Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

रस्ते पॅचवर्कच्या कामाला वेग

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शहरातील खराब रस्त्यांच्या पॅचवर्क कामाने आता वेग घेतला. महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयांनी प्रत्येकी एका रस्त्याच्या पॅचवर्कला सुरुवात केली आहे. डांबर प्लान्ट पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने पुढील १५ दिवसांत शहरातील पॅचवर्कची कामे पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.

अतिवृष्टी व महापुरामुळे शहरातील बहुतांशी रस्त्यांची चाळण झाली आहे. परतीच्या पावसाने झोडपून काढल्याने महापालिकेचा डांबर प्लान्ट नियोजित वेळेत सुरू होऊ शकला नाही. परिणामी पॅचवर्कच्या कामांना विलंब झाला. खड्ड्यांतून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याने वाहनधारकांमध्ये उद्रेक निर्माण होऊन आंदोलनाची मालिका तयार झाली. त्यामुळे शहरवासियांना दिलासा देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी तातडीने निधी उपलब्ध करून दिला. तत्पूर्वी महापालिकेने शॉर्ट टेंडर प्रक्रिया राबवत एक कोटी ६२ लाखांच्या रस्ते दुरुस्तीला मंजुरी दिली.

महापालिकेकडील निधीतून पॅचवर्कच्या कामाचे नियोजन करण्यात आले होते. त्याला प्रत्यक्षात आता सुरुवात झाली आहे. प्रत्येक विभागीय कार्यालयाकडून एका रस्त्याचे पॅचवर्क करण्यात येत आहे. त्यानुसार देवकर पाणंद चौक ते वसंत विश्वास पार्क, प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोरील रस्ता, परीख पूल व जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. शिवाय जादा वर्दळीच्या रस्त्यांचे पॅचवर्क रात्री करण्यात येत आहे. शहरातील सर्व रस्त्यांचे पॅचवर्क पंधरा दिवसांत संपवण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. मुदतीपूर्वी खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी संबंधीत ठेकेदारांना महापालिकेने सूचना केल्या आहेत. त्यानुसार अशा रस्त्यांच्या दुरुस्तीला आज सुरुवात झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ओपन जीमवरुन अधिकारी धारेवर

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

ओपन जीमच्या प्रलंबित कामावरुन बुध‌वारी महिला व बालकल्याण समितीच्या सभेत अधिकाऱ्यांना सदस्यांनी धारेवर धरले. निधी असताना कामात हयगय का? असा संतप्त सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना केला. अध्यक्षस्थानी सभापती अनुराधा खेडकर होत्या. सभेत शालेय विद्यार्थ्यांच्या मोफत केएमटी प्रवासासाठी देण्यात येणाऱ्या सवलतीच्या रकमेला मंजुरी देण्यात आली.

समितीकडून ओपन जीमच्या कामासाठी निधी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणची कामे प्रलंबित राहिली आहेत. अशीच स्थिती शाळेतील बोलक्या भिंतीबाबत झाली असल्याचे निदर्शनास आणून देत सदस्यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. सभेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लेखी स्वरुपात देण्याची मागणी सदस्यांनी केली. त्यानंतर सभापती खेडकर यांनी २०१९-२० आर्थिक वर्षात महिला व बालकल्याण समितीसाठी किती तरतूद केली आहे. तरतुदीनुसार आतापर्यंत झालेल्या खर्चाचा तपशील सदस्यांना लेखी स्वरुपात द्या असे आदेश त्यांनी दिले. महापालिकेच्या शिक्षण मंडळ आणि राजमाता जिजाबाई हायस्कूल शाळांमधील विद्यार्थ्यांना केएमटी बसमधून मोफत प्रवासाची सुविधा दिली जाते. त्यासाठी देण्यात येणाऱ्या सवलतीच्या रकमेला सभेत मंजुरी देण्यात आली. समितीच्या बजेटमधून पंचगंगा व सावित्रीबाई फुले हॉस्पिटल निधी देण्यात आला आहे. त्या निधीतून झालेल्या कामाची यादी आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी सभेत सादर केली.

सभेस उपसभापती छाया पोवार, शोभा कवाळे, सीमा कदम, अश्विनी बारामते, मनीषा कुंभार, जयश्री चव्हाण, मेहजबीन सुभेदार, उपआयुक्त धनंजय आंधळे, नगरसचिव दिवाकर कारंडे, उपशहर रचनाकार एन. एस. पाटील, वैद्यकीय अधिकारी प्रकाश पावरा, डॉ. विद्या हेरवाडे (काळे), कनिष्ठ अभियंता चेतन अरमाळ आदी उपस्थित होते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कमिटी ठरवणार दुकानगाळ्यांचे भाडे

$
0
0

महापालिकेचा लोगो वापरावा....

.......

Appasaheb.mali@timesgroup.com

Twert:Appasaheb_MT

कोल्हापूर

दुकानगाळ्यांचे थकीत भाडे, भाडेकराराच्या नूतनीकरणास विलंब, करारावरुन काही गाळेधारकांनी कोर्टात घेतलेली धाव यामुळे महापालिकेच्या मालकीच्या दुकानगाळ्यांच्या भाडे आकारणीचा प्रस्ताव वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. महापालिका आणि गाळेधारकांत भाडेआकारणीवरुन दुमत असल्यामुळे करारही लांबणीवर पडला आहे. मात्र नजीकच्या काळात महापालिकेच्या मालकीच्या दुकानगाळ्यांचे भाडे आकारणीचा निर्णय 'जिल्हाधिकारी, आयुक्त आणि मुद्रांक विभागातील उपनिबंधक'या तिघांची कमिटी घेणार आहे.

राज्य सरकारने यासंदर्भातील आदेश काढला असून महापालिकेला तसे कळविले आहे. ज्या त्या भागातील दुकानगाळ्यांच्या बाजारमूल्यानुसार एकूण खरेदीच्या रकमेच्या आठ टक्के रक्कम अथवा रेडीरेकनरनुसार वार्षिक भाडे अशी निश्चिती करण्याचे आदेश आहेत. महापालिकास्तरावर भाडे आकारणी करण्यासाठी कमिटी स्थापन होणार आहे. कमिटीत जिल्हाधिकारी, आयुक्त व मुद्रांक विभागातील उपनिबंधक अशा तिघांचा समावेश आहे. मात्र जिल्हाधिकारी व आयुक्त यांच्याकडील कार्यभार पाहिल्यावर त्यांच्या ऐवजी त्या कार्यालयातील अन्य अधिकारी व मुद्रांक विभागातील उपनिबंधक मिळून प्रत्येक मार्केटमधील बाजारमूल्यानुसार मूल्यांकन निश्चित करतील.

दरम्यान, महापालिकेच्या मालकीच्या मार्केटमधील गाळेधारकांनी परस्पर इतरांना दुकानगाळे भाड्याने दिले आहेत. महापालिकेसोबतचा करार मोडून पोटभाडेकरू नेमले आहेत. वास्तविक प्रशासनाने अशा गाळेधारकांचा शोध घेऊन कारवाई करण्याची आवश्यकता होती. मात्र नगरसेवकांची मध्यस्थी, अधिकाऱ्यांचा डोळेझाकपणामुळे महापालिकेच्या हक्काच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे. सुरुवातीच्या करारानुसार गाळेधारक महापालिकेला दरमहा ३५० अथवा ५०० रुपये इतके भाडे भरतात. अनेक वर्षे भाडेवाढ झालेली नाही. दुसरीकडे गाळेधारकांनी महापालिकेकडून मार्केटमध्ये आवश्यक सुविधा पुरविल्या जात नाहीत. स्वच्छता, सुरक्षा, गळतीची समस्या दूर केली नाही अशा तक्रारी केल्या आहेत.

