Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

नाट्यसंमेलनात कलाकारांनी सहभागी व्हावे

$
0
0
‘पंढरपूर येथे ३१ जानेवारी व १ व २ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनात कोल्हापूरच्या कलाकारांनी अधिकाधिक संख्येने सहभागी होवून कलाविष्कार सादर करावेत’ असे आवाहन नाट्यपरिषदेच्या कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष मनोहर कुईंगडे यांनी पत्रकार परिषदेत केले.

केआयटीत रंगणार ‘गुगल अब्लेझ’

$
0
0
इंटरनेटच्या सध्याच्या युगात गुगल हा नेटिझन्सचा सर्वात जवळचा मित्र बनला आहे. अगदी इंटरनेट म्हटलं तरी पटकन डोळ्यापुढे येतं ते ‘गुगल’. त्यामुळे तरुणाईशी त्यांच्याच भाषेत संवाद साधण्यासाठी केआयटी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये सोमवारी (ता. २० जानेवारी) ‘गुगल अब्लेझ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

माणूस म्हणून जगण्यासाठी....

$
0
0
कवितेच्या या ओळी कुणाच्या आहेत हे सांगता येत नाही. खेड्यात राहणाऱ्या आणि जात्यावर दळण दळताना गाणं म्हणणाऱ्या कित्येक स्त्रियांच्या ओठातून अशा रचना बाहेर पडल्या आहेत. मराठी लोकसाहित्य अशा गीतांनी समृद्ध झाले आहे. अशा ओव्यांचा रचनाकार कोणी एक नसतो. गावातल्या समग्र स्त्रीमनातून त्या निर्माण झालेल्या आहेत.

बेळगाव आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव उद्यापासून

$
0
0
चौथा बेळगाव आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव १८ ते २१ जानेवारी या कालावधीत होत आहे. बेळगाव येथील सावगाव रोड येथील अंगडी इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी येथे हा महोत्सव होत आहे. बेळगावचे माजी आमदार अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महोत्सव आयोजित केला जातो.

किलबिल

$
0
0
हिवाळा सुरू झाला की पक्षीमित्रांना वेध लागतात ते पक्षीनिरीक्षणाचे. हिवाळ्यात अनेक स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागात होते. यामध्ये स्थानिक स्थलांतरित पक्ष्यांबरोबरच काही परदेशी पक्षी आपल्याकडे पाहुणे म्हणून येतात.

अवतरला पुस्तकांचा गाव

$
0
0
सकाळची कोवळी किरणे झेलत शालेय विद्यार्थ्यांची पावले गांधी मैदानातून बाहेर पडली. डोळ्यात उत्सुकता पुस्तकांच्या गावी जाण्याची आणि आनंद ग्रंथांची दुनिया अनुभवण्याचा. जे लेखक धड्यातील ओळीतून, कवितांमधून भेटतात त्यांच्याशी पुढचे काही दिवस संवाद साधता येणार या कुतूहलाने मनाचा कोपरा न कोपरा भरून व्यापलेला.

विचारांची श्रीमंती सर्वांत मोठी

$
0
0
प्रगत तंत्रज्ञान तुम्हाला क्षणात एका क्लिकवर माहिती देत आहे. पाचआकडी पगाराने भौतिक साधने पायाशी लोळण घेत आहेत. सुखसाधनांच्या या जगात आर्थिक श्रीमंतीचे शिखर गाठण्याचा ध्यास बाळगणाऱ्या आजच्या शालेयवयातील पिढीला गरज आहे ती यासोबत विचारांनीही श्रीमंत होण्याची.

आधार असून ‘निराधार’

$
0
0
आधार कार्ड नोंदवले म्हणजे काम झाले असे नाही. तर त्या आधारकार्डच्या स्टेटसची प्रिंट घेऊन ती गॅस एजन्सी व सबंधित बॅकेत सादर केली तर ग्राहक अनुदानीत गॅस सिलेंडरसाठी पात्र ठरतो.

नर्मदा परिक्रमा हा समृद्ध करणारा अनुभव

$
0
0
नर्मदा परिक्रमेत प्रत्येक दिवशी वेगवेगळा अनुभव येतो. बिकट वाट, विस्तीर्ण जलाशय, अहंभाव टाळून श्रद्धायुक्त मनाने करावा लागणारा प्रवास त्यामुळे ही परिक्रमा तन, मन, धन अर्पूणच करावी लागते. नर्मदा परिक्रमा हा जीवन समृध्द करणारा अनुभव आहे.

