Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

टोलबाबत ‘राष्ट्रवादी’ चा घरचा आहेर

$
0
0
महाराष्ट्रातील ज्या नगरपालिका सक्षम आहे व शहरांर्तगत टोल आहे, अशा नगरपालिकांचा ठराव करून त्यांना सरकार मदत करणार असल्याचे सुत्रांकडून समजल्यानंतर कोल्हापूर पाठोपाठ सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बुधवारी टोल विरोधात सरकारला घरचा आहेर दिला आहे.

२७ वाळू ठिय्यांना साताऱ्यात मंजुरी

$
0
0
वाळू ठिय्यांचे लिलाव होऊनही केवळ पर्यावरण विभागाची मंजुरी नसल्याने लिलाव घेणाऱ्यांना नदीपात्रातून वाळू उचलता येत नव्हती. मात्र, नुकत्याच झालेल्या बैठकीत पर्यावरण विभागाने लिलाव झालेल्यांपैकी २७ ठिय्यांना मंजुरी दिली आहे.

लोकसभेसाठी रायगडमधून लढू

$
0
0
‘दोन्ही काँग्रेसमध्ये मतदारसंघांची अदलाबदल होऊन रायगड लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादीला मिळाल्यास आपण रायगडमधून निवडणूक लढवू,’ अशी भूमिका जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी बुधवारी पंढरपूर येथे जाहीर केली.

दगडखाण कामगारांचा कराडात मोर्चा

$
0
0
कराड तालुक्यातील दगडखाण कामगारांनी आपल्या प्रलंबीत मागण्यासांठी बुधवारी सकाळी येथील तहसीलदार कार्यालयावर खाटली, पोटली अन् ताटली मोर्चा काढला. मोर्चा तहसील कार्यालयावर आल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन निवासी नायब तहसीलदार एम. बी. गायकवाड यांना दिले.

बाह्यवळणे ठरताहेत जीवघेणी

$
0
0
सुरक्षा सप्ताह सुरू असतानाच दोन दिवसांपूर्वी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहनचालकाची चूक नसतानाही झालेल्या अपघातात नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. हा अपघात अतितीव्र वळणामुळे झाला होता. क्रुझर ट्रॅक्सला ओव्हरटेक करून जाणाऱ्या महाकाय कंटेनरला वळण नीटपणे न घेता आल्याने ही दुर्घटना घडली होती.

नगररचनातील ‘माणसे’ गेली कुठे?

$
0
0
ग्रामीण भागातील बांधकामांना परवानगी देणाऱ्या बिंदू चौकातील सहायक नगररचना कार्यालयात कोणी काम करते की नाही, असे चित्र सध्या आहे. कारण या कार्यालयातील एका विभागात नेहमी रिकाम्याच खुर्च्या पाहायला मिळतात.

खंडणी : NCP च्या पदाधिकाऱ्याला अटक

$
0
0
भाड्याने घेतलेले ट्रक परत न करता दरमहा २५ हजार रुपये खंडणी देण्याची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी माथाडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष मटकाकिंग आसिफ नसिरखान पठाण याच्यासह सात जणांना अटक केली आहे.

फाइव्ह स्टार MIDC त कारखान्याला आग

$
0
0
कागल फाइव्ह स्टार एमआयडीसीतील लक्ष्मी डोअर्स या प्लायवूडचे दरवाजे करणाऱ्या कारखान्याला आग लागली. या आगीत तयार दरवाजे तसेच शेडचे मोठे नुकसान झाले. सुमारे पंधरा लाखाहून अधिक नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

फुलेवाडी टोल नाका हटविला

$
0
0
आयआरबीने फुलेवाडी येथील टोल नाक्यावर बुधवारी ​दुपारी लावलेला बूथ कार्यकर्त्यांनी रात्री पुन्हा रस्त्यावरून हटवून शेजारील खड्ड्यात टाकला. रविवारी झालेल्या आंदोलनावेळी कार्यकर्त्यांनी तेथील बूथ काढून फेकून दिले होते. तरीही पुन्हा लावल्याने संतापलेल्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केले.