...

भाड्याची थकीत रक्कम २५ कोटींवर

शहरात महापालिकेच्या मालकीची ३६ मार्केट आहेत. या मार्केटमधील दुकानगाळ्यांची संख्या २०९५ च्या आसपास आहे. शहरातील मध्यवस्तीच्या भागात व उपनगरात मार्केट आहेत. दरम्यान, १५०० दुकानगाळ्यांचे भाडे वर्षानुवर्षे थकीत आहे. महापालिका आणि शेकडो दुकानगाळेधारकांतील करारही संपुष्टात आला आहे. महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील गाळे, शिवाजी मार्केट, शाहू क्लॉथ मार्केट, प्रतिभानगर मार्केट, कसबा बावडा येथील मार्केट, गांधी मैदान मार्केट अशा विविध भागातील मार्केटमधील गाळ्यांच्या भाड्याचा आणि नव्याने कराराचा प्रश्न आहे. ठिकठिकाणच्या गाळेधारकांनी वर्षानुवर्षे महापालिकेकडे भाडे भरलेले नाही. इस्टेट विभागाकडील माहितीनुसार महापालिकेच्या मालकीच्या दुकानगाळ्याच्या थकीत भाड्याची रक्कम २५ कोटींवर पोहचली आहे. प्रशासन आणि गाळेधारकांत चर्चेच्या फेऱ्या झाल्या. थकीत भाडे वसुलीसाठी महापालिकेने नोटीसा काढल्या. काही ठिकाणी दुकाने सील केल्याची उदाहरणे आहेत. विचारे मार्केटमधील २०० दुकानगाळ्यांची गेली आठ, नऊ वर्षे भाडेवसुली झालेली नाही.

....

कोट

'महापालिकेच्या मालकीच्या दुकानगाळ्यांचे भाडे निश्चित करण्यासाठी सरकारकडून नव्या सूचना मिळाल्या आहेत. जिल्हाधिकारी,आयुक्त व मुद्रांक विभागातील उपनिबंधक ही कमिटी भाडे आकारणी निश्चित करेल. सरकारनेच भाडे आकारणीसाठी दोन पर्याय सुचविले आहेत.

प्रमोद बराले, अधिकारी, इस्टेट विभाग

...........

३६

महापालिकेच्या मालकीच्या मार्केटची संख्या

...............

२०९५

मार्केटमधील दुकानगाळ्यांची संख्या

..............

१५००

पेक्षा अधिक दुकानगाळ्यांचे भाडे थकीत

.............

२५ कोटी

पेक्षा अधिक रक्कम भाडे थकीत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जि. प. सोसायटीतर्फे रविवारी गुणगौरव सोहळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीतर्फे सभासदांची गुणवंत मुले आणि कला-क्रीडा व स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा रविवारी (ता.१) आयोजित केला आहे. याप्रसंगी विविध क्षेत्रांत नावलौकिक मिळवलेल्या मान्यवरांची मार्गदर्शनपर व्याख्याने होणार आहेत, अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष राजीव परीट व उपाध्यक्ष दिनकर तराळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

साइक्स एक्स्टेंशन येथील सोसायटीच्या मालकीच्या महालक्ष्मी सभागृहात सकाळी ११ वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल अध्यक्षस्थानी असतील. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास, प्रकल्प संचालक अजयकुमार माने यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. याप्रसंगी १२५ विद्यार्थी आणि ३२ सेवानिवृत्तांचा सत्कार करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला संचालक एम. आर. पाटील, महावीर सोळांकुरे, कृष्णात किरुळकर, शांताराम माने, रणजित पाटील, आदी उपस्थित होते.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंदिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा बट्ट्याबोळ

$
0
0

फोटो आहे

भूमिका

महापालिकेने सातत्याने

कारवाई करावी

करवीर निवासिनी अंबाबाई, रंकाळा तलाव, पन्हाळा गडासारख्या ऐतिहासिक ठिकाणांमुळे शहरात वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. स्थानिक आणि बाहेरून येणाऱ्या वाहनांना सामावून घेण्यास येथील रस्ते अपुरे पडतात. त्यातच प्रमुख मार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले आहेत. तर अनेक ठिकाणच्या कमर्शियल कॉम्प्लेक्सधारकांनी पार्किंग बंदिस्त केली आहेत. या सर्वाचा परिणाम दररोज वाहतूक कोंडीवर होतो. शहराच्या प्रमुख समस्येतून मार्ग काढण्यासाठी रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याबरोबरच बेशिस्त पार्किंग कमी केले पाहिजे. तसेच पार्किंग स्लॉट निर्माण करताना महापालिका प्रशासन, शहर वाहतूक शाखा यांनी एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे. सरकारी पातळीवरून उपाययोजना सुरू असताना त्याला वाहनधारकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे. शहरातील अनेक कॉम्प्लेक्सधारकांनी पार्किंगचा वापर अन्य कारणांसाठी केल्याने रस्त्यावर वाहने उभी केली जातात. परिणामी वाहतूक कोंडीत भर पडते. पार्किंगच्या जागांची पाहणी करणे, त्यासाठी वाहतूक शाखा आणि महापालिकेने एकत्र कारवाई करणे अपेक्षित असते, मात्र वरिष्ठांनी सूचना दिल्यानंतरच याबाबत हालचाली दिसून येतात. यापुढे नगररचना विभागाने वर्षभर अशा मालमत्ता शोधून त्यांच्यावर कारवाई केल्यास वाहतूक कोंडीचा बराच प्रश्न सुटू शकतो.

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर : शहरातील प्रमुख रस्ते अरुंद असल्याने वाढत्या वाहनांना सामावून घेण्यात कमी पडत आहेत. अशा रस्त्यांवर कमर्शियल कॉम्प्लेक्स, मंगल कार्यालये, हॉटेल्सची स्वतंत्र पार्किंग व्यवस्था नाही. तसेच महापालिकेचे मर्यादित पार्किंग स्लॉट असल्याने शहरात वाहतूक कोंडी नित्याचीच बाब बनली आहे. यातून मार्ग काढताना वाहनधारक अक्षरश: मेटाकुटीला येतात. विशेषत: त्याचा त्रास पर्यटकांसह नागरिकांना होत आहे.

जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळे आणि करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी दररोज हजारो पर्यटक येत असतात. देवीच्या दर्शनासाठी शहरात प्रवेश केल्यानंतर पर्यटकांना प्रथम पार्किंगच्या जागेचा शोध घ्यावा लागतो. पुरसे वाहनतळ नसल्याने त्यांची वाहने रस्त्याच्या बाजुला कोठेही उभी केली जातात. प्रमुख सर्व मार्ग अतिक्रमणांने व्यापले असून मुख्य रस्त्यातच रिक्षा स्टॉप असल्याने वाहतूक कोंडीत अधिकच भर पडते. यातून मार्ग काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागते.

