर प्रस्ताव तयार करावा लागेल. हा प्रस्ताव पहिल्यांदा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेपुढे मांडावा लागणार आहे. व्यवस्थापन परिषदेत या प्रस्तावावर चर्चा होऊन त्यावर मंजुरीची मोहर उमटवत अधिसभेकडे नामविस्ताराचा शिफारस करावी लागेल.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी, विद्यापीठाच्या नामविस्ताराबाबत कुलपती कार्यालयाला विनंती केल्यानंतर पुन्हा एकदा नावाचा विषय ऐरणीवर आला आहे. मुख्यमंत्र्यांनी, कुलपतींना कायदेशीर प्रक्रिया त्वरित सुरू करावी असे कळविले असले तरी यासाठी मंत्रिमंडळाची मान्यता गरजेची आहे.

सिनेटचीही हवी मान्यता

व्यवस्थापन परिषदेकडून नामविस्ताराच्या प्रस्तावाची शिफारस अधिसभेकडे (सिनेट) सादर होईल. विद्यापीठाशी निगडीत कोणत्याही धोरणात्मक बाबीमध्ये व्यवस्थापन परिषद आणि सिनेटची मान्यता गरजेची असते. नामविस्तार प्रक्रियेतही सिनेटची भूमिका महत्त्वाची असेल. नामविस्ताराबाबत विद्यापीठ प्रशासनाची भूमिका जाणून घेण्यासाठी कुलगुरू देवानंद शिंदे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्वारी, मसूर, खाद्यतेल महागले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: या आठवड्यात बाजारपेठेत ज्वारी, मसूर यांसह खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. खाद्यतेलाच्या दरात प्रतिकिलो दोन ते चार रुपयांनी तर ज्वारीच्या दरात दोन रुपयांची वाढ झाली. बेळगाव मसूर प्रतिकिलो दहा रुपयांनी महागल्याने ग्राहकांच्या खिशाला चाट बसणार आहे.

बाजारात बार्शी शाळूच्या दरात प्रतवारीनुसार प्रतिकिलो दोन रुपयांनी वाढ झाली. एक नंबर प्रतिचा शाळू प्रतिकिलो ५२ रुपयांवरून ५४ रुपये झाला आहे. गहू, बाजरी, नाचणीचे दर कायम आहे. कडधान्यामध्ये बेळगाव मसूरच्या दरात प्रतिकिलो दहा रुपयांनी वाढ झाली. हा दर १५० रुपयांवर पोचला आहे. मूग, तूरडाळ, मसूरडाळ, मटकी, हरभरा डाळ या कडधान्याचे दर स्थिर आहेत.

सरकी, सूर्यफूल या खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली. सरकी तेलाचा दर प्रतिकिलो ९२ रुपयांवरून ९६ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. सूर्यफुलाच्या दरात प्रत्येकी दोन रुपयांनी वाढ झाली. शेंगतेल, खोबरेल तेलाचे दर स्थिर आहेत.

किराणामालाचे दर (प्रतिकोलो रुपयांत)

पोहे : ४४

साखर : ३८

शेंगदाणा : १२०

मैदा : ३२

आटा : ३२

रवा : ३४

गूळ : ५०

साबुदाणा : ८४

वरी : ९२

डाळींचे दर (प्रतिकिलो रु.)

तूरडाळ : ९६

मूगडाळ :, ९६

उडीद डाळ : १२०

हरभरा डाळ : ६८

मसूर डाळ : ६८

मसूर : ८० ते १५०

चवळी : ८०

हिरवा वाटाणा : १००

काळा वाटाणा : ८० ते १००

मूग ९२

मटकी : १२०

छोले : १००

धान्याचे दर (प्रतिकिलो रु.)

बार्शी शाळू : ४२ ते ५४

गहू : ३० ते ३६

हायब्रीड ज्वारी : ३६ ते ४०

बाजरी : २४

नाचणी : ३६

तेलाचे दर (प्रतिकलो रु.)

शेंगतेल : १३५

सरकी तेल : ९६

खोबरेल : २४०

सूर्यफूल : ९५ ते १०७

मसाले दर (प्रतिकलो रु.)

तीळ : १८०

जिरे : २८०

खसखस : ९०० १४००

खोबरे : १८०

वेलदोडे : ५०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कसे खावेत कांदे?; किंमत २०० पार

$
0
0

सोलापूर: गगनाला भिडलेले कांद्याचे दर खाली उतरण्याची चिन्हे दिसत नसून उलट दिवसेंदिवस दरात वाढच होत आहे. सोलापूर बाजारात कांद्याचे दर तर २०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. कांद्याची आवक कमी झाल्यामुळे हे झाल्याचे सांगण्यात येत आहे. या महिन्याच्या अखेरीस कांद्याचे दर चढेच राहतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, इतर बाजारांत मात्र कांद्याच्या किंमती यापेक्षा कमी आहेत.

