Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कराडमध्ये ६१ हजारांचा गुटखा जप्त

$
0
0
कराड येथील शनिवार पेठेतील घाऊक किराणा व्यापारी ठाकूरलाल उत्तमचंद लोहाणा यांच्या मलकापुरातील बदीयाणी कॉप्लेक्समधील गोदामावर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून ६१ हजार २४० रुपयांचा गुटखा जप्त केला.

आयटीआयमध्ये वाढला दहावीचा टक्का

$
0
0
आय. टी. आय मधील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दहावी पासची पात्रता रोजगार व प्रशिक्षण महासंचालनालय निश्चित करणार आहे. किमान बारावी पात्रता असलेल्या अभ्यासक्रमांना आता दहावी पास पात्रता असलेल्या उमेदवारांना प्रवेश मिळणार आहे.

गर्भपातप्रकरणी डॉक्टरसह चौघांवर गुन्हा

$
0
0
संगनमत करून विधवा महिलेचा गर्भपात केल्याप्रकरणी येथील डॉ. मोहन फार्णे व संबंधित महिलेसह तिची बहिण, आई व वडिलांच्यावर इस्लामपूर पोलिस ठाण्यात गर्भपाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंजिनीअरिंगचे दीडशे विद्यार्थी सवलतीपासून वंचित

$
0
0
इस्लामपूरच्या प्रांताधिकारी स्नेहल बर्गे व तहसीलदार रुपाली सरनोबत मंगळवारी कार्यालयात हजर नसल्याने इंजिनीअरिंगच्या दीडशे विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या 'एआरसी' सेंटरवर फॉर्म भरता आले नाहीत. त्यामुळे सरकारी सवलतीपासून त्यांना वंचित रावे लागणार आहे.

'विम्बल्डनच्या हिरवळीवरून' क्रीडाप्रेमींसाठी अनोखा ठेवा

$
0
0
'केदार लेले यांना लिहिलेले विम्बल्डनच्या हिरवळीवरून हे पुस्तक म्हणजे क्रीडाप्रेमींसाठी एक अनोखा ठेवाच आहे,' असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे यांनी व्यक्त केले. या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभावेळी ते बोलत होते. जिल्हा क्रीडा अधिकारी नवनाथ फरताडे विशेष उपस्थित होते.

उत्तराखंडमध्ये अडकले ९५ यात्रेकरू

$
0
0
उत्तराखंडमधील विविध ठिकाणी जिल्ह्यातील जवळपास ९५ यात्रेकरु अडकल्याची अधिकृत माहिती बुधवारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे. त्यातील शिरोळ तालुक्यातील ३८, हातकणंगलेतील ४० तर कोल्हापूर शहरातील १७ जणांचा समावेश आहे.

महापौर नायकवडींच्या अर्जावर आक्षेप

$
0
0
सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीसाठी दाखल असलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी बुधवारी रात्री उशीरापर्यंत सुरू होती. सांगलीतील छाननीत मातब्बरांच्या अर्जांना धक्का बसला नाही, पण कुपवाड भागात माजी नगरसेवक इब्राहिम चौधरी यांच्यावरील अर्जावरील निर्णय काही काळ राखून ठेवला होता.

सरकारचे कान टोचा

$
0
0
टोलला सार्वत्रिक विरोध असतानाही सरकार नमते घेत नसल्याने या प्रश्नावर जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांनी सरकारचे कान टोचावे, अशी मागणी टोल विरोधी कृती समितीच्या बैठकीत करण्यात आली. टोलचा प्रश्न न सुटल्यास सत्ताधाऱ्यांना २०१४ मध्ये पायउतार व्हावे लागेल असा इशाराही देण्यात आला.

सरकारी कर्मचारी पाळणार लक्षवेध दिन

$
0
0
सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने दिड वर्षांपासून दुर्लक्ष केल्याबद्दल २१ ऑगस्ट रोजी लक्षवेध दिन पाळण्यात येणार असून अधिकारी सर्वांसोबत असतील, असे महाराष्ट्र राज्य राज​पत्रित अधिकारी महासंघाचे सर​चिटणीस ग. दि. कुलथे यांनी सांगितले.