वाहतूक कोंडीला कमर्शियल कॉम्प्लेक्सनी बंदिस्त केलेले पार्किंग सर्वात जास्त जबाबदार ठरत आहे. बांधकाम परवाना किंवा बांधकाम पूर्णत्वाचा दाखल देताना पार्किंगसाठी जागा सोडल्याचे दाखविले जाते. त्यानुसार संबंधिताकडून जागा सोडलेली असते. किंवा नियम धाब्यावर बसवून बांधकाम केलेले असते. ज्यांनी जागा सोडलेली असते, ते नंतर पार्किंग बंद करून ठेवतात. त्यामुळे तेथे येणारी सर्व वाहने रस्त्यावरच उभी असतात. त्याचबरोबर अनेक रस्त्यावर बेवारसपणे वाहने पडून आहेत. या सर्वाचा परिणाम वाहतुकीवर होतो. दाभोळकर चौक, स्टँड परिसर, गंगावेश, लक्ष्मीपुरी, सासने ग्राउंड, ताराराणी चौक, महाद्वार रोड, मिरजकर तिकटी, लिशां हॉटेल चौक अशा सर्वच ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. यातून मार्ग काढण्यासाठी वाहनधारकांना शिस्त लावण्याबरोबर महापालिकेने खुल्या जागांचा वापर वाहनतळासाठी केला पाहिजे. तसेच पार्किंग बंद केलेल्यांवर कारवाईचा बडगा उगारला पाहिजे. त्यासाठी आयुक्तांनी केवळ आदेश न देता त्यांना प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे लक्ष द्यावे लागेल. तरच शहरात निर्माण होणारी वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल.

बंदिस्त पार्किंग प्रमुख ठिकाणे

मध्यवर्ती प्रशासकीय इमारत

महालक्ष्मी मंगल कार्यालय

खरे मंगल कार्यालय

हॉटेल पर्ल

पार्थना हॉटेल

दैवज्ञ बोर्डिंग

महालक्ष्मी चेंबर्स

धैर्यप्रसाद मंगल कार्यालय

बँक ऑफ इंडिया

जुन्या इमारतींचा जटील प्रश्न

५० वर्षांपूर्वी शहराची आकार मर्यादित होता. तसेच वाहनांची वर्दळही कमी होती. कमी वाहतूक असणाऱ्या मार्गांवर व्यवसायाच्या दृष्टीने अनेक इमारती उभा राहिल्या. सद्य:स्थितीत हे सर्व मार्ग अत्यंत रहदारीचे बनले आहेत. वाहनांची संख्या वाढलेली असतानाच या इमारतींचे स्वतंत्र पार्किंग नसल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. अशा जुन्या इमारतींसाठी महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिस स्वतंत्र धोरण अ‌लंबत आहेत. प्रत्यक्ष धोरणाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची फलनिष्पती दिसून येईल.

व्यावसायिक इमारतींमधील पार्किंग गायब झालेले असतानाच तेथील सार्वजनिक वापराचे साहित्यही अडगळीत पडले आहे. अशा इमारतींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी दहा कनिष्ठ अभियंत्यांची नियुक्ती केली आहे.

नारायण भोसले, उपरचनाकार, नगररचना विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माध्यमिक कर्मचारी-शिक्षक संघातर्फे पुरस्कारांची घोषणा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कोल्हापूर जिल्हा माध्यमिक कर्मचारी व शिक्षक संघातर्फे जीवन गौरव, गुणवंत कार्यकर्ता व सेवा गौरव विशेष पुरस्काराची घोषणा करण्यात आली. संघटनेच्या निवड समितीने कॉम्रेड सुशिला कुलकर्णी जीवन गौरव पुरस्कार सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते प्राचार्य अच्युतराव माने यांना जाहीर केला आहे. रविवारी (ता. १) दुपारी एक वाजता शाहू स्मारक भवन येथील मिनी हॉल येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

संघटनेतर्फे अन्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये कॉम्रेड एम. एम. गळदग गुणवंत कार्यकर्ता पुरस्कार भुदरगड तालुक्यातील संघटनेचे कार्यकारिणी सदस्य एम. एस. मोरस्कर यांना घोषित केला. संघटनेच्या सेवानिवृत्त कार्यकर्त्यांना दिला जाणारा सेवा गौरव विशेष पुरस्कार जयसिंगपूर येथील बळवंतराव झेले हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक एफ. वाय. कुंभोजकर, इंदूमती गर्ल्स हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका आशालता लाटकर यांना जाहीर झाला आहे. 'सुटा'संघटनेचे सहकार्यवाह प्रा. डॉ. सुभाष जाधव हे प्रमुख पाहुणे तर शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार आहे. नागरिकांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष एम. एच. तेलवेकर, कार्याध्यक्ष व्ही. जी. पाटील, सचिव राजू बरगे, खजिनदार ए. एस. पाटील यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रविवारी वर्धापनदिन

$
0
0

कोल्हापूर: बी. एस. एफ. एक्स सर्व्हस मेन वेलफेअर असोसिएशनतर्फे रविवारी (ता.१) सीमा सुरक्षा दलचा ५४ वा वर्धापन साजरा होणार आहे. याप्रसंगी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. भगवती मंगल कार्यालय गोकुळ शिरगाव येथे सकाळी दहा वाजता कार्यक्रम होणार आहे. एक डिसेंबर १९६५ रोजी सीमा सुरक्षा दलची स्थापना झाली आहे. वर्धापनदिनाचे औचित्य साधून असोसिएशनचा वार्षिक मेळावा आयोजित केला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील सभासदांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. सरोळेंना बडतर्फ करा

$
0
0

कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी लता सरोळे यांना एकाच कालावधीत दोन सरकारी आरोग्य संस्थेकडून पगार घेऊन सरकारची फसवणूक केली आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन बडतर्फ करावे, या आशयाचे निवेदन काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय पाटील यांनी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांना दिले. आडसूळ यांनी हा गंभीर प्रकार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या मार्गदर्शनानुसार चौकशी समिती नेमून या प्रकाराची तत्काळ चौकशी करू.'असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हा ग्रंथालय कार्यालय ‘बेघर’

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर

येथील जिल्हा ग्रंथालय कार्यालयासाठी स्वमालकीची इमारत नसल्याने ते गेल्या २२ वर्षांपासून बेघर असल्याच्या स्थितीत आहे. यामुळे भाड्याच्या इमारतीमधील कार्यालयातील मोफत अभ्यासिकेत अभ्यास करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थीनींची गैरसोय होत आहे. विद्यार्थी आणि वाचकांसाठी आता असलेली ३३ हजार ५०० पुस्तके ठेवण्यासाठी जागा नाही. परिणामी त्यांनी नवी पुस्तक, ग्रंथ खरेदी बंद केली आहे. कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी सुसज्ज जागा नसल्याने प्रशासकीय कामकाज करतानाही अडचणी येत आहेत.

राजारामपुरीतील ११ व्या गल्लीतील श्रीराम निवास येथे भाड्याच्या इमारतीमध्ये जिल्हा ग्रंथालय कार्यालय आहे. कार्यालयाची स्थापना झाल्यापासून म्हणजे ७ ऑगस्ट १९९७ पासून भाड्याच्या इमारतीमधूनच त्यांचे कामकाज चालते. भाड्यापोटी आतापर्यंत सरकारचे अर्धा कोटींवर खर्च झाले आहेत. तरीही स्वतंत्र जागा देऊन स्वमालकीची इमारत बांधण्यासाठी सरकारकडून मंजुरी मिळत नसल्याचे चित्र आहे. ग्रंथालय इमारतीसाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्तीचा अभाव प्रकर्षाने जाणवतो आहे.