देशभरातील बाजारांमध्ये उत्तम प्रतीचा कांदा हवा असल्यास ग्राहकाला १७० ते १८० रुपये मोजावे लागत असल्याचे व्यापारी सांगतात. याचे कारण दक्षिणेकडील राज्यांमधून कांद्याची मागणी वाढणे हे असल्याचे सांगितले जात आहे. नाशिकमधील लासलगाव एपीएमसीमध्ये कांद्याचा नवीन भाव कमाल १०० रुपये प्रतिकिलो दराने सुरू आहे. कांद्याची सरासरी किंमत ७० रुपये प्रति किलो इतकी आहे. नवीन कांद्याला लाल कांदा असेही म्हणतात. लासलगाव ही आशियातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे.

प्रमुख शहरांमध्ये ५ डिसेंबरपर्यंत कांद्याचे भाव

शहर २५ नोव्हेबरचे भाव ३० नोव्हेंबरचे भाव ५ डिसेंबरचे भाव


नवी दिल्ली ७६ रुपये ७६ रुपये ९५ रुपये

मुंबई ८९ रुपये ८२ रुपये १२० रुपये

चेन्नई ५९ रुपये ८० रुपये १२० रुपये

कोलकाता ९० रुपये ८० रुपये १२० रुपये

पणजी १०० रुपये ११० रुपये १६५ रुपये


किंमतींवर होणार संशोधन

कांद्याचे दर वाढण्याचे कारण शोधण्यासाठी आयआयटी बीएचयू येथे तोडगा काढला जाणार आहे. येणार्‍या काळात ही समस्या पूर्णपणे सुटू शकेल अशी एखादी योजना सुरू करता येईल का यावर आयआयटी बीएचयूमध्ये विचार सुरू आहे.

१ किलो कांद्याच्या किंमतीत खरेदी करू शकता या वस्तू

आपण एका किलो कांद्याच्या किंमतीसाठी बर्‍याच वस्तू खरेदी करू शकतो अशा पातळीवर कांद्याच्या किंमती अशा पातळीवर पोहोचल्या आहेत. एक किलो कांद्याच्या किंमतीमध्ये आपण एक किलो चिकन, एक दर्जेदार बिअर, २.५ लिटर पेट्रोल किंवा पाच किलो पीठ विकत घेऊ शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाज्या स्वस्त, कांदे महागच

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

भाजी मंडईत कांद्याचे दर दहा रुपयांनी वाढले आहेत. मार्केट यार्डात चांगल्या प्रतिचा कांदा दीडशे रुपये किलो आहे. तर लहान आणि मध्यम आकाराचा कांदा प्रतिकिलो ७० ते ८० रुपयांवर पोहोचला आहे. फळ आणि पालेभाज्यांची आवक झाल्याने भाज्या स्वस्त झाल्या आहे. कोथिंबीर पेंढीचा दर अजूनही १५ ते २० रुपयांवर टिकून आहे. संत्री, सिताफळे, बोरे, पेरुची आवक मोठ्या प्रमाणात झाली असून ग्राहकांकडून फळांच्या खरेदीला चांगला प्रतिसाद लाभत आहे.

ग्राहकांकडून मागणी कमी असल्याने मंडईतील विक्रेत्यांनी छोटा आणि मध्यम आकाराचा कांदा विक्रीस आणला आहे. गेल्या आठवड्यात कांद्याचा सरासरी दर ५० ते ७० रुपये होता. मात्र आवक घटल्याने स्थानिक बाजारपेठेत पुन्हा दर भडकले आहेत. लहान, मध्यम आकाराचा कांदा ८० रुपयांवर पोहोचला आहे. कांदा महागला असला तरी भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. फळभाज्या आणि पालेभाज्यांचे दर घसरले आहेत. वांग्यांचा दर प्रतिकिलो २० ते रुपये इतका कमी झाला आहे. मटार शेंगेचा दर प्रतिकिलो ४० ते ५० रुपयांवर स्थिर आहे. कांदा पात, चाकवत वगळता मेथी, शेपू, पोकळा, पालक, करडा या पालेभाज्यांचे दर उतरले आहेत. कांदा पात आणि चाकवतीचा प्रतिपेंढी दर १५ रुपये होता. तर अन्य पालेभाज्यांचे दर प्रतिपेंढी १० रुपये होते. संत्र्यांचे आगमन झाले असून प्रतिकिलो ५० ते १०० रुपये दर असल्याने ग्राहकांकडून खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला. सिताफळांचा दर प्रतिकिलो ५० ते ८० तर बोरांचा दर प्रतिकिलो ४० ते ६० रुपये आहे.

फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

वांगी : २० ते ३०

टोमॅटो : २०

भेंडी : ५०

ढबू : ४०

गवार : ७० ते ८०

दोडका : ४० ते ६०

कारली : ४०

वरणा : ४० ते ६०

हिरवी मिरची : ४०

फ्लॉवर : १० ते ३० (प्रति गड्डा)

कोबी : १० ते २० (प्रति गड्डा)

बटाटा : २० ते ३०

लसूण : ८० ते १००

कांदा : ६० ते १००

आले : ८० ते १००

पडवळ : १५ ते २० (प्रति नग)

मुळा : १० (प्रति नग)

पालेभाजी दर (पेंढी रुपयांत)

मेथी : १०

कांदा पात : १५

कोथिंबीर : १५ ते २०

पालक : १०

शेपू :१०

चाकवत : १५

करडा : १०

फळांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

सफरंचद : १२० ते १४०

डाळिंब : ६० ते ८०

संत्री : ५० ते १००

सिताफळ : ५० ते ८०

चिकू : ४० ते ८०

पेरू : ८०

केळी : ३० ते ६० (डझन)

जवारी केळी : २० ते ६० (डझन)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्यू कॉलेजने साकारले ‘ग्रीन ग्रंथालय’

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर : अधिकाधिक विद्यार्थ्यांची ग्रंथालयाकडे पावले वळावीत, अभ्यासक्रमाशी निगडीत संदर्भग्रंपासून थोरामोठ्यांच्या चरित्रांचा अभ्यास करावा, स्पर्धा परीक्षेशी निगडीत मटेरिअलपासून प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांवर आधारित पुस्तके वाचावीत यासाठी न्यू कॉलेजने ग्रंथालयात आमूलाग्र बदल केले आहेत. कॉलेजने 'ग्रीन ग्रंथालय' संकल्पना राबविली आहे. ग्रंथालयात विविध जातीच्या रोपांच्या ६० कुंड्या ठेवून नैसर्गिक हिरवाई निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

भरपूर नैसर्गिक प्रकाश व हवा खेळती राहावी यादृष्टीने इमारतीची रचना हे या ग्रंथालयचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे कॉलेजमधील एच. टी. अपराध ग्रंथालय इतर कॉलेजांतील ग्रंथालयांपेक्षा हटके ठरले आहे. ग्रंथालयाची १६५६० चौरस फूट बांधकाम केलेली तीन मजली स्वतंत्र इमारत आहे. विविध दालने, ओपॅक, देवघेव, माहिती सेवा, क्रमिक पुस्तक, संदर्भ व विशेष संदर्भ विभाग, इंटरनेट विभाग, डिजिटल लायब्ररी विभाग, प्रतिलिपी सेवा विभागांचा समावेश आहे. मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र अभ्यासिका आहेत. ग्रंथालयातील वातावरण प्रसन्न आणि प्रकाश, हवायुक्त राहावी. नैसर्गिक वातावरणाची अनुभूती मिळावी म्हणून विविध जातीच्या रोपांच्या कुंड्या ठेवल्या आहेत.

ग्रंथालयाच्या इमारतीची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. नैसर्गिक प्रकाश व खेळती हवा यामुळे इमारतीत विद्युत दिवे व पंख्यांचा कमी वापर होतो. पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग संकल्पना राबवली आहे. संस्थेचे चेअरमन दिवंगत डी. बी. पाटील यांनी नेहमीच ग्रंथालयातील सोयी सुविधांना प्राधान्यक्रम दिले. सध्याचे चेअरमन आर. डी. पाटील-वडगावकर व प्राचार्य व्ही. एम. पाटील यांनी सर्वसुविधांयुक्त ग्रंथालय धोरणाला प्रोत्साहित केले. संस्थेने नुकताच, दहा किलोवॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केला आहे. सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे सोळा विभागांना विद्युत पुरवठा होतो. यातून ग्रंथालयाच्या दरमहा लाखो रुपयांच्या वीज बिलाची बचत झाली आहे.

कॉलेजच्या ग्रंथालयामार्फत विद्यार्थ्याना जास्त सुविधा दिल्या जातात. दरवर्षी कॉलेजला सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना ग्रंथालय व सेवा सुविधांची माहिती दिली जाते. प्रत्येक वर्ग आणि विभागातील विद्यार्थ्यांसाठी एक दिवस ग्रंथालय भेट कार्यक्रम होतो. सध्या रोज ४५० ते ५०० विद्यार्थी ग्रंथालयाला भेट देतात. ग्रंथालय व्यवस्थापन अभ्यासक्रमही सुरू केला आहे.

- डॉ. आर. पी. आडाव, मुख्य ग्रंथपाल न्यू कॉलेज

दुर्मिळ साहित्याचे डिजिटायझेशन

ग्रंथालयात मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील दुर्मिळ साहित्याचा खजाना आहे. सहा हजारांहून अधिक संदर्भग्रंथ आहेत. एन्सायक्लोपेडिया ऑफ ब्रिटानिका, मराठी विश्वकोष व भारतीय संस्कृतीकोश, मराठी नियतकालिकांची सूची, भारतीय सरिताकोशचा यात समावेश आहे. ग्रंथालयात दुर्मिळ साहित्य, कॉलेजशी निगडीत कागदपत्रांचे डिजिटायझेशन केले जात आहे. कॉलेज स्थापनेपासून प्रकाशित होणाऱ्या 'क्षितिज'चे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे.