अंगणवाडी सेविकांचे प्रांत कार्यालयासमोर धरणे

$
0
0
राज्यभर सुरु असलेल्या अंगणवाडी सेविकांचे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या गडहिंग्लज शाखेच्या वतीने प्रांत कार्यालयासमोर आज एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

खासदार शेट्टी यांना अटक व सुटका

$
0
0
शिरोळ येथील श्री दत्त साखर कारखान्याच्या वार्षिक सभेनंतर २००७ साली झालेल्या गर्दी-मारामारी प्रकरणी खासदार राजू शेट्टी यांच्यासह आठजणांना शिरोळ पोलिसांनी अटक केली. तसेच प्रत्येकी १५ हजार रूपयांच्या वैयक्तिक जामीनावर सर्वांची सुटका करण्यात आली.

नाके जाळले १९ शिवसैनिकांना अटक

$
0
0
आयआरबी कंपनीचा शिरोली टोल नाका फोडल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी १९ शिवसैनिकांना बुधवारी अटक केली. टोलवसुली बंद पाडण्यासाठी शिवसैनिकांनी नाक्यावर केलेल्या हल्ल्यात ८४ लाखांचे नुकसान झाले आहे.

मित्रावर कोयत्याने वार

$
0
0
वादाचे पर्यवसान भांडणात झाल्यानंतर चिडलेल्या मित्राने जिवलग मित्राच्या मांडीवर कोयत्याने वार केला. त्यानंतर जखमी मित्राला सीपीआरमध्ये उपचारास दाखल केले.

ठरावासाठी आज महापालिकेची सभा

$
0
0
टोल रद्द करून आयआरबीला द्यायची रक्कम उभारण्याची तरतूद करण्याबाबतचा ठराव करण्यासाठी महापालिकेची विशेष सभा गुरुवारी (१६ जानेवारी) होत आहे. टोलबाबात मुंबईत झालेल्या बैठकीत ‘महापालिकेने ठराव पाठवावा, सरकार त्याचा अभ्यास करेल,’ एवढेच जुजबी आश्वान मिळाले आहे.

अन्नसुरक्षेतून लाभार्थी डावलले

$
0
0
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांच्या यादीत गरजूंऐवजी आपल्या सग्यासोयऱ्यांचा समावेश केला आहे. बड्या धेंडानाच या योजनेचा लाभ कसा होईल असे पाहिजले आहे.

विठ्ठल तो सुटला सुटला..!

$
0
0
बडवे व उत्पातांच्या कचाट्यातून पंढरीचा विठ्ठल आणि रखुमाई मुक्त झाले असून, पंढरपूर मंदिरात बडव्यांना असलेले सर्व अधिकार सुप्रीम कोर्टाच्या एका आदेशामुळे संपुष्टात आले आहेत. बडव्यांची पिढ्यानपिढ्याची मक्तेदारी संपल्याने मंदिराचे व्यवस्थापन आता मंदिर समितीकडे गेले आहे.

गावागावांत इन्शुरन्स बळकट करणार

$
0
0
‘युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून आता ग्रामीण ​आणि रिटेल क्षेत्राकडे पूर्वीपेक्षा जास्त लक्ष केंद्रित केले जाणार आहे. त्यातून हे क्षेत्र अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जातील’ अशी माहिती कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मिलिंद खरात यांनी दिली.

शाळांना नऊ कम्प्युटर भेट

$
0
0
रस्तांवर स्टेज उभारायचे, स्टेजवर मोठा डिजिटल फलक लावायचा. नेते, कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा स्वीकारायच्या. रात्री आतषबाजी व पार्टी करायची अशा जल्लोषी ​वाढदिवसाला गंगावेश रंकाळवेश पाडळकर मार्केट येथील अण्णा ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी फाटा दिला आहे.

एलबीटी रद्द न झाल्यास आंदोलन

$
0
0
राज्य सरकारने जानेवारी अखेरपर्यंत एलबीटी रद्द न केल्यास एक फेब्रुवारीपासून तिव्र आंदोलन करण्याचा निर्णय फेडरेशन ऑन असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या (फाम) बैठकीत घेण्यात आला. कोल्हापूर व्यापारी व उद्योजक महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगावकर यांनी ही माहिती दिली.

बालके, गरोदर मातांच्या आरोग्याचा प्रश्न

$
0
0
अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांसाठी गेल्या ९ दिवसांपासून पुकारलेल्या संपाचा परिणाम जाणवू लागला आहे. जिल्ह्यातील पाच हजार बालवाड्या बंद पडल्या असून बालके व गरोदर मातांशी संबंधित योजनांची अंमलबजावणी ठप्प झाल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images