भाड्याच्या इमारतीमधील जागा अपुरी पडत आहे. कार्यालयातील अभ्यासिकेतील प्रवेश मोफत आहे. यामुळे दिवसेंदिवस येथे अभ्यासासाठी येणाऱ्या गरीब, सामान्य कुटुंबांतील विद्यार्थी, विद्यार्थींनीची संख्या वाढते आहे. येणाऱ्या सर्वांना बसण्यासाठीची बैठक व्यवस्था तोकडी पडत आहे. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठीची काही पुस्तके, संदर्भग्रंथ प्रत्येक वर्षी नवी घ्यावी लागतात. नव्याने घेतलेली पुस्तके ठेवण्यासाठी जागा नसल्याने त्याची खरेदीच बंद केली आहे. त्याचा फटका अभ्यासिकेतील विद्यार्थी, विद्यार्थींना बसत आहे.

कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी आणि दैनंदिन कामकाजासाठीच्या फाईल्स ठेवण्यासाठी जागा कमी पडत आहे. अभ्यागतांना उभे राहूनच प्रतीक्षा करावी लागते. अपुऱ्या जागेअभावी कोंबड्याच्या खुराड्याप्रमाणे कार्यालयातील अंतर्गंत रचना झाली आहे. बाह्यरूपही अडगळीचे आहे. नवख्या वाचकांना तर हे कार्यालय सापडतच नाही. ११ व्या गल्लीत विचारल्यानंतरही अनेकजणांना नेमकेपणाने पत्ता सांगता येत नाही. कार्यालय शोधण्यातच नव्याने जाणाऱ्यांचा वेळ वाया जातो. दरम्यान, कार्यालयाबाहेर अधिकारी, कर्मचारी, कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांची वाहने पार्क करण्यासाठी बाहेरही जागा नाही. वाहने रस्त्याकडेला लावल्यानंतर वाहतुकीस अडथळा होतो. शेजारी राहणाऱ्या रहिवाशांकडून आक्षेप घेतला जातो. यातून वादावादीचे प्रसंग उदभवत आहेत. यामुळे एकाच छताखालील जिल्हा ग्रंथालय कार्यालय, अभ्यासिका, वाचन कक्ष, महिला वाचन कक्ष, बाल विभाग वेगळे करण्यासाठी स्वमालकीच्या इमारतीसाठी शहरात दोन एकर जागा मिळावी, अशी मागणी जिल्हा ग्रंथालय प्रशासनाची आहे.

.......

३३ हजार ५००

जिल्हा ग्रंथालयातील पुस्तक संख्या

......

अधिकारी, कर्मचारी संख्या मंजूर

......

कार्यरत कर्मचारी

..........

६८३

जिल्ह्यातील ग्रंथालयांची संख्या

.............

चौकट

वर्गनिहाय जिल्ह्यातील ग्रंथालयांची आणि कंसात पुस्तकांची संख्या अशी : अ : २१ (४५००३), ब : ९३ (१५००३), क : ३३६ (२००२), ड : २३३ (३०१).

...

कोट

' जिल्हा ग्रंथालय कार्यालय बांधकामासाठी शहरात जागा मिळण्यासंबंधीचा प्रस्ताव सरकारकडे अनेकवेळा पाठवला आहे. जिल्हा प्रशासनाकडेही जागेची मागणी केली आहे. मात्र ती मिळाली नसल्याने स्वमालकीची इमारत बांधणे शक्य झाले नाही. भाड्याची इमारत असल्याने कार्यालयासाठी पुरेशी जागा नाही.

अपर्णा वाईकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधानसभेलाउमेदवारांकडून पावणे सात कोटींचा खर्च

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानसभा निवडणूक रिंगणातील १०६ उमेदवारांनी नुकताच निवडणूक खर्च सादर केला. जिल्ह्यातील सर्व उमेदवारांनी एकूण ६ कोटी ७० लाख ८ हजार ७२० रूपये अधिकृतपणे खर्च केल्याचे दाखवले आहे. प्रत्यक्षात यापेक्षा अनेक पटीने खर्च झाला आहे.

निकाल लागल्यानंतर एक महिन्यांनी प्रचाराचा खर्च निवडणूक आयोगाकडे देणे बंधनकारक होते. त्यानुसार रिंगणातील सर्व उमेदवारांनी झालेला खर्च निवडणूक प्रशासनाकडे दिला आहे. सर्वच उमेदवारांनी आयोगाच्या २८ लाख मर्यादेतच खर्च केल्याचे म्हटले आहे. त्यांनी दाखवलेल्या खर्चानुसार एकेका मतदारसंघातील खर्च अर्ध्या कोटींवर गेला आहे. सर्वाधिक खर्च शिरेाळ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी केला आहे. सर्वात कमी खर्च कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा दाखवला आहे.

यावेळी सर्वच मतदारसंघांतील लढती प्रतिष्ठेच्या बनल्या होत्या. उमेदवारांची संख्याही अधिक होती. परिणामी खर्च करण्यासाठी प्रमुख उमेदवारांनी हात सैल सोडला. निवडणूक काळात पैशाचा महापूर आला. यामुळे प्रत्येक मतदारसंघात कोटींच्या घरात खर्च झाला. मात्र उमेदवारांनी खर्च दाखवताना निवडणूक आयोग आणि प्रशासनाच्या नियमातून पळवाट काढून प्रत्यक्ष केलेल्या खर्चापेक्षा कमी खर्च दाखवला. मतदारसंघनिहाय दाखवलेला एकूण खर्च एकत्रित केल्यास तो तब्बल पावणे सात कोटींवर गेला आहे.

........

उमेदवार आणि खर्च

मतदारसंघनिहाय रिंगणातील उमेदवारांची संख्या आणि त्यांनी दाखवलेला एकूण खर्च कंसात : चंदगड : १४(८२ लाख २६ हजार ६२८), राधानगरी : १२ (७३ लाख ९० हजार ४५२), कागल : ६ (५७ लाख ७५ हजार ६७), कोल्हापूर दक्षिण : ८ (४४ लाख १० हजार ३९२), करवीर : ८ (४५ लाख ९२ हजार ७३७), कोल्हापूर उत्तर : ८ (४५ लाख ९० हजार ४५४), शाहूवाडी : ११ (५८ लाख ३५ हजार १५७), हातकणंगले : १६ (७२ लाख ३७ हजार ३६२), इचलकरंजी : १४ (८८ लाख ९२ हजार ७७७), शिरोळ : ९ (१ कोटी ५ लाख ७ हजार ६९४).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओपन जीमवरुन अधिकारी धारेवर

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

ओपन जीमच्या प्रलंबित कामावरुन बुध‌वारी महिला व बालकल्याण समितीच्या सभेत अधिकाऱ्यांना सदस्यांनी धारेवर धरले. निधी असताना कामात हयगय का? असा संतप्त सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना केला. अध्यक्षस्थानी सभापती अनुराधा खेडकर होत्या. सभेत शालेय विद्यार्थ्यांच्या मोफत केएमटी प्रवासासाठी देण्यात येणाऱ्या सवलतीच्या रकमेला मंजुरी देण्यात आली.