- मुला, मुलींसाठी स्वतंत्र अभ्यासिका

- रेन वॉटर हार्वेस्टिंगची संकल्पना

- सौर ऊर्जा प्रकल्पातून लाखोंची वीज बचत

ग्रंथालयावर एक दृष्टिक्षेप

९२,२५९

एकूण ग्रंथ

७१,२५२

सिनीअर कॉलेजसाठीचे ग्रंथ

१९,५४६

ज्युनिअर कॉलेजसाठी ग्रंथ

फोटो ओळी ५३४०, ग्रंथालयाच्या इमारतीमध्ये विविध जातीच्या रोपांच्या कुंड्यामुळे प्रसन्नदायी वातावरण.

५३५०, ग्रंथालय इमारतीमध्ये मुला, मुलीसाठी स्वतंत्र अभ्यासिका आहेत. दिवसभर अभ्यासिका सुरू असते

५३८२ ग्रंथालय इमारत

५३६४ ग्रंथालयामध्ये 'मुक्त प्रवेशद्वार'संकल्पनेमुळे विद्यार्थी, विद्यार्थिनींना हवे ते पुस्तक शोधण्याची मुभा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थी वाहतुकीचा संघर्ष शिगेला

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

मुंबई हायकोर्टाने असुरक्षित विद्यार्थी वाहतूक रोखण्यासाठी दिलेल्या आदेशानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयाने रिक्षांवर कारवाई सुरू केली आहे. रविवारपर्यंत ८० रिक्षांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे दोन दिवस बंद राहिलेली विद्यार्थी वाहतूक सोमवारपासून (ता. ९) सुरू करण्याचा निर्णय रिक्षाचालकांना घेतला आहे. मात्र, आरटीओ आणि पोलिस अधीक्षकांनी रिक्षातून विद्यार्थी वाहतूक केल्यास कारवाई सुरुच राहणार असल्याचे संघटनेला शनिवारी स्पष्ट केल्याने रिक्षाचालकांचा पोलिसांशी संघर्ष सुरुच राहील अशी चिन्हे आहेत.

मुंबई हायकोर्टाने असुरक्षित विद्यार्थी वाहतूक रोखण्याचे आदेश दिले. त्यानुसार आरटीओ कार्यालयाकडून अवैध रिक्षा, व्हॅन, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या स्कूल बसची तपासणी आणि मोटारसायकलवरुन विना हेल्मेट आणि तीन ते चार विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या पालकांवरही कारवाई सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत सात पालकांवर कारवाई करण्यात आली. गेल्या चार दिवसांत आरटीओच्या तीन भरारी पथकांनी ८० वाहनांवर केली आहे. कोर्टाच्या आदेशानुसार रिक्षांमधील विद्यार्थी वाहतूक अवैध असल्याने सर्वच रिक्षांना नोटिसा बजाविल्या आहेत. त्यांना किमान दोन ते अडीच हजार रुपये दंड केला आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांनी कारवाईला विरोध केला.

५ डिसेंबरपासून काही रिक्षा संघटनांनी वाहतूक बंद केली. ६ आणि ७ डिसेंबर रोजी विद्यार्थी वाहतूक बंद केल्याने सुमारे सहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक व्यवस्था कोलमडली. शुक्रवारी काँग्रेस कमिटीत आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन कोर्टात दाद मागण्याचा निर्णय झाला. चालू शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत विद्यार्थी वाहतुकीला परवानगी असावी आणि जून २०२० पासून विद्यार्थी वाहतूक धोरण निश्चित करून अंमलबजावणी करावी अशी मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समिती, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, पालकांनी शिक्षण विभागाकडे केली आहे. शनिवारी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, आरटीओ एस. टी. अल्वारिस यांची भेट घेऊन वाहतूकीला परवानगी देण्याची मागणी करण्यात आली असून रिक्षाचालकांवरील कारवाईचा भुर्दंड आणि पालकांची गैरसोय टाळण्यासाठी मध्यममार्ग काढावा अशी मागणी केली.

मात्र कोर्टाच्या देशानुसार पोलिस अधीक्षक आणि आरटीओंकडून ही कारवाई सुरुच राहणार असल्याचे सांगण्या आल्याने विद्यार्थी वाहतूकीचा संघर्ष आणखीन वाढणार आहे.

सर्वच पालकांना स्कूलबस परवडत नाहीत. रिक्षातून विद्यार्थी वाहतूक स्वस्त आणि सुरक्षित आहे. गेल्या ४० वर्षांत एकही गंभीर अपघात झालेला नाही. कारवाईच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली जाणार आहे. कोर्टाचा निर्णय येईपर्यंत किमान दहा विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यास परवानगी द्यावी.