वैश्विक विकासासाठी ‘मटेरियल सायन्स’मध्ये संशोधन हवे

$
0
0
आता विद्यार्थी व प्राध्यापकांनी संयुक्तपणे मटेरियल सायन्समध्ये संशोधन करायला हवे. कारण त्यामुळे विकासाचा वेग वाढेल, अशी अपेक्षा हॅनयांग युनिव्हर्सिटीचे प्रा. यॉग पाक ली यांनी व्यक्त केली.

कॉलेजचे ‘रोस्टर’ होणार ऑनलाइन

$
0
0
जागा आरक्षण गटासाठी पण भरती खुल्या गटातील उमेदवारांची, वर्षानुवर्षे आरक्षण गटातील जागा रिक्त राहिलेली, पण रोस्टर भरलेलाच नाही. विद्यापीठाच्या सूचनांकडेही दुर्लक्ष करायचे अशा पध्दतीच्या कॉलेजस्तरावरील कामकाजाला आता चाप बसणार आहे.

मागण्या त्याच; मोर्चे मात्र दोन

$
0
0
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरु आहे. आपल्या मागण्यांकडे जिल्हा प्रशासनाचे पर्यायाने सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

अवकाश संशोधन केंद्राचे आज भूमिपूजन

$
0
0
वातावरणात होणारे बदल, वादळ आणि भूकंपामुळे होणारे परिणाम इथंपासून पृथ्वीपासून सुर्यापर्यंतच्या अवकाशाचे संशोधन पन्हाळा येथील अवकाश संशोधन केंद्रामुळे शक्य होणार आहे.

वृद्धेचे दागिने लुटले

$
0
0
पेन्शन मंजूर झाली आहे असे सांगून नकुशा मोरे (वय ७०, रा. बांबरवाडी, ता. पन्हाळा) या महिलेची पाऊण तोळ्याची माळ तरूणाने लंपास केली. गुरूवारी दुपारी बारा वाजता ही घटना घडली.

डिग्रजकर स्मृती संमेलनाला प्रारंभ

$
0
0
शास्त्रीय रागदारी आणि नाट्यगीतांच्या सुरेल सादरीकरण करत गायक महेश काळे यांनी ‘पंडित सुधाकरबुवा डिग्रजकर स्मृती संगीत संमेलना’चा पहिला दिवस गाजविला. आवाजाचा निकोप लगाव, स्पष्ट शब्दोच्चार, स्वरांवर विलक्षण हुकूमत, आकर्षक बोलताणा आणि चपळ ताणक्रिया यांचा सुंदरसा मिलाफ साधत काळे यांनी संमेलनाची सुरेल सुरुवात केली.

महापालिकेचा टोल हद्दपारीचा शड्डू

$
0
0
दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी टोलला हद्दपार करण्यासाठी राजकीय कारकिर्द पणाला लावली आहे. सभागृह त्यांच्या पाठीशी असून आयआरबीला हाकलल्याशिवाय शांत बसणार नाही, असा विश्वास सदस्यांनी गुरुवारच्या विशेष सभेत दिलाच.

कुस्तीपटू रेश्मा मानेचा राज्य सरकारकडून गौरव

$
0
0
कुस्तीमध्ये विविध मानाचे किताब पटकावणारी रेश्मा उर्फ सुगंधा माने हिचा राज्य सरकारतर्फे गौरव करण्यात आला. ती वडणगे येथे राहते. रेश्माच्या भावी कारकीर्दीसाठी सरकारच्या वतीने दोन लाख रुपयांचा चेक देण्यात आला.

पोषण आहारप्र्रश्नी ठेकेदारावर गुन्हा दाखल

$
0
0
नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाकडील शाळांना पुरविल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारातील तांदुळाच्या पोत्यात अपहार केल्याप्रकरणी संबंधित ठेकेदारावर गावभाग पोलिसात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

‘दमसा’च्या संमेलनाची रौप्यमहोत्सवी वाटचाल

$
0
0
कोल्हापुरात २५ मे १९८२ रोजी दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेची स्थापना आणि पहिले साहित्य संमेलन झाले. दक्षिण महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांतील लिहिणाऱ्यांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या संस्थेचे रौप्यमहोत्सवी साहित्य संमेलन आज आणि उद्या (१७ आणि १८ जानेवारी) पेठ वडगाव येथे होत आहे.

‘दौलत’ कृती समितीचा मोर्चा

$
0
0
गेल्या तीन वर्षात दौलत चालविण्यास संचालक गोपाळ पाटील असफल ठरले आहेत. असे असतानाही अद्यापही ते आश्वासनावर आश्वासने देत आहे असून कोणतीही भूमिका स्पष्ट करत नाहीत. उलट वाठारकर सारख्या भुरट्या कंपनीला दौलत चालविण्यासाठी देण्यासाठी वाटाघाटी करुन शेतकरी, उत्पादक व कामगारांच्या ताटात माती कालवली आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images