समितीकडून ओपन जीमच्या कामासाठी निधी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणची कामे प्रलंबित राहिली आहेत. अशीच स्थिती शाळेतील बोलक्या भिंतीबाबत झाली असल्याचे निदर्शनास आणून देत सदस्यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. सभेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लेखी स्वरुपात देण्याची मागणी सदस्यांनी केली. त्यानंतर सभापती खेडकर यांनी २०१९-२० आर्थिक वर्षात महिला व बालकल्याण समितीसाठी किती तरतूद केली आहे. तरतुदीनुसार आतापर्यंत झालेल्या खर्चाचा तपशील सदस्यांना लेखी स्वरुपात द्या असे आदेश त्यांनी दिले. महापालिकेच्या शिक्षण मंडळ आणि राजमाता जिजाबाई हायस्कूल शाळांमधील विद्यार्थ्यांना केएमटी बसमधून मोफत प्रवासाची सुविधा दिली जाते. त्यासाठी देण्यात येणाऱ्या सवलतीच्या रकमेला सभेत मंजुरी देण्यात आली. समितीच्या बजेटमधून पंचगंगा व सावित्रीबाई फुले हॉस्पिटल निधी देण्यात आला आहे. त्या निधीतून झालेल्या कामाची यादी आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी सभेत सादर केली.

सभेस उपसभापती छाया पोवार, शोभा कवाळे, सीमा कदम, अश्विनी बारामते, मनीषा कुंभार, जयश्री चव्हाण, मेहजबीन सुभेदार, उपआयुक्त धनंजय आंधळे, नगरसचिव दिवाकर कारंडे, उपशहर रचनाकार एन. एस. पाटील, वैद्यकीय अधिकारी प्रकाश पावरा, डॉ. विद्या हेरवाडे (काळे), कनिष्ठ अभियंता चेतन अरमाळ आदी उपस्थित होते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचगंगा घाट सुशोभिकरणाला ब्रेक

$
0
0

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet:satishgMT

कोल्हापूर

पुरातत्व विभागाच्या ब्रह्मपुरी साईटच्या जागेची आखणी होत नाही तोपर्यंत पंचगंगा घाट संवर्धन, पुनर्बांधणी व सौंदर्यीकरणाच्या प्रकल्पाला परवानगी देता येणार नसल्याचे केंद्रीय पुरातत्व विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे चार कोटी २८ लाख रुपयांचा निधी परत जाण्याची शक्यता आहे.

भाजप शिवसेना युतीच्या कालावधीत तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शहरात नवीन पर्यटनस्थळ विकसित होण्याच्या हेतूने या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला. २८ कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून राज्य सरकारने पहिल्या टप्प्यातील कामास प्रशासकीय मंजुरी दिली आहे. त्यासाठी चार कोटी २८ लाख रुपये मंजूर झाले आहेत. २०१८ मध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ झाला. पहिल्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, दगडी प्रवेशद्वार, उद्यान विकसित करण्यात येणार आहे. दोन वर्षांत पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला होता. या प्रकल्पात दगडांचा वापर करण्यात येणार होता. त्यासाठी ठेकेदारांनी पायासाठी खड्डेही खोदले होते.

प्रकल्पाचे काम ब्रह्मपुरी या पुरातन साईटच्या जवळ असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकल्पाला परवानगी मिळावी यासाठी राज्य पुरातत्व विभागाकडे प्रस्ताव पाठवला. परवानगी मिळण्याची शक्यता असताना शहरातील हेरिटेजसंबंधी काम करणाऱ्या काही तज्ज्ञांनी या विभागाकडे तोंडी तक्रार केली. त्यामुळे या खात्यातील अधिकाऱ्यांनी कोल्हापुरात येऊन प्रकल्पाच्या ठिकाणी भेट दिली. या प्रकल्पाला राज्य पुरातत्व विभाग परवानगी देऊ शकत नाही, असे सांगून केंद्रीय पुरातत्व विभागाकडे परवानगीसाठी प्रस्ताव पाठवला आहे. पण त्यांच्याकडून परवानगी न मिळाल्याने ठेकेदाराने पायासाठी खोदाई केलेले खड्डे बुजवले आहेत.

पर्यायी शिवाजी पूल बांधकामाला परवानगी देताना ब्रह्मपुरी उत्खननाचे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. पण या जागेचे भूसंपादन व स्थान कागदोपत्री निश्चित झालेले नाही. त्यामुळे प्रकल्पापसून ब्रह्मपुरी साइटचे ठिकाण १०० फुटाच्या पुढे असण्याची गरज आहे. जोपर्यंत ब्रह्मपुरी उत्खनन क्षेत्र निश्चित होत नाही तोपर्यंत प्रकल्पाला परवानगी मिळण्यात अडचणी येणार आहेत. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत.

पर्यावरणाला पूरक असा हा प्रकल्प असताना काही तज्ज्ञ मंडळी या प्रकल्पात खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत. याच परिसरात १९७२ मध्ये तत्कालीन प्रशासक द्वारकानाथ कपूर यांनी ब्रह्मपुरीवर पिकनिक पॉईंटची उभारणी केली. ब्रह्मपुरी साईटच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू असताना तज्ज्ञ मंडळी दुर्लक्ष करत आहेत. पण कोट्यवधी रुपयांच्या कामाच्या प्रसंगी तज्ज्ञ मंडळी खोडा घालत असल्याने हा प्रकल्प गुंडाळण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

...

असा आहे २८ कोटींचा प्रकल्प

प्रकल्पाचे डिझाइन ब्रह्मपुरी पिकनिक पॉईंट, पंचगंगा नदीचे प्रदूषण या सर्व गोष्टींचा अभ्यास करून तयार केले आहे. ब्रह्मपुरी पिकनिक पॉईंटचा खालील भाग, शिवाजी पूल, दशपिंड घाटापर्यंत नवीन दगडी घाटाचे नियोजन केले आहे. दगडी पायऱ्यांचे घाट व कमानीच्या देवळी अशी रचना केली आहे. पुराचे पाणी देवळ्यांमध्ये खेळून पुन्हा नदीत येणार असल्याने पुराचा धोकाही कमी होणार आहे. ब्रह्मपुरी पिकनिक पॉईंटच्या खालील बाजूने एक नव्याने उद्यान विकसित करण्यात येणार आहे. ब्रह्मपुरी पिकनिक पॉईंट, नवीन उद्यान, देवळी व घाटाकडे जाण्यासाठी जिने व रस्ते तयार केले जाणार आहेत. ब्रह्मपुरी पिकनिक पॉईंटवरून अधिक उंचीवरून सूर्यास्त पाहता यावा यासाठी ४० फूट उंचीच्या सनसेट पॉईंटचा प्रकल्पात समावेश आहे.

...

कोट

'प्रकल्पाच्या परवानगीसाठी राज्य पुरातत्व आणि केंद्रीय पुरातत्व विभागाकडे परवानगी मागितली आहे. पण ब्रम्हपुरी साईटचे स्थान निश्चित झाले नसल्याने परवानगी देता येणार नाही, असे राज्य पुरातत्व विभागाने कळवले आहे. ब्रह्मपुरी साईटचे स्थान निश्चित झाल्यावर परवानगी मिळेल.

धनंजय भोसले, उपअभियंता, सा. बां.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँक अध्यक्ष बदलाची चर्चा

$
0
0

बॅंक फाइल फोटो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची दाट शक्यता असल्याने त्यांच्या जागी नवीन अध्यक्षांची नियुक्ती होण्याची चर्चा सहकार वर्तुळात सुरू झाली आहे. आमदार पी.एन. पाटील, प्रताप उर्फ भैय्या माने, अर्चना पाटील यांच्या नावांची अध्यक्षपदासाठी चर्चा सुरू झाली आहे.