- शिवाजी पाटील, अध्यक्ष विद्यार्थी वाहतूक संघटना

हायकोर्टात विद्यार्थी वाहतूकीसंबधी सुनावणी सुरू आहे. शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या कारवाईचा अहवाल कोर्टाला सादर केला जाणार आहे. रिक्षा, बसचालकांवर कारवाई सुरुच राहील. याप्रश्नी कोर्टात पुढील सुनावणी १७ डिसेंबरला होणार आहे.

- डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा पोलिस अधीक्षक

रिक्षातून विद्यार्थी वाहतूक असुरक्षित आहे. त्यातून मोठी हानी होऊ शकते. त्यामुळे कोर्टाच्या आदेशानुसार अधिकाऱ्यांकडून कारवाई सुरू आहे. ती सातत्याने सुरूच राहील.

- एस. टी. अल्वारिस, प्रादेशिक परिवहन अधिकारी

वाहतूक आजपासून

रिक्षा व्यावसायिकांनी सोमवारपासून (ता. ९) विद्यार्थी वाहतूक सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. तर एका रिक्षातून दहाच विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाईल, अशी ग्वाही काही संघटनांनी आरटीओंना दिली. मात्र, कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई सुरू राहील अशी पोलिसांची भूमिका आहे. त्यामुळे रिक्षा व्यावसायिकांनी या प्रश्नी १५ डिसेंबर रोजी काँग्रेस कमिटीत सकाळी दहा वाजता पालक मेळावा आयोजित केला आहे.

जिल्ह्यातील विद्यार्थी वाहतूक

१५००

जिल्ह्यातील रिक्षा

७००

शहरातील रिक्षा

८२

स्कूल बस

२००

व्हॅन

घटनाक्रम

५ डिसेंबर : रिक्षातून विद्यार्थी वाहतूक अवैध असल्याचा कोर्टाचा निर्णय. कारवाईचे आदेश

६ डिसेंबर : रिक्षाचालकांवर कारवाई सुरू.

७ डिसेंबर : रिक्षाचालकांची काँग्रेस समितीत बैठक. पदाधिकाऱ्यांनी घेतली एसपींची भेट

८ डिसेंबर : भरारी पथकाकडून कारवाई सुरुच.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतेला सामाजिक संस्थांचे बळ

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

धुक्यात हरवलेला रस्ता आणि बोचऱ्या थंडीमध्येही रविवारी महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेला शहरवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांसोबत विद्यार्थी व शिक्षकांनी स्वच्छता मोहिमेत भाग घेत नऊ टन कचरा, प्लास्टिक जमा केले. संध्यामठ, रंकाळा उद्यानासह शहराच्या मुख्य प्रवेशद्वातील रस्त्यांची सफाई करण्यात आली.

दर रविवारी सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेला शहरवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक रविवारी नव्या संघटना आणि त्यांचे कार्यकर्ते सहभागी होऊन शहर स्वच्छतेबाबतची सजगता दाखवून देत आहेत. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी हे शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना व्याख्याने व कार्यशाळांच्या माध्यमातून मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करत आहेत. त्यामुळे विद्यार्थी, गुरुजनांचेही स्वच्छता मोहिमेला चांगले पाठबळ मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून हळूहळू थंडी वाढू लागली आहे. रविवारी सकाळच्या थंडीतच स्वच्छतेला सुरुवात झाली. रंकाळा पदपथ उद्यान, रंकाळा चौपाटी यांदरम्यान ज्येष्ठ नागरिक, रंकाळा वॉकर्स ग्रुप व व्हाइट आर्मीच्या कार्यकर्त्यांनी सफाई करण्यास सुरुवात केली. केएमसी कॉलेजच्या विद्यार्थी व शिक्षकांनी रस्ता दुभाजकांची स्वच्छता केली. स्वरा फाउंडेशन, एक हात मैत्रिचा या ग्रुपने शहराच्या प्रवेशद्वाराचा रस्ता स्वच्छ केला.

कळंबा तलाव परिसर ते कळंबा जेल, हॉकी स्टेडियम, दसरा चौक ते खानविलकर पेट्रोलपंप, रंकाळा टॉवर ते फुलेवाडी, शाहू नाका ते उड्डाण पूल, भगवा चौक या प्रमुख रस्त्यांबरोबर कोटीतीर्थ तलाव व रंकाळा उद्यानामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. सामाजिक संस्था, विद्यार्थ्यांसोबत महापालिकेच्या आरोग्य विभागाचे १५० कर्मचारी सहभागी झाले होते. आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, कनिष्ठ अभियंता आर. के. पाटील, स्वरा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद माजगावकर, केएमसी कॉलेजचे डॉ. आर. यू. बडसकर, के. डी. झिटे, विभागीय आरोग्य निरिक्षक राहुल राजगोळकर आदी मोहिमेमध्ये सहभागी झाले होते.