पावसाचा जोर ओसरला

$
0
0
गगनबावडा वगळता जिल्ह्यातील पावसाचा जोर बुधवारी ओसरला असून कोगे येथील बंधाऱ्यावरील पुराचे पाणी ओसरले. गेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी १७.९५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. अजूनही ९ मार्ग अंशतः बंद असून ७ बंधारे पाण्याखाली आहेत.

दारु पिऊन त्रास देत असल्याने भावाचा खून

$
0
0
दारु पिऊन आई-वडिलांना त्रास देत असल्याने मोठ्या भावाचा खून केल्याची कबुली महेश महादेव कोळी (२४, वारे वसाहत) याने पोलिसांना दिली. गवंडीकाम करणाऱ्या योगेश कोळी (२८) याचा मृतदेह कसबा तारळे (राधानगरी) येथे सोमवारी (दि.१७) आढळला होता.

शहरातील नववा खून

$
0
0
लक्ष्मीपुरीतील रिलायन्स मॉलनजीक बुधवारी सकाळी शकुंतला महादेव जाधव (६५) या देवदासी महिलेचा डोक्यात दगडासारखी जड वस्तू टाकून खून केल्याचे आढळले. डोक्यात दगड घालून खून झालेली ही नववी घटना आहे.

सीरियल किलरची 'मर्डर मिस्ट्री' उलगडेना

$
0
0
डोक्यात दगड घालून खून करण्याची मोडस ऑपरेंडी असलेला पहिला खून नोंदविण्यात आला तो १० मार्च २०१३ रोजी. कोल्हापुरातील सीरियल किलिंग प्रकरणाच्या शंभराव्या दिवशी बुधवारी (१९ जून) लक्ष्मीपुरीत झालेल्या खुनाने ही श्रृंखला अद्याप सुरूच असल्याचे स्पष्ट झाले.

सिटी मेडिकल हॉस्पिटलमधील डॉक्टरची आत्महत्या

$
0
0
येथील सिटी मेडिकल हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉ. विक्रम सूर्यकांत साळुंखे (वय २८, मूळ रा. लोटे,ता. खेड जि. रत्नागिरी) यांनी या हॉस्पिटलमध्येच मंगळवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

इ- मीटर नसलेल्या रिक्षांचे परमीट रद्द

$
0
0
रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्यासाठी ३० जूनपर्यंत अखेरची मुदत आहे. त्यानंतर इ-मीटर नसलेल्या रिक्षांचा परवाना निलंबित केला जाणार असल्याचा इशारा प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे यांनी दिला आहे.

आठवडाभरात पे -पार्किंग

$
0
0
महापालिकेने १३ पैकी ८ ठिकाणी पे पार्किंगचा ठेका दिला असून पुढील आठवड्यात दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंगसाठी शुल्क आकारणी सुरू होईल. आठ ठिकाणच्या ठेक्यांमधून महापालिकेला ५५ लाखाची घसघशीत कमाई होणार आहे.

भरधाव डंपरची दोन मोटारसायकलना धडक

$
0
0
भरधाव डंपरने रस्त्याकडेला लावलेल्या मोपेडसह मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन नातवांसह आजोबा उडून रस्त्यावर आदळून जखमी झाले. डंपरने मोपेडला सुमारे पाचशे फूट फरफटत नेले. दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली.

'सिरियल किलर'ला अटक

$
0
0
कोल्हापूरमध्ये मागील तीन महिन्यात एकसारख्या पद्धतीने झालेल्या नऊ हत्यांच्या प्रकरणात पोलिसांनी दिलीप लहेरिया नावाच्या संशयिताला अटक केली आहे. शाहूपुरी पोलीस त्याची चौकशी करत आहे.

जनतेच्या दरबारात येण्यास जयंतराव घाबरले

$
0
0
‘मला मिळत असलेली लोकप्रियता, माझे वाढत असलेले पाठबळ आणि मी काँग्रेसमध्ये गेल्याने झालेली राष्ट्रवादी काँग्रेसची वाताहत यामुळे जयंत पाटील आणि यांचे सहकारी अस्वस्थ झाले असून, त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, अशी टीका महापौर इद्रिस नायकवडी यांनी गुरुवारी केली.

महापौर इद्रिस नायकवडींचाच अर्ज अवैध

$
0
0
सांगलीचे विद्यमान महापौर इद्रिस नायकवडी यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी शिंदे यांनी गुरुवारी छाननीत अवैध ठरवला. प्रभाग क्र. ३० मधून नायकवडी निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images