२०१४ मध्ये युती सरकार अस्तित्वात आल्यावर बँकेवरील प्रशासक राजवट मागे घेण्यात आली. त्यानंतर बँकेवर संचालक मंडळ अस्तित्वात आले. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, जनसुराज्यच्या नेत्यांनी काही जागा वगळता संचालक मंडळांची निवडणूक बिनविरोध केली. बँकेवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा वरचष्मा असल्याने अध्यक्षपदी आमदार हसन मुश्रीफ यांची तर उपाध्यक्षपदी अप्पी पाटील यांची निवड झाली. गेली साडेचार वर्षे आमदार मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने बँकेचा उत्तम कारभार करत बँक नफ्यात आणली आहे.

ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूक झाल्यानंतर राज्यात वेगवान घडामोडी होऊन शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. मंत्रिमंडळात हसन मुश्रीफ यांची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हा बँकेची सात हजार कोटी रुपयांची उलाढाल आहे. मंत्रीपद आणि बँकेचा कारभार सांभाळताना निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन बँकेवर नवीन अध्यक्षांची निवड होईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. सध्या बँकेत राष्ट्रवादीचे बहुमत असले तरी त्यांच्याकडे अध्यक्षपदासाठी सक्षम संचालक नसल्याचे चित्र दिसून येते. मुश्रीफ यांचे कट्टर समर्थक संचालक भैय्या माने यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. पण त्यांचा संचालकपदाचा अनुभव पाहता बँकेचा कारभार त्यांच्याकडून व्यवस्थित चालवला जाईल का, अशी शंका व्यक्त केली जात आहे. विधानसभा निवडणुकीत राधानगरी मतदारसंघात माजी आमदार के.पी.पाटील यांना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील यांनी पाठिंबा द्यावा यासाठी नेते मंडळींनी प्रयत्न केले होते. त्यामध्ये ए.वाय. यांना जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची संधी देण्याचा तोडगा निघाला होता. या तोडग्यानुसार ए.वाय. गटाला अध्यक्षपद मिळू शकते. पण ते बँकेचे संचालक नसल्याने त्यांची पत्नी अर्चना पाटील यांना अध्यक्षपदाची संधी मिळू शकते, असे गणित मांडले जात आहे. पण विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार के.पी. पाटील पराभूत झाल्याने त्यांचा ए.वाय. यांना विरोध होण्याची दाट शक्यता आहे.

...

चौकट

सहा महिन्यांवर बँकेची निवडणूक

राज्यातील महाविकास आघाडीत काँग्रेसही असल्याने बँकेत काँग्रेसला अध्यक्षपदासाठी वाटा द्यावा, अशी मागणी होण्याचीही शक्यता आहे. आमदार पी.एन. पाटील अध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार ठरु शकतात. त्यांना श्रीपतराव बँक, भोगावती कारखान्याचा अनुभव असल्याने त्यांचे नाव आघाडीवर आहे. पण त्यांच्या नावाला राष्ट्रवादीकडून होकार मिळणार का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. अध्यक्षपदासाठी सहमती होत नसल्याने मुश्रीफच अध्यक्ष कायम राहतील अशा दावाही मुश्रीफ गटाकडून केला जात आहे. बँकेची निवडणूक सहा महिन्यांवर असल्याने मुश्रीफांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवावी लागणार असल्याने अध्यक्ष बदल होणार नाही असेही बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठा आजपासून सुरळीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चंबुखडी टाकीजवळ शिंगणापूर योजनेच्या जलवाहिनीला लागलेली गळती काढण्यास रात्री उशीरा महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाला यश आले. दुरुस्तीमुळे 'ई' वॉर्डातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद होता. त्या भागातील नागरिकांना टँकरच्या १६ फेऱ्यांद्वारे पिण्याचे पाणी वितरित करण्यात आले. आजपासून या भागात नियमित पाणीपुरवठा सुरू होईल. सोमवारी (ता. २) बालिंगा पंपिंग स्टेशन ते चंबुखडी संतुलन टाकीकडे जाणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर वॉशआउट व्हॉल्व्ह बसवण्यात येणार आहे. त्यामुळे ए, बी, आणि सी, डी वॉर्डातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

शिंगणापूर योजनेतून कसबा बावडा फिल्टर हाऊसकडे पाणी वितरित करताना चंबुखडी येथील टाकी ओव्हर फ्लो होत होती. त्यामुळे पाण्याची नासाडी होत असल्याने टाकीचा इन व आउटचा डिस्चार्ज वाढवण्यात येणार होता. त्यासाठी शुक्रवारी 'ई' वॉर्डातील बावडा परिसर, ताराबाई पार्क, नागाळा पार्क, शिवाजी पार्क, सदर बझार, कदमवाडी, रुईकर कॉलनी, जाधववाडी, बापट कॅम्प परिसरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता.

जलवाहिनीतील संपूर्ण पाणी वितरण बंद झाल्यानंतर सकाळी ११ वाजता दुरुस्तीला सुरुवात झाली. नऊ कर्मचाऱ्यांनी दुरुस्ती केल्यानंतर रात्री उशीरापर्यंत वेल्डिंगचे काम सुरू होते. दुरुस्तीदरम्यान चंबुखडी टाकी संपूर्ण वॉश आउट करण्यात आली. दुरुस्तीच्या काळात पाणीपुरवठा बंद असलेल्या ठिकाणी टँकरद्वारे पाणी वितरित केले. सदर बझार, कनाननगर, लक्ष्मीपुरी, सानेगुरुजी, कसबा बावडा, टेंबलाई मंदिर परिसर, शिवाजी पार्क, लाईन बझार आदी ठिकाणी १६ टँकरच्या फेऱ्या झाल्या. उपजलअभियंता राजेंद्र हुजरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठेकेदार अभिजित किल्लेदार यांनी काम पूर्ण केले.

दरम्यान, बालिंगा पंपिंग स्टेशन ते चंबुखडी संतुलन टाकीकडे जाणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर वॉशआउट व्हॉल्व्ह शुक्रवारी बसवण्यात येणार होता. एकाचवेळी पाणीपुरवठा बंद ठेवावा लागू नये, यासाठी वॉशआउट व्हॉल्व्हचे काम सोमवारी (ता.२) करण्यात येणार आहे. दुरुस्तीमुळे ए, बी, आणि सी, डी, वॉर्डातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका लागली कामाला

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या काही महिन्यांपासून थंड पडलेल्या महापालिका प्रशासकीय यंत्रणेने शुक्रवारपासून वेग घेतला. सातत्याने होणाऱ्या आंदोलनानंतर तातडीने निविदा प्रक्रिया राबवत पॅचवर्कच्या कामाला सुरुवात झालेली असतानाच नवीन रस्ते डांबरीकरणाच्या कामालाही प्रारंभ झाला. तर कसबा बावडा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील साचलेल्या कचऱ्यावर उपाय शोधण्यासाठी तज्ज्ञांसह आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पाहणी केली. स्वच्छता अभियानानंतर प्रथमच महापालिकेची यंत्रणा गतिमान झाल्याचे शुक्रवारी शहरवासियांना पाहण्यास मिळाली. कामाचा वेग आणि उरक असाच रहावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

अतिवृष्टी आणि त्यानंतर आलेल्या महापुरानंतर शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. हाडे खिळखिळी करणाऱ्या रस्त्यावरुन वाहन चालवताना वाहनधारक मेटाकुटीला येत आहेत. सोबत वाहतूककोंडीही होत असल्याने शहरवासियांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या असंतोषामुळे महापालिका प्रशासनाविरोधात दररोज आंदोलने होत आहेत. आंदोलनाची दखल घेत पंधरा दिवसांपूर्वी महापालिकेच्यावतीने पॅचवर्कच्या कामाला सुरुवात केली. पण तेही निकृष्ट दर्जाचे होत असल्याने संतापात अधिकच भर पडली. त्याची दखल घेत आयुक्त, महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर, उपमहापौर संजय मोहिते व स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी बैठक घेवून तातडीने रस्ते दुरुस्ती करण्याची सूचना केली. त्यासाठी शॉर्ट टेंडर प्रक्रिया राबवण्याची सूचना केली. त्यानंतर प्रत्येक विभागीय कार्यालयाच्यावतीने एका रस्त्यांच्या पॅचवर्क कामाला सुरुवात झाली. तसेच तीन वर्षाच्या आत खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी संबंधित ठेकेदारांना नोटिसा दिल्या आहेत.