दृष्टिक्षेपात स्वच्छता मोहीम

जेसीबी

१७

डंपर

आरसी गाड्या

१५०

कर्मचारी

९ टन

कचरा, प्लास्टिक संकलन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सांस्कृतिक ओपनिंग

$
0
0

व्याख्यानांचा जागर अन् नाताळची पर्वणी

कोल्हापूर टाइम्स टीम

या आठवड्यात कोल्हापूरकरांना व्याख्यानातून विचारांची तर नाताळनिमित्ताने आयोजित उपक्रमांमधून सांस्कृतिक पर्वणी मिळणार आहे.

रंगणार ख्रिसमस फेस्टिव्हल

डिसेंबरच्या २५ रोजी नाताळ असला तरी त्याचे पडघम डिसेंबर सुरू झाल्यापासूनच वाजत आहेत. यानिमित्ताने वायल्डर मेमोरियल चर्चतर्फे ख्रिसमस फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. १३ व १४ डिसेंबर या दोन दिवशी सायंकाळी ४ ते रात्री दहा यावेळेत न्यू शाहूपुरीतील वायल्डर मेमोरिअल चर्च येथे होणार आहे. या महोत्सवात मुलांसाठी विविध खेळ, फॅन्सी ड्रेस, फनी गेम्स, फूड स्टॉल, कॅरल साँग्ज, चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले आहे. तसेच खरेदीचा आनंद लुटण्यासाठी स्टॉल आहेत.

निर्मिती विचारमंचतर्फे पुस्तक प्रदर्शन

वाचाल तर वाचाल हा मंत्र देणाऱ्या वाचनसंस्कृतीला बळ देण्यासाठी निर्मिती विचारमंच या संस्थेच्यावतीने पुस्तक प्रदर्शन सुरू आहे. शनिवारपर्यंत (ता. १४) पुस्तकांचे हे दालन खुले आहे. या प्रदर्शनात विविध विषयांवरील पुस्तकांचा खजिना मांडण्यात आला आहे. दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनच्या कलादालन येथे भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात पुस्तकविषयक चर्चेसाठीही मंच उपलब्ध आहे.

आरोग्यविषयक व्याख्यान

ज्येष्ठांच्या अनेक प्रश्नांपैकी महत्त्वाचा विषय हा त्यांच्या आरोग्याबाबत चर्चेला येतो. ज्येष्ठांच्या शारीरीक व मानसिक आयोग्याबाबत त्यांना माहिती देण्यासाठी प्रोबस ज्येष्ठ नागरीक संघ आणि डॉ. अरगडे ट्रस्ट यांच्यावतीने सातत्याने उपक्रम राबवले जातात. या अंतर्गत १० डिसेंबर रोजी आरोग्य विषयक पुस्तकांची माहिती देण्यात येणार आहे. माजी शिक्षणाधिकारी व सध्या ज्येष्ठांसाठी काम करणारे अरविंद दीक्षित हे यावेळी ज्येष्ठांशी संवाद साधणार आहेत. राजारामपुरी येथील आठवी गल्लीतील डॉ. आरगडे हॉस्पिटलच्या सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता हे व्याख्यान होणार आहे.

पानसरे व्याख्यानमालेतून अर्थकारणावर झोत

श्रमिक प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारी अविनाश पानसरे व्याख्यानमाला एका महत्त्वाच्या विषयावर सखोल मांडणी करते. व्याख्यानमाला १४ डिसेंबरपर्यंत सुरू राहील. भारतावरील आर्थिक संकट या मध्यवर्ती व्याख्यानमाला सुरू आहे. आर्थिक मंदीचा अर्थ, कारणे, परिणाम, भविष्य, दीर्घकालीन उपाय या सर्व विषयांवर चर्चा होईल. सोमवारी भारतीय अर्थव्यवस्थेची आजची स्थिती हा विषय मांडला जाईल. मंगळवारी आर्थिक मंदीचा बँकिंगवरील परिणाम या विषयावर भाषण होईल. बुधवारी, आर्थिक संकट व शेती तर गुरुवारी आर्थिक मंदी व बेकारी या दोन महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे. शुक्रवारी आर्थिक मंदी व तंत्रज्ञान क्षेत्र या विषयाची मांडणी होणार आहे. शनिवारी आर्थिक मंदीवर उपाय या विषयाने व्याख्यानमालेचा समारोप होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंदीमुळे विकासकामात पिछेहाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कृषी क्षेत्र गेली ४० वर्षे मंदीत आहे, मात्र अन्य उद्योगाच्या तुलनेत या व्यवसायाची चर्चा होत नाही. शिवाय वाहन उद्योग, कापड उद्योग, बांधकाम उद्योग मंदीच्या विळख्यात सापडल्यामुळे विकासकामांत पिछेहाट झाली. दुर्दैव म्हणजे, मंदी म्हणजे काय हे माहीत नसणारे लोक देशात राज्य करत आहेत. वास्तविक सरकारने सर्वच क्षेत्रातील आर्थिक मंदी संपुष्टात आणण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना, आर्थिक सुधारणेसाठी कृतीशील कार्यक्रम व शेती क्षेत्रात सरकारकडून वाढती गुंतवणूक गरजेची आहे,' असे प्रतिपादन सहकार क्षेत्राचे अभ्यासक दत्ता देसाई (पुणे) यांनी केले.

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बँक एम्प्लॉइज युनियनचे नेते आप्पासाहेब ढेरे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यानात 'आर्थिक मंदी, सहकार क्षेत्र व उपायांची दिशा' हा विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कॉम्रेड अतुल दिघे होते. जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या सभागृहात कार्यक्रम झाला.

देसाई म्हणाले, 'सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका बँकिग क्षेत्रालाही बसला आहे. नोटबंदीचा प्रयोग फसला. सरकारी आकडेवारी विकासाचा आर्थिक दर उंचावत असल्याचे दर्शवित असले तरी आर्थिक विकासाचा वेग मंदावला आहे हे वास्तव आहे. सहकार क्षेत्रातील उद्योग आणि बँकिग हे अर्थव्यवस्थेचे भक्कम आधार आहेत. मात्र सरकारी धोरणांचे विपरित परिणाम या क्षेत्राला भोगावे लागत आहेत. सोन्याचे वाढते दर आणि शेअर बाजाराचा उसळी मारणारा निर्देशांक याचे दाखले देत काही मंडळी मंदी नसल्याचे भासवित आहेत.'

ते पुढे म्हणाले, ' गेल्या काही वर्षांत देशाचा आर्थिक विकासाचा दर खालावत आहे. बांधकाम उद्योगात साडेतीन लाख कोटी अडकून पडले आहेत. वाहन उद्योगाची प्रगती आणि पायाभूत सुविधा एकमेकांशी निगडीत आहेत. आज वाहन उद्योग अडचणीत सापडल्याने पायाभूत सुविधांवर परिणाम झाला. शेतकऱ्यांना, शेती क्षेत्राला सवलती देण्याऐवजी सरकारने कार्पोरेट कंपन्यांना १७५ लाख कोटींची करसवलत दिली. या करसवलतीचा फटका नागरी सुविधांना बसला. नागरिकांनी आता केवळ प्रेक्षक म्हणून बघ्याची भूमिका न घेता शेतीक्षेत्रातील गुंतवणूक वाढ, सहकार, बँकिंगसह आर्थिक धोरणाच्या बळकटीकरणासाठी सरकारवर सामूहिक दबाव निर्माण केला पाहिजे.'

बँक एम्प्लॉइज युनियनचे चेअरमन भगवान पाटील प्रास्ताविक यांनी केले. आय. बी. मुनशी यांनी स्वागत केले. बँक एम्प्लाइज को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या सभापती स्वाती कुंभार यांनी आभार मानले. याप्रसंगी कॉम्रेड बी. आर. पाटील, सी. ए. रावण, संजय केखलेकर, आर. जे. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

फोटो ओळ:

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बँक एम्प्लॉइज युनियनतर्फे आप्पासाहेब ढेरे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यानात बोलताना दत्ता देसाई. सोबत भगवान पाटील, आर. जे. पाटील, बी. आर. पाटील, अतुल दिघे, सी. ए. रावण, संजय केखलेकर, स्वाती कुंभार, आय. बी. मुनशी आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्यू कॉलेजने साकारले 'ग्रीन ग्रंथालय'