खराब रस्त्यांची दुरुस्ती सुरू असताना प्रादेशिक परिवहन कार्यालय ते पितळी गणपती व पितळी गणपती ते रमणमळा चौकापर्यंतच्या नवीन डांबरीकरणाच्या कामाला प्रारंभ झाला. प्रभारी शहर अभियंता हर्षजीत घाटगे, आर्किटेक्ट असोसिएशन ऑफ इंजिनिअर्सचे अध्यक्ष अजय कोराणे यांच्यासमवेत आयुक्तांनी कामाची पाहणी केली. रस्ते दर्जेदार करण्याची सूचना त्यांनी संबंधित ठेकेदारांना दिली.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कसबा बावडा घनकचरा प्रकल्पावरील कचरा वारंवार पेट घेत आहे. धुराचे लोट आणि कुजण्याच्या प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण होत आहे. मानवी शरीराला घातक अशा वायू उत्सर्जनामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वारंवार पेटणाऱ्या कचऱ्यावर एसटीपी प्लांटमधील पाण्याचा फवारा मारला जात आहे. पण हे प्रयत्न तकलादू ठरत आहेत. पर्यावरणप्रेमींनी याविरोधात आवाज उठवल्यानंतर महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्र विभागाच्यावतीने वायू उत्सर्जन व धुलीकरणाचा अभ्यास करण्यासाठी मशीन कार्यन्वित केली आहे. शुक्रवारी आयुक्तांनी प्रदूषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, विद्यापीठाच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख डॉ. पी. डी. राऊत, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड यांनी कचरा प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी त्यांनी तात्पुरत्या आणि दीर्घकालीन उपाययोजनांबाबत प्रकल्पस्थळी चर्चा केली. बायोमायनिंग प्रकल्प कार्यन्वित झाल्यानंतर धुरापासून परिसराची सुटका होईल. तसेच कचरा प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता वाढवण्याची सूचना आयुक्तांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


८५ केबिनवर हातोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रंकाळा तलाव परिसरातील अंबाई टँक ते हरिओम नगर रस्त्यावरील ८५ केबिनवर शुक्रवारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने हातोडा मारला. फिरस्त्यांची गर्दी असताना सायंकाळी अचानक केलेल्या कारवाईमुळे फेरीवाल्यांनी विरोध केल्याने तणाव निर्माण झाला. मात्र पोलिस बळाचा वापर करत अतिक्रमण निर्मूलन पथकाने विरोध मोडीत काढत केबिन जप्त केल्या.

रंकाळ्याला अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. तलाव परिसराचे मोठ्या प्रमाणात विद्रुपीकरण होत आहे. त्यातच हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या असलेल्या केबिन्स आता शेकड्यावर गेल्या आहेत. राजकीय पुढारी आणि गुंडांच्या वरदहस्तामुळे आता वादावादी आणि हल्ल्याचे प्रकारही वाढले आहेत. त्यातूनच बुधवारी येथे हल्ल्याचा प्रकार घडला. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शुक्रवारी तातडीने हालचाली केल्या आणि अनधिकृत केबिन्स हटवण्याची मोहीम आखली. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिलेल्या कारवाईचे आदेशानंतर सायंकाळी महापालिका यंत्रणा पोलिस बंदोबस्तात दाखल झाली.

जेसीबी, मशीन, ट्रॅक्टर, डंपर कर्मचारी आणि बंदोबस्तासह सुमारे ५० कर्मचाऱ्यांचे पथक अंबाई टँक परिसरात दाखल झाले. इराणी खणीपासून कारवाईला सुरुवात केल्यानंतर फेरीवाल्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाने पोलिसांची मदत घेतली. बळाचा वापर सुरू केल्यानंतर फेरीवाल्यांचा विरोध मावळला.

.. .. ...

रहदारीला किंवा रस्त्यावर केलेल्या अतिक्रमणावर सातत्याने कारवाई केली जाईल. कारवाईदरम्यान विरोध झाल्यास पोलिसबळाचा वापर करण्यात येईल. शहरातील सर्व रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट राहणार आहे.

पंडित पोवार, अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख

.. .. ..

कागदपत्रांची छाननी होणार

राजारामपुरी जनता बझार परिसरात अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाई केली. यावेळी येथील ५७ केबिन हटवल्या. केबिन हटवल्यानंतर कागदपत्रे इस्टेट विभागाला दाखवल्यानंतर केबिन बसवण्यास परवानगी देणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार येथील केवळ १७ केबिनधारकांनी आतापर्यंत कागदपत्रे सादर केली आहे. अंबाई टँक परिसरातही कारवाई करताना सरसकट केबिन हटवण्यात आल्या. त्यांनाही कागदपत्रे सादर करण्याची सूचना केली आहे. राजारामपुरीप्रमाणे येथील केबिनची संख्या कमी होणार असल्याचा दावा महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे.

.. .. .. .. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ इतिहास संशोधक आनंद कुंभार यांचे निधन

$
0
0

ज्येष्ठ इतिहास संशोधक

आनंद कुंभार यांचे निधन

सोलापूर

ज्येष्ठ इतिहास संशोधक तथा पुरातत्त्व विषयाचे गाढे अभ्यासक देवनागरी, कन्नड आणि अत्यंत अवघड असणाऱ्या हळे कन्नड या भाषेतील शिलालेखांचे वाचक आनंद कुंभार यांचे गुरुवारी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास निधन झाले आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय ७८ होते. त्यांच्या पश्चात दोन मुले दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.

त्यांची संशोधन तरंग हे मराठीतील तर इन्स्क्रिप्शन्स फ्रॉम सोलापूर डिस्ट्रिक्ट, हे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित आहे. कुंभार यांनी मराठी व कन्नडसह विविध भाषांतील शिलालेखांवर संशोधन करून अनेक ऐतिहासिक घडामोडींवर प्रकाश टाकला होता. सोलापूरजवळ हत्तरसंग येथे भीमा व सीना नदीच्या संगमावरील हजार वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या संगमेश्वर मंदिरातील मराठी शिलालेख सर्वांत प्रथम कुंभार यांनीच उजेडात आणला होता. इतिहासात मराठीतील पहिला शिलालेख कर्नाटकातील श्रवणबळगोळ येथील बाहुबली मंदिरात असल्याचा सार्वत्रिक समज होता. परंतु, हत्तरसंग येथील संगमेश्वर मंदिरातील मराठीतील शिलालेख शके ९४० कालयुक्त संवत्सर माघ शुद्ध प्रतिपदा (फेब्रुवारी १०१९) या काळात लिहिला गेला आहे. 'वांछितो विजया हाऐवा' ही मराठी भाषेतील ओळ या शिलालेखावर सापडली. मराठीत अस्तित्वात असलेला हा आजवर ज्ञात असलेला पहिलाच शिलालेख असण्यावर शिक्कामोर्तब झाले होते.

कुंभार सुरुवातीला भारतीय सैन्यात तार खात्यात सेवेत होते. औपचारिक अभ्यास नसतानाही त्यांनी आयुष्यभर इतिहासाचा व्यासंग जोपासला होता. महावितरण कंपनीत रूजू झाल्यानंतरही त्यांचा इतिहासाविषयीचा व्यासंग वाढत गेला. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. राहते घर देखील अत्यंत साधे पन्हाळी पत्र्यांचे छत असलेले होते. असंख्य ऐतिहासिक पुस्तकांचे त्यांच्या घरात भांडार होते. सुमारे सत्तर हजार दुर्मीळ पुस्तकांचा खजिना त्यांनी जतन करून ठेवला आहे. शिलालेख संशोधनातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेत शिवसेना उजळमाथ्याने ‘सत्तारुढां’सोबत

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

राज्यात स्थापन झालेल्या महाविकास आघाडीमुळे महापालिकेच्या सत्तारुढ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला शिवसेनेच्या नगरसेवकांचा उघड पाठिंबा मिळणार आहे. परिणामी प्रत्येक निवडीत संख्याबळासाठी कराव्या लागणाऱ्या धावपळीपासून त्यांची सुटका होईल. सत्तेचे समीकरण अबाधीत राहिल्यास पुढील वर्षी होणाऱ्या महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीवर त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

राज्यात सर्वत्र भाजपची सत्ता असताना महापालिकेवर मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीने विजयाचा झेंडा फडकावला. काठावरील बहुमत असल्याने शिवसेनेच्या चार नगरसेवकांना सत्तेत सहभागी करून घेतले. त्यासाठी त्यांना परिवहन समितीचे सभापतिपद देण्यात आले. मात्र नंतरही प्रत्येक महापौर निवडीत किंवा अन्य विषय समित्यांच्या सभापती निवडीवेळी त्यांना आपल्याकडे कायम ठेवण्यासाठी नेहमीच चुचकारावे लागले. महापौर निवडीवेळी कधी तटस्थ तर कधी गैरहजर राहून त्यांनी सत्तारुढ गटाला पोषक भूमिका घेतली. पण या पाठिंब्यासाठी सत्तारुढ आघाडीला नेहमीच त्यांच्या नाकदुऱ्या काढव्या लागल्या.

आता राज्यात सत्ताबदल घडल्यामुळे सेनेचे सर्व नगरसेवक उघडपणे भूमिका घेतील. त्यामुळे बहुमतासाठी करावी लागणारी धावपळ पूर्णपणे थांबेल. याचा परिणाम पुढील वर्षी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. निवडणूक पॅनेलनुसार होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास भाजप-ताराराणी आघाडीला रोखण्यासाठी महाविकास आघाडी येथेही आकाराला येईल. त्यातून सत्तेची समिकरणेच बदलण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभिनेत्री उषा जाधव यांचा इफ्फीत सन्मान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मोजक्या पण वेगळ्या धाटणीच्या सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्री उषा जाधव यांना 'माई घाट: क्राईम नं. १०३/२००५' या मराठी सिनेमासाठी उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने गौरवण्यात आले. गोवा येथे झालेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाच्या (इफ्फी) व्यासपीठावर उषा यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रौप्य मयूर, प्रमाणपत्र आणि दहा लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. उषा जाधव या मूळच्या कोल्हापूरच्या असून त्यांच्या शालेय व महाविद्यालयीन शिक्षणासह अभिनयाचा श्रीगणेशा कोल्हापुरात झाला आहे.

'माई घाट: क्राईम नं. १०३/२००५' या मराठी चित्रपटातील प्रभा माईन या व्यक्तिरेखेसाठी उषा जाधव यांना सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. भ्रष्टाचारी व्यवस्थेविरोधात आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी एका आईने पुकारलेला लढा या चित्रपटात आहे. आठ देशांतील चौदा चित्रपटांतून पहिल्या सहामध्ये निवड झाल्यानंतर 'सर्वोत्कृष्ट चित्रपट', 'संकलन' व 'छायाचित्रण' असे पहिल्या श्रेणीतील तीन महत्वाचे पुरस्कार पटकावून बाजी मारलेला आजपर्यंतचा हा एकमेव मराठी चित्रपट आहे. यापूर्वी कोणत्याही मराठी चित्रपटाला हा सन्मान मिळालेला नाही. यापूर्वी 'धग' या सिनेमासाठी उषा जाधव यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुळीक यांचा सत्कार करणार

$
0
0

६३९ अर्जुन टाकळकर यांचा फोटो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी वसंतराव मुळीक यांची निवड झाल्याबद्दल सर्व समाज व संघटनांच्या माध्यमातून जाहीर सत्कार करण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यामध्ये मराठा स्वराज्य भवन बांधण्याचा निर्धारही करण्यात आला.

शाहू स्मारक भवनमध्ये झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सी. एम. गायकवाड होते. यावेळी शशिकांत पाटील म्हणाले, 'मराठ्यांच्या राजधानीत शोभेल असा सत्कार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते करण्याचा मानस आहे. त्याचबरोबर शहराबरोबर तालुकानिहाय नवीन पदाधिकारी निवडी व नवीन शाखाचे नियोजन करण्यात येणार आहे.' जिल्हा संघटक रवी पाटील यांनी नवीन पदाधिकारी निवडी मुळीक यांच्या विचारानेच झाल्या पाहिजेत असे सुचवले. महिला जिल्हा अध्यक्षा शैलजा भोसले यांनी, राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मुळीक यांचा नागरी सत्कार करावा असे मत मांडले. शहर उपाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी, मराठा महासंघाचे सभासद वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे सांगितले. शहर कार्याध्यक्ष उत्तम जाधव म्हणाले, वसंतराव मुळीक यांचा सत्कार मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे. चांदीची तलवार देऊन त्यांचा गौरव करण्यात यावा. संदीप देसाई यांनी मुळीक यांचा सत्कार नुसत्या एका जातीचा न ठेवता राजर्षी शाहू सलोखा मंचच्या माध्यमातून करावा. गेल्यावर्षीप्रमाणे राजर्षी शाहू मराठा महोत्सव यंदाही घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

जिल्हा संघटक मिलिंद ढवळे पाटील यांनी हातकणंगले तालुक्यातून गाव तिथे शाखा काढण्यात येणार आहे. सध्या २५ शाखांचे नियोजन झाल्याचे सांगितले. हातकणंगले तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील म्हणाले, गाव तिथे शाखा व घर तेथे सभासद करणारच असा कार्यकर्त्यांनी निर्धार केला आहे. यावेळी सुनील पाटीलनिलम मोरे, महादेव जाधव, विजयसिंह पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अवधूत पाटील यांनी स्वागत केले. शिरीष जाधव यांनी आभार मानले. बैठकीस अनंत म्हाळुंगेकर, महादेव पाटील, रणजित आयरेकर, नितीन पाटील, प्रा. विद्या साळोखे, आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images