$
0
0

Appasaheb.mali @timesgroup.com Tweet : Appasaheb_MT कोल्हापूर : अधिकाधिक विद्यार्थ्यांची ग्रंथालयाकडे पावले वळावीत, अभ्यासक्रमाशी निगडीत संदर्भग्रंपासून थोरामोठ्यांच्या चरित्रांचा अभ्यास करावा, स्पर्धा परीक्षेशी निगडीत मटेरिअलपासून प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांवर आधारित पुस्तके वाचावीत यासाठी न्यू कॉलेजने ग्रंथालयात आमूलाग्र बदल केले आहेत. कॉलेजने 'ग्रीन ग्रंथालय' संकल्पना राबविली आहे. ग्रंथालयात विविध जातीच्या रोपांच्या ६० कुंड्या ठेवून नैसर्गिक हिरवाई निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. भरपूर नैसर्गिक प्रकाश व हवा खेळती राहावी यादृष्टीने इमारतीची रचना हे या ग्रंथालयचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे कॉलेजमधील एच. टी. अपराध ग्रंथालय इतर कॉलेजांतील ग्रंथालयांपेक्षा हटके ठरले आहे. ग्रंथालयाची १६५६० चौरस फूट बांधकाम केलेली तीन मजली स्वतंत्र इमारत आहे. विविध दालने, ओपॅक, देवघेव, माहिती सेवा, क्रमिक पुस्तक, संदर्भ व विशेष संदर्भ विभाग, इंटरनेट विभाग, डिजिटल लायब्ररी विभाग, प्रतिलिपी सेवा विभागांचा समावेश आहे. मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र अभ्यासिका आहेत. ग्रंथालयातील वातावरण प्रसन्न आणि प्रकाश, हवायुक्त राहावी. नैसर्गिक वातावरणाची अनुभूती मिळावी म्हणून विविध जातीच्या रोपांच्या कुंड्या ठेवल्या आहेत. ग्रंथालयाच्या इमारतीची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. नैसर्गिक प्रकाश व खेळती हवा यामुळे इमारतीत विद्युत दिवे व पंख्यांचा कमी वापर होतो. पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग संकल्पना राबवली आहे. संस्थेचे चेअरमन दिवंगत डी. बी. पाटील यांनी नेहमीच ग्रंथालयातील सोयी सुविधांना प्राधान्यक्रम दिले. सध्याचे चेअरमन आर. डी. पाटील-वडगावकर व प्राचार्य व्ही. एम. पाटील यांनी सर्वसुविधांयुक्त ग्रंथालय धोरणाला प्रोत्साहित केले. संस्थेने नुकताच, दहा किलोवॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केला आहे. सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे सोळा विभागांना विद्युत पुरवठा होतो. यातून ग्रंथालयाच्या दरमहा लाखो रुपयांच्या वीज बिलाची बचत झाली आहे. दुर्मिळ साहित्याचे डिजिटायझेशन ग्रंथालयात मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील दुर्मिळ साहित्याचा खजाना आहे. सहा हजारांहून अधिक संदर्भग्रंथ आहेत. एन्सायक्लोपेडिया ऑफ ब्रिटानिका, मराठी विश्वकोष व भारतीय संस्कृतीकोश, मराठी नियतकालिकांची सूची, भारतीय सरिताकोशचा यात समावेश आहे. ग्रंथालयात दुर्मिळ साहित्य, कॉलेजशी निगडीत कागदपत्रांचे डिजिटायझेशन केले जात आहे. कॉलेज स्थापनेपासून प्रकाशित होणाऱ्या 'क्षितिज'चे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘केएमटी’च्या जोतिबा दर्शन फेरीला चांगला प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

श्री क्षेत्र जोतिबा दर्शनासाठी प्रत्येक रविवारी सुरू केलेल्या केएमटी बससेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. एक दिवसीय पासचा प्रवाशांना चांगला फायदा होत आहे.

जून महिन्यापासून महापालिकेच्या सार्वजनिक उपक्रमातंर्गत (केएमटी) पन्हाळा, जोतिबा या लांब पल्ल्यांच्या बससेवेला सुरुवात झाली. मात्र अल्पावधीत जोतिबा मार्गावरील बससेवा बंद करावी लागली. प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागला होता. पण काही प्रवाशांनी दर आठवड्याला बससेवा देण्याची मागणी केली होती. त्यानुसार स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी दर रविवारी जोतिबा मार्गावर बससेवा सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत प्रत्येक सव्वा तासाला केएमटीची एक फेरी होत आहे.

सकाळपासून रात्रीपर्यंत प्रवासी केएमटीतून प्रवास करण्यासाठी गर्दी करत आहेत. पहिल्या रविवारी ३५० प्रवाशांनी प्रवास केला होता. तर या रविवारी ३६१ प्रवाशांनी केएमटीचा जोतिबा दर्शनासाठी आधार घेतला. मध्यवर्ती बसस्थानकामधून ही बस टाऊन हॉलमार्गे जोतिबाकडे रवाना होते. आठवड्यातून एकदा दिल्या जाणाऱ्या सेवेसाठी एक दिवसीय पासची सुविधाही दिली आहे. त्यामुळे प्रवाशांना नंतर शहरातही केएमटीने प्रवास करता येत असल्याने या मार्गावरील बससेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खराब रस्तेप्रश्नी आज बिंदू चौकात निदर्शने

$
0
0

कोल्हापूर

शहरातील खराब रस्तेप्रश्नी महापालिका प्रशासनाविरोधात जिल्हा वाहनधारक महासंघाच्यावतीने सोमवारी (ता.९) बिंदू चौक येथे सकाळी १२ वाजता निदर्शने करण्यात येणार आहेत. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी वाहनधारक संघाच्यावतीने जनआंदोलन हाती घेण्यात आले. याआधी बिंदू चौक येथे खडी व डांबराचे लग्न लावून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. त्यानंतर दाभोळकर कॉर्नर येथे रास्ता रोको आंदोलनही केले. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आंदोलकांसोबत बैठक घेवून रस्ते दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार अनेक ठिकाणी पॅचवर्कच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र यावर समाधानी नसल्याने वाहनधारक संघाच्यावतीने पुन्हा आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोमवारी बिंदू चौक येथे शालेय विद्यार्थ्यांसमवेत निदर्शने करण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images